राजहंसाचे चालणे... अर्थात, आणखी एक ब्लेग

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज एकदम जाणवलं की माझे इथे बरेच ब्लेग्स झालेत. ज्या ब्लॉगमध्ये वाचकांकडून काही माहिती मागितली जाते, वाचकांचा सहभाग हा प्रतिक्रियांपेक्षा जास्त अपेक्षित असतो त्याला ब्लेग म्हणतात (blog that begs). जुनी सवय. तर आणखी एक ब्लेग.
असे म्हणतात की हेमिंग्वेने एक अतिलघुकथा लिहिली होती : "For sale : Baby shoes, never worn." सहाच शब्द, बस्स ! त्याच्या सर्वोत्तम साहित्यात ती गणली जाते म्हणे.
तेव्हा 'राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?' या न्यायाने आपणही असे काही लिहावे असा विचार आला. तेव्हा हा ब्लेग आपल्या सर्वांच्या अतिलघुकथांसाठी Happy खाली तुमच्या अ.ल.क. लिहा. शक्यतो एका ओळीपेक्षा मोठी नसावी एवढीच अपेक्षा. म्हणजे हे थोडेसे गद्य हायकूसारखे होईल. सुरूवात माझ्या दोन प्रयत्नांनी करतो.

विषय: 
प्रकार: 

सोप्प आहे ते. दाब हे बटन.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

सांग ना गोष्ट. मी नाई जा.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

एक होतं पोष्ट. झाली आमची गोष्ट
(अर्थात ढापलेली)
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं

ही पण मराठीतली अलक होईल ना?

माझी पण एक अलक...
भुक, बाराची वेळ, कँटीन, भुकच... मेलेली
~~~~~~~~~

पाऊस, शेकोटी, ओकार्‍या ............ Happy

ओकार्‍यांचा आवाज ऐकताच तिची आई ओरडली, कलमुही !'

( हा शेकोट्या,ओकार्‍याचा सिक्वल)

मिनु, तुझी अकल वाचायच्या आधिच मी तशी एक अकल तयार केली होती व ती इथे नोंदवायलाच आलो होतो:

तो आला, त्याने पाहिले, तो गांगरला.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

ही स्लार्टी आणि पूनमची एकत्रित पोस्ट अलक म्हणुन चालु शकेल का? Proud
६ शब्द हवेत म्हणुन शेवटचे ३ मी टाकतेय
अण्वस्त्र, अणुवस्त्र, विवस्त्र - धुम धडाम ढिशक्यांव.
किंवा
अण्वस्त्र, अणुवस्त्र, विवस्त्र : पाक, मल्लिका, राखी. ( सगळे शब्द स्लार्टी आणि पूनमच्या पोस्ट मधुन साभार)

माझी एक ..
गुलमोहोर , कविता , आत्मक्लेश ..

दिप, Lol

मुंबई रायट - णवकवीं (आणि कवितां)चे पीक - कुरघोड्या...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

'तो गांगरला' Happy
रुनी, सहाच शब्द पाहिजेत असा नियम नाही, मोठी लिहू शकतेस Happy
विवस्त्र, अणुएवढी वस्त्र, अण्वस्त्र, विवस्त्र : चक्र पूर्ण झाले. ब्रह्माने कपाळावर हात मारला... कदाचित !
चौथ्या महायुद्धात सर्व बाजूंचे मिळून ४ नर, ५ माद्या मारले गेले. दोन झाडे भुंडी झाली.

    blackribbon1.jpg

    या काही कथा ..

    १. टॉम आणि जेरी
    २. सातच्या आत घरात!
    ३. सातच्या आत घरातच करू !
    ४. बारानंतर बाहेरच !
    ५. बारानंतर 'बाहेरचं '!

    नजरा मिळाल्या....... लग्न झालं......... वाट लागली!!!

    हुशार आणि देखणी बायको!!!....... साफ चुक!!!

    प्रयोग सुरु आहे. सभाग्रुह प्रेक्षकान्नी भरलय, आणि सापाने गॉगल लावलाय..
    Lol

    समीर, तुला '... सापाची जीभ पोळली आहे' असे म्हणायचे आहे बहुतेक Happy

      blackribbon1.jpg

      शिकार अर्धवट सोडून तिच्या मधुर सुरांचा मागोवा घेत समोर आलेल्या राजपुत्राकडे निष्प्राण नजरेनं पहात तिने विचारले, "कोण? कोण ते?" आणि तिचं भाग्य आल्या पावली परत फिरलं!
      थोडी मोठी पण "एक वाक्यी" कथा.....एकश्लोकी भागवता सारखी!!!

      १. जागतिक मंदी: आमचा वाणी काल रेशनच्या रांगेत भेटला.

      २. वैचारीक मंदी: >>मिनु, तुझी अकल वाचायच्या आधिच मी तशी एक अकल तयार केली होती व ती इथे नोंदवायलाच आलो होतो
      Happy
      ३. साहित्त्यीक मंदी: या पानावर हितगुजकर भेटतात

      दिवे घ्या ~

      exactly............ "मूळ" पोस्ट ही वाच..:)

      सत्यम "एव" जयते! Happy
      "कुणी नोकरी देता का? नोकरी!!!! Wink Sad

      पुणे तेथे बरेच काही उणे
      सत्यम शिवम सुंदरम!
      सपनो से भरे नैना... ना नींद है ना चैना Happy

      slumdog millionaire
      हे चोरीचे म्हणता येइल पण या कल्पनेमधे एकदम perfect बसतेय असे वाटले म्हणुन लिहिलेय.

      वाल्याचा वल्मिकी झाला

      स्लार्ट्या धाव !
      काय एकेक अलक येतायेत बघ Proud
      -----------------------------------------
      सह्हीच !

      Lol Lol

      हे सही आहे !

      'एक म्हातारी होती; ती लहानपणीच वारली!'

      (कुठेतरी ऐकली आहे!)

      हा प्रतिसाद 'स्पॅम' मध्ये येतोय का अ‍ॅडमिन? काल 'पुण्यातलो गटग' या बीबीवरही दोन-तीन प्रतिसाद स्पॅम कॅटेगरीमधले वाटत होते. काय प्रकार आहे?

      Pages