निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<कितीतरी वर्षांनी निवडणुक परिणामांची अशी मस्त चर्चा चाललीय आणि धडधडत्या हृदयांनी लोक पाहताहेत जिथे मिळतेय तिथे पाहताहेत. सेम हीच परिस्थिती १९७७ ला होती>

२००४ साली यापेक्षा जास्त एक्साइटिंग परिस्थिती होती. सेन्सेक्सने कोलांट्या उड्या मारल्या होत्या. त्यावेळचे निकाल अनपेक्षित होते. आता अपेक्षित ट्रेंड प्रमाणेच निकाल आहेत.

१. मोदींचे शिस्तबद्धपणे स्वतःचे कँडिडेचर मार्केट करणे
२. राहुल गांधींची अपरिपक्व युवा नेता अशी झालेली प्रतिमा
३. मनमोहन सिंग ह्यांना वैयक्तीक वलय प्राप्त न होणे
४. मोदींनी देश ढवळून काढल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणे

ही चर प्रमुख कारणे वाटतात ह्या निकालांची!

बीजेपीला कोणाच्या मदतीशिवाय सरकर स्थापना करता येणार आहे.. शिवसेना नक्कीच त्यांच्या बरोबरच राहिल.. ह्या दोघांचे मिळूनच सरकार मधले मंत्री होणार..

Pages