बालि सहल - एक झलक

Submitted by दिनेश. on 20 January, 2014 - 22:21

या महिन्यात, बालि ( BALI ) ला ५ दिवस गेलो होतो. ५ दिवस खुप भटकलो. त्याची फक्त एक झलक.

१) विमानातून उतरल्यावर थेट हॉटेलवर न जाता, तनाह लॉट या देवळाला भेट दिली.

२) बेनोआ भागातल्या आमच्या नोव्होटेल हॉटेलच्या रुमचा व्हरांडा

३) त्या भागतल्या एका हॉटेलच्या प्रवेशद्वारावरचे देखणे शिल्प

४) हॉटेलमधेच सादर झालेला फायर डान्स

५) हॉटेलमधली देखणी ऑर्किड

६) एक रम्य सकाळ

७) या खास जागी ५०,००० रुपियांना एक कप या दराची अप्रतिम कॉफी प्यायलो

८) एका तळ्याकाठचे देऊळ

९) बोटॅनिकल गार्डनमधले एक दृष्य

१०) स्नेक स्कीन फ्रुट

११) कोण आलंय मला बघायला ?

१२ ) शू , कोण आवाज करतंय ? झोप मोडली ना !

१३ ) एक रम्य संध्याकाळ

१४ ) स्पेसशिप ????

१५ ) डिझायनर कासव

१६ ) हे काय असू शकेल ?

१७ ) माझ्या कल्पनेतल्या परफेक्ट देवळाचा परिसर

१८ ) सिंगापूरच्या विमानतळावरील नेहमी भरभरून फुलणारी ऑर्किड्स

हि फक्त झलक बरं का, अजून बघायचेत का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत सगळेच फोटोज....पहिला खूप जास्त आवडला.. त्या पाण्यातल्या देवळात जायच्या पाणरस्त्यावर सेफ आहे का? फोटोत लोकं उभे दिसताहेत म्हणून जरा जास्त कुतुहल वाटतंय.

मस्तच फोटो सगळे. तो हिरवा आधी हरणटोळ वाटला, नंतर लक्षात आले की हे महाराज फारच गबदुल दिसताहेत.

बाली फोटोत खुप सुंदर दिसतेय्

मस्त आहेत सगळेच फोटोज....पहिला खूप जास्त आवडला.. त्या पाण्यातल्या देवळात जायच्या पाणरस्त्यावर सेफ आहे का? फोटोत लोकं उभे दिसताहेत म्हणून जरा जास्त कुतुहल वाटतंय. >>++१११ कसे जातात देवळात ??

हा धागा वर काढतेय.
एका मैत्रिणीचे सहकुटुंब बालीला सहल करण्याचे ठरते आहे. तिच्यासाठी काही माहिती हवी आहे.. इथे कोणी ही trip केली असेल तर मला Please विपु करा.
साधारण 1 आठवडा ते चौघे जाणार आहेत. हॉटेल व्यावसायिक कार बुकींग पुण्यातूनच आधी करावे की तिथे जाऊन केले तरी मिळेल?
दिवाळीत जाणार आहेत तर तिथे हवामान फिरण्यायोग्य असते का?

Pages