आतापर्यंतच्या लेखात आपण जलरंगासाठीचे साहित्य , जलरंगासाठीचे रेखांकन , काही वॉशेस , सॉफ्टनींग , कलर लिफ्टींग यांचा अभ्यास केला. रेखांकन आणि या वोशेसचा सराव कायम चालुच राहिला पाहीजे.
यालेखात आपण वेट इन वेट (ओल्या रंगात दुसरा ओला रंग) , ड्राय ब्रशींग या तंत्रांबद्दल बोलुया. तसेच या आणि आधिच्या कही तंत्रांचा वापर करुन झाडं / फॉलिएज , ढग कसे काढता येतील , त्यातुन छोटी चित्र कशी करता येतील याचे प्रात्यक्षिक बघु.
वेट इन वेट नावा प्रामाणे ओल्या रंगात दुसरा रंग लावणे , यात रंग पसरत गेल्याने मिळणार्या इफेक्ट , त्याला कंट्रोल करणे हे मह्त्याचे.
आधिचा रंग किती ओला आहे त्यावर दुस्रा रंग किती पसरतो हे अवलंबुन असते आणि ते कंट्रोल करणे आत्मसात करायला हवे. खालच्या फोटोत डावी कडचा रंग आधिचा वॉश खुप ओला असताना दुसरा रंग लावला , तो खुप जास्त पसरला, त्यानंतरचा दुसरा रंग अजुन वॉश थोडा वाळल्यावर आणि त्यानंतर चा रंग जवळ्जवळ सुकलेल्या वॉश वर दिला. त्यानुसार रंग पसरणे कमी कमी झालेले दिसेल.
कित्येकदा पेपर नुसता ओला करुन त्यात रंग पसरु देउन वेट इन वेट इफेक्ट वापरावा लागतो किंवा जर आधिचा वॉश सुकला असेल तर थोडे पाणी लाउन त्यावर असे काम करता येते.
ड्राय ब्रशींग - ब्रश मधे रंग घेउन ब्रश झटकून घ्यावा. या नंतर ब्रश थोडा आडवा पकडून कागदावर रोल करावा. ब्रश मधे अगदी कमी रंग असल्याने काही ठीकाणी रंग उमटतो . या तंत्राने खडबडीत पोत तयार करणे , अगदी कमी किंवा बारिक पानं असलेली सुरु सारखी झाडं काढताना विषेश उपयोग होतो.
आत्ता आपण सन्कुल यांनी विचारलेल्या ढगांचा इफेक्ट कसा पेंट करता येईल हे बघु
प्रथम कोबाल्ट ब्लु किंवा आप्ल्याकडए असलेला दुस्रा येखादा ब्लु रंग घेउन ढग रंगउन घेतले.
हा रंग ओला असतानाच ढगांमधे काही ठिकाणी अजुन गड्द निळा तसेच ऑरे़ज + नीळा यानी तयार होणार थोडा काळपट रंग वेट इन वेट पद्धतीने दिला.
त्यानंतर ढगांच्या काहि कडा सॉफ्ट केल्या. सॉफ्टनिंगसाठी ब्रश स्वच्छ पाण्यात धऊन स्पंज किंवा कापडाला टिपुन घ्यावा
झाले की सुंदर आकाश तयार , खुप सोप्पे आहे कि नाही?
असाच इफेक्ट कलर लिफ्टींग ने आणता येतो.
वेट इन वेट पध्हतीने आकाश पुर्ण रंगउन घेतले
त्यानंतर आपण कलर लिफ्ट करुन पांढूरके ढग केले , मात्र इथे ब्रशने कलर लिफ्ट करण्या ऐवजी टॉयलेट पेपर किंवा टिश्युपेपर ने हा रंग टीपुन घेतला.
प्लॅट वॉश , ग्रेडेड वॉश तसेच वेरीगेटेड वॉश मधले आकाश आपण मागल्या लेखात केले होते
त्या शिवाय वर कलर लिफ्टींग आणि वेट इन वेट प्रकारे आप्ण आकाश कसे करायचे ते वर बघितले
या शिवाय कागद ओलाकरुन त्यात वेगवेगळे रंग मिसळु देउन ( वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओल्या केलेल्या क्गादवर मारयचे आणि ते कागद तिरका करुन मिसळू द्यायचे) सुंदर रंगी बेरंगी आकाश तयार करता येते.
याशिवाय ओल्या कागदावर रंग पसरु देउन पावसाळी आकाश रंगवता येते.
आता आपण अंतरा यानी विचारलेल्या झाडे / फॉलीएज कशी रंगवावीत या प्रश्नाकडे वळू
झाडे रंगवताना येक ढोबळ नियम लक्षात ठेवायचा
जवळ्चे झाड असेल तर काही पानं /थॉडे डीटेल्स रंगवायचे ज्याने झाड जवळचे आहे हे सजेस्ट होईल, थोडे दुअर्चेह असेल तर फॉलिएज त्यात थोडे डार्क्र रंग वेट इन वेट टाकुन छाया प्रकाशाचा भेद दाखवुन रंगवावे आणि खुप दुरच्या झाडाना येक रंगाचा मोठा ठिपका /पट्टा पुरेसा होतो.
झाड रंगवताना झाडाचे फॉलिएज ज्या रंगाचे म्हणजे बहुदा हिरव्या रंगाचे पिवळा+ निळा असे मिश्रण तयार करुन घ्यायचे. रंगपेटीअतले रंग हिरवे रंग जसेच्या तसे वापरण्या पेक्षा आपल्या हव्या त्या शेड्स तयार करणे जास्त योग्य कारण पेटीतले रंग थोडे कृत्रीम वाटतात. या हिरव्या रंगाने पुर्ण लोडेड ब्रशने झाडाचे फोलीएज रंगवावे.
हा रंग थोडा सुकल्यावर , आधिच्या मिश्रणात अजुन निळा रंग अॅड करुन झाडाच्या फॉलिएज च्या खालच्या भागत जिथे सावली असु शकते आणी थोडे अधे मधे वेट इउन वेट रंगवावे. त्यानंतर याच मिश्रणात अजुन थोडा बर्न्ट सियेना अॅड करुन खोडं रंगउन काढले. आधिच्या रंगातच रंग वाढवीत गेल्याने रंगाची येक हार्मेनी तयार होते.त्यामुळे खोड , पानं खुप वेगळी न दिसता येक सलग झाड दिसते. खास करुन थोडी दुर असलेली झाडं रंगवताना या पाधतीचे काम चांगले दिसते.
खालच्या चित्रात फॉलीएज चा आकार ,झाडाचे खोड तसेच फांद्या हाईड इन हाईड आउट करताना दाखवलेय.
हे आहे सुचिपर्णी झाड.
नारळीचे झाडं असे काढता येइल.
ड्राय ब्रशींग ने केलेले झाड.
या शिवाय सुकलेले खोड आपण चंद्र्कोरिच्या चित्रात केलेच आहे.
झाड रंगवताना काही चुका कॉमन आहेत
१. सगळ्या फांद्या फॉलिएज च्या बाहेरुन काढणे , असे केले तर झाडाला फांद्या बाहेरुन चिकटवलेल्या दिसतात.
२. झाडाचे फॉलिएज वरच्या बाजुला डार्क आणि खाली लाईट- प्रकाश झाडा वरुन किंवा येका दिशेने असतो त्यामुळे खाल्ची बाजु किंवा एक बाजु सावलीत जाईल जी डार्क असयाला हवी, खाली बाजु लाईट दिसायला बहुदा फ्ल्ड लाईट्स वापरावे लागतील
३खुपबारीक बारी टीपक्यानी पानं नी पानं रंगवत बसणे, जलरंग या माध्यमात बोल्ड काम अपेक्षित आहे त्यामुळे हे टाळलेले चांगले , काही पानं सजेस्ट करणे ठीक मात्र अतीरेक टाळावा.
आता तुम्ही वेगवेळी आकाशाचे पॅटर्न्स आणि वेगवेगळी झाडं यांची कॉम्बिनेशन्स करुन खुप सारी छोटी छोटी चित्र काढु शकता.
हाच या लेखा साठी एक्सर्साईज.
येउद्या चित्र , होउदे धमाल
अधिचे तीन लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609
गजा, माझ्या पोराला
गजा, माझ्या पोराला पाटलांपेक्षा तुझं चित्रं जास्त आवडलंय.
गजानन छान आलय चित्र..
गजानन छान आलय चित्र..
सन्कुल - उत्तम प्रयत्न ,
सन्कुल - उत्तम प्रयत्न , महत्वाचे म्हणजे आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या घटक आणि तंत्रांचा वापर करुन स्वतःचे काहीतरी तयार करायचा प्रयत्न तोही बर्यापैकी यशस्वी.

काही छोट्या गोष्टी ज्या पुढे लक्षात ठेवल्यास अजुन चित्र छान होउ शकेल
१. जमिन आणि पाणी जवजवळ ५० :५० असे विभागले गेले आहे , हे ड्रॉईंग थोडे बदलुन टाळता येईल
२.डोंगरावर आउट्लाईन दिसतेय , हे ही टाळता येईल
३. क्षितिजाकडे पाणी तिरके दिसतेय, त्यामुळे पाणी कुठुन तरी वरुन वाहात येतेय असे दिसते. बहुतेक अशा मोठ्या साचलेल्या /समुद्रा सारख्या वॉटरबॉडिज काढताना , क्षितिजाकड्ची बाजू तिरकी न काढता समांतर काढा
४. किनार्यावर चांगले काम केले आहे , ओलसरपणा दाखवायचा प्रयत्न चांगला आहे , काही ठीकाणी जर थोडा पांढरा पेपर सुटता तर लाटा/सर्फ चा इफेक्ट आला असता.
गजानन, छान झालेय चित्र, ज्या काही तांत्रीक गोष्टी आहेत त्या सरावाने अजुन छान येतीलच. या वर्कशॉपनंतर सातत्य राखलेत तर तुमच्याकदुन चांगल्या चित्रांची अपेक्षा नक्कीच करता येईल. तसेच तुमच्या चित्रांमुळे बाकि सहभागी सभासद सुद्धा कॉन्फीडन्टली काम करतील हे नक्की.
जीडी, सुर्रेख जमलंय चित्र!
जीडी, सुर्रेख जमलंय चित्र!
गेल्या रविवारी काढायला
गेल्या रविवारी काढायला घेतलेले चित्र आज पूर्ण झाले.. आता झाडे, ढग सगळे वेगवेगळे करायचे सराव करते
ढग नीट जमत नाहीत. खूप सराव करायला लागणार.

गजा, अंतरा छान आलीत तुमची चित्रे. बाकी सगळ्यांची प्रगती पण मस्त चालू आहे.
नीलु काय सुंदर चित्र काढले
नीलु काय सुंदर चित्र काढले आहे..
हा माझा प्रयत्न :...झाडे काढताना खूप गोंधळ उडाला .
गेल्यावर्षी दार्जिलींग पेलींग
गेल्यावर्षी दार्जिलींग पेलींग दरम्यान येका टी इस्टेट मधे २० मिनीट थांबलो होतो त्यावेळी तेव्हढ्या वेळात येक पेंटींग केले होते. वेळ कमी असल्याने बहुतेक सगळे काम वेट इन वेट केले होते आणि त्या परिसराचा फिल चित्रात आणायचा प्रयत्न केला होता.

वा! नीलु, अंतरा - मस्त.
वा! नीलु, अंतरा - मस्त.
सुरेख चित्रं आली आहेत.
सुरेख चित्रं आली आहेत.
नीलू, एकदम खल्लास!!
नीलू, एकदम खल्लास!!
अजय, धन्यवाद. तुमच्या सूचना
अजय, धन्यवाद. तुमच्या सूचना (संकुलच्या चित्रांवरच्याही टीपाही) लक्षात ठेवतो. हे चित्र एकदा तरी पुन्हा ट्राय करीन. होडीचे पर्सेप्शन आणि प्रतिबिंबकडेही लक्ष देईन. अश्विनी, बस्के, शैलजा, नीलू, अंतरा धन्यवाद.
अंतरा, मस्तच ढगाळ फील आलाय चित्रात. नदीचे पाणी आणि झाडेही चांगली दिसताहेत.
नीलू, _/\_
आणि हो, अजय, २० मिनिटांत हे चित्र!!!!
आम्हाला चित्राची सगळी तयारी करून बसलो तरी, ओढू की नको करत कागदावर पहिली रेघ उमटायला २० मिनिटं लागत असतील.
गजानन - वेट इन वेट तंत्रात
गजानन - वेट इन वेट तंत्रात किती जलद काम करता येते हे कळावे येव्हढ्यासाठीच ते चित्र पोस्ट केले होते.
अजुन झाड हे मुख्य घटक असलेली माझी दोन चित्र पोस्ट करतोय.


पहिल्या चित्रात झाडावर , त्याच्या बुंध्यावर थोडे डीटेल्स केले आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे खुप जवलचे झाड असेल तर थोडे डीटेल्स सजेस्ट करावेत
त्यापुढचे चित्र संजय गांधी नॅशनले पार्क मधे गांधीऑ टेकडीकडे जातानाचा येक रस्ता. इथे सुरुवातीचे काम वेट इन वेट केले आणि काही डार्क्स /डीटेल्स चित्र सुकत आल्यावर टाकले.
( माझ्या मुंबई डेस्क्टॉप कॅलेंडर मधे ही दोन्ही चित्र मी वापरली होती)
या आठवड्यात पुरेसा सराव झाला तर आपण पुढील शनिवार /रविवारी आणि काही तंत्रांचा आढावा घेऊ.
आत्ता हाताशी वेळ होता म्हणून
आत्ता हाताशी वेळ होता म्हणून वेट इन वेट तंत्रानी होडीवालं चित्र करुन बघायचा प्रयत्न करतेय. अजून ओलंच आहे चित्र पण सगळे रंग नको तिथे एकमेकांमध्ये मिसळले आहेत आणि कागदावर रंगपंचमी खेळलिये असं दिसतंय.
थोडं वाळल्यावर काय होतंय बघते.
फोटो काढताना उजवीकडचा भाग निसटलाय फोटोतून माझ्याकडून.
आणि हो कागद ओला केल्यावर भरपूर फुगतोय. (हे नॉर्मल आहे न? का मी चुकीचा कागद वापरतेय?) आणि गजानन म्हणतोय त्याप्रमाणे रंग फुटल्यासारखा वाटतोय. कागद चुकीचा अहे की रंग जास्त पातळ वापरला जातोय?
जे काही रंगवलंय ते दूरून बरं दिसतंय आणि जवळून भयानक दिसतंय.
Ajay, sorry for writing in
Ajay, sorry for writing in English. But need your help soon.
Ajay, I tried latest panting with river but my green color looks terrible. I used multiple combinations no results were as good as yours. Which colors do you use to make your green?
I have ultramarine, cobalt, Prussian and phthalo blues. Also have lemon, medium and ochre yellow. What combo should I use?
I always have had issues with green color
it always looks blotchy no matter what I do.
मी जे काही भयानक रंगवलं होतं
मी जे काही भयानक रंगवलं होतं ते वाळल्यावर दुरुस्त करायचा असफल प्रयत्न केला. मुळात मागे केलेलं स्केच इतकं पुसट होतं की ते दिसतंय नाहीये, त्यामूळे रंगवताना नको त्या ठिकाणी हिरवा झुडूपांचा रंग आलाय. त्या ब्रिजला तर जागाच उरली नाही माझ्या चित्रात. आता यापुढे याच्यात काहीही सुधारणा करणं माझ्याकडून शक्य नाही. सो आय गिव्ह अप धिस टाइम.
आत्तापर्यंत कागद ओला करुन न वाळवताच रंगवत होते. आता आज कागद ओला करून सुकवायला ठेवतेय. उद्या हेच चित्र परत करुन बघेन.
हे सुधारायचा प्रयत्न केलेलं चित्र.
CalAA-kaar, मला होडीच्या
CalAA-kaar, मला होडीच्या चित्रातला हिरवी छटा हिरवा + ऑरेंज या कॉम्बोने मिळाली होती. आधी हिरवा घेऊन ती छटा मिळेपर्यंत त्यात थोडा थोडा ऑरेंज मिसळत गेलो.
CalAA-kaar ग्रीन्स च्या वेग
CalAA-kaar
ग्रीन्स च्या वेग वेगळ्या शेड्स बनवता येतात. खरे तर कलर्स muddy होउ नयेत म्हणुन काय काळजी घ्यायची हे मी नंतर कलर थिअरी च्या लेखात लिहणार आहे.
If you need lighter green shade use lemon yellow and just add very small amount of persian blue
if you have Indian yellow adding cobalt or ultranarine blue will give you wonderful natural green
if you don't have Indian yellow replace that with gamboge yellow.
I don't use phthalo blue and hence not sure about out come.
You would get very good dark green if you mix burnt sienaa with cobalt blue in equal proportion.
Another option is that use greens from tubes and add very little warm colors such as orange , yellows or even earth colors like Sienas to make them more natural.
I think I had used some veridian green+ orange for that painting
To start with don't mix more than two colors to get greens and avoid Ocre yellow.
Here is link I got from net which could be useful but I do not use all those shades personally.
Best thing is take a paper and try mixing above colors and create your own reference chart.
http://www.artistsnetwork.com/articles/art-demos-techniques/mixing-greens
गजानन... सुंदर चित्र. नीलू,
गजानन... सुंदर चित्र.
नीलू, एकदम खल्लास >>>+१
अल्पना... प्रयत्न सुरु ठेवा.
मी पण एक अयशस्वी प्रयत्न केला.... ढगांच स्केचिंग बोल्ड केल्यामुळे आऊटलाईन फार वाईट दिसतेय. मुळात पोस्टर कलर्स वापरल्याने वॉटर कलरचा परिणाम दिसत नाहियं.
अल्पना - पेपर ठिक दिसतोय,
अल्पना - पेपर ठिक दिसतोय, पहिला वेट इन वेट वॉश झाल्या नंतर चित्र सुकु देउन काम करा. तसेच लेखात लिहल्याप्रामाणे रंग किती पसरतो हे आधिचा वॉश किती ओला आहे यावर अवलंबुन असते. येक सोपा नियम सांगतो. वॉश मारल्या नंतर आपल्या हाताच्या तळव्याच्या मागच्या बाजुला पाणी लावा ब्रशने . त्यावर फुंकर मारत राहा , ते तळव्याच्या मागचे पाणी सुके पर्यंत आपला पेपरवरचा वॉश कमी दमट होतो आणी नेक्स्ट वॉश्चे रंग खुप न पसरता कंट्रोल करता येतात
ओके. पुढच्या वेळी हे लक्षात
ओके. पुढच्या वेळी हे लक्षात ठेवेन. थँक्यु.
नीलू, क्लासिक!!!!
नीलू, क्लासिक!!!!
अजय, सुचनांबद्दल धन्यवाद.
अजय, सुचनांबद्दल धन्यवाद. माझ्याकडे 'Gamboge Yellow' मिळाला कॅम्लीनच्या पेटीत होता. आता थोडी झाडांची वगैरे प्रॅक्टीस करेन.
गजानन, तुम्हाला पण धन्यवाद. तुमची सुचना उपयोगी पडली.
ते नदीचे चित्र आज परत काधले आहे.
Paper - Stratmore 400 series cold press 140lbs 300gsm. 12X18 = I cut it in half to make 2 pieces of 12X9.
होडी चुकली आहे. हिरवा रंग शेवाळीकडे झुकलाय. झाडे अजुनही Blotchy दिसत आहेत असे वाटतेय.
अजय, तुमच्या सुचना सांगा. परत करताना सुधारता येतील.
कलाकार, छान आलंय हे चित्र
कलाकार, छान आलंय हे चित्र
अजय, सद्ध्या दुसरं काही टाईम बाउंड काम चालू असल्याने चित्रांतून टाईम प्लिज घेतली आहे. पण पुढच्या आठवड्यात बॅकलॉग भरुन काढेन.
वाह वाह अजय मस्त डेप्थ !! २०
वाह वाह अजय मस्त डेप्थ !!
त्या नॅशनल पार्कच्या कुंपणाच्या जाळीचा सफेद रंग पेपरचा सोडलाय की वरुन दिलाय? डिटेलिंग भारीच झालयं.
२० मि. मध्ये चित्र !!!!!!!! बाबौ
ईंद्रा जलरंग घे बघू पहिले.. आणि तो कोण यो रॉक्स ना
बस्के +१
बस्के +१
२० मि. मध्ये चित्र !!!!!!!!
२० मि. मध्ये चित्र !!!!!!!! बाबौ स्मित त्या नॅशनल पार्कच्या कुंपणाच्या जाळीचा सफेद रंग पेपरचा सोडलाय की वरुन दिलाय? डिटेलिंग भारीच झालयं. >>>> अगदी! हे असलं मला कधी जमेल काय?
CalAA-kaar - चित्र चांगले
CalAA-kaar - चित्र चांगले होतेय. ग्रीन्स मधे वेरिएशनपण येतेय . काही चुका तुम्हाला स्वतःच कळतायत म्हणजे पुढे सुधाराल हे नक्की. अलीकडच्या झाडा/झुडपात थोडे डीटेल्स चालले असते.
मला जमेल तेव्हा झाडांच्या पेंटीग करतानाचा व्हिडीओ करुन टाकतो. ( थोडा वेळ लागेल अजुन मला या साठी)
नीलू - तो पेपर व्हाईट आहे पण वॅक्स वापरुन सोडलाय आणि हो ते पेंटींग खरं तर ऑगस्ट क्रांती मैदानाचे आहे.
अश्विनी के - जमेल हे नक्की.
पर्वत , टेकड्या कसे
पर्वत , टेकड्या कसे रंगवायचे?..

मी प्रयत्न केला पण चुकत आहे असे वाटले म्हणून थांबले.. .....
अंतरा - चांगले होतेय,
अंतरा - चांगले होतेय, टेकड्याही व्यवस्थीत येताहेत.
शैलजाने काढलेले चित्र.
शैलजाने काढलेले चित्र. तिच्याकडे नेट प्रॉब्लेम असल्याने तिने मला इथे अपलोड करायला सांगितले आहे.
Pages