तुम्हाला॑ दैनंदिन जीवनात वन्य प्राण्यांचा कधी सहवास लाभलाय का? तुम्ही त्यांच्या कितपत जवळ गेले आहात? तुम्हाला काही अतर्क्य अनूभव आलेत का? असल्यास जरुर शेअर करा. खरे तर आपले वेमा, अजय यांचाही असा एक अनूभव आहे. पण मी भारतातल्या बद्दल बोलतेय. कारण लहानपणापासुन आपल्या सहवासात आलेले भुभु आणी माऊ तसेच हम्मा व बकरी सोडले तर इतर वन्यजीव जवळ यायची शक्यता कमीच किंवा दुर्मिळ. कधीतरी घरात वा घराजवळ निघालेले विषारी साप सोडले तर आम्हालाही असे अनूभव फार आले नाही.
पण माझा मामा, स्वारगेटजवळ जेव्हा रहात होता, तेव्हा माकडांच्या आणी वानरांच्या झुंडी मात्र यायच्या त्या कॉलनीत. पेरु, जांभळे, आंबे खाण्यासाठी ही वानरे नुसती हैदोस घालायची. मी लहानपणी वानरांना फार घाबरायचे.मामाकडे रात्री जेवायला बसले की मागच्या दाराच्या अंधारात पहायला पण घाबरायचे.
अजूनही मला हे आठवले की हसू येते. एकदा जळगावला काकुकडे गेलो तेव्हा ती म्हणाली की चला मेहेरुण तलावाकडे फिरायला जाऊ. मग गेलो तिथे. तिथे भेळ घेतली, चुलत बहीण म्हणाली इथे वानरे दिसतील. मी अवाक! मग खरच तिथे काही वानरे आली. मी हातात चुरमुरे घेतले, एक वानर जवळ आले त्याने ते वेचुन खाल्ले. पण जेव्हा मी त्याच्या डोक्यावर हात फिरवायला गेले ( कुत्रे व मांजराला करतो ना तसे) तर ते भयानक पद्धतीने दात विचकुन माझ्या अंगावर आले. मी भयंकर घाबरले. त्यानंतर मी कधी हिम्मत केली नाही.
पण आता मागच्या आठवड्यात घरी ( माहेरी ) गेले, तेव्हा बरीच पाणी टंचाई होती तेव्हा आम्ही मागच्या वाड्यातुन पाणी घ्यायला आलो तेव्हा २ वानरे मागच्या हॉटेलजवळ बसली होती. आधी आम्ही त्याना पाहुन खुश झालो, लहान मुले पण खुश! त्या पाणीवाल्या वहिनीनी एका बादलीत पाणी ठेवले, मग एक मोठे वानर येऊन ते पाणी प्यायले. नंतर आमच्या शेजार्यांनी त्यांना खायला म्हणून लादी पाव फेकले, तर ते वानर अंगावर धावुन आले. आमच्या बरोबर आमच्या शेजार्यांची सून व तिची २ वर्षाची मुलगी उभी होती. मी आधी त्या सुनेला, माझ्या आईला व मुलीला घरात पळायला सांगीतले. पण माझी आई, माझी मुलगी व ती सून ( सारीका) काही जागच्या हलेनात.:अरेरे: मग मी तिच्या मुलीला घेऊन बिल्डिंगमध्ये पळाले.
त्या दरम्यान वरतुन माझ्या मुलीने केळे आणुन त्या वानराकडे टाकले, त्यामुळे ते जाईच ना. इकडे ओरडुन मी हैराण! माझी आई, मुलगी व माझी सासु तिघी एकाच जातकुळीतल्या असल्याने त्या कधीही कुणाचे चांगले सांगीतलेले ऐकत नाहीत.:राग: त्यामुळे माझा सिंघम होऊन बर्याच वेळा सटकते. मग पलीकडल्या मुलाचे कुत्रे भुंकायला लागल्यावर ते वानर पळाले. तरी पण मला त्याची चांगलीच दहशत बसली होती.
मागे आमच्या शेजार्यांच्या नातीला झू मध्ये माकड हाताला चावले होते. त्या माकडाने तिचा हातच आधी पकडला होता. हे ऐकुन मला माकडांची भीतीच बसलीय. सर्कशीनिमीत्त हत्ती, वाघ, सिंह पाहीलेत तेही बंद पिंजर्यातच. पेशवे पार्कमध्ये गेलो ते लहानपणीच.
एकदा ओळखीच्यांबरोबर निगडी येथे अप्पु घर व भक्ती-शक्तीला गेलो होतो. नवरा म्हणाला घोड्यावर बसुन बघ. मी आधी कधी बसलेले नव्हते त्यामुळे घोडा पळायाल लागल्यावर माझे धाबे दणाणले, मी आरडा-ओरडा करुन घोडेवाल्या मुलाला घोडा थांबवायला सांगीतला. सगळे हसत होते, पण मी परत कधी बसले नाही. नंतर तिथेच दुसर्या वेळी टांग्यात बसलो ( आधीची दहशत होतीच ) पण घोड्याला काय झाले माहीत नाही, तो झिगझॅग पळत सुटला. गाडीवाल्याला आवरेना. एकतर रस्त्यात गाड्या सुसाट होत्या, त्यातुन हे ध्यान उधळलेले. त्यामुळे बाकी सर्व मजा बंद करुन घरी आलो एकदाचे.
तुमचे अनूभव वाचायला आवडतील.
एक भयानक विडीओ पाहिला कोणत्या
एक भयानक विडीओ पाहिला कोणत्या ताडोबा की कुठल्या आठवत नाही... पण ओपन जीप्मधून पर्यटक चालले आहेत. आणि वाघ अगदी खूप त्यांच्या गाडीजवळ येतो. मला हे असं फारच भितीदायक वाटते.. पर्यटक पिंजर्यात पाहिजेत... असे ओपन एरियातले प्राणी बघायचे तर...
Pages