आतापर्यंतच्या लेखात आपण जलरंगासाठीचे साहित्य , जलरंगासाठीचे रेखांकन , काही वॉशेस , सॉफ्टनींग , कलर लिफ्टींग यांचा अभ्यास केला. रेखांकन आणि या वोशेसचा सराव कायम चालुच राहिला पाहीजे.
यालेखात आपण वेट इन वेट (ओल्या रंगात दुसरा ओला रंग) , ड्राय ब्रशींग या तंत्रांबद्दल बोलुया. तसेच या आणि आधिच्या कही तंत्रांचा वापर करुन झाडं / फॉलिएज , ढग कसे काढता येतील , त्यातुन छोटी चित्र कशी करता येतील याचे प्रात्यक्षिक बघु.
वेट इन वेट नावा प्रामाणे ओल्या रंगात दुसरा रंग लावणे , यात रंग पसरत गेल्याने मिळणार्या इफेक्ट , त्याला कंट्रोल करणे हे मह्त्याचे.
आधिचा रंग किती ओला आहे त्यावर दुस्रा रंग किती पसरतो हे अवलंबुन असते आणि ते कंट्रोल करणे आत्मसात करायला हवे. खालच्या फोटोत डावी कडचा रंग आधिचा वॉश खुप ओला असताना दुसरा रंग लावला , तो खुप जास्त पसरला, त्यानंतरचा दुसरा रंग अजुन वॉश थोडा वाळल्यावर आणि त्यानंतर चा रंग जवळ्जवळ सुकलेल्या वॉश वर दिला. त्यानुसार रंग पसरणे कमी कमी झालेले दिसेल.
कित्येकदा पेपर नुसता ओला करुन त्यात रंग पसरु देउन वेट इन वेट इफेक्ट वापरावा लागतो किंवा जर आधिचा वॉश सुकला असेल तर थोडे पाणी लाउन त्यावर असे काम करता येते.
ड्राय ब्रशींग - ब्रश मधे रंग घेउन ब्रश झटकून घ्यावा. या नंतर ब्रश थोडा आडवा पकडून कागदावर रोल करावा. ब्रश मधे अगदी कमी रंग असल्याने काही ठीकाणी रंग उमटतो . या तंत्राने खडबडीत पोत तयार करणे , अगदी कमी किंवा बारिक पानं असलेली सुरु सारखी झाडं काढताना विषेश उपयोग होतो.
आत्ता आपण सन्कुल यांनी विचारलेल्या ढगांचा इफेक्ट कसा पेंट करता येईल हे बघु
प्रथम कोबाल्ट ब्लु किंवा आप्ल्याकडए असलेला दुस्रा येखादा ब्लु रंग घेउन ढग रंगउन घेतले.
हा रंग ओला असतानाच ढगांमधे काही ठिकाणी अजुन गड्द निळा तसेच ऑरे़ज + नीळा यानी तयार होणार थोडा काळपट रंग वेट इन वेट पद्धतीने दिला.
त्यानंतर ढगांच्या काहि कडा सॉफ्ट केल्या. सॉफ्टनिंगसाठी ब्रश स्वच्छ पाण्यात धऊन स्पंज किंवा कापडाला टिपुन घ्यावा
झाले की सुंदर आकाश तयार , खुप सोप्पे आहे कि नाही?
असाच इफेक्ट कलर लिफ्टींग ने आणता येतो.
वेट इन वेट पध्हतीने आकाश पुर्ण रंगउन घेतले
त्यानंतर आपण कलर लिफ्ट करुन पांढूरके ढग केले , मात्र इथे ब्रशने कलर लिफ्ट करण्या ऐवजी टॉयलेट पेपर किंवा टिश्युपेपर ने हा रंग टीपुन घेतला.
प्लॅट वॉश , ग्रेडेड वॉश तसेच वेरीगेटेड वॉश मधले आकाश आपण मागल्या लेखात केले होते
त्या शिवाय वर कलर लिफ्टींग आणि वेट इन वेट प्रकारे आप्ण आकाश कसे करायचे ते वर बघितले
या शिवाय कागद ओलाकरुन त्यात वेगवेगळे रंग मिसळु देउन ( वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओल्या केलेल्या क्गादवर मारयचे आणि ते कागद तिरका करुन मिसळू द्यायचे) सुंदर रंगी बेरंगी आकाश तयार करता येते.
याशिवाय ओल्या कागदावर रंग पसरु देउन पावसाळी आकाश रंगवता येते.
आता आपण अंतरा यानी विचारलेल्या झाडे / फॉलीएज कशी रंगवावीत या प्रश्नाकडे वळू
झाडे रंगवताना येक ढोबळ नियम लक्षात ठेवायचा
जवळ्चे झाड असेल तर काही पानं /थॉडे डीटेल्स रंगवायचे ज्याने झाड जवळचे आहे हे सजेस्ट होईल, थोडे दुअर्चेह असेल तर फॉलिएज त्यात थोडे डार्क्र रंग वेट इन वेट टाकुन छाया प्रकाशाचा भेद दाखवुन रंगवावे आणि खुप दुरच्या झाडाना येक रंगाचा मोठा ठिपका /पट्टा पुरेसा होतो.
झाड रंगवताना झाडाचे फॉलिएज ज्या रंगाचे म्हणजे बहुदा हिरव्या रंगाचे पिवळा+ निळा असे मिश्रण तयार करुन घ्यायचे. रंगपेटीअतले रंग हिरवे रंग जसेच्या तसे वापरण्या पेक्षा आपल्या हव्या त्या शेड्स तयार करणे जास्त योग्य कारण पेटीतले रंग थोडे कृत्रीम वाटतात. या हिरव्या रंगाने पुर्ण लोडेड ब्रशने झाडाचे फोलीएज रंगवावे.
हा रंग थोडा सुकल्यावर , आधिच्या मिश्रणात अजुन निळा रंग अॅड करुन झाडाच्या फॉलिएज च्या खालच्या भागत जिथे सावली असु शकते आणी थोडे अधे मधे वेट इउन वेट रंगवावे. त्यानंतर याच मिश्रणात अजुन थोडा बर्न्ट सियेना अॅड करुन खोडं रंगउन काढले. आधिच्या रंगातच रंग वाढवीत गेल्याने रंगाची येक हार्मेनी तयार होते.त्यामुळे खोड , पानं खुप वेगळी न दिसता येक सलग झाड दिसते. खास करुन थोडी दुर असलेली झाडं रंगवताना या पाधतीचे काम चांगले दिसते.
खालच्या चित्रात फॉलीएज चा आकार ,झाडाचे खोड तसेच फांद्या हाईड इन हाईड आउट करताना दाखवलेय.
हे आहे सुचिपर्णी झाड.
नारळीचे झाडं असे काढता येइल.
ड्राय ब्रशींग ने केलेले झाड.
या शिवाय सुकलेले खोड आपण चंद्र्कोरिच्या चित्रात केलेच आहे.
झाड रंगवताना काही चुका कॉमन आहेत
१. सगळ्या फांद्या फॉलिएज च्या बाहेरुन काढणे , असे केले तर झाडाला फांद्या बाहेरुन चिकटवलेल्या दिसतात.
२. झाडाचे फॉलिएज वरच्या बाजुला डार्क आणि खाली लाईट- प्रकाश झाडा वरुन किंवा येका दिशेने असतो त्यामुळे खाल्ची बाजु किंवा एक बाजु सावलीत जाईल जी डार्क असयाला हवी, खाली बाजु लाईट दिसायला बहुदा फ्ल्ड लाईट्स वापरावे लागतील
३खुपबारीक बारी टीपक्यानी पानं नी पानं रंगवत बसणे, जलरंग या माध्यमात बोल्ड काम अपेक्षित आहे त्यामुळे हे टाळलेले चांगले , काही पानं सजेस्ट करणे ठीक मात्र अतीरेक टाळावा.
आता तुम्ही वेगवेळी आकाशाचे पॅटर्न्स आणि वेगवेगळी झाडं यांची कॉम्बिनेशन्स करुन खुप सारी छोटी छोटी चित्र काढु शकता.
हाच या लेखा साठी एक्सर्साईज.
येउद्या चित्र , होउदे धमाल
अधिचे तीन लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609
या प्रकारे मी केलेला
या प्रकारे मी केलेला गृहपाठ
![suru1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u254/suru1.jpg)
![suru2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u254/suru2.jpg)
![suru3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u254/suru3.jpg)
१. पहिल्यांदा ग्र्रेडेड वॉशने आकाश , वेट इन वेट ने पाणि /समुद्र आणि फ्लॅट वॉशने जमिनिचा भाग रंगवला , रंगवताना क्षितिज अगदी मध्यावर येणार नाही याकडे लक्ष दिले.
२ त्यानंतर ड्राय ब्रशींग तंत्रानी झाडं काढली
३.शेवटी झाडचे खोड, थोडे डिस्टन्ट फॉलिएज ( फक्त रंगाचा येक वाकडातिकदा पट्टा /डीटेल्स नाहि) काढुन ,चित्र संपवले. हे करताना मी माझिच वरची इन्स्ट्रस्कशन्स फॉलो करायचा प्रयत्न ठेवलाय जेणेकरुन वरची इंस्ट्रक्शन्स प्रॅक्टिकल आहेत की नाही हे कन्फर्म करु शकलो.
अजय, जबरदस्त! आता गृहपाठ
अजय, जबरदस्त! आता गृहपाठ भरपूर आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतीशय सोप्या आणी सहज पद्धतीने
अतीशय सोप्या आणी सहज पद्धतीने शिकवताय अजय तुम्ही. अनेक धन्यवाद. शाळेत जे शिकता आले नाही, ते यातुन शिकता येतेय.:स्मित:
फार मस्त इफेक्ट आलाय पावसाळी हवेचा.:स्मित:
अजय आभारी आहे. ढगांचा इफेक्ट
अजय आभारी आहे. ढगांचा इफेक्ट छान आला आहे.
गृहपाठ लवकर पूर्ण करतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सर. खूप छान, सोप्या
धन्यवाद सर.
खूप छान, सोप्या पध्दतीने माहिती दिली.ह्या माहितीचा नक्की खूप उपयोग होईल.
किती छान आणि समजेल अशा भाषेत
किती छान आणि समजेल अशा भाषेत शिकवता तुम्ही, धन्यवाद
आहा! क्या बात है!! मस्त!
आहा! क्या बात है!! मस्त!
खूप छान शिकवलत सर.. धन्यवाद
खूप छान शिकवलत सर.. धन्यवाद
सर प्लीज मला पाण्याचा इफेक्ट
सर प्लीज मला पाण्याचा इफेक्ट कसा दाखवायचा ते सान्गाल?
अजय, ढग रंगवण्याचा एक
अजय, ढग रंगवण्याचा एक प्रयत्न... ढगांच्या कडा कश्या काढाव्यात म्हणजे वास्तव वाटतील, हे काही अजून समजत नाही. मी १२ नंबरचा राऊंड ब्रश सरळ उभा धरून जरा रँडम पॅटर्न आणायचा प्रयत्न केलाय. त्यावर जरा सांगाल का?
अजय तुम्ही फारच सुरेख शिकवत
अजय तुम्ही फारच सुरेख शिकवत आहात. लेख वाचताना अगदी सोप्पं वाटतंय, पण अॅक्चुअली ते किती अवघड जातं याची कल्पना आहे. शाळेत का कोणी असे शिकवले नाही कोणास ठाऊक!
अजय . मस्त. मी परदेशात यावर
अजय . मस्त.
मी परदेशात यावर एक टिव्ही सिरीयल पाहिली होती, तुम्ही कराच.
गजानन्, तुमची प्रॅक्टिस जोरात
गजानन्, तुमची प्रॅक्टिस जोरात चाललीये.. मस्तच दिसतंय वरचं चित्र आणि बाकीचेही.
खुप सुंदर.. पाटील, खुपदा
खुप सुंदर..
पाटील, खुपदा एखाद्या डोंगरावर आपण असताना समोर एकामागोमाग एक डोंगरांचा रांगा असतील तर ते डोंगर
वेगवेगळ्या रंगाचे दिसतात. ते पण याच तंत्राने चितारता येतील ना ?
पाटीलजी तुम्ही याचे मोबाईलवर
पाटीलजी तुम्ही याचे मोबाईलवर शूटिंग करून यू त्युबवर टाकाच ट्युटोरियल म्हणून
प्रयत्न केला पण आणखी
प्रयत्न केला पण आणखी प्राक्टिस हवी असे वाट्ते.
अजय, शिकवण्याची हातोटी फारच
अजय, शिकवण्याची हातोटी फारच छान आहे.
मी लवकरच गृहपाठ पूर्ण करते. कृपया मला वर्गाबाहेर काढू नका.
गजानन - चांगले झाले आहे. रँडम
गजानन - चांगले झाले आहे. रँडम पॅटर्न तयार करण्यासाठी पेपर तेव्हढ्या भागा पुअरता नुसत्या पाण्यात बुडवलेल्या ब्रशने थोडा ओला करुन बघा. तसेच ढगांच्या काही हार्ड झालेल्या कडांचे काही ठिकाणी सॉफ्ट्नींग करुन पहा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सन्कुल - पहिले चित्र फ्हरसे जमले नाहिये. क्षितिज येका सरळ रेषेत हवे. जवळचे आणि दुरचे नारळ्/माड आकाराने कमी प्रपोर्शन केले तरी रंगात जवळ जवळ सारखे दिसतात . दुरच्या गोष्टीत कमी डीटेल्स , रंगात थोडे लाइट्नेस , निळसर झाकं ईं बदल होतात. हा एरिअल पर्स्पेक्टीव्ह चा भग झाला आणि सध्या समजावयला थोडा कठीण आहे. त्याबद्दल नंतर.
मात्र पाण्यात ला लाईन्स युटक तुटक न काढता वेट इन वेट थोडे मोठे स्ट्रोक्स अजुन पसरु द्या, आकाशाचे रंगात पण ब्रश च्या लाइन्स दिसतायत.
दुसर्या चित्रात silhouette छान झालेय पण काळा रंग सध्या टाळा. त्या ऐवजी अल्ट्रामरीन ब्लु+ बर्न्ट सिएना+ लाल असे डार्क मिश्रण वापरुन बघा.
नीली - पाण्यातल्या रिफलेक्शन्स बद्दल म्हणत असाल तर याच लेखात पुढे येखादे चित्र टाकेन.
विक्रमसिंह - कल्पना चांगली आहे पण त्यासाठी अनेक दिग्गज लोक जास्त कॅपेबल आहेत. किंबहुना मी येका मराठी चॅनलला येका शोची संकल्पना सुचवली होती. प्रसिद्ध मराठी चित्रकारांसोबत त्यांच्या स्टुडीओचा फेरफटका, गप्पा आणि त्यांच्या आपडत्या प्रकारातल्या चित्राचा डेमो. तसेच त्यांच्या प्रसिद्ध चित्रांचा मोंटाज . रविवरी सकाळी असा येखादा कार्यक्रम बघायला मस्त वाटेल आणि आपल्या सारख्या सामन्य माणसाना मोठ्या चित्रकारांच्या स्टुडीओच्या आतली दुनिया कळेल. त्या वाहिनिचा काही प्रतिसाद आला नाही
दिनेश- वेट इन वेट तंत्र खुप वर्साटाईल आहे आणि त्या तंत्राने नक्कीच तुम्ही म्हणता तसे चित्र करता येईल
रॉबीनहूड- तुमचि सुचना योग्य आहे मात्र माझ्याकडे शुट करायला तसा सेटअप नाही. म्हणजे ट्रायपॉड्ला मोबाईल अडकवुन टॉप अँगलने शुट करावे लागेल आणि तसा मोबाईल होल्डर मला कुठे दिसला नाही. काहितरी स्वतःच बनवावे लागेल.
सध्या या मालिकेतील प्रत्येक
सध्या या मालिकेतील प्रत्येक लेख फेव १० मधे टाकत जातेय...... वेकधी वेळ मिळतो आनी कधी ब्रश पेंट्स ना हात लागतो असं झालंय!!!
सुपर्ब !! मी पण हे सगळं
सुपर्ब !! मी पण हे सगळं निवडक १० मधे टाकतेय. हा एक्सरसाईझ पण भारी आहे. प्रॅक्टिस जमेल तशी चालू आहे.
नारळाची झाडे आणि थोडेसे आकाश
नारळाची झाडे आणि थोडेसे आकाश -
![VKG-Painting4.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33907/VKG-Painting4.jpg)
झाडेच झाडे (करताना मजा आली पण उत्साहाच्या भरात जरा काहीतरी गंडलेय!!)
![VKG-Painting5.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33907/VKG-Painting5.jpg)
आकाश -
![VKG-Painting6.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33907/VKG-Painting6.jpg)
अजय, रंग वाढवुन काम केले आहे. काय चुकतेय ते सांगा.
आकाश छान होतेय, झाडं पण
आकाश छान होतेय, झाडं पण चांगली आहेत , नारळ पात्यांमधे आकार थोडा अजुन चांगला, थोडी बाहेर आलेली पाती अजुन दाखउ शकता. नार्लाच्या खोडाची जाडी कमी जास्त होतेय बाकी प्रयत्न चांगला आहे
कलाकार, तुमचे आकाश खूप आवडले.
कलाकार, तुमचे आकाश खूप आवडले. एकदम खरे वाटतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजय, झाडांची अजुन थोडी
अजय, झाडांची अजुन थोडी practice करेन.
![VKG-Painting7.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33907/VKG-Painting7.jpg)
तुमच्या चित्राची कोपी केली आहे -
वरील सगळी चित्रे 4"x6" paper वर केली आहेत. जरा सराव झाला की हीच ७ बाय १० वर करण्याचा विचार आहे.
गजानन धन्यवाद. तुम्ही काधलेली सगळी चित्रे छान आहेत.
सध्या तरी झाडे ,ढग ह्यांची
सध्या तरी झाडे ,ढग ह्यांची प्रॅक्टीस सुरू आहे.. पण ..........
![TREE.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u41846/TREE.JPG)
![cloud.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u41846/cloud.JPG)
CalAA-kaar - ड्राय ब्रशींग
CalAA-kaar - ड्राय ब्रशींग मधली झाडं सोडली तर बाकी चांगले झालेय. पाणी तर अगदी फेसाळतं आलय.
![babhali.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u254/babhali.jpg)
अंतरा - झाडं मस्त केलित , हिरवा बहुदा रंग पेटीतून तसाच वापरलाय थोडा कृत्रीम वाटतोय पण इफेक्ट छान.
मीही आज येक होमवर्क केलाय .
थोड वेट इन वेट काम करुन झाडावर अजुन ड्राय ब्रश केले. झाडं इथे जवळजवळ सेंटर झाले असले तरी येका बाजुनी झुकल्यामुळे खटकत नाही.
ड्राय झाडे करण्याचा सराव आज
ड्राय झाडे करण्याचा सराव आज करेन. एकुणच झाडे करयचा सराव करेन.
सगळ्यांची चित्र बघायला मज्जा
सगळ्यांची चित्र बघायला मज्जा येतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कीप इट अप!
भारी!
भारी!
मस्तच. माझी अजून सुरुवात पण
मस्तच.
माझी अजून सुरुवात पण नाही झाली.
Pages