३) "जोडोनिया अक्षरे, उत्तम प्रकारे" - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 05:55

अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य आणि वाक्यांपासून भाषा बनते. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर मुळात आपली शब्दसंपत्ती उत्तम असण्याची गरज असते. आजच्या खेळात आपण आपली शब्दसंपत्ती अजमावून बघायची आहे बरं का!

आम्ही तुम्हांला एक अक्षरसमूह देणार आहोत. त्यातील अक्षरांना विरामचिन्हे लावून, अथवा त्यांची जोडाक्षरे बनवून तुम्ही जास्तीत जास्त शब्द बनवायचे आहेत.

एक अक्षर एकापेक्षा जास्तवेळा वापरले तरी चालेल. शब्द एकाक्षरीपासून ते कितीही मोठे चालतील. जोडशब्द मात्र चालणार नाहीत. मुला-मुलींची, गावांची नावं वगैरे चालणार नाहीत. सामान्य शब्दच हवे आहेत. क्रियापदाच्या मूळ रूपात 'णे' येत असल्यामुळे जर अक्षरसमूहात 'ण' असेल तरच क्रियापद चालेल.

उदाहरणार्थ :

शब्दसमूह दिला आहे : ग, त, र, म

ग, मगर, रात, गरम, तरंग, मंतर इ. आणि सर्व अक्षरे एकत्रित येणारा शब्द आहे - रमतगमत.

आम्ही देऊ त्या प्रत्येक शब्दसमूहातील सगळी अक्षरे एकत्र येतील असा एकतरी शब्द असेलच. तो ओळखला गेला की नवीन अक्षरसमूह दिला जाईल.

शिवाय यातील एक अक्षर ठळक केले आहे. त्यावरून तुम्हांला जास्तीत जास्त मोठं आणि अर्थपूर्ण वाक्यही लिहायचं आहे. म्हणजे इथे 'ग'पासून एक वाक्य तयार करून लिहायचं आहे. उदा. गाय गवतात गेली.

तर तयार आहात ना?????
****************************************************************************************************************

या खेळात भाग घेणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आभार. शब्द बनवणार्‍या आणि ओळखणार्‍या आणि छान छान वाक्यं बनवणार्‍या सर्वांचे अभिनंदन! Happy

१. च, ल, क, : लांबलचक

शब्द ओळखला - केदार जाधव, नंदिनी

वाक्ये :
* इब्लिस - बेस्तरवारी बंबासाठी बारक्या बोरी - बाभळीची बंबफोड बनवताना, ब्यांगकॉकच्या बबनरावांची बोटं, बाजूलाच बसलेल्या बंडखोर बिल्किस बोक्याने बोचकारल्यामुळे बावरून, बबनराव बकरीगत ब्यँ ब्यँ बोंबलले.

* स्मित_ - बालक बाकावर बसून बोबडे बोल बोलतो.

* मुग्धानन्द - बेरकी बनीने बारक्या बाळाला बोचकारले.

****************************************************************************************************************
२. , ळ, न, व, श : निवळशंख

शब्द ओळखला - इब्लिस

वाक्ये :
* मंजूडी - खंडू खराब खाणीत खोकत खोकत खोखो खेळला.

* गजानन - खुंटीवरच्या खोबणीत खोचलेल्या खरबरीत खादीकुर्त्याच्या खिशातील खवट खोबरे खवून खवून खाणार्‍या खुशालरावांच्या खाटेखाली खवळलेला खादाड खड्याबाघ खोळंबला.
****************************************************************************************************************
३. , व, श, र, स, त : सरतेशेवटी

शब्द ओळखला - सोनू. , अमितव

वाक्ये :
* रिया. - टवळीच्या टारगट टकल्या टोणग्याने ट्पालपेटीतले टपाल टोपीने टेचात टोलवून टोपलीत टाकले

****************************************************************************************************************
४. व, र, , ध, स : परस्परविरोधी, स्पर्धापर्व

शब्द ओळखला - सखी जनी (स्पर्धापर्व)

वाक्ये :
* सखी जनी - पद्मजा पाणी पिण्यासाठी पळता पळता पलिकडल्या पानश्यांच्या पारावर पोरासकट पुरती पडली.

* पेरु - पाटलांच्या पप्पुने पेशव्यांच्या पुरुषोत्तमला पडवीतुन पुरणपोळी पळवण्यासाठी पटवले.

****************************************************************************************************************
५. द, ळ, र, म, च, न : चंद्रमौळी

शब्द ओळखला - स्मित_ , केदार जाधव

वाक्ये :
* पराग - दौंडच्या दौलतराव दोंद्यांनी दौलताबादच्या दादुराव दामल्यांचे दात दारावर दाबले.

****************************************************************************************************************
६. न, ह, ज, र, म : जाहिरनामा, मेहेरनजर

शब्द ओळखला - माधव (जाहिरनामा), अगो (मेहेरनजर)

वाक्ये :
* सखी जनी - नृपसभेत नव्या नरेशासमोर नारदांच्या नामकीर्तनानंतर नऊशे नव्व्याण्णव निपुण नर्तकींच्या नयनमनोहर, नेत्रदीपक नृत्याने नादब्रह्म नि नरनारी नादावले.

* नंदिनी - नालायक नेन्यांनी नेलेले नऊ नळ न्हाणीवरच्या नोकराच्या नवसासाठी नाक्यावरच्या नाजुकाताईच्या नऊवारी दुकानामधे नेले.

* अगो - नित्यनियमाप्रमाणे नौकानयनासाठी नाना नी नानी नववस्त्रे नेसून, नागरिकांना न्याहाळत, निसर्गाला नावाजत, नादमधुर नादांनी नादावत, निळ्या नभाची निळाई निरखत, नगरवेशीवरील नारायणाला नमून नरसिंगपूरच्या नंदकिशोर नामक नावाड्यासोबत नीरा नदीकाठी नाचत-नाचत निघाले.

****************************************************************************************************************
७. , र, न, क, म, स : सूर्यनमस्कार

शब्द ओळखला - केदार जाधव

वाक्ये :
* नंदिनी - "याईरे याईरे" या यामिनीच्या युवतीगीतावरील आणि "येशील येशील" या यशवंतच्या युवकगीतावरील यानाच्या यांकोडान्सने युट्युबवरील यच्चयावत यारांना येडवले.

****************************************************************************************************************
८. च, व, क द, य, , ए, म, छ : एकसमयावच्छेदे

शब्द ओळखला - केदार जाधव, नंदिनी

वाक्ये :
* अगो - सप्तसुरांच्या सखोल सागरात साधकाने स्वतःला स्वानंदाने, समाधानाने सोडून; सजगतेने स्वरस्थाने समजून, सात्विकभावाने समर्पून, सातत्यपूर्ण स्वररियाज साधल्यासच सघन संगीतविद्या सहजरित्या साधकाच्या स्वरयंत्रावर सजते.

****************************************************************************************************************
९. ग, प, न,, म : पुनरागमन

शब्द ओळखला -

वाक्ये :
* अगो - रात्रफेरीसाठी रमतगमत रस्त्यावर रेंगाळणार्‍या रहिवाशांच्या रुक्षपणाने रहदारीच्या रस्त्यावरची रजनीकांताच्या रजत रंगात रसरसलेली, रुपगंधा, रसिक रातराणी रात्रभर रुसलेली, रागावलेलीच राहायची.

****************************************************************************************************************
१०. , ल, व, ष, न, म : नवनवोन्मेषशालिनी

शब्द ओळखला - विक्रमसिंह

वाक्ये :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह...मग स्पर्धापर्व बरोबर असेल....
वर, पाव, पसर, धर, सर, वध, पेव, वीस, वीर, वार, वास, वेस, वेध, पारस, पारध, धृव, सर्प, सर्व, स्वर, प्रसव, रस, सैर, धीर, पैसा, प्रास, सावर, सारव, रांध, सांध, स्पर्धा, पर, धाप, धूसर, धार, सार, रास, पार, पीर, पोर, पेर, विध्वंस, सूर, सौर, पुरव, पारवा, साप, पसा, धारा, सारा, पारा, वारा, वासा, पोस, पीस, पूस, पूर, पर्स, स्वार, पास, रपरप, रोप, रोध, रोव, राव, रव, रोप, वैर, वैध, सांधा, राधा, प्रवर, वारसा, सुधर, सुधार, विसर, वीररस, परि (पण अर्थाने), परी, पावा, धावा, रवा, प्रवास, धूप, धूर, स्व, परस्वर, रंध्र, संध, पर्व

पाटलांच्या पप्पुने पेशव्यांच्या पुरुषोत्तमला पुरणपोळी पळविण्यासाठी पटवले.

पाटलांच्या पप्पुने पेशव्यांच्या पुरुषोत्तमला पडवीतुन पुरणपोळी पळवण्यासाठी पटवले.

'स्पर्धापर्व' बरोबर आहेच पण एक नेहमीच्या वापरातला सात अक्षरी शब्दही या अक्षरसमूहापासून तयार होतो. त्यात एक जोडाक्षरही आहे. ओळखा बरं!

स्पर्धापर्व करता सखी जनी यांचे अभिनंदन. Happy

४. व, र, प, ध, स

याचा शब्द होता 'परस्परविरोधी'.

आता वर नविन अक्षरसमूह दिला आहे.

द, ळ, र, म, च, न

दौंडच्या दौलतराव दोंद्यांनी दौलताबादच्या दादुराव दामल्यांचे दात दारावर दाबले.. Uhoh

शब्द : राम, चळ, रचना, चमन, माळ, दळ, मन, मान, मार, माद, नाद, नाळ, राळ, नाच, नार, नीर, मळ , रम Proud

द, ळ, र, म, च, न

शब्द - माळ , नाळ, चमन, नाच, नाद, नारी, नीर, रान, राम, चार, चाळ, रोळी

जरा मोठे शब्द बनवायचा प्रयत्न करा. जोडाक्षरे चालणार आहेत आणि अक्षरं पुन्हा वापरली तरी चालणार आहे. Happy

सर्व अक्षरे एकत्रित येणारा शब्द - चांद्नीमाळ , चंद्रमौळी
थोडे मोठे ...चंद्रमौळी , ,माळरान ,नारळ , चादर , निर्मळ, नारद, Happy

स्मित_ आणि केदार जाधव ,

तुम्ही चंद्रमौळी हा योग्य शब्द ओळ्खला आहे. अभिनंदन !!!

न, ह, ज, र, म

नजरानजर
मेहेरनजर
महान
महाराज
महाराजा

न, ह, ज, र, म

नानाने नानीला नदीकिनारी नौकाविहरास नेल Proud (काहीच्या काही ..)

हजार , निहार , हाजिर , नाराज , नरम, मांजर , रंजन , मंजन , हरिनाम , माहीर, जाहीर , महाजन , महाराज , मजनू , राजमा , महान,

सर्व अक्षरे एकत्रित येणारा शब्द - हाजिरमन (हे हि काहीच्या काही ..)

नृपसभेत नव्या नरेशासमोर नारदांच्या नामकीर्तनानंतर नऊशे नव्व्याण्णव निपुण नर्तकींच्या नयनमनोहर, नेत्रदीपक नृत्याने नादब्रह्म नि नरनारी नादावले.

य, र, न, क, म, स -

शब्द -
नरक, नाक, काम, कर, नर, नरक, नरम, क्रम, काया, कायम, यम, मान, नाक, कामना, सामना, मन, कामसू, कर्म, सम्यक

वाक्य -
यतीन यवतमाळला ये.

Pages