'सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गाणं रेकॉर्ड करायच्या आधी लतानं ते फक्त एकदाच ऐकलं होतं म्हणे. ऐन रेकॉर्डींगच्या दिवशी दुसर्या एका गाण्याचे रेकॉर्डींग लांबल्यामुळे त्या या गाण्याच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. पण तोपर्यंत तुम्ही हे गाणं दुसर्या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड करा (तात्पुरते म्हणून) असे त्यांनी संगीतकारांना कळवले. म्हणून मग ते रवींद्र साठ्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशी लता मंगेशकर रेकॉर्डींगला आल्या. तोपर्यंत त्यांनी हे गाणं किंवा त्याची चाल अक्षरशः एकदाही ऐकली नव्हती. आल्यावर त्यांनी ते गाणं आपल्या अक्षरात लिहून घेतलं. मग त्यांनी रवींद्र साठ्यांच्या आवाजातलं रेकॉर्डींग लावायला सांगितलं आणि एकाग्रतेने ऐकलं. ऐकताना कागदावरच्या ओळींवर खुणा केल्या. ते गाणे संपल्यावर रेकॉर्डींगला सुरुवात करण्यास सांगितले. एकाच टेकमध्ये गाणं ओके. पंधरामिनिटांपूर्वी पहिल्यांदा ऐकलेले गाणे एका फटक्यात उच्चार आणि स्वरांचे चढउतार, वाद्यांचा मेळ हे सगळं अचूक साधत इतक्या चांगल्या दर्जात केवळ लतासारखी महान माणसंच देऊ जाणं!
हा किस्सा परवा लोकसत्तेत वाचला आणि मला जुन्या मायबोलीवरच्या बीबीची आठवण आली - http://www.maayboli.com/hitguj/messages/34/45568.html
तो धागा इथं 'पुढे चालू....' ठेवू...
एखाद्या गाण्याच्या निर्मितीदरम्यान / निर्मितीनंतरचा किंवा त्या एखाद्या गाण्याच्या चालीशी संबंधित असलेला किंवा त्या गाण्याच्या अनुषंगाने त्याच्या संगीतकारांचा/गायकांचा/गीतकारांचा आपण वाचलेला/ऐकलेला असे किस्से लिहिण्यासाठी...
गजानन, इथे लिहिण्यासारखे नाही
गजानन, इथे लिहिण्यासारखे नाही कारण..
०००
लता आणि मन्ना डे चे, रितु आये रितु जाये सखी री, मन के मीत ना आये.. हे एकंदर चार रागातले गाणे पण असे १५ दिवस तालिम करुन, एकाच टेक मधे गायलेले आहे. ऐकलेले नसेल तर यू ट्यूबवर जरुर पहा.
इतके कठीण गाणे, असे गाणे म्हणजे किती मेहनत आहे, ते अगदी जाणवतेच.
इथे लिहिण्यासारखे नाही कारण..
इथे लिहिण्यासारखे नाही कारण.. <<<
दिनेश, ठीक आहे.
>>इथे लिहिण्यासारखे नाही
>>इथे लिहिण्यासारखे नाही कारण..>> असं म्हणून तुम्ही उत्सुकता खूप जास्त ताणलीये
Not fair!! 
वा! दोन अतिशय सुरेख
वा! दोन अतिशय सुरेख गाण्यांच्या आठवणींनी सुरू झालेला अप्रतिम धागा. गजानन, धन्स. छान माहिती वाचायला मिळेल इथे.
अप्रतिम लेख आहेत दोन्ही....
अप्रतिम लेख आहेत दोन्ही.... व गाणीतर!!!!!!!!!!!!!
मनापासुन हात जोडुन धन्यवाद दोन्ही लेखांबद्दल.
आज एका साईटवर शांता शेळके
आज एका साईटवर शांता शेळके यांच्या गीतांवरचा कार्यक्रम ऐकत होतो त्यातील हि एक आठवण.
"मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा" हे गाण लिहिल्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी शांता शेळके यांना सांगितल "डोलकर डोलकर" हा शब्द छंदबद्ध नाही आहे त्यामुळे चाल लावणं अवघड आहे. तेंव्हा शांताबाईंनी "ह्रदयनाथ अरे अवघड चाली लावण्यातच तर सगळं आयुष्य घालवलं, तुझ्या तोंडुन हे शोभत नाही" अशा कानपिचक्याही दिल्या. मग ह्रदयनाथ मंगेशकरांनी दिवसरात्र एक करून हि चाल बांधली. हेमंत कुमार सारख्या हिंदी गायकाकडुन हे गाण गाऊन घेतल आणि "डोलकर डोलकर" या गाण्यानी उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं.
गुलझार यानी सांगितलेली पंचमची
गुलझार यानी सांगितलेली पंचमची आठवण:
"मेरा कुछ सामान" जेव्हा पंचमला वाचायला दिली तेव्हा तो काहीसा चिडला आणि म्हणाला "हे काय गाणे आहे? उद्या तु मला टाईम्स ऑफ इंडियाचे फ्रंट पेज देशील आणि त्याला चाल लावायला सांगशील." तिथेच आशाताई बसल्या होत्या त्यानी "मुझे लौटा दो" ही ओळ गुणगुणायला सुरुवात केली..ती त्याने उचलली आणि त्या एका ओळीवरुन गाणे तयार केले. मला आणि आशाताईना त्या गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले. बिच्चारा! काम सगळे त्याने केले आणि "खीर" आम्ही खाल्ली.
http://www.loksatta.com/daily
http://www.loksatta.com/daily/20021228/lokviv4.htm
ह्या दुव्यावर 'गोरी गोरी पान' आणि 'एका तळ्यात होती' ह्या दोन गीतांच्या आठवणी...खुद्द खळेसाहेबांच्या शब्दात वाचा.
टीपः हा लेख कदाचित तुम्हाला वाचताही येणार नाही..कारण लोकसत्ता पूर्वी युनिकोड वापरत नव्हते...
मी अग्नीकोल्हा(फाफॉ) वापरतो....त्यात जर वरच्या मेनूमध्ये व्ह्यू-कॅरॅक्टर एनकोडिंग-मोर एन्कोडिंग्ज-वेस्टर्न युरिपियन(आयएसओ ८८५९-१) असे सिलेक्ट केलेत तर लेख नक्की वाचता येईल...इतर न्याहाळकासंबंधी(ब्राऊजर) मात्र मी खात्रीलायकपणे काही सांगू शकणार नाही.
मनस्मी, देवकाका धन्यवाद "ससा
मनस्मी, देवकाका धन्यवाद
"ससा तो ससा कि कापूस जसा" या गाण्याबद्दल गीतकार शांताराम नांदगावकर यांनी सांगितलेली एक आठवण - "अरूण पौडवाल एकदा एक सुंदरशी चाल घेऊन माझ्याकडे आला, चाल घेऊन म्हणजे हार्मोनियममध्ये मला एक छानशी चाल ऐकवली आणि म्हणाला, "चल या चालीवर आता एक प्रेमगीत लिही". पण त्या चालीमध्ये मला एक वेगळा वेग दिसत होता, एक वेगळी लय दिसत होती. त्याप्रमाणे मी अरूणला सांगितले कि याच्यात प्रेमगीत लिहिण्यापेक्षा आपण जर एक शर्यतीच गाणं लिहिलं, कारण त्यात परेडची (त्यावेळी मी एअरफोर्समध्ये होतो) जी लय असते, धून असते ती मला दिसत होती. मग आम्ही दोघे बसलो, त्याने ते गाणं पुन्हा वाजवून दाखवलं आणि मग एक एक ओळ त्या शर्यतीप्रमाणे पुढे सरकु लागली.....
"ससा तो ससा कि कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ, हि शर्यत रे अपुली"
सचिनदांची आठवणः: when it came
सचिनदांची आठवणः:
when it came to "Bada Natkhat hai Re Krishna Kanhaiyya", things took a different turn when his father, veteran music director, S. D. Burman intervened and asked Burman to redo the tune. Burman was given the brief of "usual bhajan situation" by Samanta, later as he was giving final touches to the tune, his father heard the tune, and asked for the precise description of situation. On listening to the situation, he expressed his dismay as not doing justice to the situation, as R.D. Burman recounted in a later interview, "But where's the composer in you in this tune, Pancham (Burman's nickname)?" and went on to explain, "..For Sharmila here is something more than the nautch-girl she plays. Her motherly instincts have been aroused by that kid. Your tune therefore must communicate all the agony of the nautch-girl wanting to be the mother she can never be. Do it again, your way, but with the moving human situation in mind." Thus R.D. Burman made a tune in Raga Khamaj, which Lata Mangeshkar too sang with marked emotional clarity and abandon, who is usually prone let her technical dexterity outshine. The song became a classic, and later Burman called it, "his best lesson in music" form his father.
मस्त किस्सा मनस्मि.
मस्त किस्सा मनस्मि.
मस्त किस्सा मनस्मि. >>>>>+१
मस्त किस्सा मनस्मि. >>>>>+१
बर्मनदांचा किस्सा मस्त आहे
बर्मनदांचा किस्सा मस्त आहे मनस्मि. धन्यवाद!
जिप्सी, मनस्मि, मस्त किस्से
जिप्सी, मनस्मि, मस्त किस्से आणि माहिती.
प्रमोद, तुम्ही दिलेली लिंक कोल्हेकुईमध्ये आयएसओ ८८५९-१ मध्ये देखील वाचता आली नाही..
Gulzar for the next movie
Gulzar for the next movie Mausam had situations for 5 songs. Madan Mohan used to give 4 to 6 melodies for every song for Gulzar .It was finally Madan Mohan’s instinct which decides which of that tunes will match best for the song situation. And Gulzar says that Madan Mohan was always right.
Gulzar was discussing the song situation for Dhil Doondta Hai and he found his style of composing unique. Madan would hum and compose the tune playing the notes in harmonium. While Gulzar is in the living room Madan Mohan will be going in between to kitchen to prepare the mutton dish.He used to add whisky to the gravy which he never reveals to the visitors.He would come out of the kitchen and would sing the tune. Gulzar will tell his comments .Madan will go back to the kitchen to rework on the composition, saying: "Let me see if I can come up with something else". This is how the sad and happy versions of this lilting tune was created.Gulzar says he has never come across better expression of the song than this one.
The original of this song Jee Dhundhtaa Hai Phir Wahee Fursat Ke Raat Din was written by famous poet Ghalib. Always Madan Mohan used to sing as Dil Dhundhtaa Hai. As the day of recording approached Gulzar told him that the original lyrics of the poet was Jee Dhundhtaa Hai and this should not be tampered .Madan Mohan agreed .On the day of recording Madan Mohan brought the book Ghalib Diwan which is authentic literary work of Ghalib .He pointed at this poem Dil Dhundhtaa Hai Phir Wahee from the book as sung by Madan Mohan always till then..
After finishing the songs for Mausam, Madan Mohan could not live to see the success of the movie. The background score only was pending after his premature death and it was completed by Salil Choudhry.Gulzar regrets he could not work again with such a genius.
दोन्ही किस्से मस्त, मनस्मि
दोन्ही किस्से मस्त, मनस्मि ..
गुलजारला शब्द चुकीचा लक्षात होता म्हणजे?
भुपिंदर व्यतिरीक्त दुसर्या कोणाचा आवाज इंएजिन करता येत नाही त्या गाण्याकरता ..
मटणाच्या रश्श्यात व्हिस्की ..
गजानन, पाहतो मी..त्याची
गजानन, पाहतो मी..त्याची पीडीएफ बनवता येत असल्यास...
मस्त आठवणी जिप्सी,मनस्मि, दिल
मस्त आठवणी जिप्सी,मनस्मि,
दिल ढूंढता हैं अजून थोडं उलगडलं..
C Ramchandra was reputed to
C Ramchandra was reputed to be a very fast composer.
After completing the Tamil version of Azad, its producers wanted to complete its Hindi version on the same sets in Madras in quick time of 3-4 weeks.
For its music Naushad declined the offer on the ground that he did not do a rush job. C Ramchandra, of course created an all time great score. Dilip Kumar wanted Talat Memood to playback for him. When he was unavailable, C Ramchandra convinced Dilip Kumar that he would sing for him in Talat style, and no one would notice the difference. How true when you hear Kita hassen hai mausam. None of his great songs appear to be a rush job, every song seems to be crafted with a great deal of effort.
सी रामचंद्र यांची १९७८ साली घेतलेली मुलाखत..
http://www.youtube.com/watch?v=yLQPSCPIbR8
मेरे नैना सावन भादो ची आठवण
मेरे नैना सावन भादो ची आठवण पंचमदानी सांगितलेली
http://www.youtube.com/watch?v=_4O1v6AG3vU
प्रमोद यांनी पाठवलेली
प्रमोद यांनी पाठवलेली लोकसत्तेतल्या लेखाची पीडीफ - (सात तुकड्यांमध्ये आहे)
खळेसाहेब.१.pdf (135.12 KB)
खळेसाहेब.२.pdf (72.39 KB)
खळेसाहेब.३.pdf (77.88 KB)
खळेसाहेब.४.pdf (80.51 KB)
खळेसाहेब.५.pdf (73.14 KB)
खळेसाहेब.६.pdf (73.44 KB)
खळेसाहेब.७.pdf (38.29 KB)
आजच्या चतुरंग पुरवणीतील
आजच्या चतुरंग पुरवणीतील संगीतकार/गायक श्रीधर फडके यांच्यावरचा लेख
'माझ्या मना, लागो छंद'
गजानन, प्रमोद आणि
गजानन, प्रमोद आणि जिप्सी,
धन्यवाद. सुंदर आठवणी.
सुंदर किस्से मनस्मि....
सुंदर किस्से मनस्मि.... विशेषतः, सचिनदांनी आरडीला दिलेली शहाणीव... छानच.
(बाकीचं ऐकून-वाचून झालम नाहीये)
मनस्मि, दिल ढूंढता है ची अजून
मनस्मि,
दिल ढूंढता है ची अजून एक चाल मदन मोहन च्या आवजात - नीट ऐका आणि आनंद घ्या -
http://www.youtube.com/watch?v=ftywXBCuW6U
सुलु, (वीर झारा चा सीडीचा डबल
सुलु,
(वीर झारा चा सीडीचा डबल पॅक आला त्या दिवशीच घेतला होता. आणि त्यात पहिल्यांदा मेकिंग ची सीडी ऐकली होती). आठवण करुन दिल्याबद्दल अनेक आभार!
मी असे ऐकले आहे की "दिल ढुंढता है" च्या जवळपास १५ चाली त्यानी बनवल्या होत्या.
धन्यवाद.
जान-ए-जा ढुंढता फिर
जान-ए-जा ढुंढता फिर रहा....
The most celebrated hit from Jawani Diwani was 'Jaan-e-jaan dhoondta phir raha', a minor chord-based composition with soul-style strumming and a rapid bongo bat. The strength of the number lay in its harmony, which, unlike most harmonies in Hindi film songs, was not left to the chorus, but was performed by the lead singers Kishore Kumar and Asha Bhonsle. Normally, the harmony in Hindi film songs was used for colouring at critical points, but here, the harmony was almost like a parallel tune.
Furthermore, the change of octave, with Asha Bhonsle pulling off an Usa Uthup, imparted to the song a flavor very different from what Pancham had composed before. It was neither folk, nor rock 'n' roll, nor Latino; it was an Indian melody wrapped in a very Western shell. Pancham also used the echolite for the English flute echoes in the song.
या गाण्यांच्या अनुषंगाने असेच
या गाण्यांच्या अनुषंगाने असेच एक अनवट चालीचे गाणे आठवले....
तिन्ही सांजा सखे मिळाल्या~देई वचन तुला
आजपासुनी जीवे अधिक तु माझ्या~~ ह्र्द्याला...
कोणाला या गाण्याच्या मेक विषयी काही माहिती आहे का?
अवचिता परिमळु (पं. हृदयनाथ
अवचिता परिमळु
(पं. हृदयनाथ मंगेशकरांचे सुंदर विवेचन)
http://www.youtube.com/watch?v=9gIGytP5q68
अवांतरः सारेगमप च्या Established गायकांच्या पर्वात पंडितजींच्या Anecdotes साठी मी तो कार्यक्रम पहायचो. मी युट्युबवर शोधले पण मला फारसे काही मिळाले नाही. तुम्हाला इतर कुठे लिंक्स मिळाल्या तर कृपया शेअर करा.
ह्रुदयनाथानी 'डोलकर' ची
ह्रुदयनाथानी 'डोलकर' ची सांगितलेली अजून एक आठवण -
या गाण्याच्या 'पुरुष' स्वरासाठी हृदयनाथाना असा गायक हवा होता की ज्याचा 'खर्ज' वरच्या स्वराईतकाच मोठा लागेल. सहाजिकच रवींद्र साठे डोळ्यासमोर होते. काही कारणामुळे मग अरुण दातेंना विचारण्यात आलं. त्यानी 'गाण्यात मला कमी स्कोप आहे' असे सांगून नाकारले. आणि मग हेमंतकुमारांकडे दीदी च्या सांगण्यावरून हे गाणे सोपवले.
Pages