ॐ नमः पार्वतीपते, हर हर महादे SSSSSSव !!!
ज्यांना ज्यांना पोनी पोर्टर हवे होते त्यांना धारचुलालाच रजिस्ट्रेशन करायचे होते. परागने पुण्यातच पोनी पोर्टर करणार असे ठाम ठरविले होते. सौम्या पूर्ण ट्रेक घोड्यावरच करणार असे म्हणाला होता, डॉन कैलाशी (म्हणजे दिनेश बन्सल) पण पोनी पोर्टरच करणार होते. पण तिथे बुक करताना सगळे म्हणू लागले की अरे तू पण इन्शुरंस म्हणून पोनी घे, बसायला हवेच असे नाही. पण पाय मुरगळला तर काय करशील? मग तिथे माझी द्विधा मन:स्थिती झाली. कारण इतके दिवस मी ठरवले होते की फक्त पोर्टर करायचा. मग सेक्युरीटी ओव्हरटूक माय माईंड आणि पराग, सौम्या, रानडे ह्यांचे ऐकून मी पण पोनी बुक केला. लिटिल डिड आय नो की पुढे मला माझा पोनी हॅन्डलरच जास्त मदत करणार !
धारचुलाहून सकाळी निघून जीपने आम्ही नारायण आश्रमाला आलो. येताना गेल्यावर्षीच्या पुरामुळे झालेले नुकसान अजूनही दिसत होते. नारायण आश्रमाला सगळ्यांना पोनी पोर्टर मिळणार होते. पण पोनींची संख्या कमी असल्यामुळे आज मला आज पोनी अॅलॉट नाही झाला पण पोर्टर मात्र मिळाला. संतोराम ! संतोराम कडे सामान देऊन आणि नारायण आश्रमाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे आजच्या मुक्कामी सिरखाला जाण्यासाठी पायी निघालो.
३० जून - धारचुला ते नारायणस्वामी आश्रम ते सिरखा
आजचा रस्ता
ट्रेकला सुरूवात झाल्यामुळे आम्ही आनंदी होतो. कारण आता खरे निसर्गाच्या सानिध्यात असणार होतो आणि शिवाय कुणी ठरवणार नव्हते की इथेच थांबा, तिथेच थांबा. आज केवळ ७ किमीच पायी चालायचे होते. आणि ट्रेक रोडही तसा फार चढाचा नव्हता. थोड्यावेळात आम्ही ते ७ किमी पार केले आणि कॅम्प वर आलो.
कॅम्प वर आल्याबरोबर जेवण मिळाले. आजपासून हॉटेल टाईप सोयी नसणार होत्या, तर बेसिक सोयी. एका रूम मध्ये ७ ते ८ लोकं आणि हीच व्यवस्था तिबेट मधील तकलाकोट पर्यंत असणार होती. अल्मोरा अन धारचुलाच्या रूम अॅलोटमेंट गोधंळ नसणार होता कारण जे पहिले आले त्यांना रूम चॉईस असली असती. आणि एकदाका तुम्ही ती रूम तुमच्या ग्रूपसाठी घेतली की झाले. बाहेर कागदावर त्यांची नाव नोंदविली आणि ७ जण भरती केले की मग ते तुमचेच विश्व. आम्ही कर्मधर्मसंयोगाने ७ होतो. पहिले तीन दिवस जनरली सगळीकडे मी आणि पराग पहिल्या ५ च्या आत असायचो. पहिले दोघे जनरली बिहार मधील शेतकरी श्री रामसेवक सिंग आणि टेकचंद असायचे. ( ऑन हाईंडसाईट ह्याचे नाव मी ट्रेकचंद ठेवायला हवे होते) ह्यानंतर पहिले तीन-चार दिवसात, पराग, मी, श्याम आणि फनीकुमार असायचो. आणि त्या पाठोपाठ पार्वते यायचा. परागने तर पहिल्या काही दिवसानंतर कैलाशी टॉप टेन असे नावही ठेवले. आम्ही खूप आधी आल्यामुळे आम्हाला हवी ती रूम, व्यवस्थित आंघोळ करणे आणि बाकी गोष्टी म्हणजे स्वच्छ संडास वगैरे मिळायचे. शिवाय आमच्यात व शेवटी येणार्यात साधारण ६ तास किंवा जास्त अंतर असायचे. त्यामुळे आम्ही आराम करून फ्रेश असायचो. आणि त्यामुळेच नेहमी कल्ला करायचो.
सिरखा गाव.
आणि त्या रिमोट भागात लोकशाही जिवंत असण्याचा हा पुरावा !
संध्याकाळी आम्हाला एका पिकचे कॅम्प् वरून दर्शन झाले. ITBP ने सांगीतले की तो अन्नपूर्णा आहे. पण मला खात्री होती की ते अन्नपूर्णा पिक नाही. म्हणून मग मी काही स्थानिकांना विचारले. तर ते आणि ITBP दोघेही हाच अन्नपूर्णा पिक आहे हे सांगत होते. दुसरे दिवशी माझ्या पोर्टरला विचारले, तर तो कुडिला आहे असे म्हणाला. पण आणखी एकाने कुडिला हे तेथील गाव आहे असे सांगीतले.
शेवटी ते पिक्स अन्नपूर्णा नसून अन्नपूर्णा रेंज मधील काही पिक्स आहेत असे मल वाटले. घरी येऊन मी खात्री करून घेतली.
भविष्यात अन्नपूर्णा सर्किट करायचे आहे. तेंव्हा ह्या पिकजवळ जाता येईल.
१ जुलै आजचा दिवस सिरखा ते गाला असा १४ किमीचा ट्रेक होता.
एलेवेशन मॅप
आजचा रस्ता !
आज आम्हाला रिंगलिंग टॉप चढायचा होता. रिंगलिंग ची कहाणी अशी की, तो एक चीनी गुप्तहेर होता. भारतात येऊन त्याने हेरगीरी केली. पण शेवटी भारतीय आर्मीला कळाले. तो चीन मध्ये परत जाण्यासाठी पळत सुटला आणि Z मध्ये त्याने हा पर्वत चढला, पण पर्वतावर त्याला आपल्या लोकांनी गाठलेच. तिथे त्याने आत्महत्या केली.
हा चढ म्हणजे पहिला मेजर चढ ( सिंहगडापेक्षा भारीच म्हणावा लागेल का? ) होता. टॉप वर मंदीर आहे. त्याचा घंटानाद निदान १ किमी खाली ऐकु येत होता. तो घंटा नाद इतका मस्त होता की बास ! वर चढत येणार्या लोकांना, चला आता टॉप आला आहे हे त्याने कळत होते.
हे ते मंदीर.
ॐ
त्या रस्त्यावर जाताना ही कोब्रा फुलं दिसत होती. संतोराम म्हणाला की खाऊ नका, विषारी आहेत.
दूर लांबवर जो दिसतोय तो गाला कॅम्प !
आणि मध्येच डोंगराला एक आडवा छेद दिसतोय. तिथून आता नवीन मोटारेबल रोड तयार करत आहेत.
गाला कॅम्पवर आम्ही जेंव्हा पोचलो तेंव्हा सकाळचे केवळ १०:१५ मिनिटे झाली असावीत. आमच्या आधी १० मिनिटे सर्वात फास्ट जोडगळी श्री रामसेवक व ट्रेकचंद येऊन पोचले. त्यांना तर ITBP ने विचारून खात्री केली की तुम्ही नक्की यात्री आहात की कोण? कारण १० वाजे पर्यंत तिथे (इतक्या फास्ट कोणी येत नसे.) गाला कॅम्पवर जाताना आम्हाला (द इनसेपरेबल ड्युओ) कॅम्पच्या चढावर फनि कुमार दिसला. तो स्वे होत होता. त्याच्या झोकांड्या जात होत्या. त्याला आम्ही त्याचे सामान घेऊन तू फक्त चाल, हात धर वगैरे अशी मदत देऊ केली. पण त्याने ती नाकारली. फनि देखील टॉप टेन मध्ये असायचा. पण फरक इतकाच की तो जिथे उतार असायचा तिथे खूप फास्ट म्हणजे टॉप ५ मध्ये असायचा. जिथे जिथे म्हणून चढ लागला, तिथे तिथे तो ढेपाळायचा. अगदी झोकांड्या खात चढायचा. आम्हाला ती मजा वाटायची. त्याचे फोटो घेणे ही लाजवाब होते. तो चालता चालता ते दृष्य क्लिक करायचा. जणू काही ते कॅप्चर केले नाही तर ट्रीप अपूर्णच राहील.
आम्ही आपले चढ असो की उतार त्याच स्पिड मध्ये असायचो. ह्या पूर्ण रस्त्यावर तुम्हाला चढ उतार खूप आहे, बरेचचा आपण आपला कॅम्प ज्या उंचीवर आहे त्या पेक्षा २ ते ३००० फुट जास्त चढून परत उतरायचे असते. कारण त्यानेच बॉडी अक्लमटाईज होत असते.
कॅम्पवर जेवण्याची खरंच खूप छान सोय आहे.
रोज आम्ही सकाळी चार वाजता उठायचो. तो चहा बेड टी असायचा ! ती लोकं येऊनच उठा उठा म्हणायची.
सकाळी पाच वाजता कुच करायचो.
साधारण आम्ही साडेसात वाजता ( आम्ही म्हणजे जी लवकर पोचू शकत ती मंडळी) ब्रेकफास्टच्या ठिकाणी असू.
तेथून परत दोन तासात, लंच मिळायचा. अर्थात त्यांनी ब्रेकफास्ट आणि लंचच्या वेळा ह्या कॉमन यात्रेकरूच्या स्पिडला गृहित धरून ठेवल्याअसल्यामुळे दोन तीनदा ब्रेकफास्टसाठी आम्ही तो रेडी नसल्यामुळे थांबावेही लागले तर कधी कधी लंच १० ला आटोपले !
कॅम्पवर पोचल्याबरोबर तुम्हाला कधी चहा / ज्युस लगेच मिळतो.
नंतर जेवणाआधी ५ वाजता सूप मिळते. ते सूप तिथे दैवी वाटतं. इतकं की आम्ही दोन दोन ग्लास आणि भीम क्वचित ४ ग्लास पण पीत असे. मग रात्री जेवणात, दाल, राईस, छोले आणि पोळी असे. (नंतर नंतर तीच टेस्ट बोअर झाली हे खरे असले तरी तिथे, तेवढ्या रिमोट भागात हे रोज मिळणे म्हणजे स्वर्ग होता ! थॅक्युं ITBP आणि कुमाऊं मंडळ विकास निगम !
२ जुलै - आज गाला ते बुधी
गाला कॅम्प हाईट - २३३३ मिटर्स
बुधी - २६८६ मिटर्स
मॅक्स हाईट गेन - २९०० मिटर्स
अंतर - २० किमी - (खरे गाईड मध्ये १८ दिले आहे. पण मोजल्यावर ते २० भरते)
आजचा रस्ता !
एलेवेशन मॅप
आज सकाळी आधी २ एक किमी थोडा चढ उतार असणार होता. पण खरी कसरत गाला ते बुधी मध्ये तुम्हाला त्या फेमस ( की इनफेमस) ४४४४ पायर्या उतराव्या लागतात आणि आज पूर्ण वेळ तुम्ही काली नदीच्या काठाकाठाने चालत असता. काली नदी ही भारत आणि नेपाळ मधील नॅचरल बॉन्ड्री आहे. मोस्टली हा रस्ता डाउनहिल असला तरी सगळ्यात जास्त डेंजरस आहे कारण ह्यातून मध्ये मध्ये पाणी वाहते आणि कधी कधी काली २००० फुट खाली तर कधी कधी सोबत असते. तिचे रौद्र रूप निव्वळ ऐकणे आणि बघणे म्हणजे देखील तपश्चर्याच होय!
गाला ते बुधी मध्ये लखनपूरला तुम्हाला नाश्ता मिळतो. (त्या पायर्या उतरल्यावर) आणि पुढे माल्पा हे गावं लागतं. माल्पा गावात पूर्वी राहायची सोय असायची. पण बहुदा १९९८ मध्ये, तिथे जेंव्हा यात्रा चालू होती आणि कॅम्पवर लोकं राहत होती, त्या दिवशी रात्रभर लॅन्डस्लाईड झाली आणि सर्व यात्रींसहीत जवळपास १५० लोक मृत्यूमुखी पडली. प्रोतिमा बेदी पण त्यातच गेली. त्यानंतरही तिथे लॅन्डस्लाईड चालूच होती, त्यात एकुण ३५० लोकं आणि पूर्ण गाव नाश पावलं. तिथे आता काही नाही.
निसर्गाचे असे रौद्र रूप हिमालयात नेहमीच बघायला मिळते. त्यामुळे यात्रेत सहभागी होताना तुम्ही मेलात तरी चालेल, आणि चीन मध्ये असताना मेलात तर बॉडीही घरच्यांना मिळणार नाही असे लिहून घेतात !
त्या पायर्या !
एकदम डेंजरस !
आणि पायर्यांच्या बाजूला काली ! उजव्या बाजूस जी पायवाट दिसते तो नेपाळ.
कालीचे असेही एक रूप
यात्री त्या पायवाटेवरून !
अॅन्ड द म्युल ट्रेन !
घोड्यांची सारखी ये-जा असते. ते मालवाहू घोडे असल्यामुळे लाथ मारू शकतात. आणि त्यांच्या धक्क्याने तुम्ही नदीत पडून कैलासाला जाण्याआधीच वैकुंठाला पोचता ! त्यामुळे थम्ब रूल असा की, "घोडा येताना दिसला रे दिसला की आपण डोंगराच्या बाजूला व्हायचे".
ते वरून पाणी पडत आहे, ते कालीत जात आहे. काली खाली वाहतेय !
आणि मग अचानक काली तुमच्या बाजूने !
आज सकाळी ७ वाजता नाश्ता आणि ९:१५ ला जेवण केलं आणि आमच्या स्पिड मुळे नेहमीप्रमाणेच टॉप ५ मध्ये होतो. कॅम्पला पोचल्यावर नेहमीप्रमाणेच आमचा दंगा सुरू झाला. आज आदरनिय आमच्या आधी पोचला, त्यामुळे त्याने आमच्या नावाचा एका खोलीत रूमाल टाकून ठेवला. काही लोकं आज संध्याकाळी ५ पर्यंत आले.
गाला ते बुधी ही वाट अत्यंत अवघड आहे असे आम्हास सांगण्यात आले होते. तिची प्रचिती आम्हा येताना झाली. जाताना पाऊस नसल्यामुळे आणि आम्ही खूप फ्रेश असल्यामुळे काही वाटले नाही.
प्रत्येक कँम्पचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे तो कॅम्प तुम्हाला दिसतो पण येतच नाही. आणि शेवटी चढच चढ ! बुधीपण त्याला अपवाद नाही. रादर बुधीला पोचताना शेवटचा चढ खूपच अवघड आहे !
आम्ही दिवसभरातल्या घडामोडी, देशी परदेशी राजकारणाच्या घडामोडी, ग्रूप मधील एकमेकांचे पाय ओढत आणि उद्या छियालेख चढायचा आहे, ह्याची नोंद घेत, वी हीट द सॅक !
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग १
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७
मस्त वर्णन आणि फोटो.
मस्त वर्णन आणि फोटो.
मस्त फोटोज!! यात्रा
मस्त फोटोज!! यात्रा म्हटल्यावर पटकन जे डोळ्यासमोर येते - गर्दी, गचाळपणा वगैरे ते चित्र पार पुसून टाकले जातेय हे बघून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज अखेर वाचायला घेतला तुझा
आज अखेर वाचायला घेतला तुझा फोटोलॉग . फोटो मस्त आहेतच. तू लिहीलेलं पण मस्त आहे. पग्याचं गोष्टीवेल्हाळ वर्णन आधी वाचल्यानं काही उल्लेख ओळखीचे वाटतात.
Pages