लुआंडा चौपाटी

Submitted by दिनेश. on 6 April, 2015 - 07:56

लुआंडा हि अंगोलाची राजधानी. महत्वाचे बंदर आणि विमानतळही. इथल्या समुद्राजवळ एक खास भौगोलीक रचना आहे. जमिनीची एक चिंचोळी पट्टी समुद्रात दुरवर गेलेली आहे ( गूगल अर्थ वर अवश्य बघा.)
चिंचोळी म्हणालो तरी ती बरीच रुंद आहे. तिच्यावर अनेक हॉटेल्स आहेत. माझ्या माहितीतले एकमेव भारतीय हॉटेलही तिथेच आहे.

त्या चिंचोळ्या पट्टीच्या पश्चिमेला नेहमी असतो तसा बीच आहे. वाळूचा रंग अबोली आहे. तिथल्या समुद्रावर मोठमोठ्या लाटा येत असतात. कुठल्याही समुद्रकिनार्‍यावर असतो तसा तिथे धिंगाणा चालू असतो.

या चिंचोळ्या पट्टीच्या पूर्वेला एक लगून सारखा भाग आहे. त्याचा किनारा बांधून काढलेला आहे.
इथल्या समुद्रावर अगदीच मामुली लाटा असतात. पण बहुतेक पोहोण्याची परवानगी नसावी, कारण कुणी
पाण्यात उतरलेले दिसत नाही.

पण हा भाग आहे मात्र खुप स्वच्छ. इथे एक जॉगिंग ट्रॅक आहे. पहुडण्यासाठी राखलेली हिरवळ आहे.
व्यायामाची साधने आहेत. संगीताच्या कार्यक्रमासाठी कायमस्वरुपी स्टेज आहे.

एखादा आईसक्रीमवाला सोडला तर कुणीही फेरीवाला नसतो इथे. इथले पाणी स्थिर असल्याने, माश्यांच्या उड्या सहज दिसतात. पक्षीही खुप असतात. मी मागच्यावेळी गेलो होतो, त्यावेळी अचानक आभाळ भरून आले, आणि मला तिथून निघावे लागले. इथून सूर्यास्तही छान दिसतो.

तर तिथले हे काही फोटो.

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

9.

10.

11.

12.

13.

14.


15.


16.

17.

18.

19.

20.

21.

22.

23.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु+१
मस्त छ्टा टिपल्यात.
मला आत्ताच्या आत्ता जायचय तिथ.

वॉव इतक्या स्वच्छ सुंदर ठिकाणी कोणीच मानवप्राणी नाही ???

ते एलोवेरा ची फुलं आहेत कि काय???

तो ब्राऊन बगळा आहे?? बॅलंसिंग अ‍ॅक्ट मस्त करतोय..

मी तरी संध्याकाळी ४/५ वाजता गेलो होतो. कदाचित त्यानंतर गर्दी होत असेल.

मित, हा अर्धगोलाकार पुर्ण चालायला खुप छान वाटतो. ( बहुतेक ३ किमी असावा )

माधव... काढला खरा एकदाचा !

वर्षू, लाल आणि पिवळी दोन्ही एलोव्हेराचीच फुले. इथल्या ट्रॅडीशिनल मेडीसीन मधे वापरातात. ( पण तरीही तिथली झाडे शाबूत होती. )

योकु / रश्मी, स्वच्छता, वक्तशीरपणा या गोष्टी मुद्दाम अंगी लावाव्यात, एवढ्या आपण दूर सारून ठेवल्यात. खुप देशांत त्या नैसर्गिक रित्याच पाळल्या जातात.

दिनेश दा,

काय सुरेख फोटु आहेत हो.....तुमच्या मुळे विनासायास आणि घरबसल्या किती सुंदर गोष्टींचे आणि जागांचे दर्शन होते आम्हाला. शतशः आभारी आहोत तुमचे. Happy
ती कोरफडीची फुले कसली भारी आहेत नाही ? मी पहिल्यांदाच बघितली.

सुर्रेख फोटो .... स्वच्छता नजरेत भरण्यासारखी - त्यामुळे तो परिसर अजून सुंदर दिसतोय ... Happy

इथल्या समुद्राजवळ एक खास भौगोलीक रचना आहे. जमिनीची एक चिंचोळी पट्टी समुद्रात दुरवर गेलेली आहे ( गूगल अर्थ वर अवश्य बघा.) >>> हो, पाहिलं. खरंच भारी आहे ती रचना. Happy

Eddy Métais या महाभागाने जे काही फोटो काढलेले आहेत त्याचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे - कस्ला ग्रेट आहे हा इसम ... Happy

प्रामाणीकपणे सांगायचे तर १८ नंबरचा फोटो सोडल्यास (तो बरा म्हणता येईल) एकही फोटो आवडला नाही. त्यापेक्षा प्रतिसादाद दिलेल्या लिंकमधले फोटो अप्रतिम आहेत.

एवढ्या छोट्याश्या देशात अप्रतिम प्लॅनिंग केलेला समुद्रकिनारा बघुन मस्त वाटले.

दिनेश Light 1

Pages