अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य आणि वाक्यांपासून भाषा बनते. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर मुळात आपली शब्दसंपत्ती उत्तम असण्याची गरज असते. आजच्या खेळात आपण आपली शब्दसंपत्ती अजमावून बघायची आहे बरं का!
आम्ही तुम्हांला एक अक्षरसमूह देणार आहोत. त्यातील अक्षरांना विरामचिन्हे लावून, अथवा त्यांची जोडाक्षरे बनवून तुम्ही जास्तीत जास्त शब्द बनवायचे आहेत.
एक अक्षर एकापेक्षा जास्तवेळा वापरले तरी चालेल. शब्द एकाक्षरीपासून ते कितीही मोठे चालतील. जोडशब्द मात्र चालणार नाहीत. मुला-मुलींची, गावांची नावं वगैरे चालणार नाहीत. सामान्य शब्दच हवे आहेत. क्रियापदाच्या मूळ रूपात 'णे' येत असल्यामुळे जर अक्षरसमूहात 'ण' असेल तरच क्रियापद चालेल.
उदाहरणार्थ :
शब्दसमूह दिला आहे : ग, त, र, म
ग, मगर, रात, गरम, तरंग, मंतर इ. आणि सर्व अक्षरे एकत्रित येणारा शब्द आहे - रमतगमत.
आम्ही देऊ त्या प्रत्येक शब्दसमूहातील सगळी अक्षरे एकत्र येतील असा एकतरी शब्द असेलच. तो ओळखला गेला की नवीन अक्षरसमूह दिला जाईल.
शिवाय यातील एक अक्षर ठळक केले आहे. त्यावरून तुम्हांला जास्तीत जास्त मोठं आणि अर्थपूर्ण वाक्यही लिहायचं आहे. म्हणजे इथे 'ग'पासून एक वाक्य तयार करून लिहायचं आहे. उदा. गाय गवतात गेली.
तर तयार आहात ना?????
****************************************************************************************************************
या खेळात भाग घेणार्या सर्व मायबोलीकरांचे आभार. शब्द बनवणार्या आणि ओळखणार्या आणि छान छान वाक्यं बनवणार्या सर्वांचे अभिनंदन!
१. च, ल, क, ब : लांबलचक
शब्द ओळखला - केदार जाधव, नंदिनी
वाक्ये :
* इब्लिस - बेस्तरवारी बंबासाठी बारक्या बोरी - बाभळीची बंबफोड बनवताना, ब्यांगकॉकच्या बबनरावांची बोटं, बाजूलाच बसलेल्या बंडखोर बिल्किस बोक्याने बोचकारल्यामुळे बावरून, बबनराव बकरीगत ब्यँ ब्यँ बोंबलले.
* स्मित_ - बालक बाकावर बसून बोबडे बोल बोलतो.
* मुग्धानन्द - बेरकी बनीने बारक्या बाळाला बोचकारले.
****************************************************************************************************************
२. ख, ळ, न, व, श : निवळशंख
शब्द ओळखला - इब्लिस
वाक्ये :
* मंजूडी - खंडू खराब खाणीत खोकत खोकत खोखो खेळला.
* गजानन - खुंटीवरच्या खोबणीत खोचलेल्या खरबरीत खादीकुर्त्याच्या खिशातील खवट खोबरे खवून खवून खाणार्या खुशालरावांच्या खाटेखाली खवळलेला खादाड खड्याबाघ खोळंबला.
****************************************************************************************************************
३. ट, व, श, र, स, त : सरतेशेवटी
शब्द ओळखला - सोनू. , अमितव
वाक्ये :
* रिया. - टवळीच्या टारगट टकल्या टोणग्याने ट्पालपेटीतले टपाल टोपीने टेचात टोलवून टोपलीत टाकले
****************************************************************************************************************
४. व, र, प, ध, स : परस्परविरोधी, स्पर्धापर्व
शब्द ओळखला - सखी जनी (स्पर्धापर्व)
वाक्ये :
* सखी जनी - पद्मजा पाणी पिण्यासाठी पळता पळता पलिकडल्या पानश्यांच्या पारावर पोरासकट पुरती पडली.
* पेरु - पाटलांच्या पप्पुने पेशव्यांच्या पुरुषोत्तमला पडवीतुन पुरणपोळी पळवण्यासाठी पटवले.
****************************************************************************************************************
५. द, ळ, र, म, च, न : चंद्रमौळी
शब्द ओळखला - स्मित_ , केदार जाधव
वाक्ये :
* पराग - दौंडच्या दौलतराव दोंद्यांनी दौलताबादच्या दादुराव दामल्यांचे दात दारावर दाबले.
****************************************************************************************************************
६. न, ह, ज, र, म : जाहिरनामा, मेहेरनजर
शब्द ओळखला - माधव (जाहिरनामा), अगो (मेहेरनजर)
वाक्ये :
* सखी जनी - नृपसभेत नव्या नरेशासमोर नारदांच्या नामकीर्तनानंतर नऊशे नव्व्याण्णव निपुण नर्तकींच्या नयनमनोहर, नेत्रदीपक नृत्याने नादब्रह्म नि नरनारी नादावले.
* नंदिनी - नालायक नेन्यांनी नेलेले नऊ नळ न्हाणीवरच्या नोकराच्या नवसासाठी नाक्यावरच्या नाजुकाताईच्या नऊवारी दुकानामधे नेले.
* अगो - नित्यनियमाप्रमाणे नौकानयनासाठी नाना नी नानी नववस्त्रे नेसून, नागरिकांना न्याहाळत, निसर्गाला नावाजत, नादमधुर नादांनी नादावत, निळ्या नभाची निळाई निरखत, नगरवेशीवरील नारायणाला नमून नरसिंगपूरच्या नंदकिशोर नामक नावाड्यासोबत नीरा नदीकाठी नाचत-नाचत निघाले.
****************************************************************************************************************
७. य, र, न, क, म, स : सूर्यनमस्कार
शब्द ओळखला - केदार जाधव
वाक्ये :
* नंदिनी - "याईरे याईरे" या यामिनीच्या युवतीगीतावरील आणि "येशील येशील" या यशवंतच्या युवकगीतावरील यानाच्या यांकोडान्सने युट्युबवरील यच्चयावत यारांना येडवले.
****************************************************************************************************************
८. च, व, क द, य, स, ए, म, छ : एकसमयावच्छेदे
शब्द ओळखला - केदार जाधव, नंदिनी
वाक्ये :
* अगो - सप्तसुरांच्या सखोल सागरात साधकाने स्वतःला स्वानंदाने, समाधानाने सोडून; सजगतेने स्वरस्थाने समजून, सात्विकभावाने समर्पून, सातत्यपूर्ण स्वररियाज साधल्यासच सघन संगीतविद्या सहजरित्या साधकाच्या स्वरयंत्रावर सजते.
****************************************************************************************************************
९. ग, प, न, र, म : पुनरागमन
शब्द ओळखला -
वाक्ये :
* अगो - रात्रफेरीसाठी रमतगमत रस्त्यावर रेंगाळणार्या रहिवाशांच्या रुक्षपणाने रहदारीच्या रस्त्यावरची रजनीकांताच्या रजत रंगात रसरसलेली, रुपगंधा, रसिक रातराणी रात्रभर रुसलेली, रागावलेलीच राहायची.
****************************************************************************************************************
१०. श, ल, व, ष, न, म : नवनवोन्मेषशालिनी
शब्द ओळखला - विक्रमसिंह
वाक्ये :
खानावळीशी << भारी!
खानावळीशी
<<
भारी!
लांबलचक मी आधी लिहिला होता .
लांबलचक मी आधी लिहिला होता . >>> केदार जाधव. तसं असेल तर आपण तो शब्द पहिले लिहिल्याबद्दल आपलं अभिनंदन.
खुंटीवरच्या खोबणीत खोचलेल्या
खुंटीवरच्या खोबणीत खोचलेल्या खरबरीत खादीकुर्त्याच्या खिशातील खवट खोबरे खवून खवून खाणार्या खुशालरावांच्या खाटेखाली खवळलेला खादाड खड्याबाघ खोळंबला.
इब्लिस, निवळशंख शब्द
इब्लिस, निवळशंख शब्द बरोबर.
शोभनाताई, खानावळीशी हा शब्द धरता येणार नाही कारण तो मूळ शब्द नाही त्याला प्रत्यय लागला आहे.
नवीन अक्षरसमूह दिला आहे.
नवीन अक्षरसमूह दिला आहे.
सरतेशेवटी
सरतेशेवटी
ट, व, श, र, स, त * टिंगीच्या
ट, व, श, र, स, त
*
टिंगीच्या टपराट टीममधे 'ट'ची टारगट टिवटिव.
टेचात टुक्कार टिटवी टिंगीच्या टकुर्यात टपली टेकवते.
*
संयोजक साहेब,
जरा बरी अक्षरं द्या की. ट वरून क्रियापदं किती मराठीत?
लोकं भाग घेईनात की अती कठीण केल्याने
दुसरं मंजी जास्त शब्द कुणी बनवले, मोठं वाक्य कुणाचं, मोट्ठेस्ट शब्द कुणाचा, अशा डिक्लरेशन्स दिल्या तर खेळायला अजून हुरुप येईल हो.
ट्राय टरते आपलं करते
ट्राय टरते आपलं करते
टवळीच्या टारगट टकल्या
टवळीच्या टारगट टकल्या टोणग्याने ट्पालपेटीतले टपाल टोपीने टेचात टोलवून टोपलीत टाकले
टपटप टापानी ट्कल्या टेकावडेना
टपटप टापानी ट्कल्या टेकावडेना टेमलाइच्या टेकडिवर टेचात टरकावले.टारगट टोणग्यानीही टोकले.टेकावडे टरकले.टेबलवर टेकले.
सगळी अक्षरेवाला शब्द:
सगळी अक्षरेवाला शब्द: सरतेशेवटी
अरे आधीच दिलाय हा शब्द सोनू ने.
ट, व, श, र, स, त तट, रस, सर,
ट, व, श, र, स, त
तट, रस, सर, सार, तार, शर्त, वश, वसा, साव, सात, साटं, टेर
नविन अक्षरसमूह काय?
नविन अक्षरसमूह काय?
सोनू. सरतेशेवटी हा शब्द
सोनू. सरतेशेवटी हा शब्द बरोबर. अभिनंदन.
कृपया इतरही शब्द बनवा. जास्तीत जास्त शब्द बनले पाहिजेत.
ट, व, श, र, स, त तर, राती,
ट, व, श, र, स, त
तर, राती, रती, तरी, वर, वरती, वरात, वार, तव, तारा, तार, शर, वश, शत, शव, वसंत, वसत, वस्ती, शिसारी,
शीर, सतत, शीत, शित, टिटवी, टीवटीव, सत्र, शास्त्र, शस्त्र, सर्वत्र , टर, टाटा, शर्वरी, सवत, सात, सत्व, साती, स्वत्व, स्वस्त, स्वस्ति, स्वतः, श्वास, स्वांत , स्वतंत्र, सरतेशेवटी
हाय्ला! उठलं म्हनायचं की
हाय्ला! उठलं म्हनायचं की संयोजक सायेब
अमितव, ट टा टि टी टु टू टे टै
अमितव,
ट टा टि टी टु टू टे टै टो टौ टं टः
प्लस,
व वा वि वी वु वू वे वै वो वौ वं वः
यांची पर्म्युटेशन्स कॉम्बिनेशन्स. मग पुढे चला.
ट, व, श, र, स, त टर, वर, शर,
ट, व, श, र, स, त
टर, वर, शर, तर, तरस, वशाट, सरशी, टिवटिव, शीव, शीत, तट, शत, शिसारी
नविन शब्दसमूह वर दिला आहे.
नविन शब्दसमूह वर दिला आहे.
किती अक्षरं पुन्हा आधीचीच
किती अक्षरं पुन्हा आधीचीच आहेत.
ट, र, श, ष, ग, स
रवंथ, गत, सरळ, शरण, टवाळी, षटकार
सिंडरेला, दुसरा शब्दसमूह दिला
सिंडरेला, दुसरा शब्दसमूह दिला आहे. आधीचा काढून टाकला आहे.
४. व, र, प, ध, स पारध, वध,
४. व, र, प, ध, स
पारध, वध, पसारा, धावा, साप, धार, वास, सार, पार, वापर, धाव, परस, पावा, साध्वी, पूर्व, धूसर, वर्धा, स्पर्धा
स्वार, स्वारी
ध्यासपर्व
ध्यासपर्व
अरे वा केदार! जोडाक्षरं
अरे वा केदार! जोडाक्षरं चालतात हे लक्षातच राहिलं नाही.
ध्यासपर्व चालणार नाही. य हे
ध्यासपर्व चालणार नाही. य हे अक्षर वरील समूहात नाही.
पद्मजा पाणी पिण्यासाठी पळता
पद्मजा पाणी पिण्यासाठी पळता पळता पलिकडल्या पानश्यांच्या पारावर पोरासकट पुरती पडली.
स्पर्धापर्व....चालणार नाही
स्पर्धापर्व....चालणार नाही ना? प्रत्येक अक्षर एकदाच आले पाहिजे न?
पारधीसवे
पारधीसवे
पसर, वध, परस, रपरप, वर,
पसर, वध, परस, रपरप, वर, पर,
वापर, साधार, सावर, धाव, सावध, पारस, पार, सार, धार, वार, राव, वास, साव
परी, सरी, धरी, वरी, पासरी, वासरी, पीर, धीर,
धूप, वासरू, सूर, पुस, सूप, धुर, पूर, परसू, वधु,
वारस,वापर,
वारस,वापर, वर,वासरू,वधू,वर,वध
सावर,साव,सूप,सूर,सुधा,सर
पर,परसू,पसा,पैसा
रव,राव,राप,पारा
धस,धारा,धोसरा
Pages