आतापर्यंतच्या लेखात आपण जलरंगासाठीचे साहित्य , जलरंगासाठीचे रेखांकन , काही वॉशेस , सॉफ्टनींग , कलर लिफ्टींग यांचा अभ्यास केला. रेखांकन आणि या वोशेसचा सराव कायम चालुच राहिला पाहीजे.
यालेखात आपण वेट इन वेट (ओल्या रंगात दुसरा ओला रंग) , ड्राय ब्रशींग या तंत्रांबद्दल बोलुया. तसेच या आणि आधिच्या कही तंत्रांचा वापर करुन झाडं / फॉलिएज , ढग कसे काढता येतील , त्यातुन छोटी चित्र कशी करता येतील याचे प्रात्यक्षिक बघु.
वेट इन वेट नावा प्रामाणे ओल्या रंगात दुसरा रंग लावणे , यात रंग पसरत गेल्याने मिळणार्या इफेक्ट , त्याला कंट्रोल करणे हे मह्त्याचे.
आधिचा रंग किती ओला आहे त्यावर दुस्रा रंग किती पसरतो हे अवलंबुन असते आणि ते कंट्रोल करणे आत्मसात करायला हवे. खालच्या फोटोत डावी कडचा रंग आधिचा वॉश खुप ओला असताना दुसरा रंग लावला , तो खुप जास्त पसरला, त्यानंतरचा दुसरा रंग अजुन वॉश थोडा वाळल्यावर आणि त्यानंतर चा रंग जवळ्जवळ सुकलेल्या वॉश वर दिला. त्यानुसार रंग पसरणे कमी कमी झालेले दिसेल.
कित्येकदा पेपर नुसता ओला करुन त्यात रंग पसरु देउन वेट इन वेट इफेक्ट वापरावा लागतो किंवा जर आधिचा वॉश सुकला असेल तर थोडे पाणी लाउन त्यावर असे काम करता येते.
ड्राय ब्रशींग - ब्रश मधे रंग घेउन ब्रश झटकून घ्यावा. या नंतर ब्रश थोडा आडवा पकडून कागदावर रोल करावा. ब्रश मधे अगदी कमी रंग असल्याने काही ठीकाणी रंग उमटतो . या तंत्राने खडबडीत पोत तयार करणे , अगदी कमी किंवा बारिक पानं असलेली सुरु सारखी झाडं काढताना विषेश उपयोग होतो.
आत्ता आपण सन्कुल यांनी विचारलेल्या ढगांचा इफेक्ट कसा पेंट करता येईल हे बघु
प्रथम कोबाल्ट ब्लु किंवा आप्ल्याकडए असलेला दुस्रा येखादा ब्लु रंग घेउन ढग रंगउन घेतले.
हा रंग ओला असतानाच ढगांमधे काही ठिकाणी अजुन गड्द निळा तसेच ऑरे़ज + नीळा यानी तयार होणार थोडा काळपट रंग वेट इन वेट पद्धतीने दिला.
त्यानंतर ढगांच्या काहि कडा सॉफ्ट केल्या. सॉफ्टनिंगसाठी ब्रश स्वच्छ पाण्यात धऊन स्पंज किंवा कापडाला टिपुन घ्यावा
झाले की सुंदर आकाश तयार , खुप सोप्पे आहे कि नाही?
असाच इफेक्ट कलर लिफ्टींग ने आणता येतो.
वेट इन वेट पध्हतीने आकाश पुर्ण रंगउन घेतले
त्यानंतर आपण कलर लिफ्ट करुन पांढूरके ढग केले , मात्र इथे ब्रशने कलर लिफ्ट करण्या ऐवजी टॉयलेट पेपर किंवा टिश्युपेपर ने हा रंग टीपुन घेतला.
प्लॅट वॉश , ग्रेडेड वॉश तसेच वेरीगेटेड वॉश मधले आकाश आपण मागल्या लेखात केले होते
त्या शिवाय वर कलर लिफ्टींग आणि वेट इन वेट प्रकारे आप्ण आकाश कसे करायचे ते वर बघितले
या शिवाय कागद ओलाकरुन त्यात वेगवेगळे रंग मिसळु देउन ( वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओल्या केलेल्या क्गादवर मारयचे आणि ते कागद तिरका करुन मिसळू द्यायचे) सुंदर रंगी बेरंगी आकाश तयार करता येते.
याशिवाय ओल्या कागदावर रंग पसरु देउन पावसाळी आकाश रंगवता येते.
आता आपण अंतरा यानी विचारलेल्या झाडे / फॉलीएज कशी रंगवावीत या प्रश्नाकडे वळू
झाडे रंगवताना येक ढोबळ नियम लक्षात ठेवायचा
जवळ्चे झाड असेल तर काही पानं /थॉडे डीटेल्स रंगवायचे ज्याने झाड जवळचे आहे हे सजेस्ट होईल, थोडे दुअर्चेह असेल तर फॉलिएज त्यात थोडे डार्क्र रंग वेट इन वेट टाकुन छाया प्रकाशाचा भेद दाखवुन रंगवावे आणि खुप दुरच्या झाडाना येक रंगाचा मोठा ठिपका /पट्टा पुरेसा होतो.
झाड रंगवताना झाडाचे फॉलिएज ज्या रंगाचे म्हणजे बहुदा हिरव्या रंगाचे पिवळा+ निळा असे मिश्रण तयार करुन घ्यायचे. रंगपेटीअतले रंग हिरवे रंग जसेच्या तसे वापरण्या पेक्षा आपल्या हव्या त्या शेड्स तयार करणे जास्त योग्य कारण पेटीतले रंग थोडे कृत्रीम वाटतात. या हिरव्या रंगाने पुर्ण लोडेड ब्रशने झाडाचे फोलीएज रंगवावे.
हा रंग थोडा सुकल्यावर , आधिच्या मिश्रणात अजुन निळा रंग अॅड करुन झाडाच्या फॉलिएज च्या खालच्या भागत जिथे सावली असु शकते आणी थोडे अधे मधे वेट इउन वेट रंगवावे. त्यानंतर याच मिश्रणात अजुन थोडा बर्न्ट सियेना अॅड करुन खोडं रंगउन काढले. आधिच्या रंगातच रंग वाढवीत गेल्याने रंगाची येक हार्मेनी तयार होते.त्यामुळे खोड , पानं खुप वेगळी न दिसता येक सलग झाड दिसते. खास करुन थोडी दुर असलेली झाडं रंगवताना या पाधतीचे काम चांगले दिसते.
खालच्या चित्रात फॉलीएज चा आकार ,झाडाचे खोड तसेच फांद्या हाईड इन हाईड आउट करताना दाखवलेय.
हे आहे सुचिपर्णी झाड.
नारळीचे झाडं असे काढता येइल.
ड्राय ब्रशींग ने केलेले झाड.
या शिवाय सुकलेले खोड आपण चंद्र्कोरिच्या चित्रात केलेच आहे.
झाड रंगवताना काही चुका कॉमन आहेत
१. सगळ्या फांद्या फॉलिएज च्या बाहेरुन काढणे , असे केले तर झाडाला फांद्या बाहेरुन चिकटवलेल्या दिसतात.
२. झाडाचे फॉलिएज वरच्या बाजुला डार्क आणि खाली लाईट- प्रकाश झाडा वरुन किंवा येका दिशेने असतो त्यामुळे खाल्ची बाजु किंवा एक बाजु सावलीत जाईल जी डार्क असयाला हवी, खाली बाजु लाईट दिसायला बहुदा फ्ल्ड लाईट्स वापरावे लागतील
३खुपबारीक बारी टीपक्यानी पानं नी पानं रंगवत बसणे, जलरंग या माध्यमात बोल्ड काम अपेक्षित आहे त्यामुळे हे टाळलेले चांगले , काही पानं सजेस्ट करणे ठीक मात्र अतीरेक टाळावा.
आता तुम्ही वेगवेळी आकाशाचे पॅटर्न्स आणि वेगवेगळी झाडं यांची कॉम्बिनेशन्स करुन खुप सारी छोटी छोटी चित्र काढु शकता.
हाच या लेखा साठी एक्सर्साईज.
येउद्या चित्र , होउदे धमाल
अधिचे तीन लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609
आश्विनी, धन्यवाद, हे आडवे
आश्विनी, धन्यवाद,
हे आडवे झालेय ते उभे नाही का करता करता येणार?
पाटील, बर्याच वर्षांनी पहिल्यांदाच काढलेय चित्र,
अंतरांनी काढलेलं चित्र आवडलं.
अंतरांनी काढलेलं चित्र आवडलं. वहाती नदी मस्त आली आहे.
सिंडे, अंतराची जलरंगाची
सिंडे, अंतराची जलरंगाची स्टाईल मस्त आहे. तिची कॉफी पेंटिंग्ज पण आवडली होती मला. अॅक्चुअली इथे चित्र काढायचा प्रयास करणार्या प्रत्येकाची आपापली युनिक स्टाईल आढळून येतेय.
शैलजा, झाला सरळ पक्षी
अरे हो कॉफी पेंटिंग्स
अरे हो कॉफी पेंटिंग्स त्यांचीच नाही का. विसरलेच होते मी.
इंद्राने त्याच्या चित्रात
इंद्राने त्याच्या चित्रात पाठमोरा 'यो रॉक्स' काढलाय सुर्योदय बघणारा
सगळ्यांची चित्रे मस्त आहेत .
सगळ्यांची चित्रे मस्त आहेत . मला काही जमेल असे वाटत नाही
शैलजा - पक्षी सुंदर आहे,
शैलजा - पक्षी सुंदर आहे, तुम्ही बहुदा पांढरा रंग वापरलाय तो न वापरता पाण्याने रंग पातळ करणे , कागद कोरा सोडणे हे रंगांची ट्रान्स्परन्सी टीकवण्याच्या दृष्टीने जास्त योग्य. या कार्यशाळेत क्लोजअप ओब्जेक्ट्स , वस्तु चित्र /पक्षी असे काही करायचा विचार नव्हता पण जमल्यास कार्यशाळे च्या शेवटी काही फ्लोरल्स , पक्षी , ग्लास वेअर इ. करुन दाखवायचा प्रयत्न करीन.
मस्त चित्रं आहेत सगळ्यांची.
मस्त चित्रं आहेत सगळ्यांची. मी खूप मागे पडलेय. काल शेवटी मी ऑर्डर केलेले सामान आले तब्बल एक महिन्याने! असो. आता हळू हळू सराव करेन.
CalAA-kaar, तुमचे चित्र
CalAA-kaar, तुमचे चित्र आवडले. नदीचे पात्र एकदम नितळ दिसतेय आणि झाडीपण मस्त वाटतेय. वेट इन वेट चा इफेक्ट चांगला जमलाय.
अंतरा, टेकड्या आणि मागचा आभाळातला तांबडं फुटत असल्याचा इफेक्ट मस्तंच.
शैलजा, पक्षीही मस्तच.
धन्यवाद सर , अश्विनी के ,
धन्यवाद सर , अश्विनी के , सिंडरेला ,गजानन, ..
पाटील, धन्यवाद. हो पांढरा रंग
पाटील, धन्यवाद. हो पांढरा रंग वापरायचा नाही, हे नंतर लक्षात आले. अजून एखादे चित्र करुन पाहणार तसे.
जीडी - धन्यवाद.
हे येक जुने चित्र. काही
हे येक जुने चित्र. काही वर्षांपुर्वी मायबोली दिवाळी अंकासाठी केलेले.

यात वेट इन वेट तंत्र कसे वापरले आहे तसेच पेपरचा पांढरा रंग कसा सोडला आहे ते महत्वाचे
चित्र रंगवताना पेपर चा काही
चित्र रंगवताना पेपर चा काही भाग न रंगवता तसाच / पांढरा सोडता येइल का ?.. ह्याचा प्रयत्न केला..पण बर्याच वेळेस रंगवण्याच्या नादात लक्षात रहात नाही...

अंतरा, सुरेख काढतेस चित्र
अंतरा, सुरेख काढतेस चित्र
धन्यवाद अश्विनी के
धन्यवाद अश्विनी के
हे पण मस्त चित्र. एक सुचवू का
हे पण मस्त चित्र.
एक सुचवू का गं? समुद्राच्या शेजारी नारळाची उंच झाडे छान दिसतील जास्त..
बस्के अजूनही नारळाच्या
बस्के अजूनही नारळाच्या झाडांचा सराव चालू आहे. सध्यातरी झाडाचा एकच आकार थोडे फार जमतो आहे.
अंतरा - छान आहे. थोडे रंग
अंतरा - छान आहे. थोडे रंग अजुन येउ द्या , आपण रंगवलेले चित्र सुकल्यावर रंग थोडे कमी गडद दिसतात .
सर्व लोक इतके पुढे गेलेत लेख
सर्व लोक इतके पुढे गेलेत लेख मालेत. मला मात्र काल वेळ मिळाला सुरुवात करायला. पाटील तुम्ही दिलेले बेसिक वॉशेसचे चित्र इथे देतेय. कित्येक वर्षानी सुरु करतेय.

आज ढ्ग, झाडे आणि पाण्याचा सराव करेन. खूप वर्शाची इच्छा पूर्ण होत आहे चित्रकला शिकण्याची. रात्री सर्व आवरुन दमून बसल्यावर स्वतःसाठी काहीतरी करायला खूपच सही वाटतय.
-विद्या.
विद्या, मस्त!
विद्या, मस्त!
बॅकलॉगमधलं एक आज केलंय.
बॅकलॉगमधलं एक आज केलंय.
माझा नारळाचे झाड रंगवायचा
माझा नारळाचे झाड रंगवायचा प्रयत्न

अश्विनी, मस्तच!
अश्विनी, मस्तच!
अश्विनी मस्त रंगवले आहे
अश्विनी मस्त रंगवले आहे चित्र..
सगळ्यांची रंगवलेली चित्रे
सगळ्यांची रंगवलेली चित्रे बघतेय. असा केलेला गृहपाठ बघायला मजा येतेय खूप.
Ashwini - chhaan zaaley,
Ashwini - chhaan zaaley, hodiche reflection mast, electric tower che reflection aadhi nusatyaa paaNyaane rangavun nantar tyaat rangaachyaa lines kelyaa tar chhaan soft reflection aale asate
Antara- technically chaangle aahe . Naaralaachyaa zaavlyaanchyaa drawing kade thode laxya dyaa. Kaahi jhaavlyaa overlap whyaayalaa havyaat tasech kaahi jhaavLyaanchaa pasaaraa madhalyaa axis chyaa donhi baajulaa havaam baaki chhaan
Minglish response baddal xamasvaa. Mobile varun devnagari type karaNe jikariche hotey.
Uploaded from phone. Clouds
Uploaded from phone. Clouds failed totally.
Suggestions pls.
Vidya.
विद्या - तुम्ही ढगांसाठी
विद्या - तुम्ही ढगांसाठी दोन कॉन्ट्रास्टींग शेड्स वापरल्या आहेत तसेच ढगांवर परत परत काम केले आहे तेही पहीला रंग सुकत आल्यावर /सुकल्यावर. असे काम जास्तीत जास्त वेट इन वेट व्हायला हवे आणि काही डार्क भागात सॉफ्टनींग व्हायला हवे.
Tried one more time but still
Tried one more time but still not any better. As you said, I did try multiple times. I tried to soften the dried edges, but it didn't help. I have practice more.
Vidya.
I so wanted to make this but
I so wanted to make this but didn't come out that way. I am wondering how to make the strokes of clouds.
Vidya.
Pages