बागकाम - अमेरीका २०१७

Submitted by स्वाती२ on 28 January, 2017 - 13:20

बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.

परागिभवनात मदत करणार्‍या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिलाडेल्फिया फ्लॉवर शो येऊ घातला आहे . यंदाची थीम HOLLAND: Flowering the World अशी आहे.
मार्च ११ ते १९ . अधिक माहितीसाठी https://theflowershow.com/plan-your-visit

हॉर्टिकल्चर सोसायटीचे आणि मास्टर गार्डनर्स प्रोगॅमचे स्वयं सेवक बागकामाविषयी शंका निरसन करायला हजर असतात.

सध्या थंड हवेमुळे अनंत, जाई, मोगरा, तुळस ही झाडे घरात आहेत. प्रॉब्लेम असा आहे की आमचा बोका त्यांत जाउन बसतो आणी नासधुस करतो. कधीकधी सुसुही करतो. खुप जड आहेत काही कुंड्या त्यामुळे उंचावर ठेवणे शक्य नाही आणि तसाही तो चढु शकतो कुहीही. एखादे रिपेलंट औषध आहे का किंवा घरगुती रेपेलंट जे झाडांना हार्म करणार नाही.

रीपेलंट माहिती नाही पण लहान मुलांसाठी सेफ्टी गेट / प्ले एरिया एन्क्लोजर असे काही ठेवून बोक्याला मज्जाव करता येईल

थंडी जवळजवळ गायब झाल्याने सगळ्या बल्ब्जना पान फुटली आहेत. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच फुलं येणार असं वाटतं आहे.
कॉस्कोत स्प्रिंग बल्ब्ज पण मस्त आले आहेत. ते एलिफंट इअर (आळूच्या पानांसारखे दिसतात) ते घ्यावे का असं वाटतंं आहे.

राया, घरात अगदी लहान मुले नसतील तर गुलाबाच्या काटक्या कुंड्यांमध्ये खोचून, पसरून पहा. मला हा उपाय सश्यांना दूर ठेवायला उपयोगी पडला होता. माती बदलताना, खत घालताना हातमोजे वापरा.

कुंड्यांची माती कोरडी भुसभुशीत झाली आहे का? रोज सकाळी पाणी स्प्रे करा, ओल्या मातीत नाही शू करणार. काटे लावण्याचा उपाय नंतर करा , हा चालला नाही तर.

मी न्यू जर्सीत रहातो.
मला तुळस लावायची आहे - भारतीय किराणा मालाच्या दुकानात मिळणार्‍री रोपटी लावून पहिली, कधी ती तुळसच नसते तर कधी लवकर मरते.
तसेच portulaca नावाची फुले लावायची आहेत. व इतर फुलझाडे लावायची आहेत. यांना पॉटिंग सॉइलच लागते की साधी माती चालेल?
बाहेर चांगल्यापैकी गुलाब व इतर पेरेनियल झाडे लावायची आहेत. मार्गदर्शन करावे, धन्यवाद.

नन्द्या४३,
तुलशीचे बी लावल्यास छान रोपं तयार होतात. तुम्ही न्यूजर्सीत आहात तर ओळखीत कुणाकडे बी आहे का ते विचारा किंवा http://www.seedsofindia.com/ इथे विचारा. नाहीच मिळाले तर माझ्याकडे बी आहे. नाव,पत्ता दिल्यास मी पाठविन. साधारण मदर्सडे नंतर कुंडीत बी पेरा आणि पाणी घाला. कुंडी अर्धवट ऊन मिळेल अशा ठिकाणी बाहेर ठेवा. भरपूर रोपं तयार होतील.
फुलझाडे कुंडीत लावणार असाल तर निम्मी टॉप सॉइल आणि निम्मी पॉटिंग सॉईल एकत्र करुन त्यात लावा. portulaca आणि इतर अ‍ॅन्युअल्सची तयार रोप त्यात लावता येतील.
गुलाब आणि पेरेनियल्स जमिनीत लावण्याआधी सॉइल टेस्ट करुन घ्या. तुम्ही बागेत जिथे झाडे लावणार आहात तिथे ऊन किती येते त्यावर झाडांची निवड करा.
https://njaes.rutgers.edu/mastergardeners/ ही तुमच्या भागातील मास्टर गार्डनर्स ची साईट आहे. मास्टर गार्डनर्स मंडळी लॅन्ड ग्रांट युनिवर्सिटीचा कोर्स पूर्ण करुन वॉलेंटिअर म्हणून काम करतात. बागकासाठी तुमच्या भागाला योग्य असे मार्गदर्शन त्यांच्याकडे मिळेल.

बाहेर चांगल्यापैकी गुलाब >> नॉक आउट रोझेस नावाचे हायब्रिड मिळतात गार्डन सेंटर मधे. रंग एक - दोनच मिळतात. पण एकदम हार्डी, फारशी देखभाला करावी लागत नाही.
बाकी गुलाबांच्या झाडांची फार काळजी घ्यावी लागते - हरणे , जपानी बीट्लस, ग्राउंंड हॉग असे पेस्ट्स, ब्लॅक स्पॉट्स इन्फेक्षन, उन कमी पडणे , पाणी पुरेसं न मिळणे, माती चांगली नसणे असे अनेक व्याप.

तरिही लावायचेच असतील तर १२-१८ इंच माती खणून काढून त्या जागी चांगली टॉप सॉइल + ऑर्गॅनिक मॅटर असे मिक्स घाला आधी. दिवसाचे ६-८ तास प्रखर उन मिळेल, ऑगस्ट महिन्यात पाणी द्यायला होज पोचेल अशी जागा निवडा.

फुले येणारी पेरेनियल हवी असतील तर
फोरसिथिया / लायलॅक ही एप्रिल मधे फुलतील
ब्लॅक आय सुझन, कोन फ्लावर्स ही लेट स्प्रिंग / ऑल समर फुलतील
रोझ ऑफ शॅरन लेट समर,

वरती स्नेहाने लिहिलेले एकदम बरोबर आहे. मी दोन वर्षापासून गुलबक्षी लावत आहे. ससे वगैरे अज्जिब्बात तोंड लावत नाही. ज्यांच्याकडे हरिण , सशांचा उपद्रव आहे त्यांनी जरूर ट्राय करा. फक्त गुलबक्षी सगळीकडे पेरिनिअल नाही. ९/१० सोडून अ‍ॅन्युअल आहे . पण बिया पडतात आणि पुढच्या वर्षी परत रोपे उगवून येतात . आपल्या झेंडू सारखी.
आणखी एक म्हणजे अमेरिकेत रहाणार्‍यानी लक्षात घ्यायला पाहिजे कि फुल उमलायला साधारण ८ नंतर सुरुवात होते. कारण आपल्याकडे उशीरा सुर्य मावळतो. पण त्याही पेक्षा तापमान जर ९५ च्या वर असेल तर फुल रात्री १०/११ शिवाय उमलत नाहीत. पण कळ्याही झुपकेदार छान दिसतात. भारतात ६ नंतर गुलबकावली फुलते त्यामूळ आपल्याला जरा वेगळ वाटत. वारा सुटला कि संध्याकाळी कळ्या उलगडाताना बघायला मस्त वाटायच.
अर्थात सशांचा त्रास नसेल तर मी गुलबकावली नक्कीच प्रेफर करणार नाही.

marvel of Peru म्हणजे गुलबक्षीच ना? >> हो म्हणून ? नाहिये माझ्या वाक्यानंतर.

मी भेंडी आणि वाल पेरलेली गेल्या आठवड्यात पण सगळ्या बीया खारुड्या किंवा मोल्स ने खाऊन टाकल्या Sad मी बीया पेरल्यावर वरुन तारांची चिकन वायर पण टाकलेली तरी खाल्ल्या. मेथी ठेवलीये अजून पण पानं आल्यावर किती राहील माहीत नाही.

अमेझॉनवरून मोगरा मागवला आहे. एकदम पिल्लु रोपं आहेत. मला मोठी रोपं असती तर बरं वाटलं असतं. आमच्याकडे थंडी पाहता एकंदरित घरातच रुजवावी असा विचार आहे. काही टिप्स?

गुलबक्षीला पेरिनिअल सोडून एकदम अनुमोदन. काहीही काळजी करावी लागत नाही. आणि चिक्कार म्हणजे चिक्कार फुलं येतात.

भरपूर उन / उजेड मिळेल अशा जागी ठेवा मोगरा. ड्राफ्ट पासून दूर ठेवा. पाण्याचा नीट निचरा होईल अशी माती हवी- जास्त क्ले असलेली नको. एप्रिल पासून ऑ़क्टोबर पर्यंत दर १५ दिवसांनी थोडे मिरॅकल ग्रो पाण्यात मिसळून देत जा. ( पाकीटावर प्रमाण लिहिलेले असते ) कुंडीतली माती पूर्ण कोरडी होऊ देऊ नका.

वेका अमेझॉन वर $७.९९ ला आहे ४'' ते का?(लिंक पेस्ट करता येत नाहीये इथे) मागच्या वर्षी मी होम डेपो मधुन घेतल होत पण टिकल नाही. Sad

भरपुर गुलबक्षीच्या बीया ज्यांना लावायच्या आहेत त्यांच्यासाठी:
अ‍ॅमेझॉनवर अतिशय स्वस्त आहे. मी तिथुन मागविल्या. मोठ पॅकेट येत.
यावेळी सीड्स ऑफ ईंडिया वरून मुळ्याच्या शेंगाच्या बीया मिळाल्या. बघू उगवून येतात का .

इकडे ओर्नॅमेन्टल पेअर आणि प्लम वगैरेच्या बहराची यावेळी वाट लागली गेल्या स्नो मुळे. Sad
बहुतेक कळ्या झडल्यावर आता सीझन भर कसं होणार या झाडांचं? खराटेच राहणार का? की पुन्हा येतात कळ्या ?

Pages