सिध्देश्वर यात्रा - सोलापूर

Submitted by रंगासेठ on 31 January, 2014 - 23:42

दरवर्षी संक्रांतीला सोलापूरला ग्रामदैवत 'श्री सिध्देश्वरा'ची यात्रा भरते. यंदा पहिल्यांदाच ही यात्रा अनुभवायची संधी मिळाली. या यात्रेनिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असतं.

याची थोडक्यात कथा अशी आहे की सिध्दपुरुष सिध्देश्वरांच्या कार्याने प्रभावित होऊन एका कुंभारकन्येने त्यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यांनी ती नाकारली, परंतु आपल्याजवळील 'योगदंडा' समवेत तिला विवाहाची अनुमती दिली. हे अनोखे लग्न दरवर्षी मकर संक्रांतीचे तीन दिवस साजरे केले जाते. भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रांत हे तीन दिवस. यात एकूण सात 'सासन काठ्या' / 'नंदीध्वज' असतात, ज्यांना भाविक आपल्या हाताने उचलून मिरवत असतात. हजारो श्रध्दाळू भाविक संपूर्ण शुभ्र पांढर्‍या वेषात (बाराबंदी) या यात्रेला उपस्थित राहतात.

भोगी दिवशी हे मानकरी शहरातील १०८ शिवलिंगांना तेल वाहून आमंत्रण देऊन येतात. मकर संक्रांतीला हे सातही नंदीध्वज शहरातून मिरवत 'सिध्देश्वर' मंदिरात नेले जातात. वाटेत सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या असतात. मंदिराजवळील मंडपात अक्षता सोहळा होतो. अमाप जनसमुदाय या सोहळ्याला उपस्थित राहत असतो.

संध्याकाळी सिध्देश्वराच्या पटांगणात होम केला जातो, ज्यात या कुंभारकन्येची प्रतिमा सती दिली जाते.

नंतर हे सगळे 'श्री हब्बू' यांच्या वाड्यात जातात. जिथे एका वासरूला संपूर्ण दिवस उपाशी ठेवलेलं असतं, त्या वासरु समोर अनेक धान्य, फळं, भाज्या व इतर पदार्थ ठेवले जातात. दिवसभर उपाशी असलेलं ते वासरु मग ज्या पदार्थाला तोंड लावेल ते पदार्थ महाग होणार आणि बाकीचे स्वस्त, तसेच त्याने केलेल्या मलमूत्रावर यावर्षीच्या पावसाचा अंदाज बांधले जातात.

संपूर्ण मंदिराला सुंदर रोषणाई केलेली असते. या यात्रेनिमित्त जत्रा पण भरते , त्याला गड्डा जत्रा पण म्हणतात. ही जत्रा १५-२० दिवस भरते. जनावरे-खिलारांचा मोठा बाजार पण असतो. किंक्रांताला शोभेच्या दारुकामाचे सुंदर खेळ सादर केले जातात. हा जनावर बाजार आणि दारुकाम या वर्षी पाहता आलं नाही Sad

काही क्षणचित्रे खाली देतोय.

सुंदर रांगोळ्या

1)

2)

3)

4)

5)

6)

7)

8)

9)

10)

11)

यात्रेतील भाविक व सामान्य...

12)

13)

14)

15)

16)

17)

18)

19)

20)

21)

22)

23) या नंदीध्वजांना फुलांची सुंदर सजावट केली जाते.

24)

25)

26)

27) श्री सिध्देश्वराची पालखी

28)

29)

30)

31) हा बालयोगी, खिळ्यांच्या मोजडीवर उभारलेला. स्वत:हून पोजेस दिला Wink . त्या खिळ्यांवरून खाली केव्हा उतरणार विचारल्यावर, पन्नास रुपये द्या लगेच उतरतो असे बोलला Lol

32)

33) विवाह मंडप

नंदीध्वज

34)

35)

36)

सुंदर रोषणाई

37)

38)

39)

40)

41)

42)

43)

44)

45)

46)

गड्डा यात्रेचा फिल्या दिवशीची काही प्रचि

47)

48)

49)

50)

51)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम...

खूप लहान्पणी बघितली होती..त्यानंन्तर परिक्षा, शाळा यामुळे जाणे झाले नाही..
धन्यवाद.. Happy

होय दिनेशदा, मंदिर गावातच आहे. मंदिराभोवती चारही बाजूने सरोवर आहे.
लागूनच मोठ्ठे मैदान आहे जिथे ही यात्रा भरते.

मस्त आहे..........फोटो.. अप्रतिम .. वाड्याचे फोटो ........

(बर झाले इथे कोणी आक्षेप घेत आले नाही)

रंगासेठ , खूप खूप आभार!! लहानपणीच्या आठवणींना उजाळा ............ <गहिवर आलेली बाहुली>
गड्ड्याची जत्रा म्हणलं की खूप धमाल. जत्रेला लहानपणी आईवडीलां सोबत आणि नंतर मैत्रिणी-मैत्रिणी मिळून दरवर्षी न चुकता गेले आहे. आधी सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. मग भाग्यश्री चिवडा आणि बटाटावडा, उसाचा रस, पाळण्यात बसणे, बांगड्या-टिकल्या असली आलतू फालतू खरेदी, फोटो काढणे, मौत का कुवा, गाढवाचे शो, जादूचे शो असले करमणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम ( हो सोलापूरची संस्कृती अशीच भेळ मिसळ आहे Happy ) असा जंगी प्रोग्राम असे आमचा. नंतर कधीतरी डिस्ने लँड(?) पण येऊ लागले होते या जत्रेत. त्याचे तिकिट महाग असे.

रात्रीचं दारूकाम / रोषणाई बघायला आम्ही मुली मुली जेव्हा जात असू तेव्हा फार मोठा पराक्रम केल्यासारखे वाटे. धुळीने माखलेल्या होम मैदानात ही आतषबाजी चालायची. कोणीतरी हिरेमठ म्हणून गुरुजी होते ते भन्नाट निवेदन करायचे. मराठी आणि कन्नड मिश्रित. Happy खूप हसू यायचे त्याचे. तिथेच बसून कोरडी भेळ , प्रसादाच्या रेवड्या किंवा तत्सम काहीतरी तोंडात टाकायचे. आणि परत घरी येताना तळ्याच्या काठाने, किल्ल्याच्या कडेने यायचे. इतर वेळी दिवसा देखील त्या तलावाच्या बाजून येताना भीती वाटायची पण जत्रेमुळे त्या दिवसांत रात्री पण खूप गर्दी असायची.

आयुष्य खूप छान, साधं आणि सुखी होतं तेव्हा असं आता वाटतं!! Happy

अवांतर प्रतिसाद आहे. फोटो उत्तम आहेत यात शंकाच नाही.

धनश्री, मस्त आठवणी आहेत. माझ सासर आहे सोलापूर, म्हणून पहिल्यांदाच आलो या यात्रेला.

>>मग भाग्यश्री चिवडा आणि बटाटावडा, उसाचा रस, पाळण्यात बसणे, बांगड्या-टिकल्या असली आलतू फालतू खरेदी, फोटो काढणे, मौत का कुवा, गाढवाचे शो, जादूचे शो असले करमणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम<< हे सगळं होतं याही वेळी Wink

>>आयुष्य खूप छान, साधं आणि सुखी होतं तेव्हा असं आता वाटतं!! << +१

धन्स सर्वांना. Happy __/\__

धने... हिरालाल -पन्नालाल्.....धमाल लिहिले आहेस आणि नॉस्टॅल्जिक पण.
रंगासेठ, फोटो अप्रतिम. आम्ही माहेरवाशिणी सोलापुरच्या, या नात्याने आपण आमचे भावोजी. आम्च्या ताईला नमस्कार सांगा.....

ते भन्नाट निवेदन करायचे. मराठी आणि कन्नड मिश्रित. खूप हसू यायचे त्याचे. >>+१११
मी पण सोलापूरची. धन्यवाद रंगासेठ घरबसल्या गड्डा दर्शन घडविल्याबद्दल...

>>कोणीतरी हिरेमठ म्हणून गुरुजी होते ते भन्नाट निवेदन करायचे. मराठी आणि कन्नड मिश्रित. खूप हसू यायचे त्याचे<< अर्रे होय, ते होते याही वेळी. अर्थात आम्ही टीव्हीवर लाइव पाहिलं, एकदम मजेदार होते ते. गड्ड्यात हुरडा खाल्ला, पाळण्यात बसलो, काही बाही विकत पण घेतलं. Wink

सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण यात्रेला अतिशय शिस्त होती, कुठेही गोंधळ जाणवत नव्हता, महिलांना त्रास होणे, गर्दीत गोंधळ / हुल्लडबाजी करणे असा प्रकार निदान मला तरी आढळला नाही. हे कौतुकास्पद वाटलं मला.

Pages