Submitted by मिल्या on 10 April, 2015 - 03:34
मुग्ध एकांत, किती शांत प्रहर रात्रीचे
उलगडूयात, मऊसूत पदर रात्रीचे
दिवसभर सूर्य रुबाबात किती वावरतो
झेलतो चंद्र मुक्यानेच कहर रात्रीचे
सौख्य, ऐश्वर्य, बडेजाव मिरविते दिवसा
केवढे भग्न, किती नग्न शहर रात्रीचे
वेदना रोज, करे संग नव्या देहाशी
पाळते मात्र तिचे पाप ... उदर रात्रीचे
दिवस काढून फणा ताठ डसे गात्रांना
आतल्या आत भिनत जात जहर... रात्रीचे
वीज कापूर, शशी ज्योत, तबक तार्यांचे
मेघ चौरंग, धुके धूप, मखर रात्रीचे
मिलिंद छत्रे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या गझलेत रदिफेमुळे
ह्या गझलेत रदिफेमुळे व्यक्तीकरणावर बंधने आल्याचे जाणवत आहे. शब्दनिवड छानच! मतला आवडला.
बंधने = दिवसा असे असे होते, मात्र रात्री असे असे होते, अश्या स्वरुपाचाच आशय घ्यावा लागल्यासारखे झाले आहे. हे टाळताही आले असते असे वाटते.
हमे तो लूट लिया....या चालीवर
हमे तो लूट लिया....या चालीवर म्हणायला मज्जा वाटते. गझल आवडली.
दिवसभर सूर्य रुबाबात किती
दिवसभर सूर्य रुबाबात किती वावरतो
झेलतो चंद्र मुक्यानेच कहर रात्रीचे
सौख्य, ऐश्वर्य, बडेजाव मिरविते दिवसा
केवढे भग्न, किती नग्न शहर रात्रीचे>>>>>> मस्त! छान लिहीलीय.
गझल आवडली मिलिंद
गझल आवडली मिलिंद
मिल्या, मस्त लिहीली आहेस!
मिल्या, मस्त लिहीली आहेस!
वेदना रोज, करे संग नव्या
वेदना रोज, करे संग नव्या देहाशी
पाळते मात्र तिचे पाप ... उदर रात्रीचे
- छान.
फार फार मजा आली धन्यवाद
फार फार मजा आली धन्यवाद
सॉरी धन्यवाद द्यायला इकडे
सॉरी धन्यवाद द्यायला इकडे आलोच नाही परत
सर्वांचे आभार..
बेफी : बंधनांबद्दल तुम्ही म्हणतात ते पटले थोडे पण त्यातही वेगवेगळ्या अर्थ छटा आणायचा प्रयत्न केला आहे. पण हे टाळता आले असते का तर नक्कीच पण त्या दॄष्टीने विचारच नाही केले. तसा विचार करून काही नविन लिहिता येईल का हे तपासून पाहीन
क्या बात है .... काही शेर
क्या बात है ....
काही शेर ह्रदयस्पर्शी ....
सौख्य, ऐश्वर्य, बडेजाव
सौख्य, ऐश्वर्य, बडेजाव मिरविते दिवसा
केवढे भग्न, किती नग्न शहर रात्रीचे........ झक्कास
दर्जेदार. हा दर्जा हल्ली
दर्जेदार. हा दर्जा हल्ली पहायला मिळत नाही.
कृपया लिहीत रहावे..