धुकं

Submitted by सई गs सई on 5 June, 2013 - 05:15

ओले मेघ उरी झुरती
फुटोनी कोसळाया;
वीज जणु शुभ्र होते
प्राणांना उजळाया..

सरी येती देत जाती
भिजण्याचे बहाणे;
पान फुल झाड हले
घालताती उखाणे..

कवेत घेती आज मला
पाझरत्या पाऊसधारा;
चिंब मनाचे रान झाले
वाऱ्यावरती मोरपिसारा..

विझून गेले ऊन जीवाचे
वैशाखाचा व्याकूळपणा;
मागती तरी धूळ माती
निळाईच्या स्वप्नखुणा..

- सई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म, मला वाटतंय आरती प्रभू जरा जास्तच वाचतेय मी आजकाल !
ती आर्द्रता शब्दांमधे तर नाहीच पण मनात हलकीशी उतरली असावी.. Wink