मायबोली गणेशोत्सव २०१५ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - 'छायांनी रेखियले चित्र तेच देखणे' (silhouette photography)" - समाप्त!

Submitted by संयोजक on 20 September, 2015 - 05:17

गणपती बाप्पा मोरया!
प्रकाशचित्रांच्या झब्बूत छायाचित्रांचं काय काम? कारण तसं बघायला गेलं, तर छायाचित्र हा प्रकाशचित्राच्या अगदी विरुद्ध शब्द... एकात चित्रवस्तूवर प्रकाश टाकून त्याचे रंग उजळवायचे, तर दुसर्‍यात त्याच चित्रवस्तूला एका घनगर्द छटेत सामावून घ्यायचं... या दोन्ही प्रकारांत तितकंच कसब लागतं आणि तितकीच रंगत असते.

अशी ही छायांनी रेखलेली देखणी चित्रं तुम्हांला उधळायची आहेत मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळून!

'छायांनी रेखियले चित्र तेच देखणे'

छायाप्रकाशाच्या या खेळाचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ कोणत्याही प्रखर प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर टिपलेल्या वस्तूंची / माणसांची / झाडांची इत्यादी प्रकाशचित्रे (इथे छायाचित्रे) अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-
Slide2_1.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सही फोटो आहे तो, सुहास्य.

सांताक्रूज बीच, कॅलिफोर्निया बोर्डवॉकवरील स्काय ग्लायडर :

फिशरमन्स वार्फ, सॅन फ्रान्सिस्को वरील एक कमान आणि त्यातून दिसणारे जहाज :

Pages