दरवर्षी संक्रांतीला सोलापूरला ग्रामदैवत 'श्री सिध्देश्वरा'ची यात्रा भरते. यंदा पहिल्यांदाच ही यात्रा अनुभवायची संधी मिळाली. या यात्रेनिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असतं.
याची थोडक्यात कथा अशी आहे की सिध्दपुरुष सिध्देश्वरांच्या कार्याने प्रभावित होऊन एका कुंभारकन्येने त्यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यांनी ती नाकारली, परंतु आपल्याजवळील 'योगदंडा' समवेत तिला विवाहाची अनुमती दिली. हे अनोखे लग्न दरवर्षी मकर संक्रांतीचे तीन दिवस साजरे केले जाते. भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रांत हे तीन दिवस. यात एकूण सात 'सासन काठ्या' / 'नंदीध्वज' असतात, ज्यांना भाविक आपल्या हाताने उचलून मिरवत असतात. हजारो श्रध्दाळू भाविक संपूर्ण शुभ्र पांढर्या वेषात (बाराबंदी) या यात्रेला उपस्थित राहतात.
भोगी दिवशी हे मानकरी शहरातील १०८ शिवलिंगांना तेल वाहून आमंत्रण देऊन येतात. मकर संक्रांतीला हे सातही नंदीध्वज शहरातून मिरवत 'सिध्देश्वर' मंदिरात नेले जातात. वाटेत सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या असतात. मंदिराजवळील मंडपात अक्षता सोहळा होतो. अमाप जनसमुदाय या सोहळ्याला उपस्थित राहत असतो.
संध्याकाळी सिध्देश्वराच्या पटांगणात होम केला जातो, ज्यात या कुंभारकन्येची प्रतिमा सती दिली जाते.
नंतर हे सगळे 'श्री हब्बू' यांच्या वाड्यात जातात. जिथे एका वासरूला संपूर्ण दिवस उपाशी ठेवलेलं असतं, त्या वासरु समोर अनेक धान्य, फळं, भाज्या व इतर पदार्थ ठेवले जातात. दिवसभर उपाशी असलेलं ते वासरु मग ज्या पदार्थाला तोंड लावेल ते पदार्थ महाग होणार आणि बाकीचे स्वस्त, तसेच त्याने केलेल्या मलमूत्रावर यावर्षीच्या पावसाचा अंदाज बांधले जातात.
संपूर्ण मंदिराला सुंदर रोषणाई केलेली असते. या यात्रेनिमित्त जत्रा पण भरते , त्याला गड्डा जत्रा पण म्हणतात. ही जत्रा १५-२० दिवस भरते. जनावरे-खिलारांचा मोठा बाजार पण असतो. किंक्रांताला शोभेच्या दारुकामाचे सुंदर खेळ सादर केले जातात. हा जनावर बाजार आणि दारुकाम या वर्षी पाहता आलं नाही
काही क्षणचित्रे खाली देतोय.
सुंदर रांगोळ्या
1)
2)
3)
4)
5)
6)
7)
8)
9)
10)
11)
यात्रेतील भाविक व सामान्य...
12)
13)
14)
15)
16)
17)
18)
19)
20)
21)
22)
23) या नंदीध्वजांना फुलांची सुंदर सजावट केली जाते.
24)
25)
26)
27) श्री सिध्देश्वराची पालखी
28)
29)
30)
31) हा बालयोगी, खिळ्यांच्या मोजडीवर उभारलेला. स्वत:हून पोजेस दिला . त्या खिळ्यांवरून खाली केव्हा उतरणार विचारल्यावर, पन्नास रुपये द्या लगेच उतरतो असे बोलला
32)
33) विवाह मंडप
नंदीध्वज
34)
35)
36)
सुंदर रोषणाई
37)
38)
39)
40)
41)
42)
43)
44)
45)
46)
गड्डा यात्रेचा फिल्या दिवशीची काही प्रचि
47)
48)
49)
50)
51)
हो हो माया, तोच तो हीरालाल
हो हो माया, तोच तो हीरालाल पन्नालाल शो.
एकदा जत्रेत आग लागली होती. आम्ही गर्दीत अडकलो होतो तेव्हा. आणि संपूर्ण कुटुंब इकडे तिकडे असं विखरून काही वेळाने परत भेटलो होतो. मी खूप लहान होते पण ती चेंगराचेंगरी, गोंधळ, तो प्रसंग अजून लक्षात आहे.
>>सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण यात्रेला अतिशय शिस्त होती >> हे खरंय. विशेषतः काठ्यांचे नियोजन फार काटेकोर असते. गड्ड्यावर काही प्रमाणात हुल्लडबाजी असते पण नंदीध्वज समारोह फार शिस्तीत असतो.
Pages