निकोबार पासुन अंदाजे १५०० कि.मी. दुर दक्षिणेला टेमासेक (Temasek) या नावाने ओळखल जाणारं एक प्राचीन बंदर आहे. १४व्या शतकात पालेमबंग (Palembang)चा राजपुत्र त्रिभुवन (Sang Nila Utama) हा या टापु वर आला असता त्याला सिंहाचे दर्शन झाले. त्या स्मरणार्थ म्हणुन 'Temasek' बंदराचे नामकरण “The Lion City” म्हणजेच 'सिंगापुर' असे झाले.
मंगोल, पोर्तुगीज, जपानी, ब्रिटिश अशी राजयकिय स्थित्यंतरे अनुभवलेल्या सिंगापुरने १९६५ नंतर मलेशिया पासुन फारकत घेतली. चिनी, मलय, फिलिपाईन्स, भारतीय अश्या संमिश्र संकृती जोपासणार्या या देशाची धुरा पिपल्स अॅक्शन पार्टी (PAP)कडे आली. PAPचे दमदार नेता Lee Kuan Yew यांच्या योजना बद्ध नेतृत्वाखाली सिंगापुरने नेत्रदिपक प्रगती कडे वाटचाल केली. मलेशिया कडुन आयात होणार्या पाण्यामुळे बरेच वाद निर्माण होऊ लागले. त्याला पर्याय म्हणुन distilled waterचा स्विकार करणारं सिंगापुर हे एक स्वावलंबी राष्ट्र म्हणुन जगा समोर आलं. १९९० पर्यंत सिंगापुर हे आर्थिक क्रांती साठी प्रसिद्ध झालं ते 'ली कान यु' यांच्या कणखर नेतृत्वामुळेच. सिंगापुर भेटीच्या दोन दिवस आधीच त्यांच निधन झालं. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सिंगापुरकर्स तब्बल दहा तासाच्या वर रांगेत उभे रहात होते. ली वरिल प्रेमा खातर त्यांच्या अंतिम यात्रे दरम्यान लोकांनी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी केली होती.
या शिस्तबद्ध देशाला भेट देण्याचा मनसुबा नुकताच पार पडला. आधुनिकतेची कास पकडलेल्या या छोट्याश्या राष्ट्रात फिरण्यासाठी बरिच ठिकाणं आहेत. चला तर सैर करुया मर्लायनच्या देशाची...
Merlion Park
Mascot of Singapore म्हणुन Merlion प्रसिद्ध आहे. सिंहाच धड आणि खाली माश्याची शेपटी अशी या ८.६ मिटर उंच शिल्पाची खासियत आहे.
Marina Bay - Sands SkyPark
Las Vegas Sands Corpची ५६ मजली गगनचुंबी इमारत हे पर्यटकांच केंद्र बिंदू आहे. Sands SkyParkचे ३ भव्य टॉवर म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. १९१ मिटर उंच skyscapper वरिल Swimmng Pool आणि Observation Deck हे त्यांचे खास वैशिष्ट्य!!! Shopping पासुन casino पर्यंत सगळं काही एकाच छता खाली समावलेले आहे.
Observation Deck वरुन दिसणारा नजारा...
Singapore Flyer
Garden by the bay
दक्षिणेच्या बंदराकडील भागा लगत Garden by the bayचा १०१ हेक्टरचा परिसर वसलेला आहे. South, East आणि Central अश्या तीन भागात विभागलेल्या या अवाढव्य Garden मधिल Flower Dome, Cloud Forest, Supertrees Grove ही पर्यटकांची आवडती ठिकाणं आहेत. इथला Light show फारच नेत्रदिपक असतो.
Sentosa Island
Vivo City पासून जवळ असलेल्या या बेटा वर Universal Studio, Waterpark, Dolphin Island, S.E.A. Aquarium आणि बरेच वैविध्यपुर्ण Adventure park आहेत. इथला खजिना लुटायला दोन-तीन दिवस कमी पडतील.
मात्र वेळे अभावी आम्ही फक्त Universal Studio आणि S.E.A. Aquariumला भेट देणे पसंत केले. Universal Studio हे आधुनिक खेळ आणि करमणुकीच्या साधनांसाठी प्रसिद्ध असलेल ठिकाणं. स्वप्नातील बेट अस याच वर्णन केलं तर वावगं ठरू नये. इथे येणारे अबाल, वृद्ध आपले भान हरपुन या स्वप्नवत दुनियेत तल्लीन होउन जातात .
Loss Island
Jurasik Park
Water Show
4D show
Fast & furious
S.E.A. Aquarium
Jurong Bird Park
सिंगापुरच्या पश्चिमेला ५० एकरच्या भुभागात वसलेल आहे Jurong Bird Park. जगातील ४०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी इथे पहावयास मिळतात. आणि त्यांची योग्य निगाही राखली जाते हे विशेष!
Chinatown Street Market
सिंगापुरला येऊन खरेदी नी खादाडी करायची असेल तर चायना टाऊन शिवाय योग्य जागा नाही. काही शाकाहारी भारतीय मात्र Littile India मधेच जाणे पसंत करतात. पण चायना टाऊनच्या खाऊ गल्लीतली विविधता Littile India मुळीच नाही. चायना टाऊनच्या Pagoda आणि Sago streets वर खरेदी केल्या शिवाय सिंगापूर वारी पुर्ण होउच शकत नाही.
अमेरिकेपेक्षा नक्कीच इथल्या
अमेरिकेपेक्षा नक्कीच इथल्या कॅब्स स्वस्त पडतात. अमेरिकेत काहीच्या काही पैसे मोजावे लागतात. जेवण सुद्धा बर्यापैकी इथे स्वस्त आहे. महागाई फक्त जागेबद्दल आहे. रेन्ट खूप जास्त आहेत घरांचे. मग ते भाड्याचे घर असो की स्वतःचे. आणि दुसरे म्हणजे घर घेण्यासाठी केलेले जाचक नियम
एकदम मस्त फोटो.
एकदम मस्त फोटो.
लय भारी.
लय भारी.
लै भारि
लै भारि
मस्त फोटो.. रात्रीचे
मस्त फोटो.. रात्रीचे लाइटसमधले फोटो फारच मस्त आलेत.. एकदम क्लिअर
सगळेच फोटो अप्रतिम काही काही
सगळेच फोटो अप्रतिम
काही काही फोटो विशेष आवडले.
मी मिस केल.
२ नं च्या फोटोत रात्रीची वेळ
२ नं च्या फोटोत रात्रीची वेळ असून डार्क निळी बॅक ग्र्राऊण्ड कशी आली आहे? काही स्पेशल सेटिंग ?
यानण्तर यु ट्युबवर सिंगापूर
यानण्तर यु ट्युबवर सिंगापूर (१९६०) या कृष्णधवल पिक्चर पाहिला. एकदम खेडवळ सिंगापूर त्यात दिसते. त्यात तरीही एक गाणे आहे 'जीवन मे एक बार आना सिंगापूर " क्लब डन्सला अर्थातच हेलन. या चित्रपटात मलाय भाषेतले गाणे 'रासा सायांग रे... रासा सायांग सायांग रे ' हे चाली सकट गाणे घेतले आहे. त्यात चक्क लतानेही आपला आवाज मॉडुलेट केला आहे..
https://www.youtube.com/watch?v=XBE0DAJj448
आणि हे मूळ मलाय गाणे...
https://www.youtube.com/watch?v=xTKJM-em8v8
झक्कास मित्रा....
झक्कास मित्रा....
डार्क निळी बॅक ग्र्राऊण्ड कशी
डार्क निळी बॅक ग्र्राऊण्ड कशी आली आहे? काही स्पेशल सेटिंग ? >> नाही. संधीप्रकाशातला फोटो आहे.
मस्तच आहेत फोटो आणि माहिती
मस्तच आहेत फोटो आणि माहिती .
आम्ही या अगोदर २ वेळा जाउन आलो आहोत ,पहिल्यान्दा टूरतर्फे गेलो होतो . नंतर आम्ही दोघच गेलो होतो , मनसोक्त फिरलो एमारटी आणि बस ने . मज्ज्जा आली .
या वेळी लेकाला न्यायचे आहे , जुलै मध्ये प्लॅन करतोय .
इंद्रधनुष्य , तुम्ही ट्रिक म्युजिअम बघितल आहे का?
काही माहिति हवी आहे , तुम्हाला आणि बी ना विपु करेन .
मस्त फोटो आहेत! जर भारताबाहेर
मस्त फोटो आहेत!
जर भारताबाहेर राहायचं असेल पण 'होम सिक' वाटू नये असं वाटत असेल तर पूर्वेकडे सिंगापूरमध्ये राहावं आणि पश्चिमेकडे दुबईत.
छान आलेत फोटो.
छान आलेत फोटो.
छान वर्णन आणि फोटो पण मस्तच
छान वर्णन आणि फोटो पण मस्तच आहेत . कधी जायचा योग आलाच तर तुमच्याकडून नक्की माहिती घेईन .
वाह.. छान फोटोज.. ते रात्रीचे
वाह.. छान फोटोज.. ते रात्रीचे इतके सुस्पष्ट आलेत ना, कोणता कॅमेरा आहे???
प्लीज शेअर द राझ!!!
सिंगापूर बेस्ट शॉपिंग, बेस्ट इंडोनेशिअन आणी मलै फूड.. ( ती पाडांग क्रॅब करी .. नुस्ती यम्म!! )
जकार्ता ला असताना सिंगा ची प्रत्येक गल्ली बोळ ओळखीची होती.. चक्क १५,१५ दिवस मुक्काम ठोकून बसत असू तिथे. आता पुष्कळ काही बदललं असणार..
नासी हायनाम सोडून
मस्त फोटो आणि
मस्त फोटो आणि माहीती...सिटीस्क्पेस साठी बेष्ट !!
Pages