अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वाभास +१

होतात असे भास! एक दोनदा झालेत. एकदा फिरायला जात असतांना वाटलं की पुढे जाऊ नये, विनाकारण निराश वाटले. थोडे समोर गेल्यावर उड्डाणपुलावर भयंकर अपघात होऊन गेला होता.

मला आलेला अनुभव .

मी तेव्हा कॉलेज ला पंधरावी ला होते . माझ घर चाली त आहे . घर समोरासमोर आहेत . झाले असे कि त्या दिवशी मी कॉलेज ला सुठी घेवून घरी राहिली . घरी मी आणि आई फक्त , मी दुपारी घरी टीव्ही बघत बसले होते . आमचा टीव्ही एक छोट्या कपाटा वर आहे आणि मी अगदी त्या खाली बसून टीव्ही बघत होते माझा आवडता सिरीयल बघत होते ( कुठला सिरीयल ते आठवत नाही ). आई ने मला टीव्ही बघता बघता कपड्याच्या घडी करायला आणी ठेवायेला सांगितलं आणी ती बाहेर शेजारी निघून गेली . तशी मी हातातलं काम सोडून टीव्ही बघत बसले . किती कुणास ठावूक मी किती वेळ टीव्ही बघत होती पण नंतर मला घरी फार अंधारून आणी असव्स्त वाटायला लागल . मी पाठी वळून बघितलं तर दरवाजा बंध होता मी पुढे जाऊन दरवाजा जवळ गेले तर दिसलं कि दरवाजाला आतून हलकी कढी होती . मला चांगल आठवत होते कि आई बाहेर निघून गेल्यावर मी जागेवरून उठली च नाही . म दरवाजाला आतून कढी कशी काय लागली आणी असे असव्स्त कधीच नाही वाटल मला माझ्या घरी . मी कढी काढून बाहेर बघितलं तर समोरच एक घर सोडून दुसर्या घरी लोक घाईने आतबाहेर करत होते मी इशार्याने शेजारच्या काकी ला विचारले काय झाल तर त्या म्हणायला कि त्या घरी जी म्हतारी आजी होती ती आजी वारली . काकी ला दु:ख झाल्यासारेखे नाही दिसत होते कारण ती आजी फार दुष्ट होती असे सर्वजण बोलतात असो … हा अनुभव मी आईला नतर रात्री सागितलं तिने मला देवाला हात जोड असे म्हणाली .

तर हा माझा छोटासा पण जरा विचित्र अनुभव …

आता धागा वर आलाच आहेत तर ..

माझी मावशीची मुलगी मयुरी .. तिच्या मैत्रीणीच्या मोठ्या भवासोबत घडलेला किस्सा ..

तिच्याकडे गावाकडले पाहुणे आले होते . दिवसभर थांबुन रात्री वापस निघायचा त्यांचा बेत होता . रात्री परतताना तिचा दादा घरची मोठी गाडी घेऊन त्यांना सोडुन परत यायच्या हिशोबाने निघाला . परतीच्या रस्त्यावर पाहुणे मंडळी सोबत असताना एक अपघात झालेला दिसला . एक तरुण तिथ रक्तबंबाळ अवस्थेत अगदी निपचित पडुन होता . बाजुलाच त्याची बाईक तुटून पडलेली होती . एखाद्या मोठ्या वाहनाने ठोस मारल्यामुळे झालेला अपघात असावा .
हे लोक तिथेच थांबले . पोलीस, अम्ब्युलन्स ला वगैरे फोन लावला आणि गाव तेच असल्यामुळे तिथ पोहचुन सर्व सोपस्कार आटोपुन मग पाहुण्यांना त्यांच्या घरी सोडुन हा दादा परत निघाला . तशी वेळ रात्रीची जरी असली तरी अगदी १२ वगैरे नव्हते वाजले पण परतत असताना त्याच ठिकाणी जिथं त्या तरूणाचं प्रेत होत तिथ्चं त्या दादाला तो परत उभा दिसला ..
कुणास ठाऊक , जस्ट ती सर्व घटना घडल्यानं असणार.. मनात तेच विचार ताजे असणार किंवा आणखी कै कारण असणार .. पण त्याक्षणी ज्या व्यक्तीला आपण अस डॉक्टर कडे पंचनामा करुन टाकुन आलो तो अनोळखी व्यक्ती परत त्या ठिकाणी दिसन म्हणजे... यावेळी दादाने तशीच गाडी दामटवली न थांबवता .. दुसर्‍या दिवशी काय घडलं ते सांगीतल . Sad

_रोहन
काहीही अनुभव आहेत...निव्वळ टाईमपास......

चुकीच आहे हे …….

काही अनुभव खरच घडलेली आहेत …
मी विश्वास ठेवते …

मायबोलीवर अमानवीय शक्तींचे वास्तव्य :
फार फार दिवसांपूर्वीची गोष्ट नाही, आत्ता परवाचीच आहे ..
रात्री एक वाजता मायबोलीवरच काहीबाही वाचत पडलो होतो..
एक धागा दिसला, वुडहाउस या आंग्ल लेखकाच्या एका कथेचे अतिशय सुंदर भाषांतर डकवण्यात आले होते..
"जीव्हाजी (कि? जीव्हज) चे आगमन" असे काहीतरी नाव होते.. मला ते अतिशय आवडले..
आत काही जणांनी प्रतिसादपण डकवले होते.. मी तर आनंदाच्या भरात २ प्रतिसाद डकवले ..
...
दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन पाहतो तर काय .. तो धागा दिसेचना .. माझ्या प्रतिसादास कोणी प्रतिसाद दिलाय का ते पाहण्याची उत्सुकता मला शांत बसू देईना.. मी शोध घ्यायला सुरुवात केली..
शोध शोध शोधले .. गुलमोहर मधून सगळ्या विभागात जाऊन, पार गजल मध्ये पण जाऊन पहिले .. तरी नाही ..
मग मायबोली बंद करून ३ मिनिटे ध्यानधारणा केली.. पुन्हा तपासले.. तरी नाही
Uhoh मग मात्र भीतिने माझी गाळण उडाली..

माबोवर काळी शक्ती बाळगून असलेले आणि पुन्हा पुन्हा उपटणारे काही आयडी आहेत याची कल्पना येत होती काही धागे वाचून..
पण धागे उडवण्याइतपत शक्ती आता त्यांनी जमवली आहे याची उपस्थितांनी नोंद घ्यावी.. Light 1
पुढे गरज पडल्यास माबोची शांती, शुद्धी इ. करावी लागू शकते.. या कामासाठी पंडित आयडींचा शोध (कि उत्पादन) करण्यास सभासदांनी प्रारंभ करावा असे माझे आग्रहाचे प्रतिपादन आहे..
धन्यवाद ..

तो धागा प्रताधिकाराच्या अडचणीमुळे अप्रकाशित करण्यात आल्याचे मला मागाहून कळाले .. Sad
माझा छानसा अमानवीय अनुभव त्यामुळे मानवीय झाला Uhoh

ithle amanviy anubhav vachun bhyav vatal Uhoh maza dev gan tyat mi vruchhik ras wali tymule bhut mazyakad baghayala b ghabrat astyan Biggrin
bar mala tri ajun asle anubhav alele nahit pn ( manat tivra iccha asunahi Sad ) pan ase kahi anubhav aaikadun ani mavas tai kadun aiknyat alele ahet lavkarach takin mhante ithe toparyant " Kavtibaba ki jay Biggrin "

मायबोलीवरच आलेला अनुभव इतका भयानक आहे की बस.
हा धागा वाचत असताना एका आयडीच्या नावाला हातपाय आले. मला वाटलं सारखं डोळे ताणल्यामुळे भास असतील. पण नंतर ती आकृती स्क्रीनवर येऊन नाचू लागली आणि आता यूएसबी पोर्टमधून येऊन तुला धरणार असं म्हणू मागली. तरी मला भासच वाटत होते. पण त्या अआयडीय आकृतीने मायबोलीवरच्या किती आयड्यांचे भक्षण केलंय ते पुराव्यासहीत दाखवल्यावर मग काय दात खिळ्यांसारखे जबड्यात अडकले. एव्हढ्यात दिवे गेले आणि यूएसबी पोर्टमधून त्या अआयडीय अस्तित्वाने बाहेर यायचा कार्यक्रम कॅन्सल झाला. नाहीतर..

A Really Scary Scary Zombie Vampire Cape

इथली काही उंड भूतं या धाग्यावरून निसटली आहेत आणि दिसेल त्या धाग्यावर जाऊन धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे सदस्यांच्या पोस्टी अचानक ३३ वेळा पडत आहेत. मराठी विश्वात खळबळ माजवणारी ही नेटहॉण्टिंग ची घटना आहे. तरी सर्वांनी काळजी घ्यावी. शक्यतो रात्रीचे ऑनलाईन येऊ नये.

माझ्या ताईने मला सांगीतलेला हा किस्सा,
ताईच्या गावातली काही मुले नदिवर पोहायला गेली होती.तशी ती मुले नेहमीच तिकडे जायची पण त्या दिवशी आक्रितच घडलं.सगळेजण पोहत होते.पोहताना त्यांना जाणवत होतं कि कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे.अस्वस्थता जाणवत होती.म्हणुण सगळेजण नदितुन बाहेर येवु लागले.शेवटचा मुलगा बाहेर येतोय तोच त्याच्या पायाला कशानेतरी पकडले आणि त्याला नदित खेचु लागले.तो मुलगा ओरडला.सगळेजण भयभीत होऊन पहात होते. काठावरच्या मुलांना फक्त तो मुलगाच दिसत होता,त्याला कोण ओढत आहे ते दिसत न्हवतं.तो मुलगा पाण्याखाली बुडला.तो मुलगा कुठे गेला हे पाण्यात उतरुन पहायचं, इतकं धाडस काठावरच्या एकाचही झालं नाही.बातमी गावात गेली.गावकर्यांोनी पोलिसांना बोलवुन घेतलं.पोलिसांनी शोध घेतला.त्या मुलाचं प्रेत पाण्याखालच्या चिखलात रुतुन बसलेलं आढळलं. प्रश्न उद्भवतात-1) नेहमी तिथेच पोहणारा तो मुलगा पाण्यात बुडलाच कसा ? 2)तो पाण्याच्या प्रवाहात वाहुन जाण्या ऐवजी खालच्या चिखलात कसा रुतुन बसला ?

बापारे......... खुप डेन्जर आहे हे सगळ...... मि नविनच आहे ईकडे .... त्यामुळे जमत नाहिये अजुन टाईप करायला... पण माझ्याकडेहि आहेत काहि अनुभव.....

माझ गाव रायगडमधे माणगाव. हि घटना २००६ साली घडलेली आहे .त्यावर्षी आम्ही सगळे आत्त्याच्या लग्नासाठी गावी गेलो होतो. लग्न मे महीन्यात होते आणि मे महिन्यात गावी पाण्याची फार भीषण परिस्थिती असते. विहीरीच पाणी आटत त्यामुळे आम्हाला लांबून पाणी आणवे लागते.
तर आता खरी सुरुवात, भर दुपारी आम्हाला सायकल चालवायची हुक्की आली आणि मी आणि माझा काका जो माझ्यापेक्षा लहान आहे सायकल घेऊन बाहेर पडलो (मला सायकल चालवायला येत नाही आणि या प्रसंग नंतर तर कधी तिच्याकडे पाहिलेही नाही ) तो मला सायकल शिकवत होत. आम्ही जिकडे चालवत होतो त्या रस्त्याच काम चालू होत आणि बरीचशी बारीक खडी टाकली होती तिकडे. तसेच आम्ही आमच्या गावाच्या हद्दितच होतो. जिकडे हद्द सुरु होते तिकडे एक झाड आहे आणि त्याखाली आमचे देव आहेत जसे प्रत्येक गावात असतात गावाच्या रक्षणासाठी . तर सायकल चालवता चालवता आम्ही कधी तिकडून बाहेर पडलो ते आम्हाला कळलंच नाही. आणि अचानक मला मागून कोणीतरी जोरात धक्का मारल्यासारख झाल आणि मी सायकल वरून तोल जाऊन पडले ते थेट खडी मध्ये. आधी मला कळलंच नाही काय झाल ते नंतर बगितल तर सगळ अंग रक्तबंबाळ झालेलं तर माझी वरात घरी आणि घरून डॉक्टरकडे…. पण डॉक्टरच्या औषधाने मला काही बर वाटेना । सतत एक गुंगी असायची …
आणि दुसऱ्यादिवशी दुसरे काका बैलगाडी घेऊन पाणी आणायला निघाले… पाणी भरून आणल. आणि वेशीजवळ येताच (जिकडे काल मी पडले तिकडेच) त्याची बैलगाडी पाण्याच्या drums सकट उलटी झाली काकालाही बराच लागल……. आणि पुन्हा त्याच संध्याकाळी माझे तिघे भाऊ same स्पॉट वर पुन्हा सायकल वरून पडले त्यांनाही तोच अनुभव जस कि कोणी तरी त्यांना मागून खूप जोरात ढकलले …
आत्ता मात्र सगळे वडिलधारे, आज्जी आजोबा काळजीत पडले ते समजून गेले कि नक्कीच काहीतरी वेगळ आहे…. आणि संध्याकाळी आम्हा सगळ्यांवरून नारळ आणि उतारे काढून आजोबांनी त्या जागेवर नेउन ठेवले आणि काही चूक झाली असल्यास माफ करावे असे सांगून तिथून निघून आले…
आशचर्य म्हणजे त्यादिवसानंतर आम्हाला कोणालाच कसलाही त्रास झाला नाही मीही बरी झालें … आणि मग लग्न आटपून आम्ही मुंबई ला आलो…
म्हणूनच गावी किवा अनोळखी जागी गेल्यावर काही जागा प्रकर्षाने टाळाव्यात . काही गोष्टी आपल्या आकलनापलीकडच्या असतात .

मी अनुभव येण्याची अनेक वर्ष वाट बघतोय. >>> असे बोलू नये मंदार जोशी. काही अनुभव न घेतलेले बरे. विषाची परीक्षा कशाला घ्यायची? या दुनियेपलीकडेही तिसरी दुनिया आहे हे नक्की. मी लहानपणी अनुभव घेतलाय असे आई सांगते, वय वर्षे १ च्या आतबाहेर असल्याने मला आठवत नाही.

आणखी एक अनुभव जो माझ्या आज्जीला आलेला. मुंबईत आपण अगदी कुटेही केव्हाही फिरतो पण गावी वेळ काळ बघूनच घराबाहेर पाडाव लागत. हा अनुभव माझ्या आज्जीला बऱ्याच वर्षांपूर्वी आलेला आहे म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी खूप वर्ष, तेव्हा गावी कोणाकडे toilet नसायचे. रात्री-अपरात्री शौचाला- वैगेरे बाहेरच जावे लागायचे. तर एकदा आज्जीला रात्रीच बाथरूम ला जायचे होते, वेळ रात्रीची १२-१ ची असेल, मग ती घरामागे शेतात गेली आणि एका कातळावर बसली, अंधारात तिला काही दिसलं नाही. पण जेव्हा ती निघाली तेव्हा कोणीतरी तिच्या गालावर (कानाखाली) खूप जोरात एक चपराक मारली. आज्जी खूप घाबरली आणि जोर जोरात ओरडायला लागली तिच्या आवाजाने सगळे जागे झाले… कस बस तिला घरी आणल आणि शांत केल। मग तिने झालेला सगळा प्रकार घरी सांगितला… आजोबांना कळ्ळ होत ते पण ते रात्री काहीच बोलले नहि. कस बस आजी झोपली पण सकाळी जेवा ती उठली तेवा सगळ्यांना तिच्या गालावर सणसणीत बोट उमटलेली दिसली जी नॉर्मल माणसाच्या बोटाच्या उंचीपेक्षा बरीच मोठी होति. मग तीनेती जागा सांगितली जिकडे ती रात्री गेली होती तेव्हा समजल कि जागेवाल्याच्या जागेत गेली होती हा जागअवाला त्या त्या जागेचा रक्षणकर्ता असतो आणि त्याच्या जागेत कोणी आल कि त्यांना अद्दल घडवतो हा जागेवला सगळ्यांनाच दिसत नाही भाग्यावंतानाच दिसतो आणि तो फक्त माझ्या पणजी आज्जीला दिसलेला आहे त्याच शेतात तो खूप उंच असतो पांढरे कपडे घातलेले… मुंडासे बांधलेला असा …. तो तसा त्रास देत नाही आपल रक्षण करतो … आमच्या घरचे दर अमावास्ये - पौर्णिमेला जागेवाल्याला नारळ देतात . तर असा हा अनुभव माझ्या आज्ज्जीचा

Pages