बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला खरंच की काय सायो? आम्ही आपले जुनेच कपडेबिपडेबुटंबिटं घालून जुन्याच ब्यागाबिगा घेऊन येणार Wink

सिंडीवर विशवास ठेवू नका कोणी, आयत्यावेळी फेअरी गॉडमदर तिला काचेच्या बुटांपासून ते गाडीवानासकट नवी गाडी वगैरे देईल. तुम्ही बसाल २०१३ च्या स्टाइल वाल्या बॅगा / बूटं घेऊन Proud

सायो, जमेल तुझं. वृंदाताईंना कधी नाही म्हणतात होय. आता मला रात्रभर स्वप्नात शरलॉक तिळाच्या वड्या खाताना दिसणार. दोन्ही आउट ऑफ रीच Proud

सिंडे, आउट ऑफ रीच म्हणूनच मजाय ना Happy नाहीतर जिटिजी ला वगैरे आले कम्बरनाथ तर त्यांना कोण विचारेल Lol

इतका उशीर झाला तरी मी लिहितो आहे. कारण तुम्ही जरी १२:३० ची वेळ दिली असली तरी मला १ वाजेल येइस्तवर. तुम्हाला कंबरवाल्याची पूजा आरती करायची असेल तर करून घ्या. माझ्या साठी थांबू नका. प्रसादहि नाही ठेवलात तर बरेच.

माझी खात्री आहे की एरवी १२ म्हंटले की १, १:३० वाजेस्तवर सावकाश उगवणारे लोक उद्या सकाळी दहा वाजल्यापासूनच तिथे पूजेची तयारी, डेकोरेशन वगैरे करायला येतील. तेंव्हा मी येईपर्यंत सगळे आटोपले असेल.

झक्की, प्रसादाला चहा मिळणार आहे. नाही म्हणु नका Happy

बुवा, आमच्या चिल्लर पार्टीने टांग दिलेली आहे. मी एकटीच येतेय.

म्हणजे? आता रद्द का ए. वे. ए. ठि.?

स्वाती_आंबोळे यांनी फोन केला तेंव्हा मी हो म्हणून गेलो नि नंतर दोन दिवस घरी भांडणे करून कशी बशी परवानगी मिळवली!
रद्द ठरले तर फोन करून सांगेल का कुणि कृपया? ९७३-५८४-५९२३. धन्यवाद.

झक्की, अहो फक्त चिल्लर पार्टीबद्दल म्हणत होतो. मी येणार आहे. इतरही येणार आहेत. घाबरु नका, गाडी साफ करायला घ्या. Happy

मज्जा आली. चनसने वृत्तांत लिहावा व त्यात बाराकरांबद्दल चार गोड शब्द येऊ द्यावेत अशी आग्रहाची विनंती Happy

ह्यावेळचा गटग काऊंट, फॉर्मॅट एरवीपेक्षा खूपच वेगळा होता. तरी मजा आली.
बुवा, कम्बरपूजेच्या प्रसादाचे फोटो टाका.

मी मगाशी फोन वरुन फोटो आपलोड करायचा प्रयत्न केला पण जमलं नाही, फोटो साईज खुपच जास्त होती. थोड्या वेळानी डकवतो.
लोकं कमी असले तरी मजा आली. मला कंबरकन्नियांनी बॅटल ड्रेस मधली आयरीन अ‍ॅडलर दाखवून फेफरं आणलं. पाकिटात बायकोचा फोटो होता म्ह्णून वाचलो. ते सोडून बाकी सुरक्षित पणे पार पडलं गटग.

चनस, माझाही आशिर्वाद घे.

मला कंबरकन्नियांनी बॅटल ड्रेस मधली आयरीन अ‍ॅडलर दाखवून फेफरं आणलं. पाकिटात बायकोचा फोटो होता म्ह्णून वाचलो >> काहिहि थापा... Rofl

आजच्या मिनी गटगचा छोटासा वृतांत -
हजर लोक - वृंदाताई आणि त्यांचे मिस्टर (इथुन पुढे मि. वृं), मैत्रेयी, स्वाती आणि आदित्य,सायो,सिंडरेला,वैद्यबुवा .. मग झक्की ( सेलेब्रेटि लोक शेवटी येतात म्हणे :फिदी:)

पुर्व सुचना - प्रत्येक हजर व्यक्तीने खालील मजकुर वाचताना आपल्या नावाला .. ताई,दादा, वहिनी,काका, काकु, आजोबा यापैकी एक विशेषण लावुन घ्यावे ही नम्र विनंती .. मी सगळ्यात लहान होते ना तिथे म्हणुन ..

आज सकाळी शार्प ८:४५ला मला एक फोन आला जो मी मिसला .. नंतर रिडाअल केल्यावर एक गोड आवाज आला .. तो वृंदाताईंचा.. ११ वाजेपर्यंत तुझ्याकडे पोचतोय मग मैत्रेयी कडे जायचयं असं ठरलं.. वृंदाताई नि त्यांचे मिस्टर वेळेतच आले .. मैत्रेयीला घेवुन आमची साउथची बस ११:१५ला निघाली.. पण तेवढ्यात मैत्रेयीचा ब्ल्यु स्कार्फ राहिला म्हणुन गाडी रिव्हर्स घेवुन परत घरापुढे थांबली .. एकदाचा ब्ल्यु स्कार्फ मिळाला मग निघालो सगळे .. हिंदी रेडिओ लावायचा प्रयत्न केला पण आ आन्टे गाणं नव्हत म्हणुन डान्सचा चान्स राहिला Sad .. मग जीपिएस काकुंच्या कृपेने थोडं मागे पुढे होवुन आम्ही अगदी शार्प १२:२८ ला अमिया रेस्तराँला पोचलो .. तर आमचा पैला नंबर ..बाकी कोणीही आलं नव्हतं.. पण तरीही पेढे वाटले नाहित कारण समस्त मंडळींना असं वाटत की मैत्रेयी आज इतक्या लवकर गटगला आली ही गोष्ट माबो बारा गिनीज बुकात नोंद व्हावी Proud .. नंतर हळुहळु सगळी मंडळी वर सांगितल्या प्रमाणेच क्रमाने हजर झाली.. हाय हॅल्लो करुन थोड्याशाच गप्पा सुरु केल्या .. मी कोल्हापुरचा नकाशा सांगितला नि मग माझं घर.. हुश्श!!
नंतर झक्की काका आले एकदम कोट नि हॅट घालुन .. आम्ही सगळे आदराने लवुन (उठुन) त्यांना मानाचा मुजरा केला .. त्यांचे आशिर्वाद मिळाल्याने माझी ही उसगावची वारी आताच सार्थक झाली( ओबामा भेटायला येतो म्हणाले तरी मी त्यांना नाही म्हणेन!!)
गटगचे प्रमुख आतिथी आल्याने आम्ही लगेच खादाडीच्या टेबलाकडे निघालो .. भरपुर ऑप्श्नस असल्याने सगळे तुटुन पडले .. आणि त्यात दोन गट पडले .. १ कम्बरनाथवाले - स्वाती,सिंडी,सायो, मै नि आदित्य, वृंदाताई .. २ रा - मी, वैद्यबुवा (चुकुन नाथ असा टायपो झाला असता :फिदी:), झक्की नि मिस्टर वृं...
पहिल्या गटाचा विषय बहुतेक शेरलॉक नि कम्बरनाथांचा होता .. पण झक्कींनी पहिला बॉल टाकला की माझी ही कितवी उसगावची ट्रिप आहे ? अजुन एक गुगली की मला बघुन त्यांना भारत मॅट्रिमोनीची अॅड आठवली Uhoh नंतर मग नेहरु-गांधी ते राहुल गांधी , भारतातल्या समस्या वगैरे गोष्टीवर गप्पा सुरु झाल्या .. मि.वृं नी त्यांच्या लहानपनी नेहरु नि जॉन केनडी यांना अगदी जवळुन बघितल्याचे , नंतर राजीव गांधींना प्रत्यक्ष भेटुन हस्तांदोलन केल्याचे सांगितले .. मग एक राजीव गांधींची उसगावच्या शो मधली मुलाखत सांगितली.. आता त्यांना राहुलचा ही मुलाखत बघायचा आहे पण मी त्यांना निगेटिव्ह रिव्ह्यु दिला आहे (कोणीही भांडायला येवु नये प्लीजच) ..
मग झक्कींना अचानक बायकोच्या कॉलची आठवण आली नि ती घरी घेणार नाही म्हणत म्हणत अजुन अर्धा तास थांबले :).. आम्च्या गप्पांची गाडी भारतावरुन घरगुती समस्यांवर पोचली .. मग झक्कींच्या सुपर बॉलच्या गेम वरुन एक कॉमन चर्चा दोन्ही गटांनी मिळुन केली.. तोपर्यंत सगळ्यांची जेवणं , डेझर्ट खावुन झाले (उगाच आमच्या पोटात दुखु नये म्हणुन मेन्यु देत नाहीये .. क्षमस्व!)
हॉटेलवाल्यांनी पंण त्यातल्या त्यात बरा दिसतोय म्हणुन बिल वैद्यबुवांना आणुन दिले .. बिलाचा घोळ आवरुन नि झक्कींचा निरोप घेवुन आम्ही सगळे स्वातींच्या घरी गेलो .. चिमुकल्या गौरीने अगदी क्युट स्माईल दिल्यावर सगळे खुष झाले .. थोडावेळ तिच्याशी खेळण्यात नि लाड करण्यात मस्त गेला Happy
नंतर मैत्रेयी नि सायो ने वंदनाबेनना भेटायचे म्हणुन कल्टी मारली ते त्या ३ ला सुरळीच्या वड्याऐवजी ढोकळा घेवुन परतल्या.. स्वातीने मस्त चहा केला नि स्नॅक्स म्हणुन वृंदाताईंच्या तिळाच्या वड्या , काजु चिक्की (ज्याला आम्ही पामरांनी शेंगदाण्याची चिक्की समजली Sad ) , सिंडीच्या तिळ वड्या नि नानकटाई , मखाणे , चकली होते .. मग कम्बरनाथाची प्रार्थना आदित्यने सीझन २ लावुन सुरु केली नि आम्ही प्रसाद घेतला.. (बुवा प्रसादाचा फोटो टाका हं प्लीज).. कम्बरनाथ अगम्य ब्रिटिश भाषेत प्रवचन देत होते .. शेवटी कंटाळुन वैद्यबुवाच घरी निघाले .. प्रवचन पॉज करुन आम्ही त्यांना बाय केलं .. अगदी तल्लीन होवुन त्यांच्या ३ पट्टशिष्या - स्वाती,सिंडी नि मैत्रेयी ऐकत/बघत होत्या .. तरीही मि. वृं ना डुलकी आलीच!
सिंडी नि आदित्यने कम्बरनाथांची फुल्ल जीवनगाथा सांगितली आणि शेवटी एकदाच प्रवचन संपल .. (बरं झाल झक्की चहासाठी नाही थांबले ते)

टाटा बाय बाय नि पुन्हा ८ मार्चला भेटायच ठरवुन आम्ही स्वातीचा निरोप घेतला .. जीपिएस काकुंना जाग करुन घरी पोचलो आरामात ..

सगळी कम्बरनाथांची कृपा! Happy Wink

बाराकर माझ्या नजरेतुन ..
वृंदाताई नि मि. वृ - अतिशय गोड कपल! अजिबात ओळख नसुनही मला न्यायला आले ... २ मिनिटात अगदी त्यांच्या घरात घेतले आणि प्रेमाने अगदी आईबाबांसारखी सगळी विचारपुस केली .. मि. वृं पहिल्यांदा थोडे कडक शिस्तीचे असतील असं मला लुक वरुन वाटल .. पण अगदी विरुध्द आहेत ते Happy
मैत्रेयी -- अतिशय बडबडी नि प्रचंड उत्साही..
सिंडी नि सायो - त्यांनी आल्या आल्या ओळख परेड दिली नाही .. त्यामुळे मी सिंडीला सायो नि सायोला सिंडी समजत होते ..
सायो सोबत जास्ती बोललेच नाही पण गोड आहे दिसायला .. हो तिला गुजराथी क्लासेसची गरज आहे त्यामुळे माहिती असेल तर तिलाच कळवा Proud
सिंडरेला अगदी नाजुक आहे नावाप्रमाणे .. अगदी तोलुन मापुन व्यवस्थित बोलते .. Wink
स्वाती नि फॅमिली - सगळेच मस्त .. घरही खुप आवड्लं मला .. Happy
वैद्यबुवा - मी इमॅजिनल की असतील कोणीतरी सिनिअर सिटिझन्स पण चक्क नाही!! मराठी बोलले की बुवा नि उसगाव अॅक्सेंट मधे अंकल वैद्य हा फरक आहे Proud
झक्की - अगदी सेलेब्रेटी! Wink .. मी घाबरलेच होते पहिल्यांदा बोलताना (उगाच विकेट पडायची!) पण ते अगदी आरामात, मजेत बोलत होते..
मला खुप बरं वाटल सगळ्यांनाच भेटुन .. मज्जा आलीच .. Happy

( हायला.. मिनी म्ह्णता म्हणता बरचं लिहलं आहे मी .. जर काही चुकुन राहिले असेल तर प्लीज अॅड करावे .. चुकले असल्यास माफ करावे .. नि म्या पामराला आपल्याच कळपात ठेवावे ही विनंती )

>>हॉटेलवाल्यांनी पंण त्यातल्या त्यात बरा दिसतोय म्हणुन बिल वैद्यबुवांना आणुन दिले ..
अरे देवा! Lol

काल झक्कींनी फारसे सिक्सर हाणलेले दिसत नाहीत.

>>मला कंबरकन्नियांनी बॅटल ड्रेस मधली आयरीन अ‍ॅडलर दाखवून फेफरं आणलं. पाकिटात बायकोचा फोटो होता म्ह्णून वाचलो >> काहिहि थापा...

कैच्याकै ! मागच्या गटगच्या वेळी तुमच्या पाकिटात कंगना राणावत चा फोटो होता.

नाही, मी कम्बरनाथ गटात अजिबात मोडत नाही, या बायांच्या नादाने आवडून घ्यायचा प्रयत्न केला पण अजून 'तसं' काही वाटत नाही हे मी नम्रपणे कबूल करते.

पुढच्या वेळी खमण ऐवजी खांडवीच ऑर्डर करण्यात येईल.

वृत्तांत लिहून तू जा आणि ख गटगला यायला एलिजिबल आहेस हे सिद्ध केलंस चनस.

Pages