पर्यावरणाच्या मुळावर विकास

Submitted by विठ्ठल on 2 March, 2016 - 08:22

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-दिल्ली कॉरीडॉर साठी 'Mumbai Metropolitan Region' ५६ हेक्टर वनजमिनीवर पाणी सोडणार आहे.

अधिक माहिती : http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Forest-department-clears-...

विकास हवाच पण पर्यावरणाचा नाश करुन तो मिळ्वायचा कां, या विषयावर आपली मते मांडावित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्ताधार्यांना अपशकुन करण्यासाठीच फक्त, सत्ताधार्यांकडुनच्या होऊ पहाणार्या विकासास अडथळा आणण्याकर्ता विरोधीपक्षीय राजकारणी "पर्यावरणास फक्त निमित्तमात्र " वापरित आहेत असे माझे मत.
अशाच प्रकारे विरोध व खटले दाखल केले गेले होते मुंबैपुणे एक्स्प्रेस वे च्या वेळेस.... कारण योजनाकर्ते होते शिवसेनेचे नेते व हिंदुहृदयसम्राट .......
विरोधात बसण्याचा अति कंटाअळा आलाय, अन कधी एकदा सत्तेत जातोय या भावनेमुळे, आंदोलनास व त्यानिमित्ताने पब्लिकच्या पुढे नाव गाजन्यास निमित्त मिळवायला ती कोणचीशी भुतांची सेरियलही चालू शकत्ये. अन यावेळेस यात "शिवसेनाही" हिरिरीने सहभागि असे चित्र.. Lol
आता तर काय? मोदीविरोधाची झिंग अगदी टीपेला पोहोचलेली असल्याने केंद्र/राज्य सरकार जे काय जहिर करेल त्याविरोधातच बोल्ले पाहिजे असा बहुधा "व्हीप" असावा त्यांच्या तरुण तडफदार(??) पक्षाध्यक्षांचा.... Proud

वाट तर लागलिय पर्यावरणाची मुंबै पुणे हाय्वे ने. दरडी कोसळणे, अपघात, पहाड कमकुवत होणे आदी गोष्टी झाल्यात.

विकासाला अंत नाही, तद्वत पर्यावरणाचा ह्रास अपरिहार्य आहे. आपापल्या घरांमध्ये एकवार नजर फिरवल्यास आपणही त्याला किती हातभार लावलेला आहे तेही कळून चुकेल. मुळ मुद्दा लोकसंख्या नियंत्रण, त्यावर कुणाकडेही उपाय नाही. खाणारी तोंडे वाढल्याने, एकाची दोन/तीन/चार घरे झाल्याने जमिनीचा तुकडा कमी पडायला लागलाय. तेंव्हा जंगल तोडून शेतीसाठी डोंगर सपाटीकरण सगळीकडे चालू आहे. त्यामुळे यात फक्त सरकारच जबाबदार नाही.

एखाद्या डोंगराच्या कुशीतली वस्तीने किती दिवस शहरातील रंगीबेरंगी जीवनाला फक्त लांबूनच पाहायचे?

नाशिक कडील सातमाळा रांगे सारखे सगळे डोंगर बोडके आहेत. दुरदुरवर एकही झाड दिसत नाही. धोडप किल्ल्याच्या पायथ्याला हट्टी नावाचे गाव आहे, इथला खवा नाशिकमध्ये प्रसिद्ध. पण त्या खव्यासाठी, डोंगरावरील सगळी झाडे अगदी मुळासकट तोडून टाकण्यात आली आहेत. बेचिराख करून झाल्यावर खवेवाल्यांनी आपला रोख दुसरीकडे वळवला आहे.

आता धार्मिक रंग देऊया:-
सप्तशृंगी, एकवीरा, मांगी तुंगी, कळसुबाई, मलंगगड यासारख्या उंचावरील ठिकाणावर वावर वाढल्यामुळे खालचा कचरा वर आणून टाकला जातो.

माळशेजसारखा 'virgin' घाट परिसर पण यात भरडला जातोय. MTDC च्या लॉजमधील सांडपाणी थेट दरीमध्ये सोडलेले आहे.

स्पष्टच बोलायचे तर कॉन्ग्रेस आणी भाजप्+शिवसेना तसेच राष्ट्रवादी हे सारे पक्ष हलकट आहेत.>>>>> +१००००
कोणालाही नावजायला नको. सगळे शेवटी राजकारणी आहेत. आज तळ्यात, उद्या मळ्यात! Wink Wink Wink

>>>> आपापल्या घरांमध्ये एकवार नजर फिरवल्यास आपणही त्याला किती हातभार लावलेला आहे तेही कळून चुकेल <<<< अगदी अगदी....
जे काम एखाद दोन टामरेलात होऊ शकेल ते करन्याकरता संडासात फ्लश करतो तर तिनचार लिटर पाणी दरवेळेस वाया घालवतो आपण,
झुरळे/किडामुंगी मारण्याकरता जी जी विषारी द्रव्ये फवारतो, डासांकरता उदबत्या /इलेक्ट्रिक उपकरणे लावतो, उंदरांकरता चिकटप्लेटी वापरतो त्यानेही "पर्यावरणाचा र्हासच" करत असतो आपण.. झालच तर एसी गाडीच्या गारव्यातुन फिरताना दीडपट इंधन जाळुनही पर्यावरणाचाच र्हास होत असतो ते आमच्या गावीही नसते.... . Proud

आयला, ज्यांनी आयुष्यात कधी मुठभर मातीमधे हात घातलेला नसतो, कधी वीतभर खोल खणलेले नसते, आयुष्यात मनीप्लॅण्ट्/तुलसी अन चुटुरफुटुर फुलझाडां व्यतिरिक्त एकही झाड्/वृक्ष वाढवुन जोपासलेले नस्ते, आयुष्यात कधी विहीर्/ओढ्यावरुन लांबुन डोक्यावरुन वाहुन आणून पाणी भरलेले नसते, ती लोक पर्यावर्णाबाबत बोलतात.... काय विनोद आहे... !

केवळ अती श्रीमंत लोक खरेदी करू शकतील अशा कॉलोनिज जंगल तोड करून बांधणे आणि सरकारने जंगलतोड करून रस्ता बांधणे यात काहीही फरक नाही का? असो.

देशाच्या चार कोन्यातली चार शहरे जोडण्यासाठी जो चौरस्ता बांधला गेला त्यात हजारो झाडे तोडली गेली. त्या रस्त्याचा फायदा आज सगळ्यांनाच होतोय ना?

लिंबूजी मी वर हेच लिहिलेय। रोज आपण जेवढे पर्यावरण भक्षण करतोय त्यापुढे असले प्रकल्प काहीच नाही. असो.

भारत त्याच्या पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूराष्ट्रांशी स्पर्धा करताना त्यांच्यासारखाच होऊ पाहतेय हे दुर्दैव आहे.
भारताचा पाकचीनस्तान होऊ नये ..

विठ्ठल, स्पष्टच बोलायचे तर कॉन्ग्रेस आणी भाजप्+शिवसेना तसेच राष्ट्रवादी हे सारे पक्ष हलकट आहेत, म्हणजे यातली माणस. वरुन दुष्मनी असते यान्ची, पण स्वार्थ असला की आतुन लग्गेच साटे-लोटे होते यान्चे. ठाकरे आणी शरद पवार यान्ची मैत्री अशीच होती. दाखवायचे वेगळे अन खायचे वेगळे. बास लोकाना लुबाडा आणी स्वतच्या सात पिढ्यान्ची सोय करुन हात झटका.

>>>>>>

हो तर, भुजबळांच्या मागे लागायचे आणि शरद पवारांशी गळाभेट घ्यायची. नुसते ड्रामे स्टंट नौटंकी. पण हे समर्थकांनाही समजते. पण ते देखील आपली पोळी कशी भाजली जाईल याच विवंचनेत असतात. म्हणून मला कोणी अमुक तमुक पक्षाचा निष्ठावान दिसला की माझा त्या माणसावरून विश्वासच उडतो.

>>> कॉन्ग्रेस आणी भाजप्+शिवसेना तसेच राष्ट्रवादी हे सारे पक्ष हलकट आहेत, <<<< यात "कम्युनिस्ट" का नाही धरले? Proud का ते तेव्हडे सोवळे का? अहो मुळात लोकशाहीवरुन विश्वास उडावा लोकांचा, हीच तर असले विचार पसरविण्याची कम्युनिस्टांची खेळी असते..... अन आपण कनिष्ठ अन मध्यमवर्गीय फसतो त्यात.... अन त्यांचीच री ओढत राजकारणी अन लोकशाहीचा "अनुल्लेख करीत" मतदानाच्या वेळेस घरात अंडी उबवत बसण्यात भुषण मानतो.... कम्युनिस्टांची खेळी यशस्वी होत जाते, जिथे यशस्वी होत नाही, तिथे "नक्षली/वा तत्सम " असतातच.....

>>>> म्हणून मला कोणी अमुक तमुक पक्षाचा निष्ठावान दिसला की माझा त्या माणसावरून विश्वासच उडतो. <<<<
Lol
अन मला कोणी राजकीय पक्ष म्हणजे गॉन केसेस म्हणणारा दिसला की मी समजुन चालतो की याचे लाल "ब्रेनवॉश" झालेले आहे पूर्ण... Proud

कम्युनिस्ट विचारात काय वाइट आहे. उलट उजव्या विचारांच्या व्यक्तिपेक्षा डावे हे अभ्यासु नि मानसिकद्रुष्ट्या सक्षम वाटतात

अज्जीबात नाही लिम्बुभाऊ. सामान्य माणसाला रोजच्या जेवणाची पडलेली असते, मग कशाला डावे-उजवे करत बसेल?

बाकी राजकारणाच्या बाबतीत माझा एकच आदर्शः- भगवान श्रीकृष्ण, जय हो!

अन मला कोणी राजकीय पक्ष म्हणजे गॉन केसेस म्हणणारा दिसला की मी समजुन चालतो की याचे लाल "ब्रेनवॉश" झालेले आहे पूर्ण... 
>>>>>>>

आणि याव्यतीरीक्त तिसरी व्यक्ती अस्तित्वातच नसते होय ना Happy

बायदवे हा लाल काय प्रकार आहे जे माझा ब्रेनवॉश करायला टपलेत.
मला तर आजवर भगवा आणि हिरवा हेच दोन माहीत होते.

>>>> उलट उजव्या विचारांच्या व्यक्तिपेक्षा डावे हे अभ्यासु नि मानसिकद्रुष्ट्या सक्षम वाटतात <<<<
Uhoh
हे तुम्ही बोलताय पगारे साहेब? पार्टी बदलललीत का? की युती झाली डाव्यांबरोबर? असेल असेल... Wink
पण तुमच्या माहितीकरता, कॉन्ग्रेस व बीजेपी हे "उजवे" पक्ष मानले जातात बर्का.... अन अर्थातच त्यांचे पक्षाध्यक्षही.....

>>>> उदारमतवादी डावेपणा हा आपल्यासारख्या देशासाठी योग्य आहे. <<<
माफ करा पगारे साहेब या धाग्याचा विषय नाही, पण सांगुन टाकतो की डाव्यांमधे "उदारमतवाद" वगैरे काहीही नसते... ते फक्त अन फक्त डावेच असतात...... पूर्वीही त्यांना समजायच्या चुका झाल्यात हिंदीचिनीभैभै च्या वेळेस..... आता साठेक वर्षांनी पुन्हा त्याच चुका होऊ नयेत...... नै, बिहार मधे गोड गोड वाटले असेल आत्ता, पण सावधान... सांभाळा.... Happy असे मला कॉन्गी हायकमांडला सांगावेसे वाटते.

धागा थोडा रस्ता सोडुन आडवाटेला गेलाय हे खरे. माझःयामते पर्यावरणाच्या मुळावर जसा विकास येतोय तसेच विकासाच्या मुळावर पर्यावरण येत आहे.रस्ते, पुल, इमारति, रेल्वे लाइन, एअरपोर्ट बांधायचे तर जागा लागणारच नि पर्यावरणाची हानि होणारच. यावर दुसरा पर्यायही नाहि आहे.

>>>> विकासाच्या मुळावर पर्यावरण येत आहे <<<< सहमत.
देशाचे एकुण बांधकामरहित क्षेत्र व बांधकाम झालेले क्षेत्र, यांच्या क्षेत्रफळाची तुलना केली पाहिजे.
थोडे गुगल म्याप उघडुन बसले तरी कळेल की मुंबै पुणे एक्स्प्रेस वे च्या दोन्ही बाजुला कित्येक किमि मोकळी जागा आहे, जिथे वृक्ष लागवड्/तळी वगैरे बाबी होऊ शकतात. मुंबै पुणे वे चे एकुण क्षेत्रफळ १०० किमी गुणिले त्याची रुंदी इतके होईल, त्या तुलनेत मुंबै ते पुणे या अंतरात किती भूभाग तसाच पडीक दुर्लक्षित आहे? त्याचे प्रमाण किती? हे बघितल्यावर कळेल की कुणीतरी छू केले आपण सुद्धा पर्यावरणाच्या नावाने बोम्बा मारु लागतो. Happy

>>>> जैतापुर प्रकल्पही पर्यावरणाच्या नावाखाली रोखला गेलाय. <<<<
तो काय किंवा दाभोळ प्रकल्पास केला गेलेला विरोध काय, दोनही बाबी राजकीय मूर्खपणाच्याच वाटतात मला. Happy

मला जैतापूरची भीती यासाठी वाटते कि तिथे जपानसारखी काही दुर्घटना घडली तर तिथल्या लोकांना लगेच मदत मिळेल का याची शाश्वती वाटत नाही. नेते पळून जातील आणि जनता बळी पडेल. आणि याचे परिणाम दीर्घस्वरूपी असतील. आपल्याकडे सुरक्षा हि गोष्ट आपण खूप दुर्लक्षितो आणि ह्या खोडीमुळेच तिथे दुर्घटना घडेल अशी भीती वाटते. भोपाळ दुर्घटनेचे परिणाम लोक आजही भोगताहेत आणि ते लोक सोडून बाकी देश विसरूनही गेलाय ती घटना.

Pages