कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरी येऊन वर्गणी वसूल करेन सांगतो आधीच <<< येताना मधवडका घेऊनच या बाटलीतून... म्हणजे दोघांचाही फायदा Proud

म्हणूनच तर दोघांचाही फायदा ना... ? Wink

दोघेही 'झिंगालाला हूम... झिंगालाला हूम... ' करत घरी जातील.. (कुणाच्या ते माहीत नाही)

बुवांचे पैसे बुडाले तर त्यांचा कसा फायदा? हां, आता कशाकरता तुमच्याकडे आले हेच विसरले तर मग ठिक आहे Proud

आमच्या बच्चेकंपनीने साफ मना केलंय यायला.
वृंदाताई आणि प्राचीही आहेत बशीत. त्यांना शुक्रवारी निघून शनिवारी परत यायचा बेत कळवलाय. उत्तर आलं की इथे नक्की करते.

वृंदाताई आणि प्राचीही आहेत बशीत.>>>>> त्यांना बच्चे कंपनीत गणतेस की काय सायो? अरे त्या रुसल्या तर रस्त्यात आपण खायच्या गोष्टींकडे कोणाच्या तोंडाकडे बघणार? Proud

बुवा, तुम्ही खायचं राहूनच द्या. तुम्हांला फटके पडतील तेव्हा इन जनरलच कुणाच्या तोंडाकडे बघणार हा विचार करा Proud

सुमॉ, वा वा! Happy
अंजलीही म्हणाली होती लेकीला आणण्याबद्दल.
आर्तीतै रेवाला घेऊन आल्या तर ल्हानीलाही कंपनी होईल. Happy

भाई, देसाईसाहेब येणारेत ़का?
( माहेरच्या माणसाना साहेब वगैरे म्हणाव लागत... 'आला माझ्या माहेरचा वैद्य' च्या चालीवर Happy

सायो, बुवांना हाणण्यात अर्थ नाही. ते एकदम प्रवचन द्यायला लागतात असा अनुभव आहे. शिवाय तेच ड्रायव्हर, म्हणजे प्रवचनाने त्यांची त्यांनाच झोप आली तर पंचाईत! Proud

बाई, आमच्या गावी किर्तन/प्रवचनात बाकीचं पब्लिक डोलत झोपतं असा अनुभव आहे. तसं झाल्यास आपण सेफ Wink

बुवा नको पण प्रवचन आवरा म्हणावं लागणार आहे Proud
वृंदाताई आणि प्राचीकरता बशीत जागा अडवून ठेवा.

मी सोमवारी गाडी बूक करुन टाकू म्हणतो. सध्या तरी ६ डोकी फिक्स आहेत असं दिसतय.
मी, भाई, बाई, सायो, मै, शोनू. जी एस किंवा अजून कोणाला यायचं असेल तर कृपया लवकर कळवा.

गळ घाला म्हटलं 'टाका' नव्हे,
तुम्ही इंग्लिश लिहायला लागलात तर अजिबातच यायचे नाहीत ते.

Pages