Submitted by मिल्या on 29 January, 2015 - 05:10
विरहामध्ये झुरतो कणकण, तू पण मी पण
घेत राहतो श्वास तरी पण, तू पण मी पण
रात्र घेउनी आली अगणित स्पर्श-सुयांना
करायचे का चांदण-गोंदण, तू पण मी पण
सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण
माझ्यामध्ये बिंब तुझे अन् तुझ्यात माझे
तरी भोगतो एकाकीपण, तू पण मी पण
लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण
सोबत असुनी मुक्कामाचा थांग न पत्ता
करत राहिलो नुसती वणवण, तू पण मी पण
मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण
- मिलिंद छत्रे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहवासाची लज्जत तेव्हा वाढत
सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण>>>>>>>सम्पूर्ण गझल आवडली, त्यात हे विशेष.:स्मित:
काफियारदीफ जोडी छान
काफियारदीफ जोडी छान वापरलीत
गझल खूप सुन्दर आहे खूप आवडली
धन्यवाद
व्वा !
व्वा !
क्या बात है मिलिंदराव .....
क्या बात है मिलिंदराव ..... आख्खी गजलच मनाला हिंदोळ्यावर झुलवणारी - "मी पण तू पण" - जियो !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर गझल!!! धन्यवाद मिलिंद!!
सुंदर गझल!!!
धन्यवाद मिलिंद!!
सही आहे.
सही आहे.
आभारी आहे सर्वांचा
आभारी आहे सर्वांचा
गझल आवडली !
गझल आवडली !
मिठीत होतो तरी आपल्यामधे
मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण<<< वा मस्त
गझल छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहवासाची लज्जत तेव्हा वाढत
सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण ...>>>>>
...................... झकास !!
सोबत असुनी मुक्कामाचा थांग न
सोबत असुनी मुक्कामाचा थांग न पत्ता
करत राहिलो नुसती वणवण, तू पण मी पण
मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गझल छान झालीये.
चांदण गोंदण... अगदी अगदी,
चांदण गोंदण... अगदी अगदी, मिल्या!
मस्त!!!
परत एकदा आभार
परत एकदा आभार
मस्तं...
मस्तं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्यामध्ये बिंब तुझे अन्
माझ्यामध्ये बिंब तुझे अन् तुझ्यात माझे
तरी भोगतो एकाकीपण, तू पण मी पण
लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण
>> क्या बात है !
लाट किनारी आल्यावरती लाट न
लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण
वा. खयालांची मांडणी आकर्षक आहे. पण त्यापुढे जायला हवे कधीतरी.
शुभेच्छा.