Submitted by भक्तिप्रणव on 22 October, 2014 - 05:06
अथांग अधीर
पसरले पर |
आनंद कवेत
बासरीचे सुर ||
अनाहत स्वर
विचारांच्या पार |
द्वैत नि अद्वैत
बासरीचे सुर ||
खोल अंतर्मनी
प्रगाढ चिंतनी |
शांतीचे आगर
बासरीचे सुर ||
सकल सुजन
सृजन सुमन |
गुंफतात हार
बासरीचे सुर ||
मथुरा नंदन
करीता वंदन |
भाव अनावर
बासरीचे सुर ||
संदीप मोघे
08989160981
sandeep.moghe@yahoo.com
भोपाळ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरीली शब्दकळा जीवास निर्गुणी
सुरीली शब्दकळा जीवास निर्गुणी कृष्णलंळा लावणारी कविता....