क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ हल्ली क्रिकेट किती अति झाले आहे. त्यातही आश्विन सर्व फॉर्मेटमध्ये खेळतो. त्यातही कसोटीत अति वापरला जातो. हल्ली तर फलंदाजीच्या अपेक्षाही ठेवल्या जाऊ लागल्यात त्याच्याकडून. बरेपैकी पुर्णही करतोय. एकाच सामन्यात सलग ईतक्या ओवर टाकतो कि एखाद्या मोठ्या स्पेलमध्ये बोटे थकल्याने इफेक्टीवनेस कमी झाल्याचे जाणवते अधूनमधून. स्वताही गोलंदाजीत एवढे वेरीएशन ट्राय करत असतो की बोटांवर ताण येतच असणार... आणि शेवटी ज्याचा त्याचा फिटनेस असतोच. त्यात तुलना करण्यात अर्थ नाही. तरी आश्विनचा नक्कीच वाईट नाहीये.

भाऊ, अश्विनला विश्रांतीची गरज विकेट्स, धावा वगैरे पेक्षाही नसून त्याच्या दुखर्‍या बोटाला पूर्ण बरे होण्याची सवलत मिळावी ह्या द्रुष्टीने आहे. त्यात मर्यादित किंवा कसोटी सामन्यांचा संबंध नाही. कु. ऋ. ने नेहमीप्रमाणे वेगळे फाटे फोडलेत Happy जयंत यादव ला पण अजमावून पाहता येईल हाही एक फायदा आहेच.

बाय द वे, पुन्हा एकदा नं १. जबरी! >>> पाकिस्तानला पिछाडून हे विशेष Happy
आता ३-० करून आणखी पुढे निघून जाऊ... पुढेही देशातच खेळायचे असल्याने इन्शाल्लाह आणखी आणखी पुढे Happy

त्याच्या दुखर्‍या बोटाला पूर्ण बरे होण्याची सवलत मिळावी ह्या द्रुष्टीने आहे. >>> ओह बोत दुखरे आहे का त्याचे? मला माहीत नव्हते हे. तरीच ते जाणवायचे मोठ्या स्पेलला.

सॉरी, बोटाच्या दुखापतीचं मलाही माहित नव्हतं. मग मात्र अश्विनला विश्रांति देणं गरजेचं आहे, याच्याशीं सहमत.
<< पुढेही देशातच खेळायचे असल्याने इन्शाल्लाह आणखी आणखी पुढे >> १+ .. १++ ...१+++ .. असं का ? Wink
" प्रत्येक देश आपल्याला सोईच्याच विकेटस बनवतो ", हा आपला युक्तिवाद मला कांहींसा लंगडा वाटतच होता ; पण असंच होत राहिलं तर क्रिकेट जगतात तो एक मोठा विनोदच ठरण्याचीही आतां शक्यता वाटते !

आता इतर देशातल्या पिचबद्दल नुसतेच तक्रार करत बसण्यापेक्षा, तशी काही पिचेस तयार करा नि त्या देशाच्या दौर्‍याआधी तश्याच पिचेसवर सराव करा. जरा जास्त दिवस सराव करावा लागेल.
सैनिकांकडून, पोलीसांकडून म्हणे २४ तास कामावर हजर रहाण्याची अपेक्षा असते. त्यांच्या मानाने क्रिकेट खेळणे कितपत महत्वाचे?
तसे चांगले सिनेनट सुद्धा एखाद्या महत्वाच्या रोलसाठी खूप तयारी करतात.

इतर नोकर्‍या करणारे लोक दररोज नोकर्‍या करतच असतात. हमाल, बांधकामावरचे मजूर यांना पण खूप शारीरिक कष्ट करावे लागतात, त्यांना देते का कुणि सुट्टी, किंवा इतके पैसे की काही दिवस काम न करता त्यांचा उदरनिर्वाह चालूच राहील?

क्रिकेट खेळतात, खूप पैसे, प्रसिद्धी पाहिजे, तर जरा जास्त काम करायला काय हरकत आहे?

उग्गीचच्च व्यक्तिपूजेचे एव्हढे स्तोम आहे भारतात की त्यापुढे हात टेकावेत.

इतर देशातल्या पिचबद्दल नुसतेच तक्रार करत बसण्यापेक्षा, तशी काही पिचेस तयार करा नि त्या देशाच्या दौर्‍याआधी तश्याच पिचेसवर सराव करा. >> पिचेस तयार करता येतील हो पण तसे हवामान नि मुख्य म्हणजे तशा कॅलिबरचे बॉलर कसे आणणार ?

"पिचेस तयार करता येतील हो " - पिच बनवताना त्या मातीचा गुणधर्म, हवामान हे सगळे घटक त्यावर परिणाम करतात. त्यामुळे असं मेड टू ऑर्डर पिच बनवताना त्यावर मर्यादा येतात.

<< असं मेड टू ऑर्डर पिच बनवताना त्यावर मर्यादा येतात.>> हें खरं असलं तरीही मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी फलंदाजीला अनुकूल पिचेस व कसोटीसाठी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल पिचेस इथं बनवलेली आपण पहातोच ना ! हवामानाच्या फरकामुळे भले द. आफ्रिका व इंग्लंडसारखीं पिचेस नाहीं बनणार इथं पण म्हणून फक्त फिरकीलाच सर्वस्वी अनुकूल अशींच पिचेस बनवणं हा एकमेवच पर्याय तर नाही ना ! कृपया आपल्या स्पीनर्सना मीं कमी लेखतो असं समजूं नये. पण त्याना पिचकडून जर अवाजवी मदत मिळत असेल, तर त्यांच्या कामगिरीचं व त्यामुळे आपल्याला मिळालेल्या विजयाचं कांहीं प्रमाणात तरी अवमूल्यन होतंच, असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतं.

भाऊ, ह्या सीरीजमधल्या दोन्ही मॅचेस मधली पिचेस अवाजवी मदत करणारी होती असे तुम्हाला वाटतेय का ?

मला वाटते फिरकीला सर्व दिवस एकाच प्रमाणात धर्जिणी पिचेस बनवणे हे निव्वळ अशक्य आहे. हेच फास्ट किंवा सीम बॉलिंगला बाबत करणे शक्य आहे. तरीही न्ञुझिलंडसारख्या देशात जो Drop in पिचेसबद्दल आघाडीवर आहे अजूनही फिरकीला धार्जीणे पिच बनवणे शक्य झालेले नाही किंवा सीम ला अवास्तव मह्त्व न देणारे पिच बनवणे शक्य झालेले नाही. तिथे आपली काय कथा ?

अरे पण या मागच्याच सामन्यात वेगवान गोलंदाजांनी कमाल केली की.. नवीन बॉलवर स्विंग झाला, जुना बॉल रिव्हर्स झाला, वातावरण ढगाळ होताच भुवनेश्वरनेही आपली कमाल दाखवली..
या चर्चेची काळवेळ चुकतेय का Happy

<< मागच्याच सामन्यात वेगवान गोलंदाजांनी कमाल केली की.>> 'मागच्याच' म्हणजे पहिल्या कीं दुसर्‍या सामन्याचं बोलताय ? पहिला सामना तर टॉस जिंकला तेंव्हांच आपण जिंकणार - आणि तेंहीं मुख्यतः पीचमुळे - हें जवळ जवळ निश्चित होतं. दुसर्‍या सामन्याचं पीच त्यामानाने दोन्ही संघाना बर्‍याच प्रमाणात समान संधी देणारं होतं हें मान्य.

शिवाय, मीं केवळ या सामन्या/सिरीजबद्दल बोललो नसून माझं एक सर्वसाधारण मत वर मांडलंय. द. आफ्रिकेच्या गेल्या दौर्‍यात त्यानी चांगल्या विकेटसवर सर्व मर्यादित षटकांच्या सामन्यांत आपल्याला धूळ चारली . मग सर्वस्वीं एकांगी 'स्पीनींग ट्रॅक्स' बनवून आपण कसोटी मालिकेत त्यांचा कचरा केला. तेंव्हांदेखील मला हेंच वाटलं व खटकलं होतं.

भाऊ मर्यादित षटकांच्या सामने चांगल्या विकेट्स वर होते का ? मला वाटले कि बर्‍यापैकी पाटा विकेट्स वर होते नि आफ्रिकन नि ऑसीज अशा पिचेस वर मर्यादित षटकांच्या सामन्यांमधे अधिक प्रभावी ठरतात आपल्यापेक्षा.

माझ्या मते आदर्श स्पिनिंग ट्रॅक्स हि फँटसी आहे. फार तर शेवटचे दोन दिवस माईनफिल्ड होणार नाही इतपत करणे शक्य आहे. सिमिंग ट्रॅकसाठी त्या मानाने अधिक लीअवे आहे. पण जे काही बदल असतील ते थेट आंतरराष्ट्रिय सामन्यांमधे न करता रणजीपासून करावे.

<< माझ्या मते आदर्श स्पिनिंग ट्रॅक्स हि फँटसी आहे. >असामीजी, आदर्श स्पिनींग ट्रॅक्स बनवावे नसावे लागत, चांगले नाहीं बनवले कीं होतच असावेत ते तसे; मुंबईच्या आझाद व ओव्हल मैदानावरच्या पिचेसवर माझे दोन्ही स्पीन कधीं नव्हे ते अ‍ॅक्चुअली वळताना बघून मीं सुद्धां आनंदाने नाचलोय पूर्वीं ! Wink

ते अ‍ॅक्चुअली वळताना बघून मीं सुद्धां आनंदाने नाचलोय पूर्वीं >?>> बघा म्हणजे हा प्रॉब्लेम पारंपारिक आहे Wink

आदर्श अशा अर्थाने कि पाच दिवस even bounce, equal amount of turn मिळणारे. पण अर्थात तसे झाले तर त्यात मजा तरी काय ? त्यामूळे हे कमी अधिक होणे हे बॅट्समनची खरी परिक्षा घेणारे म्हणून मला योग्य वाटतात. अर्थात minefield नसावे पण तसे होउ न देण्यासाठी लागणारी margin फिरकी पिचेससाठी अगदीच कमी आहेत म्हणून हा problem अधिक जाणवत असावा.

कुणी ऑस्ट्रेलिया - द. अफ्रिका वन-डे बघतय / फोलो करतय का? जबरी चाललीये मॅच >> ऑसी बॅटींग सुरू असताना पाहिले तेंव्हा लक्षात आले कि डरबन मधे आहे मग आफ्रिकेसाठी चेस कठीण जाउ नये असे वाटले. तसेच झाले. आता हे पिच आदर्श पिच म्हणायचे कि नाही हा कळीचा प्रश्न ! Happy

बघा म्हणजे हा प्रॉब्लेम पारंपारिक आहे डोळा मारा >>> अगदी पुरातन काळापासूनचा. लगानमध्येही बॉल वळला तेव्हा क्रिकेटचा ओ की ठो न कळणारे गावकरीही आनंदाने नाचू लागलेले.

ऑस्ट्रेलियाची प्रत्येक सामन्यात धुलाई होतेय. मागच्या सामन्याला त्यांचा स्कोअर बघून मी मित्राला म्हटलेले की मागचे दोन सामने पाहता आफ्रिका हा स्कोअर मारू शकते. किंबहुना आज खरा चुरशीचा सामना बघायला मिळेल. नंतर स्कोअर फॉलो करता आला नाही. रात्री उशीरा थेट जिंकलेलेच समजले पण आश्चर्य वाटले नाही.

आता हे पिच आदर्श पिच म्हणायचे कि नाही हा कळीचा प्रश्न ! >>> फोर सिक्स हे नव्या पिढीतील जास्तीत जास्त लोकांना मैदानावर खेचतात या समजापोटी हल्ली सगळीकडेच हे चित्र दिसू लागलेय. आता हा समज खरा कि खोटा हा एक चर्चेचा विषय आहे. मला पर्सनली फारच बोअर होऊ लागलेय. जी मजा दादाने द्रविडसोबत ईंग्लंड वर्ल्डकपला श्रीलंकेची धुलाई करत आणलेली, आणि जयसुर्या मंडळींची गोळी त्यांनाच खिलवलेली. ती मजा लोप पावलीय. उद्या कोणी सहाशे मारले तरी ती मजा आता पुन्हा अनुभवता येणार नाही.

तरी कसोटी क्रिकेटमुळे क्रिकेटचा आनंद उचलता येतोय ईतकेच.

<< बघा म्हणजे हा प्रॉब्लेम पारंपारिक आहे >> Wink कधीकाळीं कसल्याही पीचवर कां होईना पण मीं चेंडू वळवत होतों, यावरील आपल्या मनातील अव्यक्त शंकाही मीं समजूं शकतों ! Wink
<< जी मजा दादाने द्रविडसोबत ईंग्लंड वर्ल्डकपला श्रीलंकेची धुलाई करत आणलेली,...... ती मजा लोप पावलीय. >> सहमत.

उद्या कोणी सहाशे मारले तरी ती मजा आता पुन्हा अनुभवता येणार नाही. >> असच काहि नाहि रे, कितीही म्हटलेस तरी सहाशे मारणे हे अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे. किंबहुना दर मॅच गणीक बॅट्समनचा अधिकाधिक धावा चेस करण्याबाबतचा क्लिनिकल approach किंवा अधिकाधिक धावांचा डोंगर रचण्याची कसरत हिही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. Please do not say that Kohli's clinical chases in ODI were inferior by any standards than Dada's inning.

द. अफ्रिकेने ज्या परिस्थितीतून मॅच खेचली, ती मस्त होती. मिलर हा एकमेव रेकग्नाईझ्ड बॅट्समन शिल्लक होता, तो सुद्धा फारसा फॉर्म मधे नव्हता आणी १००+ रन्स सत्तर-एक बॉल्स मधे हवे होते.

गंभीर बिग मॅच प्लेयर आहे. त्यामुळे तो ह्या मॅच मधे काहीतरी भरीव करेल असं फार वाटतय. सो फार सो गूड

<< सो फार सो गूड >> खरंय. पुजारादेखील आतां आपल्या करिअरच्या महामार्गावर येवून पुढे चाललाय. ऑल द बेस्ट, फॉर अ गुड मॅच विथ थर्ड विन टू इंडीया !!

विराट कोहलीचं तेराव्या शतकासाठी अभिनंदन! कोहली आता फॉर्मात खेळायला लागेल अशी अपेक्षा. मोठ्या होम सीझनच्या सुरवातीला आलेल्या ह्या शतकाने त्याचा आत्मविश्वास नक्कीच बूस्ट होईल. पुढे इंग्लंडविरुद्ध २०१२ चा वचपा त्याला नक्कीच काढायचा असेल.

विराट कोहली, कोलकत्याच्या दुसर्या इनिंग मधे पण छान खेळला होता. काल तो आणी रहाणे मस्त खेळले.

रणजी ट्रॉफी मधे मुंबई-तमिळनाडू मॅच मस्त झाली.

'द आफ्रिकेत बॅकफूटवर छान खेळणारा पुजारा आतां कंपल्सिव्ह फ्रंटफूट बॅटसमन झालाय; इथं ठीक आहे पण स्विन्गींग विकेटवर त्याला ही संवय सोडून अ‍ॅडजस्टमेंट करावीच लागेल ' - इति मांजरेकर. मला हें समजत नाहीं कीं त्या लेव्हलला दोन्ही प्रकारच्या विकेटसवर खेळलेल्या पुजाराला हें कळत नसेल, असं मांजरेकर कां गृहीत धरतो. केवळ तो एक्स्पर्ट कॉमेंटेटर आहे म्हणून कीं लोकानी त्याला एक्स्पर्ट समजावं म्हणून ?

लोकांनी समजावं म्हणून. अर्थात त्याच्याइतकी जाण असणारे कमी आहेत आजूबाजूला पण 'अहं' घात करतोच.

म्हणून आपल्याला तरी गावस्कर बेस्ट वाटतो सगळ्यांत.

रहाणेचंही आठवं शतक पूर्ण !! अभिनंदन !!
[ गॅलरींत उभं राहून टाळ्या मारणार्‍या सौ. रहाणेंच्या चेहर्‍यावरचा ओसंडणारा आनंद त्याला अशींच शतकं ठोकण्याची प्रेरण देवो !! Wink ]

Pages