भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नको असली धनप्राप्ती...हे गिमिक लक्ष्मी देवीला माहीत आहे वाटते नाहितर ऊगीचच धनाची देवता म्हणतात काय?

पण पुरुषांचे पाय शनी आणि बायकांचे मनगटापासून पुढे हात शुक्र असतील तर शनी शुक्राच्या प्रभावाखाली येतोय ना? मग टेक्निकली उलट होतंय. आपल्याला शुक्र शनीच्या प्रभावाखाली हवे असेल तर पुरुषांनी पायाच्या बोटांनी बायकांचे हात दाबले पाहिजेत.

काही काही भोंफॉ एवढे आचरट असतात की फक्त अवाक् व्हायला होते, काही कॉमेंट करावीशी वाटत नाही, उपहासात्मक आहे की काय असे वाटते. वरचे त्यातलेच.

आणि हे सुद्धा.

पुरुषांनी पायाच्या बोटांनी बायकांचे हात दाबले पाहिजेत>>> Rofl मी इमॅजीन केलं Wink
रमड, तुझ्या तर नवर्याचाच आयडी धनि, त्यमुळे पाय न दाबता ही धनि च Lol

@मानव >>> मला वाटलेलं तो जोक आहे. नो वंडर भारतात ‘मेरे शेअर्स गिर गये। मै बरबाद हो गया।’ टाईप्स पिक्चर गाजायचे.

आपल्याला शुक्र शनीच्या प्रभावाखाली हवे असेल तर पुरुषांनी पायाच्या बोटांनी बायकांचे हात दाबले पाहिजेत.
>>> Rofl

जिथे जिथे हे भोंफॉ समोर येतात तिथे त्या त्या वेळी असं काय काय सुचायला हवं, फॉ करणार्‍यावर फेकून मारायला

मला सुद्धा तसेच वाटले पहाता क्षणी, पण कुठल्या अँगलने शूट केलेय, एक्सप्रेशन वगैरे पहाता नंतर काही सांगता येत नाही असे वाटले. तरीही तो जोक असावा अशी आशा करतो.

तरीही तो जोक असावा अशी आशा करतो.>>>>

त्या बाईच्या टेबलावर पसरलेले फेंगशुइ जग पाहता आणि ऐकणार्‍यांच्या तोंडावरचा भक्तिभाव पाहता हा जोक नसुन सत्य घटना है मिलॉर्ड!!!

आणि हे सुद्धा.
<<<< हायला, आज मला कळले वॉल स्ट्रीटला बैलाचे शिल्प का आहे?

माझे ऑफिस त्या बैला शेजारीच होते काही वर्षे. कुणी कुत्रे विचारत नसत त्याला त्यावेळी.
आजकाल तिथे गेले तर भारतीय व चिनि टूरिस्टांचा अक्षरशः वेढा पडलेला असतो.
शेअर मार्केटात लाखाचे बारा हजार झालेला एखादा करतही असेल. मरता क्या नहीं करता.

आजकाल तिथे गेले तर भारतीय व चिनि टूरिस्टांचा अक्षरशः वेढा पडलेला असतो >>> त्याचं कारण कळलंच आता आपल्याला Proud

कुठल्याही परंपरेमागचा कार्यकारणभाव लक्षात न घेता टिंगल उडवणाऱ्या लोकांना काय म्हणावे कळत नाही. शनीच्या प्रभावाखाली आलेले लोक शेअर बाजारात मार खातात. बैलाचा तो भाग शुक्राच्या अधीन असल्याने तिथे हात लावल्याने शनीचा प्रभाव ओसरतो. इतकं साधं सोपं विज्ञान आहे त्याच्यामागे.

29 मार्च ते 20 मे पिशाच्च योग असं या विदुषी चे भाकित आहे.

https://youtube.com/shorts/sl6QhpVw1w0?si=XXEHFoNb2IU2wvHB >>>> शणी आनि शणीवार... Biggrin

एक गोष्ट सांगायला या विदुषीची काहीच गरज नाही , ती म्हणजे आंतराष्ट्रीय स्तरावरील अमेरिका + इस्राएल X इराण + येमेन + हीजबुल्लाह यांच्यातील सद्यस्थितीतील तणावाची परीस्थीती ध्यानात घेता ३० किंवा ३१ मार्चच्या ईदच्या चंद्रदर्शनानंतर ( रमजानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर ) सामरिक घडामोडीत वेग येण्याची दाट शक्यता वाटतेय.

Pages