भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळं (म्हणजे मंगळसूत्र आणि जोडवी वगैरे..) जेव्हा माझ्या आयुष्यात आलं तेव्हापासून मी माझा थायरॉइड बॅलन्स हरवून बसले आहे. मग आता मी काय करायचं? >>>> Lol Lol

धमाल चालली आहे इथे.

"की फॉरवर्ड लिहू मग समजणारे" - हा जिंकलेला प्रतिसाद आहे

नदीच्या पाण्याने स्त्री चे सौंदर्य निखारून येते तर पुरूषाचे शरीर पीळदार होते. >>> पण नदीला हे कळतं कसं? स्त्रीचे शरीर पिळदार आणि पुरुषाचे सौंदर्य निखारून ( हा मराठी शब्द आहे? ) असं होणार नाही कशावरून? AI युक्त नदी??

पण नदीला हे कळतं कसं?
>>>> असे काय करता नदीच्या पाण्यात कसले तरी दैवी गुणधर्म असतात असे म्हटले ना?

यावर न्हाव्याकडे न जाता आपणचं आपले केस कापावे इतका सोपा उपाय आहे की! वस्तरा, कात्री, ट्रिमर, ग्रूमर, लॉन मोअर काय वाट्टेल ते वापरा. नदीत कशाला जायला हवंय!

हे forward न्हाव्या पर्यंत पोचले तर केस कापण्याच्या पैश्यापेक्षा नदीतील वाहते पाणी केसांवर फवारण्याचे पैसे जास्त लावेल.... टक्कल विरोधक गुणविशेष म्हणून !!

>>>>हे forward न्हाव्या पर्यंत पोचले तर
का नाही पोचणार. काही माबोकर न्हावी असूच शकतात.

कालच १ काहीही हं श्री टाईप काकू फेबू वर गजरा स्त्री च्या आरोग्या वर कस अ तिउत्तम असतो असा लेख होता Sad स्त्रीच्या डोक्यातून उत्सर्जित होणारी गरम लहरी फुलाच्या वासांनी होणारी शितलता वगैरे वाट्टेल ते होतं..
रहावलं गेलं नाही आणि मी लिहिले.. मग पुरुषांनी पण लावायला हवे गजरे.

हा फॉर्वर्ड एका लिंकसहीत आला आहे. याला भोंदू फॉर्वर्ड मधे चोप्य पस्ते करावं कि अन्य धाग्यावर ?

"विवाहा सहज बनवा, व्यभिचाराला अवघड बनवा"
- आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम
अर्थात समाजात जर विवाह साध्या पद्धतीने, कमी खर्चात पार पडतील, तेंव्हा परिणामतः‌ समाजात नैतिकता वृद्धींगत होईल आणि लोकांना व्यभिचार करणे अवघड होऊन जाईल.)"
अधिक माहितीसाठी संपर्क साधा या टोलफ्री नंबरवर - 1800 572 3000
https://www.lokmat.com/filmy/bollywood/actor-aamir-khan-marriage-with-re...

विवाह साध्या पद्धतीने, कमी खर्चात पार पडतील

>> बरोबर आहे. आमच्याकडे एकाला असं साधेपणाने, कोणालाही न बोलवता कमी खर्चात लग्न करायचं होतं पण त्याची सद्य बायको आणि मुलांना साधेपणाने आणि पोलिसांना आमंत्रण न देता केलेलं लग्न अजिबात पसंत नसल्याने त्याला नाईलाजाने व्यभिचार करावा लागला.

कळस आहे
लोक काय वाट्टेल ते पाठवतात///// फुकटात विनोद निर्मिती......... हे पहा.....
हसाव की रडाव कळत नाही

प्रत्येकाला माहिती असले पाहिजेत असे काही अलिखित सामाजिक नियम कोणते आहेत?
1.मित्राच्या बहिणीशी लग्न करणार नसाल तर प्रेम करू नये.
2. दवाखाना, विमान प्रवास, आणि मुलाखत या तीन ठिकाणी शक्यतो परफ्युम वापरू नये.
3. लग्न समारंभ ,शोक समारंभ, व कामाचे ठिकाण येथे शक्यतो सर्वात मिसळून जातील असेच कपडे घालावेत.
4.कोणी पैसे दिले तर त्याने मागायचा आधी परत द्यावेत.
5.जर तुम्ही सिगारेट ओढत नसाल तर मित्र सिगारेट ओढताना लांब थांबावे व सिगारेट ओढणाऱ्या लोकांनी उगीच ओढत नसलेल्या लोकांच्या तोंडावर धूर सोडू नये.आणि त्याला एकदा ट्राय कर म्हणू नये.
6.कोणी तुमचा कॉल उचलत नसेल तर उगीच 3,4 नंबर वरून त्या व्यक्तीला कॉल करू नये. कदाचित ती व्यक्ती काही कामात असु शकते.नाहीतर त्याला तुमच्याशी बोलायचे नसेल.
7.वर्गात लेक्चर असताना सर्वाना त्रास होईल असे वागू नये. वर्गात 50 मुले असतील आणि तुम्ही 2 मिनिट जरी चुकीचे वागले तरी 50 मुलांचे 2 मिनिट असे 100 मिनिट वाया जातात. तुम्हाला शिकायचे नसेल पण कदाचित बाकीच्यांना शिकायचे असते.
8. दुसऱ्याच्या आवडी निवडी वर हसू नका, ह्याची gf अशी , हा देव चांगला नाही, हे का खातोय , त्या सिंगर चा आवाज चांगला नाही तुला का आवडतो, टिकटोक फालतू आहे ( हे खरेच फालतू आहे ) तुम्हाला त्याचे निवडीचे काय करायचेय त्याला त्याचे पाळू द्या
9.जेवताना आवाज करू नयेच पण तोंडात काही असताना बिलकुल बोलू नये.
10.इतकेच तोंडात भरावे जितके असताना तुम्ही तुमचे नाव सांगू शकता. आणि तोंड बंद ठेवूनच चावावे
11.सर्वाना वाढून झाल्यावरच जेवायला सुरुवात करावी
12.एखादा पदार्थ कसे खायचे हे माहिती नसल्यावर बाकीच्या कोणीतरी खाताना पाहावे मग सुरुवात करावी उगीच अज्ञानी बनून फिंगर बाउल पियू नये.
13. एखाद्या अनोळखी व्यक्तीविषयी लगेचच चर्चा करू नये, तुम्ही जीच्याबद्दल चर्चा करता ती तुम्ही ज्याच्याशी चर्चा करता त्याची कोणतरी असू शकते.
14.कोणाच्या घरी गेले तर तिथल्या मुलांना कितीवीला आहे विचारून झाल्यावर त्याचे मार्क, आणि गणितातले, इंग्रजी मधले प्रश्न विचारू नयेत.
15.बिना आमंत्रणाचे कोणत्याही कार्यक्रमात जाऊ नये.
16.एखादा पत्ता माहिती नसला तर का जायचंय, तिथे काय आहे असले प्रश्न विचारून किंवा खोटा पत्ता सांगून समोरच्याच्या टाईमपास करू नये. सरळ नाही माहिती सांगावे.
17.समोरचा व्यक्ती तुम्हला माहिती असलेला जोक सांगत असेल तर उगीच तो जोक पूर्ण करून रसभंग करू नये.
18.रांग लावली असली तर रांगेचा रिस्पेक्ट करावा.मधेच घुसू नका आणि कोणाला घुसून पण देऊ नका.
19.समोरची व्यक्ती मुलगी आहे म्हणून सगळे खरे मानू नका, पाहिले दोन्ही बाजू एकूण घ्या मगच ठरवा. दरवेळेस मुलाची चूक नसते.
20. तसेच दरवेळेस ऍकॅसिडेंट झाला तर कार वाल्याची चूक नसते दोन्ही बाजू समजून घ्या आधी मदत करा नंतर दोषारोप करत बसा.
21.काही चुकीचे होत असेल तर मदत करा.तिथले फोटो , व्हिडीओ काढून स्टेटस ठेवण्यापेक्षा ती परिस्थिती कशी नीट करता येईल ते पहा.
22.प्रवासात शेजारच्या व्यक्तीला स्वतः विषयी सगळेच सांगू नका, पैसे एकाच ठिकाणी ठेवू नका, स्वतःला लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊनच निघा.
23.स्वतः बद्दल गोष्टी, तुम्ही किती शिकलात, तुम्ही काय करता, किती पैसे कमावता, तुमच्याकडे काय काय आहे हे विचारल्याशिवाय सांगू नये. फुशारक्या मारू नयेत.
24.कोणाकडे भेटायला पहिल्यांदा घरी जाणार असाल तर शक्यतो मोकळे जाऊ नये. काहीतरी छोटेसे पुस्तक, खायचा पदार्थ, एखादी वस्तू घेऊन जावे.
25.वैयक्तिक स्वछता पाळा, चांगले दिसा उगीच शरीराच्या दुर्गंधीने हवा प्रदूषण, आणि गाबाळे दिसून दृष्टी प्रदूषण करू नका.
26.अपव्होट फ्री असतात उत्तर कोणाचेही आवडले तरी देत जा. कोणी कोणी भरपूर वेळ देऊन उत्तरे लिहिते. दररोज 2 , 2 तास लिहिणारे लोक आहेत इथे. लेखकांनी सुद्धा दर 2 मिनिटांनी सारखे सारखे किती अपव्होट झाले ते मोजत बसू नये. आयुष्यात इतरही गोष्टी आहेत करण्यासारख्या.
आजून खूप सारे गोष्टी आहेत फक्त आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही काही नुकसान होणार नाही असे वागले. एखादी गोष्ट जितकी चांगल्या प्रकारे करता येईल तितकी केली म्हणजेच समाजातले तुम्ही भरपूर नियम पाळले.
भरपूर लाईक्स बद्दल धन्यवाद. काही आजून टीप देऊ इच्छितो प्रत्येक दिवशी एक एक ऍड करेल.
लग्न झाल्यावर जोवर एकमेकांना योग्य रित्या समजून घेत नाहीत तोवर बाळाचा विचार करू नका. ( खूप वेळा चुकीच्या व्यक्ती बरोबर फक्त बाळासाठी राहावे लागते आणि उरलेल्या आयुष्याचे वाटोळे होते म्हणून पाहिले समजून घ्या काहीही प्रॉब्लेम्स असू शकतात )
आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाहुण्याकडे ठेवू नये.
दवाखान्यात कोणाच्या सोबत गेले असाल तर कॅन्सलटेशन रूम मध्ये जाऊ नये. तुमच्यामुळे आजारी व्यक्तीला डॉक्टर बरोबर स्पष्ट नाही बोलता आले तर चुकीचे निदान होते. त्या व्यक्तीला एकट्याला डॉक्टर जवळ सोडावे. जर डॉक्टर ने बोलावले तरच आत जावे
आपल्या सोबतच्या व्यक्तींची नेहमी कोणाला भेटल्यावर ओळख करून द्यावी नाहीतर त्यांना बरोबर नेऊ नये.
आणि समजा ते एकमेकांना आधीच ओळखत असतील तर तुम्ही एकमेकांना कसे ओळखता हे विचारू नये. त्यांनीच स्वतः सांगितले तर ठीक नाहीतर काहीही नाते, ओळखी असू शकतात आणि त्यांना ते सांगायचे नसतील.
जर तुम्हाला कोणी हॉटेल मध्ये नेणार असेल तर शक्यतो ऑर्डर त्याला देऊ द्या. त्याने काहीतरी प्लॅन केलेला असेल , त्याचे काहीतरी बजेट ठरलेले असेल.
एखाद्याला मदतीचे खोटे आश्वासन देऊ नये. आणि एकदा दिले असेल तर काही दिवसांनी मदत करेल, अजून काही दिवस लागतील असे म्हणून समोरच्याचा सारखा सारखा वेळ वाया घालवू नये.नाही जमत असे सरळ सांगून मोकळं व्हावे जेणेकरून समोरच कुठेतरी दुसरीकडे प्रयत्न करू शकतो.

चांगल्या आणि प्रॅक्टिकल आहेत टिप्स.
दुर्दैवाने हे बेसिक मॅनर्स लोकांना पोस्ट लिहून सांगावे लागतात हेच दुःखदायक आहे.

>>>>.कोणाच्या घरी गेले तर तिथल्या मुलांना कितीवीला आहे विचारून झाल्यावर त्याचे मार्क, आणि गणितातले, इंग्रजी मधले प्रश्न विचारू नयेत.

हाहाहा. हा नियम आवडला.

बाळंतपणानंतर दवाखान्यातच काही लोक भेटायला येतात व हलतच नाहीत. ओल्या बाळंतिणील विश्रांतीची नितांत आवश्यकता असते. तेव्हा उपर्‍या किंवा लांबच्या नातेवाईकांनी, दवाखान्यात भेटायलाच जाऊ नये.

हे बेसिक मॅनर्स म्हातार्‍या लोकांचे असतील.
>>समोरची व्यक्ती मुलगी आहे म्हणून सगळे खरे मानू नका, >> नो! देअर इज अ रिझन.
>>फोटो , व्हिडीओ काढून स्टेटस ठेवण्यापेक्षा >> कुठल्या काळात वावरताय राव!
>>पत्ता माहिती नसला तर का जायचंय, तिथे काय आहे असले प्रश्न विचारून किंवा खोटा पत्ता सांगून समोरच्याच्या टाईमपास करू नये. >> ऐतन! अगेन नो!
>> दवाखाना, विमान प्रवास, आणि मुलाखत या तीन ठिकाणी शक्यतो परफ्युम>> घामट कुठले!
>>. फुशारक्या मारू नयेत.>> मग जगायचं तरी कशाला?
>>ते एकमेकांना आधीच ओळखत असतील तर तुम्ही एकमेकांना कसे ओळखता हे विचारू नये>> अरे! हे तर नक्कीच विचारावे आणि कानकोंडे करावे.
>>ह्याची gf अशी , हा देव चांगला नाही, हे का खातोय , त्या सिंगर चा आवाज चांगला नाही तुला का आवडतो, टिकटोक फालतू आहे ( हे खरेच फालतू आहे ) >> स्टॉपच! टिकटॉकला काय बोलायचंच नाय!
>>इतकेच तोंडात भरावे जितके असताना तुम्ही तुमचे नाव सांगू शकता. >> हँग!

अशाने उद्या माबोवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागतील लोक!

अमितव Lol

अमित Lol

बऱ्याच दिवसांनी आला एक अचाट मेसेज

*स्त्रियांनी गायत्री मंत्र का म्हणू नये*.

*शास्त्र जे करू नका म्हणते; तेच नेमके करावयास धावणे, हा सामान्य स्वभाव असतो. आणि त्यामुळेच नाश होत असतो, हे आपणांस समजत नाही*.

असे परमपूज्य सद्गुरू श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्यांच्या 'अभंग अमृत' या ग्रंथात पान क्रमांक १७८ वर सांगतात आणि हे समजावण्यासाठी खालील कथा सांगतात-

स्त्रिया आणि गायत्रीमंत्र :
सहज विषयांवरून विषय निघाला; म्हणून मला माझ्या आईची गोष्ट आठवली. माझ्या मातुःश्री (परमपूज्य सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे)या परमार्थातील एक थोर अधिकारी होत्या.
त्यांच्याकडे अनेक स्त्रिया मार्गदर्शनासाठी येत असत. एकदा अशाच पाच-सहा जणी त्यांच्याकडे आल्या होत्या. चर्चा सुरू झाली. एका बाईने आमच्या
मातुःश्रींना विचारले की, “बायकांनी गायत्री मंत्र का म्हणू नये ?"
त्यावर आमच्या मातुःश्री चटकन् सावरून बसल्या. एक-दोन मिनिटे स्तब्धतेत गेली. मग त्या सांगू लागल्या; "हा प्रश्न योग्य आहे. या प्रश्नाचे
उत्तर देण्याची माझी पात्रता नाही. परंतु मला एक माहीत आहे की, सर्व ऋषी,मुनी, साधू, संत सदैव आपल्या हिताचेच सांगत असतात. त्यावर माझा
नितांत विश्वास आहे. माझे तीर्थरूप पू.श्री.नारायणराव सोनटक्के हे मोठे अभ्यासक होते. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे ते निःसीम भक्त होते.
गायत्रीमंत्राची अक्षरे आहेत चोवीस ! प्रत्येक अक्षर एका एका नाडीद्वारे
प्रकाशित होत असते. जसे टाईपरायटरवर एकेका अक्षरासाठी एक एक बटण
असते आणि ते दाबले की, नेमके तेच अक्षर उमटते; तसे गायत्रीमंत्रातील
प्रत्येक अक्षर एकेका नाडीद्वारे प्रकाशित होते. पुरुषांना पूर्ण चोवीस नाड्या
आहेत; परंतु स्त्रियांना मात्र फक्त बावीसच नाड्या आहेत. त्या दोन नाहीत,
त्यामुळे स्त्रियांना दाढी-मिशा येत नाहीत व प्रोस्टेट ग्रंथी वाढत नाही. या
अशा दोन नाड्या कमी असल्यामुळे, चोवीस अक्षरांचा गायत्रीमंत्र जपला तरी
उपयोगी पडत नाही.ज्याप्रमाणे टाईपरायटरवर जेवढा कागद असेल, तेवढीच अक्षरे
उमटणार; आणि कागद संपल्यावर अक्षरांची बटने दाबली तरी अक्षरे उमटणार
नाहीत; त्याप्रमाणे ही अक्षरे परिणाम करू शकणार नाहीत. इतकेच नव्हे तर;
गायत्रीमंत्र हा पुरुषबीज वाढविणारा मंत्र असल्यामुळे, तो जपल्याने बीज वाढू
शकते.शास्त्र असे आहे की, स्त्रियांमध्ये बीज वाढू नये; शोणित वाढावे.
स्त्रियांनी गायत्रीजप केला तर, शोणित जळून जाईल.

*त्यामुळे या जन्मी केलेला जप,पुढल्या जन्मी धड स्त्री नाही,धड पुरुष नाही असा तृतीयपंथी बनवतो* . अशांना दाढी-मिशा येतात; परंतु त्याचबरोबर लुगडे नेसण्याची हौस
निर्माण होते. स्त्रियांप्रमाणे हातवारे करावे असे वाटू लागते. या सर्व पूर्वजन्मीच्या स्त्रीवासना ! परंतु, त्या जन्मात गायत्री जपल्यामुळे बीज वाढले,
दाढी-मिश्या फुटल्या; पण मूळचे स्त्रीसंस्कार असल्यामुळे लुगडे नेसण्याची हौस मात्र राहिली. असे होऊ नये, शोणित जळू नये, अर्धवट बीज वाढू नये; यास्तव बायकांनी गायत्री जपू नये !"

आजकाल, स्वतःचा मोठेपणा सांगण्याकरिता, “तुम्ही करा; काही होत नाही. मी आहे ना !" असे सांगण्याचे फॅडच आहे. परंतु ऐकणाऱ्यांच्या हे लक्षात
येत नाही की, आपण असे केले तर काय घडेल ?

प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी, तसेच सर्व प्रमुख आचार्यांनी म्हणून च सांगितले आहे ..
*स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये*

Pages