आतला माणूस जो आहे फरारी
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
5
आसमंती घ्यायची आहे भरारी?
फेड आधी या धरेची मग उधारी
शोधतो दाहीदिशांना काय जाणे?
आतला माणूस जो आहे फरारी
मागण्या आधी मिळाले सर्व काही
हात माझे छाटले मी; खबरदारी !
कागदी नावेस का माहीत नाही?
दीपस्तंभ एकही नाही किनारी
वाहवत जातो कुणी नेईल तेथे
आपल्याला आपली मग ये शिसारी
- परागकण
प्रकार:
शेअर करा
शोधतो दाहीदिशांना काय
शोधतो दाहीदिशांना काय जाणे?
आतला माणूस जो आहे फरारी
सुरेख!
मस्त!
मस्त!
सुंदर !
सुंदर !
पिके मस्त आहे रे. आवडाली.
पिके मस्त आहे रे. आवडाली.:)
Dhanyawad!
Dhanyawad!