आतापर्यंतच्या लेखात आपण जलरंगासाठीचे साहित्य , जलरंगासाठीचे रेखांकन , काही वॉशेस , सॉफ्टनींग , कलर लिफ्टींग यांचा अभ्यास केला. रेखांकन आणि या वोशेसचा सराव कायम चालुच राहिला पाहीजे.
यालेखात आपण वेट इन वेट (ओल्या रंगात दुसरा ओला रंग) , ड्राय ब्रशींग या तंत्रांबद्दल बोलुया. तसेच या आणि आधिच्या कही तंत्रांचा वापर करुन झाडं / फॉलिएज , ढग कसे काढता येतील , त्यातुन छोटी चित्र कशी करता येतील याचे प्रात्यक्षिक बघु.
वेट इन वेट नावा प्रामाणे ओल्या रंगात दुसरा रंग लावणे , यात रंग पसरत गेल्याने मिळणार्या इफेक्ट , त्याला कंट्रोल करणे हे मह्त्याचे.
आधिचा रंग किती ओला आहे त्यावर दुस्रा रंग किती पसरतो हे अवलंबुन असते आणि ते कंट्रोल करणे आत्मसात करायला हवे. खालच्या फोटोत डावी कडचा रंग आधिचा वॉश खुप ओला असताना दुसरा रंग लावला , तो खुप जास्त पसरला, त्यानंतरचा दुसरा रंग अजुन वॉश थोडा वाळल्यावर आणि त्यानंतर चा रंग जवळ्जवळ सुकलेल्या वॉश वर दिला. त्यानुसार रंग पसरणे कमी कमी झालेले दिसेल.
कित्येकदा पेपर नुसता ओला करुन त्यात रंग पसरु देउन वेट इन वेट इफेक्ट वापरावा लागतो किंवा जर आधिचा वॉश सुकला असेल तर थोडे पाणी लाउन त्यावर असे काम करता येते.
ड्राय ब्रशींग - ब्रश मधे रंग घेउन ब्रश झटकून घ्यावा. या नंतर ब्रश थोडा आडवा पकडून कागदावर रोल करावा. ब्रश मधे अगदी कमी रंग असल्याने काही ठीकाणी रंग उमटतो . या तंत्राने खडबडीत पोत तयार करणे , अगदी कमी किंवा बारिक पानं असलेली सुरु सारखी झाडं काढताना विषेश उपयोग होतो.
आत्ता आपण सन्कुल यांनी विचारलेल्या ढगांचा इफेक्ट कसा पेंट करता येईल हे बघु
प्रथम कोबाल्ट ब्लु किंवा आप्ल्याकडए असलेला दुस्रा येखादा ब्लु रंग घेउन ढग रंगउन घेतले.
हा रंग ओला असतानाच ढगांमधे काही ठिकाणी अजुन गड्द निळा तसेच ऑरे़ज + नीळा यानी तयार होणार थोडा काळपट रंग वेट इन वेट पद्धतीने दिला.
त्यानंतर ढगांच्या काहि कडा सॉफ्ट केल्या. सॉफ्टनिंगसाठी ब्रश स्वच्छ पाण्यात धऊन स्पंज किंवा कापडाला टिपुन घ्यावा
झाले की सुंदर आकाश तयार , खुप सोप्पे आहे कि नाही?
असाच इफेक्ट कलर लिफ्टींग ने आणता येतो.
वेट इन वेट पध्हतीने आकाश पुर्ण रंगउन घेतले
त्यानंतर आपण कलर लिफ्ट करुन पांढूरके ढग केले , मात्र इथे ब्रशने कलर लिफ्ट करण्या ऐवजी टॉयलेट पेपर किंवा टिश्युपेपर ने हा रंग टीपुन घेतला.
प्लॅट वॉश , ग्रेडेड वॉश तसेच वेरीगेटेड वॉश मधले आकाश आपण मागल्या लेखात केले होते
त्या शिवाय वर कलर लिफ्टींग आणि वेट इन वेट प्रकारे आप्ण आकाश कसे करायचे ते वर बघितले
या शिवाय कागद ओलाकरुन त्यात वेगवेगळे रंग मिसळु देउन ( वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओल्या केलेल्या क्गादवर मारयचे आणि ते कागद तिरका करुन मिसळू द्यायचे) सुंदर रंगी बेरंगी आकाश तयार करता येते.
याशिवाय ओल्या कागदावर रंग पसरु देउन पावसाळी आकाश रंगवता येते.
आता आपण अंतरा यानी विचारलेल्या झाडे / फॉलीएज कशी रंगवावीत या प्रश्नाकडे वळू
झाडे रंगवताना येक ढोबळ नियम लक्षात ठेवायचा
जवळ्चे झाड असेल तर काही पानं /थॉडे डीटेल्स रंगवायचे ज्याने झाड जवळचे आहे हे सजेस्ट होईल, थोडे दुअर्चेह असेल तर फॉलिएज त्यात थोडे डार्क्र रंग वेट इन वेट टाकुन छाया प्रकाशाचा भेद दाखवुन रंगवावे आणि खुप दुरच्या झाडाना येक रंगाचा मोठा ठिपका /पट्टा पुरेसा होतो.
झाड रंगवताना झाडाचे फॉलिएज ज्या रंगाचे म्हणजे बहुदा हिरव्या रंगाचे पिवळा+ निळा असे मिश्रण तयार करुन घ्यायचे. रंगपेटीअतले रंग हिरवे रंग जसेच्या तसे वापरण्या पेक्षा आपल्या हव्या त्या शेड्स तयार करणे जास्त योग्य कारण पेटीतले रंग थोडे कृत्रीम वाटतात. या हिरव्या रंगाने पुर्ण लोडेड ब्रशने झाडाचे फोलीएज रंगवावे.
हा रंग थोडा सुकल्यावर , आधिच्या मिश्रणात अजुन निळा रंग अॅड करुन झाडाच्या फॉलिएज च्या खालच्या भागत जिथे सावली असु शकते आणी थोडे अधे मधे वेट इउन वेट रंगवावे. त्यानंतर याच मिश्रणात अजुन थोडा बर्न्ट सियेना अॅड करुन खोडं रंगउन काढले. आधिच्या रंगातच रंग वाढवीत गेल्याने रंगाची येक हार्मेनी तयार होते.त्यामुळे खोड , पानं खुप वेगळी न दिसता येक सलग झाड दिसते. खास करुन थोडी दुर असलेली झाडं रंगवताना या पाधतीचे काम चांगले दिसते.
खालच्या चित्रात फॉलीएज चा आकार ,झाडाचे खोड तसेच फांद्या हाईड इन हाईड आउट करताना दाखवलेय.
हे आहे सुचिपर्णी झाड.
नारळीचे झाडं असे काढता येइल.
ड्राय ब्रशींग ने केलेले झाड.
या शिवाय सुकलेले खोड आपण चंद्र्कोरिच्या चित्रात केलेच आहे.
झाड रंगवताना काही चुका कॉमन आहेत
१. सगळ्या फांद्या फॉलिएज च्या बाहेरुन काढणे , असे केले तर झाडाला फांद्या बाहेरुन चिकटवलेल्या दिसतात.
२. झाडाचे फॉलिएज वरच्या बाजुला डार्क आणि खाली लाईट- प्रकाश झाडा वरुन किंवा येका दिशेने असतो त्यामुळे खाल्ची बाजु किंवा एक बाजु सावलीत जाईल जी डार्क असयाला हवी, खाली बाजु लाईट दिसायला बहुदा फ्ल्ड लाईट्स वापरावे लागतील
३खुपबारीक बारी टीपक्यानी पानं नी पानं रंगवत बसणे, जलरंग या माध्यमात बोल्ड काम अपेक्षित आहे त्यामुळे हे टाळलेले चांगले , काही पानं सजेस्ट करणे ठीक मात्र अतीरेक टाळावा.
आता तुम्ही वेगवेळी आकाशाचे पॅटर्न्स आणि वेगवेगळी झाडं यांची कॉम्बिनेशन्स करुन खुप सारी छोटी छोटी चित्र काढु शकता.
हाच या लेखा साठी एक्सर्साईज.
येउद्या चित्र , होउदे धमाल
अधिचे तीन लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609
काय मस्तं वर्गं चाललाय. पाटील
काय मस्तं वर्गं चाललाय.
पाटील आणि त्यांचे विद्यार्थी या सगळ्यांचे अभिनंदन.
असं काही भरीव काम होताना पाहिलं की मायबोलीकर असल्याचं सार्थक वाटतं.
तुमचे सगळे लेख वाचते आहे.
तुमचे सगळे लेख वाचते आहे. अतिशय माहितीपूर्ण तरी अजिबात कंटाळवाणे न होउ देता लिहिले आहेत. मात्र मी फक्त वाचनमोडात. या कार्यशाळेमुळे अनेकांनी पुन्हा किंवा नव्याने ब्रश हातात घेतले असं जाणवलं. मस्त चित्र काढली आहेत सगळ्यांनीच. लगे रहो
पाटील, तुमची एकेक डीटेलिंग
पाटील, तुमची एकेक डीटेलिंग शिकवण्याची पद्धत अतिशय सराहनीय आहे
मी पण आहे हां वर्गात... जर्राशी बॅकबेंचर झालेय..
सगळे आर्टिस्ट्स खूप सुंदर काम करत आहेत..
कसलं मस्त. हॅट्स ऑफ पाटील सर.
कसलं मस्त. हॅट्स ऑफ पाटील सर. मी एक्दम ढ आहे. पण आयुष्यात एक तरी मस्त पेंटींग करायचं आहे. आत्ता जॉईन केलं तर जमेल का ?
ढग आणि झाडांची
ढग आणि झाडांची प्रॅक्टिसः


झाडं नीट जमली नाहियेत
एक जरा बरं जमलेलं झाडः ड्राय
एक जरा बरं जमलेलं झाडः
ड्राय ब्रशिंग चा प्रयत्न..
नमस्कार अजय, हा माझा सराव. या
नमस्कार अजय,
हा माझा सराव. या वेळेस मी थोडा जाड hand-made पेपर वापरला आहे.
सध्या मी समुद्र, आकाश आणि झाडे यांची प्राक्टिस करित आहे.
धन्यवाद...
सन्कुल... मस्तच
सन्कुल... मस्तच
नमस्कार, आणखी एक प्रयत्न
नमस्कार, आणखी एक प्रयत्न

धन्यवाद इंद्रधनुष्य.
धन्यवाद इंद्रधनुष्य.
समुद्र जरा कठिण जात आहे. बघु
समुद्र जरा कठिण जात आहे. बघु पुन्हा गृहपाठ करुन बघतो.
प्रयत्न सुरु आहेत... ढग थोडे
प्रयत्न सुरु आहेत...

ढग थोडे फार जमत आहेत असे वाटले म्हणून समुद्र रंगवून बघयाचा प्रयत्न केला पण जमला की नाही..नाही माहीत. सुचीपर्णीची झाडे अजिबात नाही जमत.
अंतरा, समुद्र छान जमला आहे.
अंतरा, समुद्र छान जमला आहे.
अंतरा - समुद्र खुप चांगला
अंतरा - समुद्र खुप चांगला झालाय. क्षितीजा जवळ दोन तीन छोट्या बोटी रंगवल्या तर खुप छान पेंटींग तयार होईल.
धन्यवाद सन्कुल.. धन्यवाद सर.
धन्यवाद सन्कुल..
धन्यवाद सर. समुद्र रंगवताना इतके टेन्शन होते की आणखी काही काढायला पाहीजे हे लक्षातच नाही आले.
समुद्रातलं चमकणारं पाणी खूपच
समुद्रातलं चमकणारं पाणी खूपच सुंदर दिसतय.
अंतरा, मस्त आलंय चित्र. खूपच
अंतरा, मस्त आलंय चित्र. खूपच आवडलं.
सगळ्यांचेच सरव छान आहेत . इथली (या ग्रूपातली) सगळी चित्रं बघायला मजा येतेय.
अंतरा, मस्त आलंय चित्र. खूपच
अंतरा, मस्त आलंय चित्र. खूपच आवडलं.> +१
अंतरा अगदी सुपर्ब समुद्र!!
अंतरा अगदी सुपर्ब समुद्र!! फार आवडला!
मला कधी जमणार असं!
सगळ्यांना धन्यवाद. बस्के
सगळ्यांना धन्यवाद.
बस्के नक्की जमेल तुम्हाला समुद्र रंगवायला...
ढगांचा छोटासा प्रयत्न करुन
ढगांचा छोटासा प्रयत्न करुन बघितला आज.

अल्पना छान , रंग /रंग काळपट
अल्पना छान , रंग /रंग काळपट वाटु नये म्हणुन काही करता येते का ते येखद्या लेखात बघु.
आधिच्या रेखांकनाच्या लेखात मी हा फोटो वापरला होता.


या फोटोत खुप सारे डीटेल्स नाहित तसेच आकाशाचे रंग फारसे नीट नाहीत.
या फोटोचा वापर रेफरंस म्हणुन करुन आणि मुख्य्त्वे वेट इन वेट , ड्राय ब्रश तंत्राने चित्र करुन पाहुया.
पहिल्यांदा स्केच करुन घेतले . यात काही अनावश्यक घटक काढुन टाकले उदा: सुचना फलक, मधेच कंपोझिशनला बाधक झुडुप इ. चित्रात पाण्याचा भाग खुप रिकामा दिसत होता म्हणुन तेथे येक होड़कं काढले , इथे गणपती विसर्जनाच्या वेळी असे तराफे , होड्या असतात. अजुन आपण फिगर्स चा अभ्यास केला नाहिये म्हणुन त्यांचा वापर केला नाही.
त्यानंतर पुर्ण पेपर फ्लॅट ब्रशने ओला करुन घेतला. त्यावर राऊंड १२ नं ब्रशने आकाशात निळा, जांभ़ळा, ऑरेंज , पिवळा अशा रंगानी रंगवुन पेपर तिरका करत येकमेकात मिसळु दिले, पाण्याच्या जागी ही पातळ रंग मारुन घेतला. जमिनिकडचा भाग थोडा ओरेंज + ब्र्र्न्ट सिएनाने रंगवला.


त्यानंतर वरचा कुप ओला नसताना पण रंग दमट असतानाच मागची झाडी वेट इन वेट पध्हतीने रंगवली. यात ओरेंज + ग्रीन याचा वापर केलाय , काही ठिकाणी पाणी , थोडा पिवळा, निळा यांचा टच देत वेरिएशन आणले, खालचा जमिनिकडचा हिरवा गवताचा भाग थोडा जास्त पिवळा अॅड करत रंगवला.
फोरग्राउंडला ड्राय ब्रशींग्ने (बर्न्ट सिएना) मातीचा पोत मिळवला
चित्र सुकलयावर पिवळ्या रंगाने ४ नं ब्रशने होडी रंगवली, ती सुकल्यावर पिवळा+ बर्न्ट सिएना अशा मिश्रणाने होडीच्या फळ्या तसेच सावलीकडचा भाग रंगवला.

निळा+बर्न्ट सिएना+ किंचित लाल असा काळ्पट रंग बनउन हा रंग पातळ करुन मागचा ब्रिज आणी इलेक्त्रिक टॉवर रंगवला.
मस्त. हे इथे बघताना कित्ती
मस्त.
हे इथे बघताना कित्ती सोप्पंय असं वाटतंय. पण हातात रंग आणि ब्रश घेतल्यावर अगदी फे फे उडते.
आज आधी झाडांची प्रॅक्टीस करून मग हे पण करून बघेन.
आहाहा काय सुंदर चित्र
आहाहा काय सुंदर चित्र बनवलंय पाटील. फोटोपेक्षा कितीतरी सुंदर.
वाचताना सोपं वाटलं तरी अस जमेल असं वाटत नाही.. पण प्रयत्न करुन पाहू.
खूप सुंदर चित्र आहे.. पण
खूप सुंदर चित्र आहे.. पण रंगवायला अवघड वाटते आहे..कितपत जमेल हे नाही माहित..प्रयत्न अर्थातच करेन..
reflections नाही जमत.
नमस्कार, प्रयत्न सुरु आहेत..
नमस्कार, प्रयत्न सुरु आहेत..
समुद्र, आकाश आणि झाडे एकत्र करायचा प्रयत्न केला... सुचनाचे स्वागत..
अजय, झाडे रंगवताना
अजय, झाडे रंगवताना ट्रान्सपरन्सी मेंटन करणारी काळसर गडद छटा मला जमलेली नाही.
माझ्याकडचा सध्याचा कागद १५० GSM चा असल्याचे नीलूकडून जलरंग पण गटग मध्ये कळले. चिकटपट्टी लावली तरी तो फुगतोय. सुकेल तसा पूर्ववत होतो, पण वेट इन वेट साठी अवघड होतेय.
तुमच्या चित्रांत अगदी मोजक्याच फटकार्यांमधून चित्र जिवंत झालंय. त्याबाबतीत माझे चित्र पार गंडलेय.
झाडांकरता आधी ऑरेंग + हिरवा दिला होता. त्याची छटाही चांगली जमली होती. पण फुगलेल्या कागदावर तो खड्यांतच जास्त बसून राहिला आणि जसा सुकत जाईल तसा फाकायला लागला. (रंगात पाण्याच्या केशवाहिन्यांचे पॅटर्न दिसू लागले.) ते खूप वाईट दिसत होते म्हणून जरा सुकल्यावर वरून दुसरा हिरवा रंग करून त्यावर दिलाय. आज या वॉशेसनी रडकुंडीला आणले. 
गजानन, खूप्च सुरेख जमलंय की
गजानन, खूप्च सुरेख जमलंय की चित्र. मला आवडले..
पाटील ही तर जादू आहे. पहिल्या फटकार्यातून पुढे जाऊन इतकं सुंदर चित्र! मला हे कधीतरी १५ वर्षांनी थोडंसं जमेल. पण तुमच्या स्टेपबायस्टेप सुचनांसाठी धन्यवाद!
गजानन चित्र छान आलंय, पण डबल
गजानन चित्र छान आलंय, पण डबल वॉशेस द्यावे लागल्यामूळे जलरंगाची जादु (स्पेशली हिरव्या रंगामध्ये) तितकीशी जाणवत नाहीये. योग्य कगदावर छान जमेल नक्कीच.
गजा, सुरेख आलंय चित्र
गजा, सुरेख आलंय चित्र
Pages