क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फास्ट खेळा हे कधी सांगायचे असते जेव्हा मागे रहाणे, विराट सारखे खेळाडू शिल्लक असतील. तेव्हा सांगितलेले योग्य ठरले असते. त्या मॅगी मॅन जाडेजाच्या भरोश्यावर फास्ट खेळा विकेट गेली तर गेली असे विराट बोलला असेल तर नमस्कारच करतो मी. Wink

शामी, इशांत आणि भुवी यांची बॅटींग "चली तो चांद तर वरना २ ओवर तक" अशीच झाली आहे.

किमान ४०० पर्यत तरी स्टडी राहा कारण किमान ६० ओवर्सचा खेळ बाकी होता. या ६० ओवर्स मधे किमान १०० धावा तरी झाल्या असत्या. असे ही खेळपट्टी ठणठणीत होती त्यामुळे बॉलर्स काही कमाल करतील अशी अपेक्षा ठेवणे चुकिचे होते. दुसर्‍या दिवशी सकाळी स्वींग मिळेल तेव्हा नविन बॅट्समन पटापट आऊट होण्याचा चांस जास्त होता. अथवा शेवटचे २० ओवर दिले तर त्यांची धावसंख्या सुध्दा कमी झाली असती आणि १-२ विकेट मिळाले असते तर अजुन दबाव वाढला असता.
पण त्यांना एकदम फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर फार जास्त षटके खेळायला मिळाली याचा फायदा त्यांनी चांगल्या धावा काढून घेतला. त्यामुळे आता दुसर्‍या दिवशी उतरताना डोक्यावर प्रेशर इतके नसेल.

"फास्ट खेळा हे कधी सांगायचे असते जेव्हा मागे रहाणे, विराट सारखे खेळाडू शिल्लक असतील. तेव्हा सांगितलेले योग्य ठरले असते." - परवा बांगर म्हणाला की रहाणे ने थोडा अ‍ॅटॅक करायला हवा होता चेस वर. हे मला तरी फारसं पटलं नाही. रहाणे आणी अश्विन जोडी पहिल्याच दिवशी दुसर्या सेशन ला मैदानात होती आणी स्कोअर १५० पण नव्हता. त्यातून बांगर-शास्त्री सारखी लोकं जेव्हा अ‍ॅग्रेसिव्ह बॅटींग विषयी बोलतात, तेव्हा ते विनोदी वाटतं. चालायचच. रोल बदलला म्हणजे हे बदल होणारच.

साहा चा अ‍ॅप्रोच मला वाटतं, त्याला बॉल लागल्यावर बदलला. तो आऊट झाला तो बॉल जबरदस्त वगैरे नसला तरी चांगला चेंज ऑफ पेस होता. भुवनेश, शामी, ईशांत ह्या तिघांकडून थोडी बॅटींग ची अपेक्षा नक्कीच आहे. ते अगदी सिटींग डक्स नाहीयेत. मिश्रा ने पहिल्या दोन टेस्ट्स मधे जवाबदारी आणी परिस्थीती ओळखुन बॅटींग केली होती.

आपल्या दुसर्या ईनिंग मधल्या बॅटींग ला फार महत्व आहे हे असामी चं म्हणणं पटलं. केवळ तेव्हढ्यासाठी तरी शर्मा ला तिसर्या क्रमांकावर पाठवून कोहली आणी रहाणे ला त्यांच्या नेहेमीच्या जागेवर आणावं असं वाटतं.

ईंग्लंड - पाकिस्तान ची मॅच पण मस्त चालू आहे.

वन डे सारखे खेळा हा मंत्र खरे तर शिखर धवन आणि रोहीत यांना द्यायला हवा. एका बाजूने त्यांनी अटॅक सुरु केला तर बॉलर थोडे हडबडतील.
रोहीतला वनडे सारखा खेळ जमतो. तो डिफेंस करायला लागला की लगेच आऊट होतो. त्याने सेहवागची शैली घ्यायला पाहिजे. तरच तो टेस्ट मधे यशस्वी होईल. अन्यथा त्याचा "युवराज" होईल. रोहीतसारखा फलंदाज टेस्ट मधे असायला हवे पण तो खेळला तरच.

वे. इंडिजमधे पाऊस ! 'ड्रॉ'चे ढग सामन्यावर काळोख करून आहेतच !
तिकडे मोइन खानने शतक करून इंग्लंडला तारलंय.

भाऊ - मोईल "अली" ना? Happy इंग्लंडला तारलंय म्हंटल्यावर शंका आली. पाक बद्दल असते तर वाटले असते मोईन खान परतला की काय. पाक मधे काही सांगता येत नाही. इम्रान खान सुद्धा परत येइल.

पाक मधे काही सांगता येत नाही. इम्रान खान सुद्धा परत येइल. >> अगदी कालपर्यंत हनीफ मोहम्मदही आला असता. Sad त्याला श्रद्धांजली वाहायचं राहून गेलं. RIP.

पाक क्रिकेटमधली फर्स्ट फॅमिली असेल ना आपल्या कपूर खानदानासारखी? त्याच्या नात्यातील बरेच लोक त्यांच्या संघात असत. सादिक मोहम्मद, बहुधा माजिद खान ही.

हो. तो बहुधा फादर ऑफ पाकिस्तान क्रिकेट म्हणून ओळखला गेला तरी हरकत नसेल.

<< भाऊ - मोईल "अली" ना? >> हो. माझंही वय झालंय तरीही मीं इथं खेळायला येतो म्हणून असं होतं ! Wink
<< हनीफ मोहम्मदही आला असता.>> आज तो गेल्याचं वाचलं. पाक क्रिकेटचा एक मानबिंदु !. श्र्द्धांजली !

विकी वर चेक केले. मुश्ताक मोहम्मद, सादिक मोहम्मद आणि वझीर मोहम्मद हे भाउ. शोएब मोहम्मद मुलगा.

भुवनेश ने अप्रतिम बॉलिंग केली. स्विंग, सीम, स्पीड सगळच जबरदस्त! ब्लॅकवूड ला टाकलेला बॉल कुठेही, कुणाचीही विकेट घेईल असा होता आणी सॅम्यूअल्स ला जबरदस्त सेटअप केलं. वाह! ईतक्या उष्ण-दमट हवामानात १० ओव्हर्स चं स्पेल टाकणं सुद्धा कौतुकास्पद! राहूल आणी रोहीत ने कॅचेस टाकले नसते तर अजुन १० रन्स चा लीड मिळाला असता. असो. भारताची आश्वासक सुरूवात आहे. विको निकालासाठी प्रयत्न करेल असा अंदाज आहे.

पाकिस्तान च्या टीम मधे कधीही, कुणीही परत येऊ शकतं. मधेच एकदम तौफीक उमर, ईम्रान नझीर वगैरे पण खेळताना दिसू शकतात.

"एका सेशन मधे मॅच फिरवू शकणार्‍या रोहितला का नाहि पाठवले वरती ?" - त्याच भितीमुळे. Wink

ह्या जोडीला आता खेळलच पाहीजे. नंतर एकदम अश्विन आहे. भुवी ने सगळे देव पाण्यात घालून ठेवले असतील.

धवन ने विको चे काम सोप्पे करून टाकले. पुढच्या टेस्ट्मधे ओपन कोण करणार ह्याबाबत. Happy

आत्ता प्रश्न फक्त एव्हढाच असणार कि सेशन चेंजर रोहित साठी कोहली स्वतःला नि राहाणेला किती इनिंग्स बळी देणार ?

"धवन ने विको चे काम सोप्पे करून टाकले. पुढच्या टेस्ट्मधे ओपन कोण करणार ह्याबाबत." - सहमत.

"आत्ता प्रश्न फक्त एव्हढाच असणार कि सेशन चेंजर रोहित साठी कोहली स्वतःला नि राहाणेला किती इनिंग्स बळी देणार ?" +१

<< "एका सेशन मधे मॅच फिरवू शकणार्‍या रोहितला का नाहि पाठवले वरती ?" - त्याच भितीमुळे.>> Wink
<< ह्या जोडीला आता खेळलच पाहीजे. नंतर एकदम अश्विन आहे.>> साहाला विसरलात तर एक वेळ क्षम्य आहे पण जडेजाला सुद्धां !!! Wink
पण काल जडेजा चेंडूला फ्लाईट देताना बघून बरं वाटलं. भुवी हा खरंच कसोटी दर्जाचा अत्यंत उपयुक्त गोलंदाज आहे, असं मला वाटतं. धवन हा 'मिडल ऑर्डर'च फलंदाज आहे व त्याला सलामीला पाठवणं हें 'रिस्क' आहे [ जरी त्या पोझिशनमधे त्याने धांवा केल्या असल्या तरीही] , हें माझं ठाम मत मी इथं पूर्वीं पासून मांडलंही आहे. पुजाराला वगळणं खरंच बुचकळ्यात टाकणारंच आहे ! एक चांगला 'क्लोज-इन' क्षेत्ररक्षकही त्यामुळे कमी पडतोय.

चला किमान माझे म्हणणे कोहली ने ऐकले आणि रोहितला फटाकेबाजी करायला लावली. आणि रोहीतने पण मनसोक्त हाणायला सुरुवात केली. Wink (काश मै थिंकटँक में बैठा होता )

उद्याच्या दिवसातील पहिले २० ओव्हर २०-२० च्या आवेशात खेळले पाहिजे किमान १००-१२० धावा तरी लंचच्या अगोदर काढल्या तर आघाडी ४०० पार जाईल. मग वेस्ट इंडीज एक तर विकेट गमवेल अथवा ड्रॉ साठी प्रयत्न करेल. बाजी आपल्या हातात राहिल

<< (काश मै थिंकटँक में बैठा होता ) >> तो आपका 'थिंकींग'भी वही टँकमें डूब जाता ! Wink
<< मग वेस्ट इंडीज एक तर विकेट गमवेल अथवा ड्रॉ साठी प्रयत्न करेल. >> आज मिश्राची उणीव तीव्रतेने भासेल !

<< बॉल् स्पिन होऊ लागला तर जाडेजा सुध्दा परिक्षा घेऊ शकतो >> कालच खेळपट्टी 'स्पीन'कडे झुकायला सुरवात झाली होती; खेळपट्टीची साथ असेल तर जडेजा चालतोच [ कालही तो फ्लाईट देवून गोलंदाजी चांगली करत होता. पण अश्विन व मिश्रा जोडी खतरनाक ठरूं शकली असती, हेंही आहेच.

भारताचा २००+ धांवानी विजय. अभिनंदन !
या दणदणीत विजयाचा संबंध पुजारा व मिश्रा याना वगळण्याच्या निर्णयाशी जोडून, कोहली आणि कं.ला असेच निर्णय घेण्याची चटक न लागो !!!

मिश्राची कमतरता जाड्याने भासू दिली नाही. अ‍ॅज आय से. वेस्ट इंडिज एकतर जिंकण्यासाठी खेळतील अथवा वाचण्यासाठी. यावेळी ते वाचण्यासाठी खेळले. त्यात घात झाला. दुसर्‍या टेस्ट सारखे त्यांनी आक्रमक खेळायला हवे होते.

दुसर्‍या टेस्ट मधे खेळपट्टी पावसानंतर बदलली आणि ठणठणीत झाली ज्यावर फलंदाजांना प्रचंड मदत मिळाली. तर
तिसर्‍या टेस्ट मधे खेळपट्टी पावसानंतर बदलली आणि नरम झाली ज्यावर गोलंदाजांना मदत मिळू लागली.

दोन्ही कसोटी सामन्यामधे पावसाची मोलाची भुमिका ठरली

तिथं युनूसने द्विशतक करून " उपखंडातले फलंदाज इंग्लंडमधे 'फ्लॉप' जातात " या सिद्धांतालाच सुरूंग लावलाय !

Pages