Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी, भाऊ, सहमत! जस्ट लीव्ह
असामी, भाऊ, सहमत! जस्ट लीव्ह हीम अलोन!
कुंबळेने आज स्पष्ट केलंय कीं
कुंबळेने आज स्पष्ट केलंय कीं 'स्ट्राईक रेट'बद्दल पुजारावर कोणतंही दडपण आणलं गेलं नव्हतं. पुजारा हा संघातला एक अत्यंत महत्वाचा घटक असल्याचं आपण मानतो, अशी पुस्तीही त्याने जोडली आहे.
माध्यमांमधेंच कुणाला तरी पुजाराच्या यशामुळे पोटदुखी निर्माण झाली असावी.
आतां सुद्धां मला हेंच वाटतं
आतां सुद्धां मला हेंच वाटतं कीं पुजारा हा 'लंबे दौडका घोडा' आहे व त्याला नाउमेद न करतां प्रोत्साहन देणंच भारतीय क्रिकेटच्या हिताचं आहे.>>>
अगदी!!
सध्याच्या संघात तरी कसोटी साठी पुजाराच उत्तम पडझड रोखू शकणारा फलंदाज आहे जो नेटाने एक बाजू लढवू शकेल.. कसोटी साठी त्याच्या निवडीला पर्याय नाही..
लोकसत्तात एका बातमीत साधारण
लोकसत्तात एका बातमीत साधारण असं लिहिलंय
'जर दहा वर्षांपूर्वीचा काळ असता तर ह्याच पुजाराला रेड कार्पेट अंथरले गेले असते'
पटलं!
बीसीसीआयच्या नव्या निवड
बीसीसीआयच्या नव्या निवड समितीबद्दल काय वाटतं?
एम. एस. के. प्रसाद (६ टेस्ट, १७ वन डे),
देवांग गांधी (४ टेस्ट, ३ वन डे),
सरणदीप सिंग (३ टेस्ट, ५ वन डे),
जतिन परांजपे (४ वन डे),
गगन खोडा (२ वन डे),
यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवणार? रिमोट कंट्रोल ला होय बा करणारे वाटतात सगळे.
इतर कुणाही सीनियर प्लेयरला अप्लायही करावसं वाटू नये म्हणजे परीस्थिती किती खराब असेल याची कल्पनाच केलेली बरी.
निवड समिती चं काम, जे
निवड समिती चं काम, जे देशांतर्गत कामगिरी चा आढावा घेऊन, कौशल्य ओळखून, त्याला योग्यप्रकारे संधी निर्माण करणं, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य ती कामगिरी न करणार्या खेळाडूंना आणी संघ-व्यवस्थापनाला वेळोवेळी ती जाव्यवस्थापनाला, कामगिरी सुधारण्याची संधी देणं आणी गरज पडल्यास त्या खेळाडूला काही काळ देशांतर्गत सामन्यांमधे परत पाठवणं, हे करता येण्याकरता लागणारा प्रथम श्रेणी क्रिकेट चा अनुभव आणी उत्तम व्यवस्थापन-कौशल्य असेल, तर ह्या समितीला यशस्वी कामगिरी करता येईल.
सचिन कप्तान असताना थोपवलेले
सचिन कप्तान असताना थोपवलेले टीम सिलेक्शन वाटते :). पण जोक्स अपार्ट, यांचा अनुभव कमी आहे म्हणून आधी डिसमिस करण्यापेक्षा काय करतात ते पाहू. कदाचित ते लोढा कमिशन वगैरे चालू आहे तोपर्यंत हंगामी समिती असूदे म्हणूनही निवडले असतील "नाईट वॉचमन"
मला वाटते लोधा कमिटीच्या
मला वाटते लोधा कमिटीच्या शिफारसीनुसार वरच्या यादीतले शेवटचे दोन टेस्ट्स न खेळल्यामूळे आपोआप बाहेर निघणार आहेत. निव्वळ टेस्ट खेळल्यामूळे निवड समिती मधे काम करण्याची पात्रता कशी निर्माण होणार हा प्रश्न कोणितरी लोढा समितीला विचारायला हवा होता.
सिनीयर प्लेअर्सनी अप्लाय केलं
सिनीयर प्लेअर्सनी अप्लाय केलं होतं पण बर्याच जणांची अॅकॅडमी वगैरे असल्याने वेस्टेड इंटरेस्टचा प्रश्न येऊ नये म्हणून घेतलं नाही असं कुठेतरी वाचलं.
यांचा अनुभव कमी आहे म्हणून आधी डिसमिस करण्यापेक्षा काय करतात ते पाहू. >>>>> अनुमोदन.
तो परत आलाय तो फॉर्ममध्ये
तो परत आलाय
तो फॉर्ममध्ये आहे
तो फिरकीला उत्तम खेळतो
फक्त त्याला आता अकरात खेळवा उद्या
तो नसणार. धवन जवळजवळ फिक्स
तो नसणार. धवन जवळजवळ फिक्स आहे.
चुकून हे "गणपती" बद्दल लिहिले
चुकून हे "गणपती" बद्दल लिहिले की काय असे वाटले.
( गणपती यायच्या आधी आजकाल, " मी येतोय " चे पोस्टर असातात, त्याचा प्रभाव दुसरं काय ! )
संधी द्यायला हवी असे वाटते.
सिनीयर प्लेअर्सनी अप्लाय केलं
सिनीयर प्लेअर्सनी अप्लाय केलं होतं पण बर्याच जणांची अॅकॅडमी वगैरे असल्याने वेस्टेड इंटरेस्टचा प्रश्न येऊ नये म्हणून घेतलं नाही असं कुठेतरी वाचलं. >>> हा खूप व्हॅलिड पॉईण्ट आहे. लोढा कमिशन चे काम याविरूद्धच होते ना. कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्टविरूद्ध.
तो नसणार. धवन जवळजवळ फिक्स
तो नसणार. धवन जवळजवळ फिक्स आहे.
>>>
आतून खबर लागली की अशी बातमी आलेय खुली..
राहुल गेला तरी दोन ओपनर होतेच चौदाच्या संघात, तरी बाहेरून ओपनरच घेतला म्हणून जरा आशा आहे की खेळवू शकतील..
आणि फॉर्ममध्येच घेणे आणि खेळवणे कधीही चांगले.. त्या प्लेअरसाठीही आणि अर्थातच पर्यायाने संघासाठीही.. उगाच बेंचवर बसल्या बसल्या फॉर्म जायला नको.. आणि उद्या राहुल परत आल्यावर तसेच न खेळवता बाहेर केले गेले तर त्यातूनही काही फायदा नाही.. संधी मिळाली आहे एखादा पर्याय चाचपायची तर चाचपून घ्यायचे. तसेही शर्मा नामक बेभरवश्याचा प्लेअर आधीच आहे एक संघात.. संघबांधणी चालू आहे..
आतून खबर लागली की अशी बातमी
आतून खबर लागली की अशी बातमी आलेय खुली.. >> मागची मॅच संपल्या संपल्या धवन ला घेऊन कुंबले नि कोहली दोनेक तास सराव करत होते. ईडन वर मागचे दोन्ही दिवस तेच घडले.
असामी ओके
असामी ओके
गंभीर ला घेतल्यामुळे धवन वर
गंभीर ला घेतल्यामुळे धवन वर दबाव येऊन तो चांगला खेळला तर बरं होईल.
गंभीर ला घेतला हे चांगले
गंभीर ला घेतला हे चांगले झाले. तो अचानक का बाहेर गेला समजले नाही. त्याची बॉडी लॅन्ग्वेज पाहून उगाचच असे वाटते की तो कोणाशीच चांगले संबंध वगैरे आवर्जून ठेवत नसावा. अलूफ टाईप. त्यामुळे तो कोणाचाच फेवरिट नाही.
धोणीपर्वात नंतर गंभीर /
धोणीपर्वात नंतर गंभीर / सेहवाग हे एकटे पडू लागले. त्यातच सेहवाग गेल्यावर गंभीर जास्त एकटा पडला, त्याला मध्ये आणले, पण खेळूच दिले नाही. ह्या वेळी तसे होऊ नये. विराट अन गंभीर एकाच गावचे आहेत, त्यामुळे त्याला आता एकटेपणा जाणवायला नको.
गंभीर नि कोहलीचे जमत नाही.
गंभीर नि कोहलीचे जमत नाही. गंभीर ला England दौरा भोवला. परत नेमक्या त्याच्या लग्नाचा मुहूर्त साधून तो बाहेर असताना धवन ने जागा फिक्स करून टाकली.
तो आला १० चेंडू खेळला १ धाव
तो आला १० चेंडू खेळला १ धाव काढून माघारी गेला!
वरुण धवन ला खेळवले असते तर कदाचित जास्त धावा काढल्या असत्या!
गंभीरचा का नाही गांभिर्याने विचार केला असावा!? तो नक्कीच कसोटी करीता उपयुक्त ठरु शकतो!
वरुण धवन ला खेळवले असते >>>>
वरुण धवन ला खेळवले असते >>>> वरुण धवन?
वरुण धवन?>>> अरे त्या शीकर
वरुण धवन?>>> अरे त्या शीकर धवन ऐवजी! म्हणतोय मी...
कसोटी सामन्यात सलामीला
कसोटी सामन्यात सलामीला धवनपेक्षां गंभीर [ आत्तां फॉर्ममधे असेल तर ] निश्चितच सरस आहे, हें माझं वैयक्तीक मत.
पण कोहली आणि गंभीर हे दोघेही आत्मकेंद्रीतव कांहींसे आढ्यताखोर असावेत असा संशय घ्यायला वाव असल्याने, ते दोघे कप्तान व खेळाडू म्हणून अस्तील तर संघात एक तणाव सतत जाणवेल, अशा शंकेची पालही मनात चुकचूकतेच.
मी आधी म्हटल्याप्रमाणे
मी आधी म्हटल्याप्रमाणे कोहलीचे टेस्टमधील अवगुण अजूनही प्रकर्षाने जाणवत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या त्या सीरीजनंतर दिड वर्षांत एक वेस्ट इंडीज सीरीज सोडली तर टेस्टमध्ये त्याचा खेळ यथातथाच आहे. द हाईप डझ नॉट जस्टिफाय इटसेल्फ.
मी आधी म्हटल्याप्रमाणे
मी आधी म्हटल्याप्रमाणे कोहलीचे टेस्टमधील अवगुण अजूनही प्रकर्षाने जाणवत आहेत.>>>
अगदी!
आज देखिल दुरावस्था ओढवून घेतली आहे नाहक! धवन, कोहली, विजय खराब शॉट सिलेक्शन!
ऑस्ट्रेलियाच्या त्या
ऑस्ट्रेलियाच्या त्या सीरीजनंतर दिड वर्षांत एक वेस्ट इंडीज सीरीज सोडली तर टेस्टमध्ये त्याचा खेळ यथातथाच आहे. >> हो अजून लिमिटेड टू टेस्टकडे असलेली अॅडजस्टमेंट झाली नाही असे वाटतेय. ती लवकर व्हावी अशी आशा. दर वेळी साहा, अश्व्नि. जाडेजा हात देतील ह्यावर भरवसा नाही. रोहोत ऐवजी जयंत यादव हवा होता.
हो अजून लिमिटेड टू टेस्टकडे
हो अजून लिमिटेड टू टेस्टकडे असलेली अॅडजस्टमेंट झाली नाही असे वाटतेय. >> हो मलाही तसेच वाटले.
कृष्णा - लोल
"वरुण धवन" - मस्त!! "विजय
"वरुण धवन" - मस्त!!
"विजय खराब शॉट सिलेक्शन!" - विजय ला पडलेला बॉल चांगला होता. बाकीचे बघितले नाहीत.
"रोहीत ऐवजी जयंत यादव हवा होता." - रोहीत ऐवजी कुणीही चालेल टेस्ट ला. त्याच्याकडे ते टेंपरामेंट च नाही दिसत. जयंत नसला तर लालू यादव पण चालेल. आणी शर्मा च हवा असेल, तर कपिल शर्मा पण चालेल. निदान एनर्जी लेव्हल तरी हाय आहे.
न्यूझिलंड ने छान बॉलिंग केली. द.अफ्रिकेपेक्षा खूप चांगले लढताहेत ते. जाता जाता त्या अंपायरला एक शर्ट पीस - पँट पीस द्यायला हरकत नाही. दोन प्लंब एल्बीडब्ल्यू ची अपील्स फेटाळली त्याने.
क्रिकइन्फोच्या पेज वर कोहली
क्रिकइन्फोच्या पेज वर कोहली चे घरच्या मैदानावरचे अपयश म्हणून माहिती आहे. २०१३ पासून भारतात शतक नाही. ते वाचून मोहिंदर अमरनाथ आठवला. पाक मधे तीन व विंडीज मधे दोन शतके मारली, नंतर इंग्लंड मधल्या वर्ल्ड कप मधे चांगला खेळला. नंतर घरच्या सिरीज मधे सिंगल डिजिट स्कोअर्स
Pages