Submitted by रसप on 15 June, 2013 - 00:41
पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !
मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही
ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही
बन 'जितू' देव तू आता
माणुसपण सोसत नाही
....रसप....
१४ जून २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post_15.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाऊस आवडत नाही तो मनास भिजवत
पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही..........चांगला मतला....
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही......... व्वाह!!
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !....
मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही....वा वा !!
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही....
ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही....बढिया...
बन 'जितू' देव तू आता
माणुसपण सोसत नाही...
एकंदर चांगली गझल.
सगळ्यांनी रस्ता धरला दु:खाचे
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही
सु रे ख !!
खूप आवडली गझल.
सगळ्यांनी रस्ता धरला दु:खाचे
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही
मस्तं. नविन विचार.
Crisp आवडली.
Crisp
आवडली.
मी गझल करण्याचा नादच सोडून
मी गझल करण्याचा नादच सोडून दिलाय.....कारण त्यातून डझनभर चुकाच निघतात....मात्रा चुकल्यात, अर्थ चुकलाय....वगैरे वगैरे.... पण तरीही इतरांच्या वाचण चालूच ठेवलंय.
रसप,
गझल मस्त...आवडली.
जित्या असल्या गझला लिहित जाऊ
जित्या असल्या गझला लिहित जाऊ नकोस मला इन्फेरिअरिटि कॉम्प्ले़क्स येतोय
सगळे शेर भारी आजवरची तुझी सर्वात आवडलेली गझल
मैफल रंगत नसताना<< मी असताना असे करून वाचले कारण नसताना असे म्हणण्यामागचा नेमका अर्थ समजला नाही समजावून सांग !
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही.<<<<<, ए हा माझ्या मनातला शेर आहे परवाच्या कार्यक्रमानंतरचा ...तू कसा लिहिलास रे ?
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही<<<< या शेरासाठी ___/\___ !!!
कधीच विसरू शकत नाही मी हा शेर !!!!
वैभव, तिथे असे म्हणायचे होते
वैभव,
तिथे असे म्हणायचे होते की, मैफल कंटाळवाणी आहे पण तरी बसून राहावे लागते आहे. अर्ध्यातून उठून जायची इच्छा खूप होतेय पण तसे करता येत नाहीये.
धन्यवाद !
सगळ्यांनी रस्ता धरला दु:खाचे
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही << खूप छान >>
आवडली
वा वा वा उमदा गझल ! ती
वा वा वा
उमदा गझल !
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !...खल्लास रे !
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही...वा वा !
मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही.... साधा शेर गहिरा अर्थ !
सूंदर
सूंदर
छान गझल, दु:खाचा शेर मस्त
छान गझल, दु:खाचा शेर मस्त जमलाय!!
ती स्पष्टच 'नाही' म्हणते पण
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !
सुरेख!!!!
गझल फार आवडली. सर्वच शेर कमी
गझल फार आवडली. सर्वच शेर कमी जास्त पण आवडलेच. सहजतेत अर्थवाहीपण मस्त आलेले आहे. तुमच्या आजवर वाचलेल्या गझलेतील मला सर्वाधिक आवडलेली गझल ही आहे.
शुभेच्छा!
खूप सुंदर. सगळ्यांनी रस्ता
खूप सुंदर.
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही >> अप्रतिम.
नि:शब्द. आवडली.
नि:शब्द. आवडली.
एकूणच छान गझल. सगळ्यांनी
एकूणच छान गझल.
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही>>> अतिसुंदर!
कीप इट अप, पुलेशु.
छान. -दिलीप बिरुटे
छान.
-दिलीप बिरुटे
ती स्पष्टच 'नाही' म्हणते पण
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !
मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही>> क्लास अपार्ट !
सर्वांचे मनःपूर्वक आभार !!
सर्वांचे मनःपूर्वक आभार !!
व्वा…अतिशय सुंदर गझल
व्वा…अतिशय सुंदर गझल रणजित,
तुझ्याकडून अशा गझलेची मी कधीपासून वाट बघत होतो.
सगळी गझल सुरेख….
फक्त
'मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही'
या शेरात तुला अभिप्रेत असलेला अर्थ पहाता 'उठता येत नाही' अशी काहीतरी वाक्यरचना हवी.
'उठवत नाही' चा अर्थ 'मनाची उठायची तयारी नाही' असा होतो जो तुला अभिप्रेत नाहीये.
चुभूद्याघ्या.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अजून एक…… 'पाहत' असा
अजून एक…… 'पाहत' असा वापरलेला काफिया शब्द मूळ 'पहात' असा आहे का ?? का दोन्ही चालतं….
चुकल्यास जरूर सांग… शंका म्हणून विचारतोय …
चांगली गझल.
चांगली गझल.
थँक्स वैभव.. 'उठवत नाही' चा
थँक्स वैभव..
'उठवत नाही' चा अर्थ मला जो अभिप्रेत नाही, तो का होत नाही हे कळले नाही.
'पाहत' आणि 'पहात' हे दोन्हीही वापरले जातात. (कदाचित शुद्ध रुप 'पाहात' आहे आणि हे दोन्ही अपभ्रंश असावेत, पण दोन्ही प्रचलित आहेत नक्कीच.)
वैभवराव माझ्यासाठी कळीचा
वैभवराव माझ्यासाठी कळीचा असलेला मुद्दा उपस्थित केलात धन्स
......पहात आणि पाहत दोन्ही चालते
......पहाणे व पाहणे हेही चालते
..........पण पहा चालते तसे पाह चालत नाही अनेक लोकाना (मला चालते आणि मी गझलेत २-३ वेळा चालवलेही आहे )
तज्ज्ञांनी मत द्यावे अशी विनंती
शुद्ध रुप 'पाहात' आहे<<<१००% मान्य
___________________________________________
@जितू मैफिल चा शेर फार भारी आहे रे पण मला पहिल्या ओळीतून तुझ्या नेकक्या भावना कमी पोचत आहेत
मग मी हा शेर मनातल्यमनात असा वाचला तर चालेल का .....
मैफल रंगत नसते अन् (/पण)
अर्ध्यातुन उठवत नाही
न चालल्यास क्षमस्व !!
ती स्पष्टच 'नाही' म्हणते पण
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही >>> हे दोन शेर सर्वात विशेष.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर :
"पण पहा चालते तसे पाह चालत नाही अनेक लोकाना ......" >>> वैवकु. काहीसा संभ्रम निर्माण होण्यासारखे आहे हे.
" 'नव्हता' चालतो. मग 'व्हता' का चालत नाही ?" हे आठवले.
उकाका अजून विष्लेशण करून
उकाका अजून विष्लेशण करून सांगू शकाल का
व नंतर तुमचे काही निर्णायक मत असेल तर तेही स्पष्ट साण्गावे ही विनंती
चांगली गझल !
चांगली गझल !
वैवकु., मी काय मत देणार !
वैवकु.,
मी काय मत देणार ! तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा असे मलाही वाटते.
एक सामान्य माणूस म्हणून इतकेच मत देईन की
’पाह’ तितकंसं बरोबर वाटत नाही..... पण का वाटत नाही याचं उत्तर सांगता येत नाही.
म्हणूनच ’ती फुलराणी’ नाटकातील ’नव्हता’ ’व्हता’ची आठवण आली.
ऐकायला 'पाह' विचित्र वाटते.
ऐकायला 'पाह' विचित्र वाटते. त्यात सहजता वाटत नाही. म्हणून मी माझ्या कवितेत/ गझलेत असे रुप वापरणार नाही. ते शब्दकोषांच्या दाखल्याने किंवा जाणकारांच्या टिप्पणीने बरोबर असल्याचे सिद्ध झाले तरी..... कारण ते कानाला खटकते. तसे 'पहा' किंवा 'पाहते/ पहाते' हे खटकत नाही.
------------------------------------
'मैफल रंगत नसते पण'
- असेच केले होते आधी. पण का कुणास ठाऊक तो ओळिच्या शेवटी येणारा 'पण' आजकाल फार यायला लागला आहे, असे वाटले. तोडून टाकला त्याला !!
ते कानाला खटकते.<<<< मत मान्य
ते कानाला खटकते.<<<< मत मान्य त्याबद्दल आदर आहेच पण मला पाह हे अधिक टो़कदार व काळजात अधिक सहज रुतणारे वाटते (वैयक्तिक मत व स्वानुभव मांडला गैरसमज नसावा )
वृत्तात पहा असेच बसत असेल तर मी ही पहा असेच वापरतो अनेकदा

पाह हे मी तरी जाणून-बुजून वापरले नाही ते मला सर्वात आधी जेव्हा सुचले ते तसेच सहजच सुचले !! मग मी "अरे हे काय झाले "असा विचार करत करत माझ्या या प्रतिसादातील ठळक ओळीपर्यंत पोचलो /पोहचलो आहे
असो हा काही फार चर्वितचर्वण़ करण्याचा मुद्दा नव्हेच मुळी माझ्याकडून संपला बुवा आता!!
धन्यवाद जितू व उकाका
____________________________________-
तो शेर असा होता..................
नको देऊस आता यापुढे इस्लाह आयुष्या
तुझे ऐकून मी झालोय "वैवकु" पाह आयुष्या
पुनश्च धन्स
Pages