मोठ्ठी मोठ्ठी घरं, सारवलेलं अंगण आणि त्यावरची सुबकशी रांगोळी.. यथावकाश घरं आटोपशीर झाली, अंगणं हरवली, रांगोळीही काढण्या ऐवजी चिकटवता यायला लागली... पण रांगोळीची सुबकता कधीच कमी झाली नाही.
याच सुबकतेला माबोकरांसमोर मांडा आणि खेळा खेळ झब्बू रांगोळींचे.
नेमकं करायचंय काय? तर तुम्ही काढलेल्या, पाहिलेल्या,प्रसंगी बनवलेल्या देखील रांगोळींचे फोटोज इथे टाकायचेत आणि एकमेकांना झब्बू द्यायचेत.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय - रांगोळी
मामी रांगोळी मस्त्..कशी केली
मामी रांगोळी मस्त्..कशी केली सांगु शकाल? कोणती कोणती फुले आहेत त्यात? एकदम फिरंगी रंगसंगती आहे. आपली भारतीय गडद रंगांची नसल्यामुळे हटके वाटते आहे.
फुलांची रांगोळी -
फुलांची रांगोळी -
मामी धन्यवाद
मामी धन्यवाद
धन्यवाद!! पियु परी, फ्रीहॅन्ड
धन्यवाद!!
पियु परी, फ्रीहॅन्ड आहे !
(No subject)
Pages