सुरुवात -२

Submitted by स्फिंक्स on 26 August, 2015 - 23:52

सुरुवात -२

मागचा भाग: http://www.maayboli.com/node/55155

कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. “झाली का रडारड सुरु या काव्याची? “ आत शिरत असणाऱ्या रघुनाथारावाना त्या म्हणाल्या.
“रडारड? काव्या तर कधीच झोपली. प्रवासाने थकली होती.” रघुनाथाराव पलंगावर बसत म्हणाले.
“मग आत्ता धावत कोण गेले? आणि तो रडण्याचा आवाज?” रेवतीबाई जवळजवळ ओरडल्याच.

=================================================================== ===

“कोण होते? मी तर आत्ताच तिथून आलोय, मला तर कुणीच दिसले नाही. तुम्हाला भास होत असेल. तसाही वय होत आलाय आपला.” रघुनाथराव मिश्कील स्वरात म्हणाले.
“हं... पुरे झाले चिडवणे. अजून पन्नाशीच्या जवळही नाही मी. त्या कीर्तीला सारखे ऐकवत असते म्हणून खरच म्हातारी नाही झाले.” रेवतीबाई फणकारल्या “आणि काय हो? कुठे गेला होता दुपारी? कित्ती वाट बघीतली.”
“अहो, मी,कीर्ती आणि काव्या मंदिरात गेलो होतो. इथे जवळच कृष्णाचे मंदिर आहे. छोटेसेच आहे पण खुप सुंदर आहे. आपणही जाऊ कधीतरी फिरत- फिरत”
“काही नको. मलाही नाही देवाला लागायचे किर्तीसारखे. ती असते देवासमोर सारखी तेव्हढा पुरे. मीही देव-देव करायला लागले तर घराचे वाटोळे होईल. एक काम होणार नाही” रेवतीबाईंनी ब्यागेतून शाल काढत आवाज हळू करत विचारले “त्या कीर्तीचे झाले का आवरणे? राहुल कुठे आहे हो? दिसला नाही जेवणानंतर.”
“आल्या-आल्या कुबट वास येत होता. तो कुठून येत होता ते शोधायला गेलाय.” रघुनाथराव म्हणाले
“कसला वास? बरेच दिवसापासून घर बंद होते म्हणून वास येत होता. उगाच माझ्या बाळाला कामाला लावले. जा घेवून या त्याला. थकला असेल तो.” रेवतीबाईंनी आवाज वाढवत हुकुम केला आणि रघुनाथराव राहुलला बोलवायला गेले.

“ती कीर्ती बसली असेल टाईमपास करत.” रेवतीबाईंची धुसफूस सुरु झालीच होती तेव्हढ्यात बाहेर परत पावलांचा आवाज झाला. रेवातीबाई शाल सावरत उठल्या आणि लाईट्स गेले.

“आता आले का मेणबत्ती शोधणं? त्या भवानीने कुठे ठेवली कुणास ठावूक?” रेवतीबाई चडफडत मेणबत्ती शोधायला लागल्या. अंधारात पायावरून काहीतरी गेल्यासारखे वाटले तशा त्या दचकल्या. “अगबाई, इतके दिवस बंद घर साप-बीप तर नाही न घरात? काहीतरी बुळबुळीत होते. पण हा कसला विचित्र आवाज घासल्यासारखा. सापाचा आवाज कसा असेल असा?”
“गारठा का वाढला? कोण आहे तिकडे? कीर्ती?” रेवतीबाईंना दरवाज्यावर एक स्त्रीची आकृती दिसली आणि त्यांनी हाक मारली “कीर्ती, मेणबत्ती दे ग जरा. आता या म्हातारपणी धडपडले ना तर तुम्हालाच सांभाळावा लागेल बघ.”
“अरे.... ही कीर्ती जागेवरची ढिम्म हलत नाहीये. कसला माज आलाय कुणास ठावूक. थांब आत्ता सरळ करते हिला.”
“काय गं ए.. ” रेवातीबाई काही बोलायच्या आतच त्यांना कुणीतरी धक्का देवून खाली पाडलं. त्यांनी मागे वळून बघितला तर मागे कुणीच नव्हतं.खिडकीतून पौर्णिमेचे टिपूर चांदणे आत येत होते. खिडकीतून फक्त वठलेले झाड दिसत होते. हवा म्हणावी तर खिडकीवरचे पडदेसुद्धा हलत नव्हते.
“ मी हवेनी पडण्यासारखी राहिले का आता? मग धक्का कुणी दिला?”रेवातीबाई गोंधळल्या. आणि दाराकडे बघितले, ती आकृती तशीच उभी होती. “तुझी म्हातारी सासू पडली आणि तिला बघत राहिलीस. मदत करायचे सोडून सासूला घाबरवतेस? थांब. चांगला धडा शिकवते. अस्सा समाचार घेते” रेवातीबाई तिरमिरत उठणार तेव्हढ्यात
खिडकीचे तावदान एकमेकांवर आपटू लागले आणि दारे वाजू लागल्या. वारा तर नव्हता, मग हे असे का होतेय ते रेवतीबाईंच्या लक्षातच येत नव्हते.आता मात्र त्यांना घाम फुटला होता. आणि खुप भीती वाटायला लागली. “अहो.... “त्यांनी खाली बसल्या-बसल्याच हाक मारायला सुरुवात केली. “राहुल.....”
परत एकदा काहीतरी बुळबुळीत पायावरून गेले आणि रेवतीबाईंच्या तोंडातून आवाज फुटणे बंद झाले. त्या डोळे फाडून दारातल्या आकृतीकडे बघत होत्या. अचानक ती आकृती गायब झाली. बाहेर धावायचे आवाज येवू लागले. रेवतीबाईंच्या हातापायाला घाम फुटला.

तेव्हड्यात राहुल आणि रघुनाथराव दारातून आत आले. आणि खाली पडलेल्या रेवतीबाईंकडे आश्चर्याने बघत राहिले. “तिथे... तिथे काहीतरी होते.” रेवतीबाई बोट दाखवत म्हणाल्या ”कीर्ती... कीर्ती होती.”
“कीर्ती कशी असेल? ती तर स्वयंपाकघरात आवराआवर करत होती. आम्हीं तिथूनच मेणबत्ती घेवून आलो आणि ती झोपायला गेली.” रघुनाथराव रेवतीबाईंना उठवत म्हणाले.
“त्या काळ्या मांजरीवर पडता-पडता वाचलो. ती कधीची घुटमळते आहे किर्तीभोवती” राहुल मेणबत्ती लावत म्हणाला.
“ती टवळी आहेच का? दुधासाठी घुटमळत असेल” रेवातीबाई नॉर्मल होत होत्या.
“हो न. कीर्तीचा भारी लळा लागलाय तिला. आत्ताही तिच्या खोलीच्या दाराशी बसली आहे. पण तुम्ही खाली काय करत होत्या?” रघुनाथरावांनी विचारले.
“अहो, मी काय हौस म्हणून खाली बसले होते का? काहीतरी मुर्खासारखे बोलू नका. त्या कीर्तीने मनात भरवले आहे कि वाडा अशुभ आहे , म्हणून असे भास होत आहेत.” रेवतीबाई फणकारल्या.

अचानक कुणाचीतरी किंकाळी ऐकू आली आणि तिघेही दचकले. तिघेही दरवाज्याच्या दिशेने बघायला लागले आणि दरवाज्यात ज्वाळेचा प्रकाश दिसला. जणू काही बाजूच्या खोलीला आग लागली होती. आग विझवायला राहुल आणि रघुनाथराव पुढे सरसावले. पण रेवातीबाई जागाच्या जागी गोठल्या. पुन्हा एकदा ती आकृती दाराजवळ होती. पण या वेळेस ती आकृती स्वतःच आगीत होर्पलाल्यासारखी दिसत होती. एक जीवाच्या आकांताने प्रयत्न करणारी काळी आकृती आणि तिच्या आजूबाजूला वेढणाऱ्या ज्वाळा असे दृश्य दारासमोर दिसत होते. आता तिघेही डोळे फाडून दारातल्या आकृतीकडे बघत होते.

पुन्हा एकदा किंचाळी ऐकू आली.आता दारासमोर काही नव्हते. आकृती आणि ज्वाळा गायब झाल्या होत्या.
“मला हे काहीतरी काळ-बेर दिसतंय” रघुनाथराव काळजीत म्हणाले.”आधी या खोलीतून बाहेर निघू या.” घाईघाईने तिघेही खोलीबाहेर आले. त्यांनी मागे वळून खोलीच्या दाराकडे बघितले, पुन्हा एकदा ती आकृती दारावर उभी होती, तिची जळजळीत नजर त्यान्च्यावर रोखलेली होती. तिघांची भीतीने गाळण उडाली आणि तिघेही शक्य तितक्या लवकर जीना उतरू लागले. पण ती आकृतीही त्यांच्या मागे येवू लागली. पुन्हा एकदा रडण्याचा आणि पाळण्याचा आवाज येवू लागला. परत घासण्याचा आवाज येत होता. पण यावेळेस तो आवाज चहूबाजूंनी येतायेता होता. कुणीतरी पाय घासत घासत त्यांच्या भोवती फिरत होते. अंधारात काहीच दिसत नव्हते. फक्त आवाज ऐकू येत होते.
आता मात्र तिघांचाही भितीने जीव जात होता. कशाचीही परवा न करता ते तिघे घराबाहेर पळाले.

वाड्याबाहेर पडल्यावर त्यांनी मागे वळून पहिले तेव्हा तीच आकृती वाड्याच्या दाराशी उभी होती आणि त्यांच्याकडे बघत होती. तिच्या मागे ज्वालांचा प्रकाशही दिसत होता.

“तिकडे जावू यात. तिकडे कृष्णाचे मंदिर आहे. तिकडे आपल्याला आसरा मिळेल.” राघुनाथाराव धापा टाकत म्हणाले.

मंदिरात सगळे उभे होते. मंदिराचे कवाड बंद होते पण ओसरीवर जागा मिळाली होती.
“काय बाई भयंकर होते. पण वाचलो त्यातुन” रेवातीबाई सुस्कारा सोडत म्हणाल्या “मी म्हंटलाच होता, आपण कधी कुणाचे वाईट केले नाही कि वाईट चिंतले नाही. आपले वाईट होणे शक्यच नाही.”
“कीर्ती आणि काव्याचे काय? ” राघुनाथारावानी काळजीत विचारले.
“जाऊ दे. त्यांना वाचवायला कोण जाणार. आपण तिघे वाचलो ते खुप आहे.” रेवातीबाई फणकारल्या.
”अग पण आपली सून आणि नात...” राघुनाथाराव डोळ्यात पाणी आणुन म्हणाले.
“हं... पुरे झाले. आपलाच जीव धोक्यात होता. कसेबसे वाचलो आपण.” रेवातीबाई तिरमिरीने म्हणाल्या.
“अग पण, त्यांचे काय हाल झाले असतील?” राघुनाथाराव काकुळतीला आले होते.
“ते आपण उद्या सकाळी बघू. आता त्या वाड्यात सकाळशिवाय मी जायची नाही आणि तुम्हाला दोघानाही जाऊ देणार नाही.” रेवातीबाई ठामपणे म्हणाल्या आणि तिथेच ओसरीवर आडव्या झाल्या.

क्रमशः

-स्फिंक्स
======================================================================
कीर्तीचे मनोगत पुढच्या भागात.

पुढचा भाग: http://www.maayboli.com/node/55536

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोड काहितरि़ खटकतय. बायकोच ठिक आहे पण राहुल मुलिसाठि ईतका गप्प कसा??
>>
+१

पुढे मिळेल बहुदा उत्तर
किंवा त्यालाही मुलगा हवा असेल मुलगी झाली म्हणून राग असेल तिच्यावर वगैरे.
काय माहीत
थांबून बघुयात पुढे काय होतंय ते Happy

प्लिज जास्त गॅप घेऊ नका.

प्लिज जास्त गॅप घेऊ नका. +१११११ अशा कथांमध्ये जास्त गॅप आली की थरार, मज्जा निघुन जाते सगळी.

प्लिज जास्त गॅप घेऊ नका. +१११११ अशा कथांमध्ये जास्त गॅप आली की थरार, मज्जा निघुन जाते सगळी.>>> ++ १११ मस्त लिहीत आहाता Happy

प्लिज जास्त गॅप घेऊ नका. +११११११ अशा कथांमध्ये जास्त गॅप आली की थरार, मज्जा निघुन जाते सगळी.>>> ++ १११११ मस्त लिहीत आहाता >>>>११

thank you इतक्या सकारात्मक प्रतिक्रिया बघुन खुप बरे वाटले. अजून लिहायचा खुप उत्साह आला. पण काय करणार? अजूनही मी नवीनच आहे त्यामुळे, प्रत्येक भाग विचार करून करून लिहावा लागतो आणि उशीर होतो. मी नक्की प्रयत्न करेन कि पुढचा आणि शेवटचा भाग लवकर यावा.

स्वस्ति, तुमचा instant reply बघुन खुप छान वाटला.

मनु७७१ आणि रीया, राहुल गप्प आहे कारण तो त्याचा स्वभाव आहे. त्याला लहानपणापासून तसेच प्रोग्राम केले गेले आहे, कि रेवातीबाई जे म्हणतील तेच खरे आणि बरोबर. त्यामुळे, तो त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो आणि याचाच रेवातीबाई फायदा उचलतात . अगदी लग्न झाल्यानंतरही रेवातीबाई नवरा-बायकोच्या मध्ये सारख्या होत्या आणि लावा-लाव्या करत होत्या.त्यामुळे त्यांचे नाते फुललेच नाही. मुलगी झाल्यावर काही दिवस त्याला प्रेम वाटले, पण रेवातीबाईंनी लगेच भडकावले कि मुलगा हवा आहे आणि अजून काय काय......(याचा संदर्भ पहिल्या भागात आला आहे.)
प्रश्न हा नाही कि राहुल का गप्प आहे, प्रश्न हा आहे कि कीर्ती का गप्प आहे? याचेच उत्तर पुढच्या भागात द्यायचा प्रयत्न करावा म्हणूनच पुढचा भाग कीर्तीच्या आवाजात लिहायचे ठरवले आहे.

ते अमानविय किर्ती च्या फेवर च असणार नक्की..

त्या दरवाजात उभ रहाणारीच भय नै..पायावरुन खुरडत काय गेल ते सांगा अगुदर.. Uhoh Sad

आवडला हा भाग, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत, लौकर टाका हो..
पु.ले.शु Happy

छान झालाय हा भाग पण...
लवकर टाका भाग पुढचे म्हणजे मागची कथा विसरत नाही...
पायावरुन खुरडत काय गेल ते सांगा अगुदर Uhoh >>>+१