पाऊस आवडत नाही

Submitted by रसप on 15 June, 2013 - 00:41

पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही

सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही

ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !

मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही

मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही

ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही

बन 'जितू' देव तू आता
माणुसपण सोसत नाही

....रसप....
१४ जून २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post_15.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखन नियमावली

नियम १६ : राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. रहाणे - राहाणे, पहाणे - पाहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना 'राहा, पाहा, वाहा' यांजबरोबरच 'रहा, पहा, वहा' ही रूपे वापरण्यास हरकत नाही.

@स्वातीजी,

'मैफल रंगत नसतांही' - हे चालू शकेल. पण 'नसतां' हे रुप, रचनेत वापरल्या गेलेल्या भाषेच्या भागाशी जुळेल का अशी शंका वाटते. तसेच, 'नसताना' असे म्हणण्यात मला स्वतःला प्रामाणिकपणे काही प्रॉब्लेम वाटत नाहीये.

--------------------------------------

@माशा जी,

तुम्ही सुचवलेले वृत्तात बसत नाही.

Pages