Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी_केदार | 3 July, 2014 -
मी_केदार | 3 July, 2014 - 16:22
जिचे केस कुरळे आहेत आणि जिला अजून कोंबड्याने स्पर्श केलेला नाही अशी युवा व पवित्र कोंबडी. >>> अशी कोंबडी शोधायची म्हणजे कामधंदे सोडून तिच्यावर डोळ्यात तेलघालून लक्ष ठेवायल हवंय फिदीफिदी नाहीतर मेली शेण खायची हसून हसून गडबडा लोळण>>>>
हाहाहा
लयच भारी
मी एवढ्यात एक पुस्तक वाचले,
मी एवढ्यात एक पुस्तक वाचले, त्यातल्या महितीनुसार, आपल्या शरिरातील विर्य, धातु कपाळामधे असतो. ज्या वेळी आपण श्वास घेतो तेव्हा हवेच्या आणि विर्याच्य घर्शणाने कम्पने निर्माण होतात. ति कम्पने आपल्या सुशुम्ना नाडी मधे पोहोचतात तेव्हा आपल्याला स्वप्ने पडतात.
त्यात अजुन detail माहिती होती, ती आत्ता आठवत नाही.
असे लोक असलं काहीतरी करतात
असे लोक असलं काहीतरी करतात आणि गोत्यात येतात....मग या फालतु गोष्टी करतेवेळी अक्कल कुठे गेली असते...एखाद्याचा जीव घेउन स्वता:चा फायदा करुन घ्यायचा प्रयत्न करतात पण हाती काहीच येत नाही
haba mi dileya pratisadat
haba mi dileya pratisadat tumhala vaiyaktik sherebaji/ tomana marlela nahiye ek gamat mhanun mi to pratisad dila hota taripan tumhi tumchya ह.बा. | 3 July, 2014 - 16:45 ya pratisadat mala vaiyaktik sherebaji keli aahet je mala avadalela nahiye tumhi tya pratisadatun majha nav kadhun takav
dhanyavad
आपल्या समाजात अजूनही अशा
आपल्या समाजात अजूनही अशा प्रथा सुरू आहेत याचं आश्चर्य आणि खेद दोन्ही आहेच.>>> आश्चर्य आणि खेद नव्हे भिती म्हण भिती. एखाद्या दिवशी शेजारचे काका-काकू गुप्तधनासाठी तुलाही कापू शकतात. किंवा जिवंत पुरू शकतात. दिसतात तशी नसतात माणसं. कुणाचा काही भरोसा नाही.
एवढी अपशकुनी चर्चा केली चार दोन आत्मे तर डोकावलेच असणार. उगाच बाधायला नको ह्या मायबोलीला. चांगली चालं गं बाई.....![d.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29624/d.jpeg)
![b.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29624/b.jpeg)
ह.बा... कोहळा पण ना ? कुणाला
ह.बा... कोहळा पण ना ?
कुणाला रत्नाकर मतकरींचे "वटवट सावित्री" नाटक आठवतेय का ? दिलीप प्रभावळकर आणि बहुतेक अर्चना पाटकर होते त्यात. भूताची धमाल होती त्यात. पहिल्या बायकोचे भूत आणि दुसरी बायको यांचा सामना होता.
ह.बा. | 3 July, 2014 - 16:45
ह.बा. | 3 July, 2014 - 16:45 ya pratisadat mala vaiyaktik sherebaji keli aahet je mala avadalela nahiye tumhi tya pratisafadun majha nav kadhun takav
असे म्हणालात म्हणून. नका फार मनावर घेऊ. ![consoling1.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29624/consoling1.gif)
dhanyavad >> काही वयक्तीक नाही त्यात. मी जस्ट एक जोक मारलाय. तुम्ही हबा तुम्हाला
Nav kadhyla Kay ghyal
Nav kadhyla Kay ghyal
Nav kadhyla Kay ghyal>>>
Nav kadhyla Kay ghyal>>> kaahi nahi. me Apale nav kadhlele aahe.
काय लोक नाजून झालेत आजकाल.
त्यांना म्हणजे आत्म्यांना
त्यांना म्हणजे आत्म्यांना भविष्य ठाऊक असते का?
नाही. आत्मे फक्त भूतकाळ आणि वर्तामान्कालात्ल्याच गोष्टी सांगू शकतात . त्यांना भविष्य समजत नसतं. ह्या विषयावर अभ्यास असलेल्या एका लेखकाने लिहिलेलं पुस्तक वाचला होता. पुस्तकाचं नाव बहुदा 'आत्म्याचा शोध आणि बोध' आहे . त्याच्यात हे बजावून सांगितलय कि आत्म्यांना भविष्य समजत नसतं
अजून १ फ़ेमस गोष्ट . एक
अजून १ फ़ेमस गोष्ट . एक रिक्षावाला रात्री एका माणसाला / किवा बाईलाही घेवून चाललेला असतो. ती अमावस्येची रात्र असते .. उशीर झालेला असतो. अचानक १ बाई रिक्षाला हाथ करते. पण रिक्षावाला थांबत नाही. मागे बसलेला माणूस त्याला विचारतो "का रे रिक्षा थांबवली नाहीस. ती बिचारी बाई एकटी एवढ्या रात्रीची कशी जाणार ?" रिक्षावाला म्हणतो अहो ते भूत होत. पाय बघितले नाहीत का उलटे होते. तो माणूस स्वताचे पाय दाखवून म्हणतो, "असेच का?"
मोहिनी ही गोष्ट मी ही
मोहिनी ही गोष्ट मी ही ऐकलीय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमचे एक कर्नाटकी साहेब होते.
आमचे एक कर्नाटकी साहेब होते. त्यान्च्या रिलायन्स मोबाईल वर घरच्या एमटीएनल नं. वरुन आणि बायकोच्या एअरटेल नं. वरुन मिस काअॅल येत असत. परत फोन केल्यावर कळे की कुणी फोन नाही केलेला.
एकदा तर तिन्ही फोन बाजुला असतानां असे फोन येत होते. त्यांनी मोबाईल सर्विस सेंटर मधुन चेक केले पण काही problem नाही मिळाला आणि काही network problem समजावा तर तिन्ही फोन वेगवेगळ्या कंपनीचे.
ते लोक खुप टेन्शनमध्ये होते.
यात ट्विस्ट हा की त्यान्च्या बायकोच्या एअरटेल नं. हा काही दिवसांपुर्वी आत्महत्या केलेल्या पुतण्याचा होता. तो ह्या लोकांशीच close होता आणि त्याच्या आत्महत्येच कारण कुणालाच माहीत नव्हतं. सगळ्यांनी हा विचार केला कि कदाचित त्याचं जे बोलणं राहिलं त्यासाटी असं व्हावं.
माझा अनुभव -- . . साधारण
माझा अनुभव --
. . साधारण पंधरा दिवसांपूर्वी . मी घरी एकटाच होतो . रात्री झोप येत नव्हती म्हणून मी फुटबॉल मॅचेसचा आनंद घेत होतो . साधारण दिड वाजले होते . मी tv बंद केला आणि पलंगावर अलगद अंग टाकले . माझ्या पलंगाच्या बाजुलाच एक जुन्या पद्धतीची तीन दरवाज्याची खिडकी आहे . मी ती खिडकी लॉक न करता ढकलून बंद केली होती . त्या खिडकीच्या एका दरवाज्यासमोर मी एक पिण्याच्या पाण्याची बाटली ठेवली होती . का कोण जाणे मला झोप येत नसल्यामुळे मी एकटक त्या बाटलीकडे पाहत काहीतरी विचार करत होतो . अचानक खडकनऽऽऽ असा मोठा आवाज झाला .मी खुप दचकलो.. माझ्या समोर बाटली लगतची खिडकी आपोआप उघडली .बाटली खाली पडली . मला खरंच घाम फुटला .मला प्रथम वाटले की कोणीतरी बाहेरुन ढकलली असेल . म्हणून मी पुर्ण धैय एकवटून बाहेर डोकावून पाहिले . बाहेर कोणीच नव्हते शिवाय माझा कुञा शेरू तो निवांत अंगणात पहुडला होता . जर हे काम कोण्या मानसाचे असते तर शेरुने मला नक्कीच सावध केलं असते . शिवाय बाहेर असा वारा नक्कीच नव्हता की जेनेकरुण त्याने खिडकी एवढ्या जोरात उघडेल . बाहेर अगदी स्मशान शांतता होती . मी माञ त्या रात्री जाम घाबरलो होतो . ती अख्खी रात्र मी जागुन काढली .
मुर्दाघर का
मुर्दाघर का भूत
http://youtu.be/Z2QX-USZ_78
काल गप्पांच्या नादात ऐकलेले
काल गप्पांच्या नादात ऐकलेले इथले (ओमान मधले) दोन किस्से:-
एका मित्राच्या ऑफिस मधली एक मुलगी, तिचा नवरा व त्यांचा छोटा मुलगा, इथे Muttrah नावाचा एक भाग आहे, तिथे एका फ्लॅट मधे राहात होते. वारंवार तिला असं जाणवायचं की अजून कोणीतरी घरात आहे. एक दोन वेळा तिला असंही जाणवलं होतं की तिच्या शेजारुन कोणीतरी डोकावून पाहतंय. एकदा रात्री तिचा मुलगा रडल्याने की आणि कशाने तरी, तिला जाग आली...आणि उठून बसल्यावर तिला दिसलं की बेडच्या शेजारीच जमीनीवर कोणीतरी गुडघ्यात डोकं खुपसून बसलंय. प्रचंड घाबरल्याने, तोंडातून आवाजच फुटला नाही. त्या आकृतीकडे पाहातच तिने शेजारी झोपलेल्या नवर्याला हाताने हलवून उठवायचा प्रयत्न केला. थोडा वेळ प्रयत्न करुनही न उठल्याने क्षणभरासाठी त्या आकृतीवरुन आपली नजर हटवून नवर्याला परत हलवून उठवलं. तो पर्यंत ती आकृती गायब!... याला भास म्हणावा की अमानवीय !
दुसरा किस्सा माझ्या मेहुणीचा. ती Salalah (South Oman) मधे राहात होती. रात्री झोपेत असं जाणवलं की तिचे पाय हलवून तिला कोणीतरी उठवतंय. आधी वाटलं की मुलांपैकीच कोणीतरी असेल. जेव्हा जाग आली, तेव्हा तिला आपले पाय हलताना दिसले, पण कोणीच नव्हतं. मुलं आणि नवरा झोपला होता. तिने नवर्याला उठवून हे सगळं सांगितलं. काही नाही, भास असेल अशी समजूत घालून त्याने तिला परत झोपायला सांगितलं. जवळपास तासाभराने परत तोच अनुभव आला!
त्यांच्या बंगल्याच्या दोन बंगले पलिकडच्या बंगल्यात एक कृष्णवर्णिय एकटाच रहायचा. ह्या घटनेच्या रात्री तो टल्ली होऊन गाडी चालवत कसा बसा घरी आला. (तो कसा आला हे ही कोडंच आहे कारण गाडीचे सगळे टायर्स फाटलेले होते!) आणि त्या नंतर तीन दिवस त्याच्या घरातून काहीच हालचाल न जाणवल्याने पोलीसांना कळवण्यात आले. त्याच रात्री तो मेला होता असं समजलं. त्याच रात्री कोणीतरी आपले पाय हलवतंय असं वाटणे या घटनेला निव्वळ योगायोग म्हणावं की अमानवीय !
मित.....दुसरा किस्सा आधी पण
मित.....दुसरा किस्सा आधी पण लिहीलाय का तुम्ही?? वाचल्यासारखा किंवा मग ऐकल्यासारखा वाटतोय...
बापरे पण घरात वगैरे असं काही होणं म्हणजे....मी लहान असताना आत्याच्या घरात म्हणजे चेंबुर च्या टाटा कॉलनी मधील घरात राहायला घाबरायचे...तिथलं वातावरण गंभीरच आहे...खुप झाडे त्यामुळे सतत सावली . घराबाहेर रस्त्यावर उन्ह आजीबात नाही....त्या मुळे वातावरणात आलेला थंडपणा आणि गूढपणा...घरात पण सतत लाईट्स लावाव्या लागतील ईतका अंधार...नॉर्मली आपण एका रूम मधुन दुसर्या रूम मधे आलो की लाईट्स बंद करतो...त्यामुळे अगदी टॉईलेट ला जायच असलं किंवा किचन मधे पाणी प्यायला जायच असलं तरी माझी तंतरायची.....
एकदा रात्री तिचा मुलगा
एकदा रात्री तिचा मुलगा रडल्याने की आणि कशाने तरी, तिला जाग आली...आणि उठून बसल्यावर तिला दिसलं की बेडच्या शेजारीच जमीनीवर कोणीतरी गुडघ्यात डोकं खुपसून बसलंय. प्रचंड घाबरल्याने, तोंडातून आवाजच फुटला नाही. त्या आकृतीकडे पाहातच तिने शेजारी झोपलेल्या नवर्याला हाताने हलवून उठवायचा प्रयत्न केला. थोडा वेळ प्रयत्न करुनही न उठल्याने क्षणभरासाठी त्या आकृतीवरुन आपली नजर हटवून नवर्याला परत हलवून उठवलं. तो पर्यंत ती आकृती गायब!... याला भास म्हणावा की अमानवीय ! >>>>
हे साधारण माझ्या अनुभवासारख आहे मी मागे इथे टाकलेला किस्सा....
दुसरा किस्सा आधी पण लिहीलाय
दुसरा किस्सा आधी पण लिहीलाय का तुम्ही?? >>> नाही... ३-४ महिन्यापूर्वीचीच घटना आहे ती !
बाहेर कोनही नसताना बेडरूम ला
बाहेर कोनही नसताना बेडरूम ला कडी लागली होती नंतर आफोआफ उघडली. TYA NANTAR ME GHAR BADLE PARYANT EK RATRA PAN ZOPU NAHI SHAKLE.
बाथरुममध्ये गात होतात का ?
बाथरुममध्ये गात होतात का ?
एकदा भुतांच्या झाडीत सेमरा
एकदा भुतांच्या झाडीत सेमरा बंधूंचा पिक्चर चालू होता. माणुसकी नावाचा...
भुतं किंचाळत ओरडत बेशुद्ध पडत होती.
मग भूतबोली वर द क्षीणा नावाच्या भूताने अपिशाच्चीय असा धागा काढला.. आपापले अनुभव लिहा म्हणून..
बाप्रे
आठवले तरी भयंकर !!
मला भुते स्वप्नात दिसतात.
मला भुते स्वप्नात दिसतात. शक्यतो महिला. इथेच लिहू की स्वप्नांचा वेहगळा धाहगा आहे.
स्वप्नांचा पण एक धागा आहे
स्वप्नांचा पण एक धागा आहे
जर हे काम कोण्या मानसाचे असते
जर हे काम कोण्या मानसाचे असते तर शेरुने मला नक्कीच सावध केलं असते . >> अमानविय असते तरि शेरुने सावध केले असते ना??? आठवा तलाश् मधली पिंकी .
मस्करी करायची नाही आहे मी गंभीर्पणे बोलतेय![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ऋन्मेऽऽष इथेच टाका
ऋन्मेऽऽष इथेच टाका किस्से
येवु द्या !!
रीया बघतो सर्च मध्ये टाकून
रीया बघतो सर्च मध्ये टाकून मिळतो का नाहीतर टाकतो इथेच, पण सुट्टीच्या दिवशी दुपार बघून लिहेन.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
लिहायचे म्हणजे आठवायचे, कल्पनेत अनुभवायचे, हे असले काम सांजच्या रातच्या टायमाला नगं
किस्से सम्पले????????
किस्से सम्पले????????
एक छोटासा पण भयानक
एक छोटासा पण भयानक किस्सा.........
एकदा रात्री ११.३० च्या सुमारास घरी निघालो होतो, त्याआधी २-३ दिवस जाम ताप चढला होता पण तरीही कामावर गेलो होतो, काम महत्वाचे असल्याने. वाटेत साधारण ३०-४० चा वेग धरुन आपला कडेने चाललो होतो, मधेच आरशात पाहून मागच्या गाड्यांचा अंदाज घेत होतो, अचानक आरशात एक मुलगी मागच्या सीटवर बसल्याचा भास झाला , मी जरा हादरलो डोळे चोळून मागे बघतो तर काय
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
माझी मिसेस मागे निवांत मोबाईलवर गाणी ऐकत बसली होती
मी जरा विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिले मग नंतर ट्युब पेटली मी तिला थोड्या वेळापुर्वीच माझ्या सासरहून ( जे ऑफीस आणि घराच्या वाटेवरच आहे) गाडीत बसविले होते, दिवसभर काम आणि तब्बेत यामुळे गेल्या दोनचार तासात काय झाले होते याबाबत मी जवळपास अनभिज्ञच होतो.
पण त्यानंतर मी मात्र कुणालाही गाडीत घेतले तर माझ्या शेजारच्या सीटवरच बसायला सांगतो, कारण ते दोन चार सेकंद मी स्तब्ध आणि कन्फुझ होतो जे ड्राईविंग करत असताना घातक आहे.
ओह्ह डेंजरस आहे. विचार करा
ओह्ह डेंजरस आहे.
विचार करा दोनचार सेकंदाच्या जागी पंधरावीस सेकंद तुमच्या स्मरणशक्तीने दगा दिला असता तर ...
माझे मात्र असे बरेचदा होते. पण या उलट..
म्हणजे मी मैत्रीणीबरोबर बाईकवरून फिरून परतताना नेहमीच तिला तिच्या घरापर्यंत न सोडता अध्येमध्ये हायवेवर वा तिचे एखाद्या दुकानात कुठे काम असेल तिथे सोडतो. आणि थोड्या वेळाने तिला मी उतरवलेय हे विसरून जातो. मग काही काळाने, अचानक, अरे एवढा वेळ मागून काहीही आवाज किंवा हालचाल नाही हे जाणवून अरे हि कुठे पडली कि काय या धक्क्याने क्षणभर गाळण उडते आणि बाईकवरचा कंट्रोल नाही म्हटले तरी डुचमळतोच. आता हा क्षण देखील किती सेकंदांचा असतो हे तिला मी स्वताच ड्रॉप केले आहे याचे स्मरण किती लवकर होते यावरच ठरते. सुदैवाने आजवर कुठे धडकलो नाहीये पण धडक्या बरेच भरल्यात.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Pages