भरतकाम - साडी आणि कुर्तीच्या बाह्या

Submitted by अश्विनी के on 21 October, 2013 - 01:30

१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच) Happy

फिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.
DSC_0071.jpgDSC_0074.JPG

ही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्‍यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.

DSC_0072.jpg

अजूनही बरेच ड्रेसेस आणि साड्या भरतकाम/पेंट केले होते पण आता शिल्लक नाहीत. होते तेव्हा फोटो काढून ठेवायचं सुचलं नाही. ह्या दोन गोष्टी अजून आहेत म्हणून तुम्हाला दाखवता आल्या. गोड मानून घ्या Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठेंकू Happy

मानुषीताई, तुमच्या पिशव्या पाहून मला परवा मोह झाला होता त्या फुल्ल भरलेल्या हातांची मस्त बॅग करावी म्हणून. त्यासाठीच ती खणाच्या तळाशी सांभाळून ठेवलेली कुर्ती बाहेर काढली होती. पण तेव्हा केलेली मेहनत आठवून फक्त फोटो काढून ठेवून दिली Happy

मस्त झाले आहे. सॅ टिन स्टिच माझा आवडता. ते अ‍ॅ़ करचे किट यायचे बघा. त्यात तोच लागतो. एकदा आणले पाहिजे परत. Happy

मस्तच दिसतय अश्विनी . तुझ्या हातात सफाई आहे. अजुन काही भरत काम केलं असशील तर टाक नं, तुझं बघुन मला सुध्दा उत्साह आलाय. परत भरतकाम करावसं वाटतय Happy

वा! काय सुंदर आहे. रंगसंगती,सफाई अप्रतिम! तुम्ही याच्या फ्रेम का नाही करत? छान दिसतील.

Pages