'मर्लायन'च्या देशात...

Submitted by इंद्रधनुष्य on 15 April, 2015 - 03:34

निकोबार पासुन अंदाजे १५०० कि.मी. दुर दक्षिणेला टेमासेक (Temasek) या नावाने ओळखल जाणारं एक प्राचीन बंदर आहे. १४व्या शतकात पालेमबंग (Palembang)चा राजपुत्र त्रिभुवन (Sang Nila Utama) हा या टापु वर आला असता त्याला सिंहाचे दर्शन झाले. त्या स्मरणार्थ म्हणुन 'Temasek' बंदराचे नामकरण “The Lion City” म्हणजेच 'सिंगापुर' असे झाले.

मंगोल, पोर्तुगीज, जपानी, ब्रिटिश अशी राजयकिय स्थित्यंतरे अनुभवलेल्या सिंगापुरने १९६५ नंतर मलेशिया पासुन फारकत घेतली. चिनी, मलय, फिलिपाईन्स, भारतीय अश्या संमिश्र संकृती जोपासणार्‍या या देशाची धुरा पिपल्स अ‍ॅक्शन पार्टी (PAP)कडे आली. PAPचे दमदार नेता Lee Kuan Yew यांच्या योजना बद्ध नेतृत्वाखाली सिंगापुरने नेत्रदिपक प्रगती कडे वाटचाल केली. मलेशिया कडुन आयात होणार्‍या पाण्यामुळे बरेच वाद निर्माण होऊ लागले. त्याला पर्याय म्हणुन distilled waterचा स्विकार करणारं सिंगापुर हे एक स्वावलंबी राष्ट्र म्हणुन जगा समोर आलं. १९९० पर्यंत सिंगापुर हे आर्थिक क्रांती साठी प्रसिद्ध झालं ते 'ली कान यु' यांच्या कणखर नेतृत्वामुळेच. सिंगापुर भेटीच्या दोन दिवस आधीच त्यांच निधन झालं. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सिंगापुरकर्स तब्बल दहा तासाच्या वर रांगेत उभे रहात होते. ली वरिल प्रेमा खातर त्यांच्या अंतिम यात्रे दरम्यान लोकांनी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी केली होती.

या शिस्तबद्ध देशाला भेट देण्याचा मनसुबा नुकताच पार पडला. आधुनिकतेची कास पकडलेल्या या छोट्याश्या राष्ट्रात फिरण्यासाठी बरिच ठिकाणं आहेत. चला तर सैर करुया मर्लायनच्या देशाची...

Merlion Park

Mascot of Singapore म्हणुन Merlion प्रसिद्ध आहे. सिंहाच धड आणि खाली माश्याची शेपटी अशी या ८.६ मिटर उंच शिल्पाची खासियत आहे.

Marina Bay - Sands SkyPark

Las Vegas Sands Corpची ५६ मजली गगनचुंबी इमारत हे पर्यटकांच केंद्र बिंदू आहे. Sands SkyParkचे ३ भव्य टॉवर म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. १९१ मिटर उंच skyscapper वरिल Swimmng Pool आणि Observation Deck हे त्यांचे खास वैशिष्ट्य!!! Shopping पासुन casino पर्यंत सगळं काही एकाच छता खाली समावलेले आहे.

Observation Deck वरुन दिसणारा नजारा...

Singapore Flyer

Garden by the bay

दक्षिणेच्या बंदराकडील भागा लगत Garden by the bayचा १०१ हेक्टरचा परिसर वसलेला आहे. South, East आणि Central अश्या तीन भागात विभागलेल्या या अवाढव्य Garden मधिल Flower Dome, Cloud Forest, Supertrees Grove ही पर्यटकांची आवडती ठिकाणं आहेत. इथला Light show फारच नेत्रदिपक असतो.

Sentosa Island

Vivo City पासून जवळ असलेल्या या बेटा वर Universal Studio, Waterpark, Dolphin Island, S.E.A. Aquarium आणि बरेच वैविध्यपुर्ण Adventure park आहेत. इथला खजिना लुटायला दोन-तीन दिवस कमी पडतील.

मात्र वेळे अभावी आम्ही फक्त Universal Studio आणि S.E.A. Aquariumला भेट देणे पसंत केले. Universal Studio हे आधुनिक खेळ आणि करमणुकीच्या साधनांसाठी प्रसिद्ध असलेल ठिकाणं. स्वप्नातील बेट अस याच वर्णन केलं तर वावगं ठरू नये. इथे येणारे अबाल, वृद्ध आपले भान हरपुन या स्वप्नवत दुनियेत तल्लीन होउन जातात .

Loss Island

Jurasik Park

Water Show

4D show

Fast & furious

S.E.A. Aquarium

Jurong Bird Park

सिंगापुरच्या पश्चिमेला ५० एकरच्या भुभागात वसलेल आहे Jurong Bird Park. जगातील ४०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी इथे पहावयास मिळतात. आणि त्यांची योग्य निगाही राखली जाते हे विशेष!

Chinatown Street Market

सिंगापुरला येऊन खरेदी नी खादाडी करायची असेल तर चायना टाऊन शिवाय योग्य जागा नाही. काही शाकाहारी भारतीय मात्र Littile India मधेच जाणे पसंत करतात. पण चायना टाऊनच्या खाऊ गल्लीतली विविधता Littile India मुळीच नाही. चायना टाऊनच्या Pagoda आणि Sago streets वर खरेदी केल्या शिवाय सिंगापूर वारी पुर्ण होउच शकत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच फोटो.. सिंगापूरमधे सतत काहीतरी नवीन आकर्षण तयार होत असते.
प्रत्येक ठिकाण हे एका स्वतंत्र बीबीचा विषय आहे.. हे प्लीजच नोट करावे. ( अजून वेळ गेलेली नाही. शेवटी क्रमशः हा एकच शब्द लिहायचा आहे. सध्यातरी )

जबरी! डोळ्याचे मस्त पारणे फिटले. हा अनूभव भारतातुन तिथे जाऊन इथे शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद.:स्मित:

सर्वच फोटो अतीशय सुन्दर असल्याने केवळ एकाबद्दल मत देता येत नाहीये.

धन्यवाद सगळ्यांचे

Wallpaper म्हणून मी एखादा फोटो घेउ का ? >> जरूर

प्लेटमध्ये पेढ्यांसारखं काहितरी दिसतंय >> ते होममेड पाव आहेत.. ताजे ताजे भट्टीतून काढलेले खुसखुशीत!

प्रत्येक ठिकाण हे एका स्वतंत्र बीबीचा विषय आहे.. >> खरयं... खुप काही लिहिण्यासारख आहे. तुम्ही कधी जात आहात? Wink

इंद्रधनुष्य.. मस्तच फोटो आहेत रे! खासकरुन कसीनो आणी लाइट शो!

सिंगापुरच्या चँगी ऐअरपोर्टचा एकही फोटो नाही? चँगी ऐअरपोर्ट!.. सगळ्या जगातल्या बेस्ट एअरपोर्ट पैकी एक एअरपोर्ट आहे तो!

प्रत्येक फोटोला क्या बात है अशी दाद उमटत होती मनात. Happy

क्वालिटी ऑफ फोटो, फ्रेमिन्ग (कोम्पोजिशन) , क्लॅरिटी सगळच उत्तम.
प्रतिबिम्बाचा तर अफलातुन आहे. Happy

इंद्रा, मी बर्‍याच वर्षात गेलो नाही. फक्त ट्रांझिट मधे असतो तिथे. आता बरीच नवी आकर्षणे झाली आहेत. जायला पाहिजे एकदा.

मस्त आलेत फोटो! सिंगापूरला जाऊन य वर्ष झाली. मर्लायन व बर्ड पार्क शिवाय काही आठवत नाही.

माझ्या मुलाला फोटोग्राफीची खूप आवड आहे. त्याला तुमचे फोटो खूप आवडले. त्याच्या वतीनी एक प्रश्न .. कोणता कॅमेरा वापरला आहे?

मस्त फोटोज, ईथे येऊन ८ वर्ष झालीत. एकच खटकण्यासारखी गोष्ट म्हणजे महागाई Sad
बाकी मस्त! दरवर्षी ईथे टुरिस्ट अ‍ॅटरॅक्शन्स तयार करतच असतात.
पुर्वी काहि फ्री असणार्या गोष्टी आता तिकीट लाऊन घ्याव्य लागतात. जसे...सेन्टोसातले फाऊन्टन शो.

सुंदर! बरेच भाग बघितले आहेत तरी फोटोत वेगळेच वाटताहेत!
आशु, सिंगापुर तस स्वस्त वाटल होतं आम्हाला य वर्षांपूर्वी... पब्लिक ट्रांसपोर्ट/ टैक्सी खुपच छान आणि स्वस्त आहे तिथे.. तसेच खाद्यपदार्थही.

धन्यवाद मंडळी

शुगोल Canon SX40 P/S Camera वापरतो.

महागाईच्या बाबतीत मला तरी ठीक वाटले... म्हणजे INRशी तुलना न करता. Transportसाठी MRTचा स्वत पर्याय आहेच. पण Taxi सुद्धा परवडण्यार्‍या आहेत. आम्ही ९५% प्रवास टॅक्सीनेच केला तरी सुद्धा आमचे ५ दिवसात SGD३००च्या आसपास झाले.

Pages