लुआंडा हि अंगोलाची राजधानी. महत्वाचे बंदर आणि विमानतळही. इथल्या समुद्राजवळ एक खास भौगोलीक रचना आहे. जमिनीची एक चिंचोळी पट्टी समुद्रात दुरवर गेलेली आहे ( गूगल अर्थ वर अवश्य बघा.)
चिंचोळी म्हणालो तरी ती बरीच रुंद आहे. तिच्यावर अनेक हॉटेल्स आहेत. माझ्या माहितीतले एकमेव भारतीय हॉटेलही तिथेच आहे.
त्या चिंचोळ्या पट्टीच्या पश्चिमेला नेहमी असतो तसा बीच आहे. वाळूचा रंग अबोली आहे. तिथल्या समुद्रावर मोठमोठ्या लाटा येत असतात. कुठल्याही समुद्रकिनार्यावर असतो तसा तिथे धिंगाणा चालू असतो.
या चिंचोळ्या पट्टीच्या पूर्वेला एक लगून सारखा भाग आहे. त्याचा किनारा बांधून काढलेला आहे.
इथल्या समुद्रावर अगदीच मामुली लाटा असतात. पण बहुतेक पोहोण्याची परवानगी नसावी, कारण कुणी
पाण्यात उतरलेले दिसत नाही.
पण हा भाग आहे मात्र खुप स्वच्छ. इथे एक जॉगिंग ट्रॅक आहे. पहुडण्यासाठी राखलेली हिरवळ आहे.
व्यायामाची साधने आहेत. संगीताच्या कार्यक्रमासाठी कायमस्वरुपी स्टेज आहे.
एखादा आईसक्रीमवाला सोडला तर कुणीही फेरीवाला नसतो इथे. इथले पाणी स्थिर असल्याने, माश्यांच्या उड्या सहज दिसतात. पक्षीही खुप असतात. मी मागच्यावेळी गेलो होतो, त्यावेळी अचानक आभाळ भरून आले, आणि मला तिथून निघावे लागले. इथून सूर्यास्तही छान दिसतो.
तर तिथले हे काही फोटो.
धन्यवाद, हा समुद्रच आहे. पण
धन्यवाद,
हा समुद्रच आहे. पण नैसर्गिक अडथळा असल्याने इथे लाटा पोहोचू शकत नाहीत. एखाद्या शांत सरोवरासारखा भासतो हा समुद्र. लाटाच नसल्याने मुंबईला आहेत तसे काँक्रिटचे ठोकळेही नाहीत. संध्याकाळच्या वेळी इथे मस्त वारा सुटतो. त्या हिरवळीवर आडवे पडून सूर्यास्त बघायला छान वाटते.
केपी, खास आभार. त्या लिंकमधले फोटो सुंदरच आहेत.
मला स्वतःला, फोटोतली जागा / वस्तू जशी आहे तशी दिसलेली आवडते. उगाच खूप प्रोसेस केलेले, रंग भडक केलेले, भरपूर शार्प केलेले फोटो फारसे आवडत नाहीत. त्यात फोटोग्राफर आणि त्याने वापरलेले सॉफ्टवेअरच जास्त दिसते. अर्थात हा माझा चॉईस... ( असे म्हणायची पद्धत आहे आजकाल )
Pages