अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा खरेतर भास आभासांचा खेळ आहे.
जिथे कमी आणि कोंडलेली एनर्जी आहे तिथे तिथे असा आभास होतो.

आम्ही पूर्वी राहयचो त्या कॉलनीमध्ये ओढ्या जवळच्या अपार्ट्मेंट्मध्ये गूढ वाटायचं.शिवाय अम्हाला तिथे जायला परवानगी नसायची.गेलोच तर दसर्‍या-संक्रांतीला ग्रूप मिळून जायचो.तिथे डॉर्मिटरीत लाल बल्ब लागलेला असायचा.खाली राहणारे कायम झिरो चे बल्ब आत लावून बसलेले.बाहेर आलो की डावीकडे ओढा आणि रस्ता ओलांडला की ख्रिस्तियन स्मशानभूमी.

तसंच सांगली आणी कोल्हापूर मध्येही काही जागा हांउटेड 'वाटतात' आम्ही त्याही पालथ्या घालून आलो आहोत.पण हॉरिबल वाटतात जणू. Wink

गावाकडे देखील अशा कोंदट आणि लोकांच्या मानसिकतेतून वर आलेल्या जागा असतात.वदंता असतात.काही वेळा तिकडे कोणी फिरकण्याचा प्रयत्न करु नये म्हणूनही असं केलं जातं.

छान आहे धाग फुल्ल टाईम पास.

माझा भाऊ आणि त्याचे काही मित्र भुतं शोधायची खुप प्रयत्न करायचे.
आमावस्येला रात्री स्मशानभुमित जायचे.जिथे कुठे भुताच्या वास्तव्याची चर्चा असायची तिथे भुतांना शोधायला जायची.पण त्यांना भुतं कधी दिसली नाहित आई त्याला रागवायची पण तो ऐकायचा नाही मुळात आईच म्हणायची भुत-बित काही नसते. मानसच भुत होऊन लोकांना घाबरवतात.

भाऊ उतरुन टाकलेले लिंब व नारळं पण आणायचा.सगळे मिळुन खोबर खायचे.
लिंब सरबता साठी किंवा किचनमधे वापरला जायचे.

क्रुपया आता इथे फक्त आणि फक्त अमानविय किस्सेच येऊ द्यात ही नम्र विनंती. >> + १११११
११ पोस्टस बघुन वाटलं की ईथे नवीन काही अमानवीय वाचायला मिळेल तर ईथे भलतच युद्ध पेटलय....

११ पोस्टस बघुन वाटलं की ईथे नवीन काही अमानवीय वाचायला मिळेल तर ईथे भलतच युद्ध पेटलय.... >>>> +१.. मानवीय युद्ध पेटल होत..

मानवीय युद्ध पेटल होत >>> फसलीस वाटतं. अगदी खरीखुरी वाटतात माणसांसारखी. झपाटलेल्या जागेवर पण येउन गेली ..

पुर्विच्या 'आमनवीय' धाग्यावर वाचाले होते, मुम्बै कडुन पुन्याला जाताना खालापुर टोलनाका पार केल्यावर उजवी कडे एक एमारत दिसते,ती पन भारलेली आहे असे म्हणातात. दीवाळी नन्तर गेल्या आठव्ड्यात पुण्याला गेले होते,खरेच अशी एमारत आहे का हे पाहायचे ठरवले.(नवर्यला यातले काही माहित नाही). सकाळी जाताना डुलकी लागल्याने बघाता आले नाही म्हनुन सन्ध्याकाळी पुण्याहुन परत येताना पाहायचे ठरवले.
तर झाले असे की खालापुर टोलनाक्याच्या काही मीटर आधी अशी एक जुनी , जिर्ण एमारत दिसाली. पाहुन अतीशय भकास, भयाण वाटले. त्या एमारति वरुन नजर हटवली आणी एक मिनीट सुन्न झाल्यासारखे झाले.माझ्या आणी नवर्यच्या कानात दडे बसल्यासारखे झाले.टोल नाका पार केल्यावर बरे वाटले.

खखोदेजा, टाटान्च्याच एका कम्पनीत ( मुम्बई की पुणे ब्रॅन्च माहीत नाही) एक बाई रात्री ठरावीक वेळेत फिरताना दिसते. कुणाला काही करत नाही, कम्पनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यानी मान्य केलय. पण काही त्रास नसल्याने कुणी लक्ष देत नाही.

अश्विनी
मीच टाकलेला तो किस्सा

माझ डोक दुखायच त्या इमारतीकडे पाहून.

माझ्या एका यातल्या 'जाणकार' मित्राने सांगितलेल की तिथे १५० २०० आहेत आणि आता त्याना नेता मिळालाय. बघ काय होत ते? त्यानंतर बरेच अपघात सुरू झाले.
लग्नाच्या वर्हाडातले २७ जण मारले गेले ते तिथेच.

नुकतच मी पाहील की तिथे एक छोट मंदीर बांधलय, बहुदा पुजा केली असेल.

हो गुगु,समोर टोलनाका असुन , हातात पर्स असुन, पैसे देण्याचे सुचत नव्हते.पण मन्दिर बघित्ल्यचे आठ्वत नाही.गाडीने ति जागा पटकन cross केली. मग 'भीमरुपी' म्हटले आणी सन्कट जाउ दे अशी प्रार्थना केलि.

मी ती इमारत अनेकदा पाहतो. मात्र इतर शारिरिक लक्षणं तर सोडाच मला त्या इमारतीकडे पाहून भीती वगैरे काहीही वाटत नाही. उलट एकदा तिथे जाऊन यावं असंच वाटतं.

टिंगल कसली त्यात, मला जे वाटलं ते बोललो. टिंगल तुम्ही करताय पुन्हा पुन्हा या बाफवर येऊन.

-------------------

रच्याकने, माझा राक्षस गण आहे का तपासायला हवे. म्हणून नसेल भीती वाटत.

कोथरुडला मी एका पी.जी. मध्ये रहात असू. सात आठ जणी होतो. रात्री अडीच वाजता सगळ्या टक्क जाग्या होत असू. आणि रुमच्या सर्व खिडक्यांवर टेबल टेनीसचा बॉल आपटत राहिल्यासारखा आवाज येत असे. एकदा मी रुमसमोर सुया खोचलेले लिंबू काळी बाहुली आणि भोवती कुंकवाची रेघ पाहिली.तरी आम्ही दीड वर्ष तिथेच काढले.

कोथरुडला मी एका पी.जी. मध्ये रहात असू. सात आठ जणी होतो. रात्री अडीच वाजता सगळ्या टक्क जाग्या होत असू. आणि रुमच्या सर्व खिडक्यांवर टेबल टेनीसचा बॉल आपटत राहिल्यासारखा आवाज येत असे. एकदा मी रुमसमोर सुया खोचलेले लिंबू काळी बाहुली आणि भोवती कुंकवाची रेघ पाहिली.तरी आम्ही दीड वर्ष तिथेच काढले.

>>माझ्या एका यातल्या 'जाणकार' मित्राने सांगितलेल की तिथे १५० २०० आहेत आणि आता त्याना नेता मिळालाय

म्हणजे काय? मला काही कळलं नाही.

बाय द वे, चेडा आणि छुमछुम आवाज हे काय आहे? चेडा हा पुरुष आहे ना? हा आवाज एखाद्या नव्या जातीच्या रातकिड्यांचा असू शकतो का?

...

हो . मी पण बर्याच वेळ मॅप बघत होते.
पहिल्यान्दा जी बिल्डिन्ग वाटली ती फूड मॉल निघाली.

महिन्यातून एकदा तरी मुम्बई-पुणे-मुम्बई होतं.
त्यामुळे फारच उत्सुक्ता आहे.

गेली कित्येक वर्ष पाहते आहे मी ही बिल्डिंग. पण या स्टोरीज आजच कळाल्या. इतके दिवसात फक्त एवढंच बोलणं झालं होतं कि 'काही प्रॉपरटीजचे वाद दिसताहेत. कोर्टाच्या स्टेमुळे बांधकाम थांबलं आहे बहुतेक. इतकी वर्ष सुलझले वाद नाहीत तर ज्याची इन्वेस्टमेंट आहे त्याचं किती नुकसान.' पण अशा कथा लिंक्ड आहेत म्हणुन अर्धवट बिल्डिंग असेल असं वाटलं नव्हतं.

ज्यांना ही बिल्डिंग माहीत नाही त्यांच्यासाठी - मुंबईला जाताना ' दत्ता स्नॅक्स' मधुन बाहेर आलात कि खालापुर टोलकडे जाताना डावीकडे बिनरंगाची शेवाळं आलेली आणि अर्धवट बांधलेली बिल्डिंग आहे. किंवा मुंबईहुन येत असाल तर टोल भरल्यानंतर फुड मॉल कडे जाताना फुड मॉलच्या diagonally opp उजव्या हाताला आहे ही बिल्डिंग.

त्या बिल्डिन्ग्च्या मागे आणखीही काही बान्धकाम दिसते . म्हनून मला वाटलं दूसरी कुठलीतरी असेल.

अर्धवट बांधलेली बिल्डिंग आहे. किंवा मुंबईहुन येत असाल तर टोल भरल्यानंतर फुड मॉल कडे जाताना फुड मॉलच्या diagonally opp उजव्या हाताला आहे ही बिल्डिंग>>>>

ह्या बिल्डिंग जवळुन किमान २००-३०० वेळा गेलो असेल मी मला काही जाणवलेले नाही.. Uhoh

मनीमाउ, क्या करैक्ट बोल्या तुम! मलाही हे माहिती नव्हते. पण आदल्या दिवशी 'अमानवीय' धागा वाचण्यात आला, म्हणुन जातना पाहीले.

ह्या बिल्डिंग जवळुन किमान २००-३०० वेळा गेलो असेल मी मला काही जाणवलेले नाही.. अ ओ, आता काय करायचं >>> मला सुद्धा कृष्णा. . या स्टोरीज आजच कळाल्या.

Pages