आपल्या त्या ह्यांना भेटण्यासाठी गटग

Submitted by सिंडरेला on 7 July, 2015 - 13:56
ठिकाण/पत्ता: 
मिठास 1655-170 Oak Tree Rd. Edison, NJ 08820 Phone: (732) 947 3014

आपले ते हे १८ जुलै रोजी बागराज्यात पिस्काटावेमध्ये असणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी म्हणून समस्त मानेमंडळींनी वाकडी वाट करून येण्याचे करावे. त्यांना घाबरून प्रेमा आणि माया दडून बसल्यात हे आधीच जाहीर करते आहे. अधिक चौकशी केल्यास मानेंकरवी अपमान करण्यात येइल.

माहितीचा स्रोत: 
होमलेस नेटवर्क
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 18, 2015 - 11:30 to 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते हे पिस्काटावेत असनारेत तर नॉर्थ जर्सी कायकू. हौबौट एडिसन ऑर क्लोज बाय. साउथ प्लेनफिल्ड - पिस्काटावेत पण चांगली रेस्टॉ. निघाली आहेत हल्ली. म्हणजे आपल्या विकुंना उगीच जास्त ड्रायव्हिंग नको म्हणून. नैतर आमचं काही नसतं असलं.

एडिसन चालेल पण मग बशीतल्या गप्पा मिस झाल्या म्हणून तुम्हालाच हळहळ वाटते Wink

स्वप्नील जोशी >>> अरे देवा !!!! >>> Biggrin

18 July, 2015 - 21:00 - 19 July, 2015 - 02:30 असं दिसतय. >>> मग तीच वेळ असणार गटगची Lol

हो तेही आहेच Happy माने बस सर्विस फार चॅप्टर आहे. एकदा घेतलेले ष्टाप पुन्हा घेत पण नाही. आमची कशी व्हि ताईंची सात्विक बस असते नॉर्थ ला जाताना Happy इतरांनी पण सुचवा कुठे हादडायचंय ते.

ह्यावेळी काय खास माने थीम असणार आहे की काय? Proud

बरं तर,
मी फिलीहून येणार आहे. रात्री पिस्काटावेला जायचय. कुठलही सोईचं ठिकाण ठरवा.
बुवांनी पुरणपोळ्या संपल्याचं कालच जाहिर केलय. नाहीतर त्यांच्या घरीच धाड घातली असती. Wink
किती वाजता भेटायचं त्याप्रमाणे मी लंचच्या आधी बाकी कोणाला भेटायचं का ते ठरवेन.

ओ! खरे खरे माने येणार आहेत! Lol

मी बहुतेक डि सी मध्ये असणार आहे त्यामुळे जमणं अवघड वाटतय पण पिलान बदलला तर येइनच.

मेरा बेसिक मेच लोचा. मला वाटलं आपले ते हे म्हणजे सिंडीचे ते माने नातेवाईक. पण हे गटग अटलांटाच्या मानेंकरता आहे होय!!! ( हे ही मानेच, किती तो योगायोग Proud )

जुने हिशेब चुकते करायचे असतील Wink

नातेवाईक माने नाही येणार इतक्यात, ते येणार असले की योग्य आयडी शोधत टिपाप्यात येतीलच Proud

झक्की येणार म्हणाले आहेत तेव्हा आता कुणी टांग देउ नका.

सायो, वादि आहे त्यादिवशी की पार्टी आहे?

पण म्हणजे सिंडरेलाला काय म्हणायचंय? मुलाच्या वादि आणि/किंवा पार्टी ला आईने हजर नसलं तरी चालेल? Wink Proud

Pages