डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
अरे देवा.... कोणी लिहिलंय हे?
अरे देवा.... कोणी लिहिलंय हे? काहीही.....
आचार्य वाग्भट पुन्हा येऊन अष्टांग ह्रदय पाठ करून घेतील.
दुधीचा रस पिऊनच पैठणी फेम
दुधीचा रस पिऊनच पैठणी फेम आदेश बांदेकर यांना ऍडमिट करावं लागलं होतं ना? असच काहीसं होत बहुदा
हो.. तो दुधी कडू होता आणी
हो.. तो दुधी कडू होता आणी त्यांना त्याचा खूप त्रास झाला होता. वरचा मोबाईल नंबर खरा असेल तर फोन करून त्याला सांगायला हव की फाॅरवर्ड करताना निदान चांदण्या कमी वापर. इतक्या चांदण्या बघून तारे चमकले डोळ्यांसमोर वाचताना
निदान चांदण्या कमी वापर.
निदान चांदण्या कमी वापर. इतक्या चांदण्या बघून तारे चमकले डोळ्यांसमोर वाचताना>>
तो मेसेज व्हॉट्स ॲप साठीच तयार केला असणार. अख्खा मेसेज बोल्ड करायला इतके स्टार वापरलेत
सकाळी रिकाम्या पोटी (शौचाला
सकाळी रिकाम्या पोटी (शौचाला जाऊन आल्यावर) पिऊ शकतो >>>
तो कंस दिला हे बरे केले. नाहीतर आडातच नाही तर वाली म्हण आठवली.
अॅक्च्युअली त्या मोठ्या पोस्ट मधे मूळ काहीतरी आयुर्वेदिक तथ्य असावे. अॅसिडीटीला प्रोबायोटिक खा सांगतात तसे काहीतरी. पण मेसेज मधे हरवून गेले.
लौकीचा लौकीक २०० - ३०० मिली
लौकीचा लौकीक २०० - ३०० मिली ग्राम मध्ये.
ऑन अ सिरियस नोट, असे
ऑन अ सिरियस नोट, असे कच्च्या भाजीचे ज्यूस वगैरे पिणे निरुपद्रवी नसते. गुळवेल चा ज्यूस लिव्हर साठी टॉक्सिक असतो. पण रामदेव बाबा काय वाट्टेल ते दावे करून तो विकतात व फेसबूक अंकल्स तो पितात, शिवाय त्यावर शंका उपस्थित करणारे राईस बॅग कन्व्हर्ट, विदेशी दलाल, फार्मा दलाल, लिब्रू वगैरे ओरडतात.
खडकात मीठ कशाला घालायचे आहे?
खडकात मीठ कशाला घालायचे आहे?
*आणि आली तर!*
*मग पुन्हा येऊ नकोस!!* >>>> याची अजिबात टोटल लागली नाही.
इतक्या चांदण्या बघून तारे
इतक्या चांदण्या बघून तारे चमकले डोळ्यांसमोर वाचताना >>> हाहाहा.
लौकी म्हणजे दुधी भोपळा का?
लौकी म्हणजे दुधी भोपळा का? त्याचा रस कसा काय खावा?
चांदण्या >> हाहा
<<<<अॅक्च्युअली त्या मोठ्या
<<<<अॅक्च्युअली त्या मोठ्या पोस्ट मधे मूळ काहीतरी आयुर्वेदिक तथ्य असावे. अॅसिडीटीला प्रोबायोटिक खा सांगतात तसे काहीतरी. पण मेसेज मधे हरवून गेले.>>>
नाही त्यात काही तथ्य नाहीये. रक्ताची आम्लता वाढली तर ते घट्ट होऊन ब्लाॅकेजेस होण्याइतपत वेळ मिळणार नाही त्याआधीच व्यक्ती चा मृत्यू होईल. हे टाळण्यासाठी शरीरात तीन बफर सिस्टीम्स काम करत असतात आणि रक्ताचा पीएच काटेकोर पणे सांभाळला जातो.
आम्लपित्त झाले तर आपण क्षारयुक्त गोष्टी घेत नाही इनो वगैरे तत्सम ऍसिड न्युट्रलाइजरस घेतो जे त्वरित परिणाम करतात. मग त्या पेक्षा जास्त ऍसिडिटी वाढली तर अतिसंथ परिणाम करु शकणारे क्षार घेणं हे काही लॉजिकल नाही. मुळात त्यांनी सिवियर ऍसिडिटी म्हणून जी लक्षणे सांगितली आहेत ती लो ग्रेड इन्फ्लेमेशन ची आहेत.
शेवटचं दुधी चा ज्युस तो कडु आहे का नाही हे बघता घाऊक प्रमाणात काढला जातो जे भयानक डेंजरस आहे. वरती बांदेकरांचे उदाहरण दिले आहे त्यापेक्षा भयंकर केस मी वाचली आहे. ४० च्या आसपास वय असणारी नुकतीच अमेरिकेतुन परत येऊन पुण्यात सेंटर झालेली एकदम फिट महिला हा कडु दुधीचा ज्युस प्यायल्याने २४ तासांत मरण पावली :(. लोकसत्ता आणि मटाच्या पुणे एडिशन नी कव्हर केली होती ही बातमी.
तरीही दुधी चा ज्युस अजुनही विकला जातो, अशा पोस्ट येत रहातात आणि लोक अजुनही विश्वास ठेवतात ह्या सगळ्यावर.
ह्या अशा वॉट्स ऍप पोस्ट वर विश्वास ठेवणारे सिनियर सिटीझन्स हा एक स्वतंत्र विषय आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत मोदींनी थाळी वाजवायला सांगितली कारण ती कंपन करोना विषाणू चा नाश करतील आणि भारत करोना मुक्त होईल अशा अर्थाची एक अत्यंत आचरट पोस्ट फिरत होती. तीच्यावर १००% विश्वास असल्याने पुरेशी काळजी न घेता माझे वडील वावरत होते परिणामी कोविड मुळे त्यांचा मृत्यू झाला असा अनुभव एकाने शेअर केला होता. हे असले फाॅरवर्डस डेंजरस आहेत.
*आणि आली तर!*
*आणि आली तर!*
*मग पुन्हा येऊ नकोस!!*}}}}}}}
हे सगळ्यात भारी आहे...सगळे आजार असेच बरे व्हायला हवेत...
पर्णीका - धन्यवाद माहितीबद्दल
पर्णीका - धन्यवाद माहितीबद्दल. वेमांना विनंती केली आहे ते वाक्य काढायची कारण आता मला ते काढता येत नाही.
विकु - तुमचीही पोस्ट नोटेड.
*आणि आली तर!*
*आणि आली तर!*
*मग पुन्हा येऊ नकोस!!*
किंवा खडकात मीठ घालावे!*>>>>>
इंग्लिश, हिंदी, मराठीचं कडबोळं करून लिहिलेला हा मेसेज करमणूक करणारा आहेच. पण या वरच्या २ वाक्यांना फुटलेच.
केच्याकै लिहिलंय. आली तर येऊ
केच्याकै लिहिलंय. आली तर येऊ नको, खडकात मीठ घाल, लौकीचा रस पी, दूधीचा रस सेवन कर, हा नंबर सेव्ह कर, त्या नंबरला नमस्कार कर, त्याला संपर्क कर. कशाचा कशाला ताळमेळ नाही.
कडवट दुधी तर कुप्रसिद्ध आहेच. पण कडवट काकडीपासून सुद्धा काळजी घ्यायला हवी. एकाच फॅमिली मधल्या आहेत त्या दोघी. बांदेकरांचा किस्सा ऐकल्यापासून तर मी दुधी पूर्ण बंद केला आहे. त्या कुठल्या फुगू का काय नावाच्या विषारी जपानी फिश सारखा वाटतो दुधी. असेल नीट तर आरोग्यास फायदा नाहीतर मरण
हेल्थच्या नावाखाली काहीही फॅड निघते आजकाल. कालपरवा एक मित्र "आयोनाइज्ड वॉटर" चे गुणगान गाऊ लागला. हे म्हणजे तोंडून आलेले "काय च्या काय फॉरवर्ड" होते. अयोनाईज्ड गॅस म्हणजे प्लाझ्मा गॅस हे माहीत होते आणि तो धोकादायक असतो. त्यामुळे अयोनाईज्ड वॉटर हे आरोग्यासाठी फायद्याचे असेलच कसे? त्यामुळे त्याने सुरवात करताच मला कळले कि काहीतरी नवीन मार्केटिंग फॅड आहे. पण त्याला नाराज नको करायला म्हणून ऐकत राहिलो. पण जेव्हा तो म्हणाला "इलेक्ट्रिक रॉडस मधून हे पाणी पास केले जाते त्यामुळे ते आयोनाइज होते. म्हणजे त्यातले ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगवेगळे होतात" मग मात्र इतका वेळ दाबून धरलेले हसू एकदम बाद्दकन्न फुटले
म्हणालो, "बस्स कर रे बाबा बस्स कर. आता नाही ऐकवत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळे केले तरीही ते पाणीच राहते" 
मग जरा वेळाने गुगलून बघितले तर अयोनाईज्ड वॉटर च्या नावाखाली आजकाल अल्कलाइन वॉटर विकत आहेत.
Ionized water is a commercially available form of alkaline water
अर्थात त्याचे फायदे सांगितले जात आहेत. पण त्याचबरोबर ते ठराविक प्रमाणापेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते असेही वाचायला मिळते. WHO ने सुद्धा त्याबद्दल इशारा दिलेला वाचला.
एकूणात काय तर नवीन काही फॅड आले की जरा सावधच असलेले बरे
दुधीचा मस्त हलवा हाणायचा
दुधीचा मस्त हलवा हाणायचा सोडून रसाचे कसले डोहाळे…
दुधीचा मस्त हलवा हाणायचा
दुधीचा मस्त हलवा हाणायचा सोडून रसाचे कसले डोहाळे
>>> दुधीचा हलवा हाणून झालेली मेदवृद्धि कमी करण्यासाठी हो.
बाकी दुधी, दोडका वगैरे पदार्थांच्या भाज्या करण्यापूर्वी एक छोटा तुकडा कच्चा खाऊन बघण्याची सवय लावली आहे मातोश्री व सासूबाईंनी. शक्य झाले असते तर त्यांनी भाजी घेतानाच खाऊन बघितला असता
हो मी पण खाऊन बघते, आदेश
हो मी पण खाऊन बघते, आदेश बांदेकर आणि त्या परसिस्टंट मधल्या बाईंची हॉरर स्टोरी ऐकल्यावर.कडू असेल तर थेट कंपोस्ट ला.
कावळे कबुतर आदि पक्षी काकड्या खात नसावेत, नाहीतर त्यांना देऊन पाहिलं असतं.अर्थात कडू काकडी त्यांच्या पण सिस्टम वर असा परिणाम करेल की कसे, माहीत नाही.
४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या आईने दुधी हलवा केला होता. देवाला नैवद्य दाखवल्यावर आमच्या डॉगीला एक घास दिला. थोड्या वेळाने डॉगीला उलट्या सुरु झाल्या. आम्ही दुधी हलव्याची चव घेतली तेव्हा समजलं कि दुधी कडू होता. डॉगी रात्रभर उलट्या करत होता. बेसिक गोळ्या औषध देऊन काय फरक नाही पडला. पहाटे पहाटे उलट्या करायचा थांबला. सकाळी त्याला डॉक्टरकडे नेऊन सलाईन लावली तेव्हा कुठे बरा झाला. एका घासाने हे सगळं झालं.
कावळे कबुतर आदि पक्षी काकड्या
कावळे कबुतर आदि पक्षी काकड्या खात नसावेत, नाहीतर त्यांना देऊन पाहिलं असतं. >> तुमची ती 'कुत्री असलेली' मांजर खाते का पहा.
शाळेसारख सुख नाही....!
शाळेसारख सुख नाही....!
मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो,
तो वर दहावीचा शेवटचा पेपर आला.
मी गेलो हायस्कूल सोडून,
माझा वर्गातला बेंच तिथेच राहिला.
बाहेर जाताना कळत नव्हतं,
आता येथे परत येणे नाही.
आयुष्याच्या पानावर मित्रांनो अन् मैत्रिणींनो,
शाळेसारखं सुख नाही.
आता दिवसाला आणतो मी,
खूप सारे पैसे कमवून.
पैसा-पैसा म्हणत-म्हणत,
जातो साऱ्या गर्दीत हरवून
त्या भल्या मोठ्या रक्कमेला,
आईच्या एक रुपयाची सर नाही.
अन् आयुष्याच्या पानावर मित्रांनो,
शाळेसारखं सुख नाही.
अफाट रस्त्यावर आता,
गाडी माझी सुसाट असते.
भली मोठी गाडी पण,
सोबत त्यात कोणीच नसते.
चार चाकीच्या गाडीला मात्र,
मित्रासोबत डब्बल शीट फिरणाऱ्या,
सायकलीची सर येणार नाही,
अन् आयुष्याच्या पानावर मित्रांनो
शाळेसारखं सुख नाही.
कैक हॉटेल आहेत आता,
दुपारचे जेवण करण्यासाठी.
वेगवेगळ्या डिश अन्,
वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी.
त्या सगळ्या जेवणाला मात्र,
मित्रांसोबत शाळेत खालेल्या,
डब्यातील जेवणाची चव नाही.
अन् आयुष्याच्या पानावर मिंत्रानो
शाळेसारखं सुख नाही.
आता झालो मोठे आम्हीं,
कळते आम्हा सर्व.
शाळेतून बाहेर पडल्यावर,
मिटला सारा गर्व.
एक हाती लॅपटॉप अन्,
बॉस कामाचे मेल पाठवतो.
दंग झालेल्या या जिवनात मग,
शाळेचा बेंच पुन्हा आठवतो.
पण जेंव्हा कळायला पाहिजे होते,
तेंव्हा माणसाला कळत नाही.
अन् आयुष्याच्या पानावर मित्रांनो
शाळेसारखं सुख नाही.
अन् आयुष्याच्या पानावर मित्रांनो अन् मैत्रिणींनो शाळेसारखं सुख नाही.
( कोणीतरी फॉरवर्ड केलेली पोस्ट आवडली म्हणून.....)
..
घ्या अजून एक रत्न!!
हे काकाफॉ आहे.
हे काकाफॉ आहे.
अमेरिकाने ढुंढ निकाले रामायण
अमेरिकाने ढुंढ निकाले रामायण के सबुत.
हे त्या याची सर त्याला नाही
आणि शेवटच्या ओळीत एकदम..
'अन् आयुष्याच्या पानावर मित्रांनो अन् मैत्रिणींनो शाळेसारखं सुख नाही....'
मैत्रिणींनो.... वाचून फिस्कन हसायला आले.
तेव्हढेच थोडे thrill अनुभवले त्याने!!!
काहीही लिहितात लोक. !!!!
शाळेतले सुख तेवढ्यापुरतेच बरे वाटते. दहावीनंतर कुणाला तरी एखादा महिना तरी एक्सट्रा काढायला सांगितला शाळेत .तर आवडेल का?
'कुत्री' असलेली मांजर उर्फ
'कुत्री' असलेली मांजर उर्फ सेनापती सोसायटी बाहेर बिझी असते,अगदीच पार्ट टाईम येते
ती काकडी वगैरे अजिबात खाणार नाही.हुं करून नाक उडवून समोरुन निघून जाईल.(परवा मारी बिस्कीट ला हेच केलं तिने)
हे करू नका..तरी आपण का करतो
हे करू नका..तरी आपण का करतो
स्त्रियांनी गायत्री मंत्र का म्हणू नये.
शास्त्र जे करू नका म्हणते; तेच नेमके करावयास धावणे, हा सामान्य स्वभाव असतो. आणि त्यामुळेच नाश होत असतो, हे आपणांस समजत नाही.
असे परमपूज्य सद्गुरू श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्यांच्या 'अभंग अमृत' या ग्रंथात पान क्रमांक १७८ वर सांगतात आणि हे समजावण्यासाठी खालील कथा सांगतात-
स्त्रिया आणि गायत्रीमंत्र :
सहज विषयांवरून विषय निघाला; म्हणून मला माझ्या आईची गोष्ट आठवली. माझ्या मातुःश्री (परमपूज्य सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे)या परमार्थातील एक थोर अधिकारी होत्या.
त्यांच्याकडे अनेक स्त्रिया मार्गदर्शनासाठी येत असत. एकदा अशाच पाच-सहा जणी त्यांच्याकडे आल्या होत्या. चर्चा सुरू झाली. एका बाईने आमच्या मातुःश्रींना विचारले की, “बायकांनी गायत्री मंत्र का म्हणू नये ?"
त्यावर आमच्या मातुःश्री चटकन् सावरून बसल्या. एक-दोन मिनिटे स्तब्धतेत गेली. मग त्या सांगू लागल्या; "हा प्रश्न योग्य आहे. या प्रश्नाचे
उत्तर देण्याची माझी पात्रता नाही. परंतु मला एक माहीत आहे की, सर्व ऋषी,मुनी, साधू, संत सदैव आपल्या हिताचेच सांगत असतात. त्यावर माझा नितांत विश्वास आहे. माझे तीर्थरूप पू.श्री.नारायणराव सोनटक्के हे मोठे अभ्यासक होते. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे ते निःसीम भक्त होते.
गायत्रीमंत्राची अक्षरे आहेत चोवीस ! प्रत्येक अक्षर एका एका नाडीद्वारे प्रकाशित होत असते. जसे टाईपरायटरवर एकेका अक्षरासाठी एक एक बटण असते आणि ते दाबले की, नेमके तेच अक्षर उमटते; तसे गायत्रीमंत्रातील प्रत्येक अक्षर एकेका नाडीद्वारे प्रकाशित होते. पुरुषांना पूर्ण चोवीस नाड्या आहेत;
परंतु स्त्रियांना मात्र फक्त बावीसच नाड्या आहेत. त्या दोन नाहीत, त्यामुळे स्त्रियांना दाढी-मिशा येत नाहीत व प्रोस्टेट ग्रंथी वाढत नाही. या
अशा दोन नाड्या कमी असल्यामुळे, चोवीस अक्षरांचा गायत्रीमंत्र जपला तरी उपयोगी पडत नाही.
ज्याप्रमाणे टाईपरायटरवर जेवढा कागद असेल, तेवढीच अक्षरे उमटणार; आणि कागद संपल्यावर अक्षरांची बटने दाबली तरी अक्षरे उमटणार
नाहीत; त्याप्रमाणे ही अक्षरे परिणाम करू शकणार नाहीत. इतकेच नव्हे तर;
गायत्रीमंत्र हा पुरुषबीज वाढविणारा मंत्र असल्यामुळे, तो जपल्याने बीज वाढू शकते.शास्त्र असे आहे की,
स्त्रियांमध्ये बीज वाढू नये; शोणित वाढावे. स्त्रियांनी गायत्रीजप केला तर, शोणित जळून जाईल.
त्यामुळे या जन्मी केलेला जप,पुढल्या जन्मी धड स्त्री नाही,धड पुरुष नाही असा तृतीयपंथी बनवतो . अशांना दाढी-मिशा येतात; परंतु त्याचबरोबर लुगडे नेसण्याची हौस निर्माण होते. स्त्रियांप्रमाणे हातवारे करावे असे वाटू लागते. या सर्व पूर्वजन्मीच्या स्त्रीवासना ! परंतु, त्या जन्मात गायत्री जपल्यामुळे बीज वाढले, दाढी-मिश्या फुटल्या; पण मूळचे स्त्रीसंस्कार असल्यामुळे लुगडे नेसण्याची हौस मात्र राहिली. असे होऊ नये, शोणित जळू नये, अर्धवट बीज वाढू नये; यास्तव बायकांनी गायत्री जपू नये !"
आजकाल, स्वतःचा मोठेपणा सांगण्याकरिता, “तुम्ही करा; काही होत नाही. मी आहे ना !" असे सांगण्याचे फॅडच आहे. परंतु ऐकणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की, आपण असे केले तर काय घडेल ?
प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी, तसेच सर्व प्रमुख आचार्यांनी जे सांगितले आहेत ..
...
काहीही हा श्री!!!!!
अशक्य आचरट पोस्ट आहे ही
अशक्य आचरट पोस्ट आहे ही
कुठल्या तारेत असतात लोकं हे असलं लिहिताना
अशक्य आचरट +१.
अशक्य आचरट +१00
Excel मध्ये असतो तसा whatsapp
Excel मध्ये असतो तसा whatsapp मध्ये नावाचा filter हवा होता गृप मधल्या विशिष्ट व्यक्तीने पाठवलेले msgs वाचण्यासाठी.
मग मी थेट इकडे पाठवले असते pipeline through.
काहीही काय थेट अशी धमकी?
काहीही काय
थेट अशी धमकी?
Pages