Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रीया - या तुझ्या मोनिकाला
रीया - या तुझ्या मोनिकाला माझा साष्टांग दंडवत सांग हो !!
जाहीर सत्कार तर व्हायलाच हवा तिचा सोबत "धाडसीकन्या" असा पुरस्कारही !!
धाडसी वगैरे माहीत नाही पण ती
धाडसी वगैरे माहीत नाही पण ती वर्कोहॉलिक आहे. पण तो धाग्याचा विषय नाही त्यामुळे जाऊ देत.
ती म्हणते की ती तो आवाज ऐकतच नाही. पुर्वी ही गोष्ट नोटीस केल्यापासून आता ती रोज फुल्ल आवाजात कानात हेडफोन्स टाकून गाणी लावते त्यामुळे तिला तो आवाज येतच नाही.
तरीही असा आवाज येतो हे माहीत असताना स्वतःच्या मनाला असा आवाज येतच नाही हे सांगणं आणि रोजच्या रोज अशा जागी एकटीने बसून काम करणं ही ग्रेट गोष्ट आहे हे मात्र मला पुर्णपणे मान्य आहे.
तुझ्या मैत्रिणीच्या धाडसाला
तुझ्या मैत्रिणीच्या धाडसाला सलाम. पण हा आवाज कसा व का येतो अशा शोध कोणी घेतला होता का? म्हणजे धाडस केले होते का? किन्वा त्या हॉलमध्ये जर कॅमेरे असतील ( बसवले असतील तरच ) तर कधी काही आढळले का? फार प्रश्न विचारले पण जाम उत्सुकता वाटली.
मी कालच एकाशी पैज लावलेली
मी कालच एकाशी पैज लावलेली आहे. आमच्या गावात काही भुतबाधा असलेल्या जागा आहेत (म्हणे). एक ढोल बिदीतून आणि दुसरा जखण्या आंबा (जखिणी असतात तो). एकाशी पैज लावली की पुढच्या वेळी गावात येईन तेव्हा त्याच्या घरावरुन रात्री पावणेबारा वाजता निघणार म्हणजे ही दोन ठिकाणं मधे लागतील साधारण रात्री बाराच्या सुमारास आणि आमच्या घरी पोहोचणार.
बघू कधी योग येतोय तो.
Tumhi ekadam daringbaz aahat
Tumhi ekadam daringbaz aahat
मी माझ्या नेहेमीच्या
मी माझ्या नेहेमीच्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांना विचारले, त्यांनी मला या प्रकारामागची कारणे छान समजावून सांगितली आणि गोळ्या दिल्या <<< अदिजो कारण सांगाल का ?
भुतही कॉन्फरन्स रुम मधे
भुतही कॉन्फरन्स रुम मधे मिटींग मिटींग खेळतात वाटत :))
.
.
Rashmi, none of us ever tried
Rashmi, none of us ever tried or not even interested to search as we know no one is gonna belive us.
Our ODC is restricted odc so outsiders are not allowdp
No camera ,no smartphone alwd inside odc or we would atleast have tried somethng with gathered proof..
मला कधीकधी वाटत चित्रपटांनी
मला कधीकधी वाटत चित्रपटांनी कथांनी वगेरे भूतांची प्रतिमा फारच डागाळून ठेवलीये. इतके काही वाईट नसतात ते.
ओह! माझे असे मत वाचून कोणाला
ओह! माझे असे मत वाचून कोणाला मी भुताचा एजंट किंवा खुद्द भूतच आहे अशी शंका येतेय का.?
मला थोडी थोडी येतेय ..
रोज फुल्ल आवाजात कानात
रोज फुल्ल आवाजात कानात हेडफोन्स टाकून गाणी लावते>>> अशाने तिला नॉर्मल माणसांचे आवाज ऐकायला येणंही बंद होइल. मग भुतांची खुसफुस काय ऐकु यायचा प्रश्नच नाही.
असे आहे होय रीया ते. शक्यता
असे आहे होय रीया ते. शक्यता आहे. पण गुढ वाटले. प्रकु धन्य आहात तुम्ही. माझी तर भितीने गाळण उडुन ततपप झाली असती नाहीतर हार्ट अॅटॅक तरी आला असता. हो, मी घाबरट आहे भुतान्च्या बाबतीत. पण माझा राक्षस गण आहे. असे म्हणतात की मनुष्य गणाला भूत दिसते व झपाटते देखील ( कारण मनुष्य मनाने कमकुवत असतो, अर्थात सगळेच नसतात तसे) राक्षस गणाला भूत दिसत पण काही करत नाही. आणी देवगणापासुन ते चार हात दूर रहात.
रात्री शक्यतो, वाळत घातलेले
रात्री शक्यतो, वाळत घातलेले कपडे बाहेर तसेच ठेऊ नये असे म्हणतात, कारण ते कपडे कोणी चोरून नेउन त्याच्यावर करणी वगैरे करेल ही भीती असे.
नुकतीच यासंदर्भातील एक घटना घडली, तर माझ्या मामाची मुलगी स्वाती ताई, पुण्याला मेडिकल शिकायला होती तिची सर्वात जवळची मैत्रीण मनीषा. मनीषा नगरची होती. अतिशय सभ्य, मनमिळावू, इझी गोइंग गर्ल.
तर मनीषा ताईच्या कुटुंबाचे त्यांच्या काकांशी वाकडे होते. घर-जमीन-विहीर-सोने अशा अनेक गोष्टींवर वाद असत. त्यात मनीषा ताई दिसायला सुंदर, पुण्याला मेडिकल शिकतेय, तिचा लहान भाऊ एयरफोर्सची तयारी करतोय या बाबतही तिच्या काकुच्या मनात जेलसी होतीच. ती वाढत वाढत इतकी वाढली की, एके दिवशी मनीषा ताई सुट्टीसाठी घरी गेली असताना रात्री काकूने तिची ओढणी चोरली, त्यावर करणी करून ती परत आहे तिथे ठेवली. आणि तेव्हापासून घराचे वासे फिरले. जेव्हा जेव्हा मनीषा ताई ती ओढणी वापरत असे त्यावेळी हमखास काही ना काही दुर्घटना घडत असे. खुपदा मनीषा ताईच्या घरी काय चाललं आहे, कोण काय बोलत आहेत, कोणाचे काय प्लान्स वगैरे गोष्टी पण त्या काकुला समजत असत. मनीषा ताई ती ओढणी घेऊन पुण्याला आल्यावरही होस्टेल वर तिला त्रास होऊ लागला. नंतर नंतर घरातल्या प्रत्येकालाच हा त्रास होऊ लागला. (मनीषा ताई, मध्यरात्रीच ओरडायची, उठून एका कोपऱ्यात बसायची, कुणीतरी अंगावर फटकारत आहे, काहीतरी टोचत आहे असे तिला फील व्हायचे, )
शेवटी खूप शोध शोध करून कोणीतरी त्याना लातूर मधील कोण्या मांत्रिकाचा पत्ता दिला, सध्या वेशात तो ५ दिवस त्यांच्या घरात राहिला आणि त्याने सर्व धागेदोरे शोधले.
सध्या परिस्थिती बरी आहे. स्वाती ताईने जेव्हा ही गोष्ट आम्हास सांगितली त्यावेळी आमचा पण विश्वास बसला नाही. पण स्वतः ताईने आपल्या डोळ्याने या गोष्टी पहिल्या होत्या, सो...
Zakoba, tila normal
Zakoba, tila normal manasanche avaj nahich yet aiku. Tila haak marun damato amhi pan no use.
yedi 
Mag ping karav lagat kinva tapali maravi lagate mag headphones kadhun baghate kon alay te
प्रशू, करणी करणारा/री शेवटी
प्रशू,
करणी करणारा/री शेवटी खड्ड्यात जातो/ते. अखेरीस त्याचं/तिचं तळपट होतंच. महाराष्ट्रात घाटावर छेडे नामक करणी अशाच तऱ्हेची आहे.
आ.न.,
-गा.पै.
रश्मी.., मीपण राक्षस गणाचा
रश्मी..,
मीपण राक्षस गणाचा आहे. मलाही कधीच भूत दिसणार नाहीये. काही ठिकाणी फक्त जाणवतं की इथे काहीतरी आहे.
आ.न.,
-गा.पै.
>>आमच्या ओडीसी मधे अनेकांनी
>>आमच्या ओडीसी मधे अनेकांनी ही गोष्ट सांगितलीये की त्यांना आतल्या कॉन्फरन्स रूम मधून नॉक केल्याचे आवाज ऐकू येतात.
तुमच्या टीममध्ये कोणी भूताखेतांवर विश्वास न ठेवणारे लोक असतील तर तो आवाज यायच्या १० मिनिटं आधी कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन बसून तो आवाज कुठून येतोय ह्याचा शोध घेऊ शकतात का? त्या रूमचा दरवाजा त्यावेळी उघडा असेल तर काय होईल? तरी नॉक केल्याचा आवाज येईल का? हे नॉक ३ वेळा होतं का (इथे मला The Conjuring मध्ये सान्गीतलेला संदर्भ आठवतोय हे कबूल)
Swapna knock ekdach hot... I
Swapna knock ekdach hot...
I dnt thnk konamadhe itaki himmat asel pan wicharun pahate ki koni aat jatay ka basayala.
Daravaja ughada thevanyach dokyat nahi aal kadhich.
But some how we all hv decided nt b in offc after nine pm so lets see
गापै , छेड़े बद्दल माहिती देता
गापै , छेड़े बद्दल माहिती देता येईल का.?
रीया, भयंकर आहे अनुभव . भीती वाटली वाचूनच ( अवांतर त्या नॉक नॉक ने तुझ्या कीबोर्डला काही केलेय का ? मिन्ग्लिशमध्ये का लिहून राहिलिस
)
प्रकु , बापरे ! मला वाचुनच
प्रकु , बापरे ! मला वाचुनच भीती वाटायला लागली .
त्या रूमचा दरवाजा त्यावेळी उघडा असेल तर काय होईल? तरी नॉक केल्याचा आवाज येईल का?>>> स्वप्ना , आणि समजा आवाज आला , उघड्या दरवाजावर नॉक केल्याचा .तर मग कोणाची हिम्मत होईल वळून कॉन्फरंस रूमकडे बघायची .
बंद दाराआड स्रुष्टी
स्वस्ति >> ते जाऊच्दे..
स्वस्ति >> ते जाऊच्दे.. उघड्या दारावर नॉक वगैरे ..
पण समजा कोणी दरवाजा उघडा ठेवून आत थांबल आणि नॉक व्हायच्या वेळी एक अचानक अपनेआप धाडकन दरवाजा बंद झाला तर
किती घाबरता रे
किती घाबरता रे
रामसे ब्रदर्स हि हॉ हॉ हा
रामसे ब्रदर्स हि हॉ हॉ हा
हायला टीना , भर दूपारी विचार
हायला टीना , भर दूपारी विचार करायला लावला आहेस .
माझ्या बेडभोवती अशा आकृत्या
माझ्या बेडभोवती अशा आकृत्या असत्या तर मी त्यांना विचारलं असतं "काय, इथे काये? मेल्यानंतर कामधंदा नसतो का?"
माझ्या बेडभोवती अशा आकृत्या
माझ्या बेडभोवती अशा आकृत्या असत्या तर मी त्यांना विचारलं असतं "काय, इथे काये? मेल्यानंतर कामधंदा नसतो का?"
>>
नाही तर मायबोलीवर रजिस्टर व्हायला सांगा
बऱ्याचदा मलापण भास व्हायचे,
बऱ्याचदा मलापण भास व्हायचे, की कोणीतरी पाहत आहे. माझ्या आजीला सवय होती की रात्री खूप वेळ झाला की म्हणायची झोपा आता आणि उद्या अभ्यास करा. असो, काही त्रास नाही झाला, फक्त एक जाणीव. Someone is watching over! पण नंतर ते भास होणे बंद झालेत
अजून एक विचित्र प्रकार म्हणजे काही वर्षांपूर्वी मला आणि सौ ला एकच स्वप्न दिसलं होत.
आम्ही कोठेतरी फिरायला गेलो होतो आणि एका काळ्या आकृतीनी आमचा रस्ता अडवला आणि हल्ला चढवला. आम्ही कसेतरी वाचलो. आम्हा
दोघांना एकाच वेळी हे स्वप्न पडलं, आणि त्याच दिवशी बहिणीसपण असाच काहीसा भास झाला होता.
पण एकच स्वप्न दोघांना, एकाच वेळी पडू शकत का? पुढचे ४ ५ दिवस मस्त गप्पा हा मारायला विषय होता.
अनिरुद्ध_वैद्य
अनिरुद्ध_वैद्य
हे अमानवीय आहे कि नाही मला
हे अमानवीय आहे कि नाही मला माहित नाही पण .... हे घडलंय माझ्या बाबतीत...
माझ सासर आणि माहेर मधल अंतर फार लांब नाही बाईक वरून साधारण अर्धा-पाऊन तास लागतो.
त्यामुळे फार-फार तर कधीतरी रात्री ११:०० ला जरी आईच्या घरातून निघाल तरी तरी अर्ध्यातासात आम्ही घरी पोहोचतो.. त्यादिवशी असेच आम्ही लेट ११:०० वाजता आईकडून निघलो ... हाईवे वर जास्त वाहनांची वर्दळ न्हवती आणि काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाडी होती तिकडचे स्ट्रीटलाईटस न्हवते.. रस्त्याच्या मधोमध एक खड्डा होता फक्त बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाशात नवऱ्याला तो दिसला नाही आमची गाडी त्या खड्डात पडता पडता वाचली म्हणजे थोडी स्लीप झाली पण लगेच ह्यांनी गाडीला सावरल पण ह्या अचानक घडलेल्या घटणेमुळे आम्ही दोघेही जर मनातून घाबरलो होतो ...मी तर थरथर होते.. वाटेत आम्ही अजिबात ह्यावर न बोलता घरी आलो ... त्यानंतर झोपायला घेई पर्यंत आम्ही दोघेही हि घटना विसरलो, पण रात्री मला नक्की किती वाजता नाही सांगता येणार पण अचानक जाग आली आणि स्वप्नात तो प्रसंग दिसला जाग आल्याबरोबर अचानक मनात हा विचार आला कि ती जागा चांगली न्हवती , आपण नशिबाने वाचलो.. खरतर जागा चांगली कि वाईट हा विचार माझ्या मनात कधीच येत नाही पण ह्यावेळी अचानक आला . मी सकाळी हे माझ्या नवऱ्याला सांगितलं आणि नवल म्हणजे त्यांनाही हे असच काल रात्री जाणवलं ते पण रात्री माझ्यासारख अचानक जाग येउन...आम्ही आता आमचा येण्याचा रस्ता बदला आहे..आम्ही आता लॉंगरूठने घरी जातो ... माझ्या ह्या अश्या गोष्टींवर अजिबात विश्वास न्हवता पण आलेल्या अनुभावावरून तरी मला विषाची परीक्षा न घ्यावी असच वाटतंय...
Pages