राजहंसाचे चालणे... अर्थात, आणखी एक ब्लेग

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज एकदम जाणवलं की माझे इथे बरेच ब्लेग्स झालेत. ज्या ब्लॉगमध्ये वाचकांकडून काही माहिती मागितली जाते, वाचकांचा सहभाग हा प्रतिक्रियांपेक्षा जास्त अपेक्षित असतो त्याला ब्लेग म्हणतात (blog that begs). जुनी सवय. तर आणखी एक ब्लेग.
असे म्हणतात की हेमिंग्वेने एक अतिलघुकथा लिहिली होती : "For sale : Baby shoes, never worn." सहाच शब्द, बस्स ! त्याच्या सर्वोत्तम साहित्यात ती गणली जाते म्हणे.
तेव्हा 'राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?' या न्यायाने आपणही असे काही लिहावे असा विचार आला. तेव्हा हा ब्लेग आपल्या सर्वांच्या अतिलघुकथांसाठी Happy खाली तुमच्या अ.ल.क. लिहा. शक्यतो एका ओळीपेक्षा मोठी नसावी एवढीच अपेक्षा. म्हणजे हे थोडेसे गद्य हायकूसारखे होईल. सुरूवात माझ्या दोन प्रयत्नांनी करतो.

विषय: 
प्रकार: 

सरिता, त्या ३ मलाही फार आवडल्या. मी एक सांगायचे विसरलो. या सर्व कथा ६ शब्दी आहेत, मासिकाने मुद्दाम तशा मागवल्या, हेमंग्वेच्या कथेच्या धर्तीवर.
जाता जाता, ऑर्सन स्कॉट कार्ड या माणसाची Ender पुस्तकमालिका वाचलीये का ? निदान पहिली २ - Ender's Game आणि Speaker for the Dead . या दोन्ही उच्च दर्जाच्या विज्ञानकादंबर्‍या आहेत. (ह्युगो आणि नेब्युला ही विज्ञानकथांमधली नोबेल या पुस्तकांना मिळाली आहेत.)

    blackribbon1.jpg

    स्लार्टी, तुझी ही पुस्तकं मिळवण्याची ठिकाणं आधी सांग पाहू.. म्हणजे शोधून वाचता येतील आणि कधी कधी लेखकाचे नावं मराठी मधे लिहिलं की त्याचं पुस्तक गूगलवर शोधताना आपण जे स्पेलींग करतो ते चुकीच असतं आणि मग ते पुस्तक सापडता सापडत नाही.. अर्थात त्या पुस्तकाबद्दलची माहिती. तेंव्हा एक सुचना अशी की मराठीमधे लेखकाचे नाव अवश्य लिहा पण सोबत कंसात जर ईंग्रजी मधे नाव लिहिलं तर उत्सुक व्यक्तीला पुस्तकाचा शोध घेणे सोपं जातं. अनंत धन्यवाद!!!!!

    पण शब्दांशिवाय कथा म्हणजे हे अतिनवअतिलघुकाव्य होईल.>> हे कसे वाटतय बघ. मी फक्त शब्द जोडतोय.

    कोहम ? अहम ब्रह्मासी ! कोहम ?

    हे छान आहे. ते अगदी मूलभूत असे प्रश्नचिन्ह होते तर... फक्त ब्रह्मासी नाही, ब्रह्मास्मि पाहिजे. (बाकी ते वर लिहिलं ते माझं मत रे. मी तज्ज्ञ नाही :))
    .
    ती उठून उभी राहिली. कळप पाहत होता. ती ताठ कण्याने चालू लागली. पाहता पाहता ती उत्क्रांत झाली.

      blackribbon1.jpg

      त्याचा कटाक्ष, तीचं लाजणं, ट्यॅहॅ ट्यॅहॅ ट्यॅहॅ.. Proud (हिंदी चित्रपटाची अलक)

      प्रश्ण संपले, बी सुटला, दिवा घे. Proud

      स्लार्टी, अरे माझं इंग्रजी वाचन फार म्हणजे फार कमी आहे रे. आता ब्रिटीश लायब्ररी जॉईन करतेच.. चिन्मय ऐकत नाहीये नं? हे मी त्याला १५ दिवसांपूर्वीच ऐकवलं होतं Happy

      मृण तुझं वाचून आता मला राहवेना बघ Happy

      "पाऊस, शेकोटी, ओकार्‍या" Proud
      --> (७०-८० दरम्यान्च्या असंख्य हिन्दी चित्रपटांची अ ल क)!!

      >>>>>"पाऊस, शेकोटी, ओकार्‍या" Lol

      मृ, मै, Lol
      स्लार्टीने सांगितलेल्या ६ शब्दांऐवजी तुम्ही ३च शब्द वापरुन अअलक नावाचा नवीन भन्नाट प्रकार काढलात.

      माझा बहुदा फसलेला प्रयत्न -

      यश. माझ्या प्रयत्नांचं फल. आणि आत्मा?? हरवला..

      They baptized him on deathbed; world changed.
      - Kedar Joshi

      They will come again. Beaware -For your life. I lost mine.
      - Kedar Joshi

      केदार,
      दुसरी मस्त..
      .....
      An eye for an eye makes the whole world blind.

      रुनी, त्यांना आपण मायक्रो किंवा नॅनो अलक म्हणु यात! Proud

      चिन्मय धन्यवाद. तू जागाच का? अरे पहिलीला पण खुप मोठा इतिहास आहे.

      चिन्मय धन्यवाद. तू जागाच का? बापरे... !!

      ही पण एक छान अलक होईल.. आणि ह्याला पण नजिकचा इतिहास आहे.. Proud

      चिन्मय केदार दिवे घ्या.. Happy

      केदार, तुझेच शब्द वापरुन -
      तू का जागा? तू जागाच का?
      Happy

      तो स्लार्टी मारेल तूम्हाला. हा बाफ वाहता नाही. Happy

      होय. मी अजून जागाच...!!!

      ही अलक होईल का?:)
      .....
      An eye for an eye makes the whole world blind.

      धाव धाव रे स्लार्टी आता (ही अलक नाही) Happy

      होय! मी अजुन जागाच, कावळा शिवेपर्यंत!!

      चिन्मय Happy हो होईल ना.. अजून एक शब्द घालतो..

      होय. मी अजून जागाच...!!! उगाच???

      असो.. खरय हा वाहता बा.फ. नाही.. आवरायला हवं.. Happy

      >>होय. मी अजून जागाच...!!!

      >>ही अलक होईल का?

      नेमके कश्यासाठी जागे आहात ह्यावर अवलंबून आहे ते ! Proud

      होय! मी अजुन जागाच, कावळा शिवेपर्यंत!! >> बापरे. फारच बोल्ड स्टेटमेंट आहे हे.
      याचा अर्थ तूम्हाला तोच अभिप्रेत आहे का? की दुसरा.

      तोच कुठला आणि दुसरा कुठला? मेल्यानंतर पिंडाला कावळा शिवण्याबद्दल संदर्भ आहे तिथे.. थोडक्यात एका म्रुतात्म्याचे उद्गार आहेत ते. जोपर्यंत कावळा शिवत नाही,(अत्रुप्त इच्छा पुर्ण होत नाहित) तोपर्यंत मी जागाच. (श्या.. अलक समजवायला एक दी.क. लिहावी लागली.. म्हणजे फसलीच ती.)

      आयला ! लोक सुटलेच एकदम Happy ओकार्‍या... Lol
      केदार, दोन्ही छान आहेत, पण मराठीत लिही ना. पहिल्याला कॉन्स्टंटाईनचा संदर्भ आहे ना ? दुसर्‍यालाही काही ऐतिहासिक संदर्भ आहे का ?

        blackribbon1.jpg

        "या न्यायालयात निरपराध लोकांच्या मृत्यूचे कारण होण्याची शिक्षा मृत्यूदंडच ...", असे म्हणताना न्यायाधीशच खुर्चीत अचेतन होऊन कोसळले!!

        केदार, पहिलीला काय संदर्भ आहे ते सांग. दोन्ही खूप आवडल्यात.

        स्लार्टी -- दुसरीचा संदर्भ अगदी ताजा आहे. म्हणजे सध्या मुंबई वर पाकनी जो हल्ला केला त्याबद्दल केदारनी लिहिलं आहे. की ते परत येतीत, यावेळी तुमचे असतील, मी माझे प्रियजन आधिच हरवले आहेत.

        चू. भू . दे. घे.

        दिवस-रात्री एक करून - मी चंदसुर्य हरवलेत - तरीही आयुष्य करडेच राहिले.

        बरोब्बर बी. पण माझे प्रियजनच नाही तर "मी"च मेलो आहे. म्हण्जे कालचा मी व आजचा मी बदललेलो आहोत.

        स्लार्टी, आता दुसर्‍यालाही ऐतिहासिक संदर्भ लाभलाच म्हणायचा. दुर्दैवाने.

        पहिल्याचा संदर्भ - कोणे एके काळी युरोप वर पेगन्स (म्हणजे मूर्तीपुजा करनारे) लोक राहायचे. तेव्हां ख्रिश्चन धर्म प्रसार करन्यासाठी युरोप व मध्यपुर्वेत हल्ले करुन लोकांना बळजबरी ख्रिश्च्नन करुन घ्यायचे. एक मोठा पेगन असलेला राजा जेव्हा मरायला टेकला तेव्हा ह्या लोकांनी त्याचावर आक्रमन केले. हा हल्ला खुपच मोठा होता, त्याचात प्रतिकार करायची शक्ती न्हवती. तूम्हाला मारू वा तूम्ही धर्म बदला असा प्रस्ताव मांडला गेला. तेव्हा त्या मरनासन्न असलेल्या राजाने ख्रिश्चन धर्म स्विकारला व नंतर पुर्ण राज्य ख्रिश्चन झाले. तेव्हा पासून पेगन्स फक्त भारतातच राहीले. व जगात बद्ल खुप मोठा झाला. म्हणून तसे लिहीले.

        हो मराठीतच लिहेन पुढची. Happy

        Pages