भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वाचून covid जीवघेणा नसून बापुडवाणा आहे आणि स्वतःच विक्टिम आहे असं फिलींग आलं >>> Lol परफेक्ट!

यावर स्पीलबर्ग/लुकास वगैरे पिक्चर बनवतील. रेडिएशन मुळे म्युटेट होउन तो एक्दम गॉडझिला साइजचा होतो व न्यू यॉर्क किंवा एलए वर हल्ला करतो ई. किंवा तो शार्कनाडो वाला सार्स-कोव्हिड-नाडो सिरीज काढेल.

बापरे! शार्कनाडो सारखे covid चे 'जीवाणू' बदाबदा कोसळतायत, आपल्या असंख्य नांग्यांनी लोकांना धरून त्यांना covid ची लागण करतायत, मग लोकं फटाफट सर्दी, ताप वगैरे ने हैराण होतायत असलं काहीतरी डोळ्यासमोर आलं Wink त्यावर उपाय म्हणून विमाने खाली वाफाऱ्यांचे फवारे सोडतायत असली भंपक कल्पना पण आली डोक्यात Lol

वरच्या चर्चेनंतर स्नॉर्कलिंग व स्कूबा च्या उपमा अ‍ॅनिमल बाफवर अचूकरीत्या वापरल्याबद्दल मानव यांना एक लाइक बनतोच >> +१ Happy

And these days every thoughtful scientist knows this to be a fact. That NASA’s Apollo missions never went to the moon. And NASA themselves are announcing that “We Never Went to the Moon” when they tell us that “we will not be able to embark on future manned space flight until we can solve the radiation problem.” So the radiation problem was not solved in the 60’s and therefore space flight was not possible in the 60’s. NASA is admitting this openly.

वरील परिच्छेद फक्त नमुन्यादाखल.
नासाने एक दशका पूर्वीच आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला तेव्हाच्या टेप्स इरेज झाल्या असे सांगितले (ओरिजनल इरेज झाल्या तरी त्यावरून आधीच घेतलेला बॅकअप आहे) त्यावरून आणि व्हॅन ऍलन बेल्ट्स बद्दल वाचून krishna.org वर नव्या दमाने हा लेख आलाय असे दिसते. धमाल लेख आहे.

यांचे आधीचे लेख आणि चर्चे नुसार चंद्र पार सूर्याच्याही पलीकडे आहे आणि नासा/इस्रो वर्णन करतात त्याप्रमाणे झाडे-इतर जीव नसलेला रुक्ष ग्रह नाहीये.

Lol

सूर्याभोवती फिरताना कधीतरी चंद्र तिकडेच राहिलेला दिसतो. एखादे लहान मूल बाजारात फिरताना चुकून मागे राहावे तसा Happy किंवा तो दुसरा चंद्र असावा. वावे यांनी माबोवर सिद्ध केलेच आहे की दोन चंद्र आहेत.

त्यांनी तेथे भारताचे मून लॅण्डिंगही फेक आहे असे म्हंटले आहे. ते ऑलरेडी डिस्पेल झाले आहे. कारण भारताचे/बॉलीवूड मधले ग्राफिक्स त्यापेक्षा टेरिबल आहे Happy त्यामुळे भारत प्रत्यक्ष मून लॅण्डिंग करणे व त्याबद्दल बेमालूम ग्राफिक्स तयार करणे यात पहिल्याची शक्यता जास्त आहे Happy

भारत प्रत्यक्ष मून लॅण्डिंग करणे व त्याबद्दल बेमालूम ग्राफिक्स तयार करणे यात पहिल्याची शक्यता जास्त आहे >> Rofl

फा Lol

फा Lol

भारत प्रत्यक्ष मून लॅण्डिंग करणे व त्याबद्दल बेमालूम ग्राफिक्स तयार करणे यात पहिल्याची शक्यता जास्त आहे >>> हे बेक्कार होतं Lol

भारत प्रत्यक्ष मून लॅण्डिंग करणे व त्याबद्दल बेमालूम ग्राफिक्स तयार करणे यात पहिल्याची शक्यता जास्त आहे >>> Rofl Rofl

मग काय तर. कुणीतरी प्लास्टिकची अंडी बाजारात आल्याची अफवा उडवली होती जी बनवायला ओरिजिनल अंड्यापेक्षा जास्त खर्च येत होता Lol

बायद वे हे फेक मून लँडिंग वाले आणि "सपाट पृथ्वी" वर विश्वास ठेवणारे दोन्ही एकच असावेत.

याचे परिणामही दिसायला सुरुवात झाली आहे.. सलग दुसऱ्या दिवशी लक्षद्वीप हा गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला कीवर्ड बनला आहे..

म्हणून मी नेहमी लिहीत असतो भारतीय जनता शिक्षित तर झाली पण परिपक्व अजून पण झालेली नाही

यात पहिल्याची शक्यता जास्त आहे >> Rofl
मला ती व्हाट्सअ‍ॅप फॉरवर्ड पाक ची क्लीप आठवली ज्यात ते म्हणत होते त्यात काय आम्ही ही केलय आणि अति वाईट ग्राफिक्स होते..

फा Biggrin

*७०. ओली भेळ"- एक पुर्ण अन्न.*

मी सन १९६५ ते १९६८ च्या दरम्यान *पुणे आकाशवाणीवर 'वनिता मंडळ'* या कार्यक्रमाचे भाग ऐकायचो. त्यातील एका भागात *"ओली भेळ हे एक पुर्ण अन्न"* कसे आहे हे सांगितले गेले. ते पुढील प्रमाणे..

भेळेतील चुरमुरे हे पिष्टमय पदार्थ आहे. फरसाण हे नत्रयुक्त पदार्थ आहे. चिंच व गुळाचे पाणी यातील चिंच आंबट रस आहे व गुळ मधुर रस आहे. याशिवाय मिरची तिखट रस आहे व मिठ खारट रस आहे. शेंगदाणे हे प्रोटिन्सयुक्त आहेत. कांदा, टोमँटो व कोथिंबीर या शरीराला आवश्यक असणारे पदार्थ भेळीत असतात. या ओल्या भेळीमध्ये स्निग्ध रस नसल्यामुळे भेळ खाल्यानंतर थोडे दही खावे. असे त्या कार्यक्रमात सांगितले होते.

मी गेली ५० वर्ष आठवड्यातून एकदा किंवा दोनदा संध्याकाळी ओली भेळ खातो आहे. मी भेळ खाताना त्यावर भरपुर चिंच-गुळ पाणी टाकायला सांगतो. मला ओली भेळ आजपर्यंत कधीच बाधली नाही. उलट ओली भेळ खाल्यानंतर मला एनर्जीटीक वाटते असा माझा ५० वर्षाचा अनुभव आहे.

ज्यांना बाहेरची भेळ खाल्याने बाधेल अशी भिती वाटते त्यांनी घरी ओली भेळ करून खावी. असे माझे मत आहे. हवे असल्यास त्यावर चाट मसाला किंवा जिरे पुड घातल्यास उत्तम चव येते व ते फायदेशीर आहे.

अरविंद जोशी, B.Sc.
९४२१९४८८९४

माझे सर्व लेख एकत्रित करून *'आजोबांचा बटवा'* नावाचे फेसबुक पेज बनवले आहे त्याची लिंक पुढे देत आहे.

https://www.facebook.com/profile.php?id=61550682486411&mibextid=ZbWKwL

Exactly.. हे forward आवडलं आहे.
ह्यापुढील version dehydration होऊ नये म्हणून पाणी पुरी कशी फायदेशीर आहे हे करा.
चाट तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!

कृपा करून एखादे फॉरवर्ड पिझ्झा ने मसल मास कसा वाढतो आणि आनंदी हॉर्मोन्स कसे उत्तेजित होऊन फायदा होतो असेही येऊंदे. Happy
आता पेपरात फ्रोझन करून मग दुसऱ्या दिवशी भात खाल्ल्याने त्यातले स्टार्च कसे वजन वाढवत नाही हे येतं आहे.शिळ्या पोळीचे फायदे पण येत आहेत पेपरात.

खालील फॉर्वर्ड लवकरच
मॅगी बनवून तशीच ठेवून दिली आणि सात दिवसांनी खाल्ली तर शरीर पिसासारखे हलके होऊन उडता येऊ शकते.

सात लाल मिर्च्या खिशात ठेवून दिवसभरात चावून खाल्ल्यास मनुष्यास रूप बदलण्याची सिद्धी प्राप्त होते. मंत्राद्वारे फक्त कुत्रा, हत्ती आणि मांजर यांचे रूप घेता येते. पण मिरचीमुळे तुम्ही अय्याराप्रमाणे कुणाचेही रूप घेऊ शकता.

आता पेपरात फ्रोझन करून मग दुसऱ्या दिवशी भात खाल्ल्याने त्यातले स्टार्च कसे वजन वाढवत नाही हे येतं आहे >>> आह! परदेस मधे महिमाने न्यू यॉर्क टाइम्सच्या पेपरमधे शाखाला पराठे का दिले ते आता कळाले. ती सतत भारतीय संस्कृती मधे नखशिखांत बुडालेल्या अवस्थेत असल्याने आपल्याकडे न्यूजपेपर ही वस्तू आस्तित्त्वात नसतानाही या शास्त्रीय गोष्टी ज्ञात होत्या हे तिला चांगले माहीत होते.

फक्त तिची चूक ही झाली की स्वतःच्याच मंगनीचा फोटो आलेले पान त्या करता वापरले. हे जोशी जेव्हा "७१" लिहितील तेव्हा तेवढी एक सावधगिरीची सूचना त्यात त्यांनी घालावी.

'पेपरात येतं आहे' आणि 'पेपरात फ्रोझन करून' अशा दोन्ही वाक्यरचनांचे वेगवेगळे अर्थ आहेत. Lol
संस्कृत श्लोकांमधे जसं विशेषण एकीकडे आणि त्याचं विशेष्य दुसऱ्या टोकाला असतं तसं झालंय बहुतेक अनुच्या त्या वाक्याचं.

अनु Rofl

Pages