शहरात पोचताना गेला बुजून रस्ता

Submitted by तिलकधारी on 20 March, 2013 - 07:58

शहरात पोचताना गेला बुजून रस्ता
आला असेल बहुधा गावाकडून रस्ता

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

सार्‍या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा व्वा.

सर्व शेर आवडले.

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

अप्रतिम! खरीखुरी अनुभूती.

व्वा ! निव्वळ अप्रतिम!

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

सार्‍या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता

स-ला-म !!!

वाह!!

अप्रतिम आहे ही गझल !!

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

>>> क्याबात है !!

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता<<<

वा वा, सुंदर शेर, आटोपशीर गुणी गझल

धन्यवाद

खूप तरल !
डोळ्यांत सापडेना, स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

तितकाच भिडणारा !
हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता
>>
दुसरी ओळ फार घोळतेय मनात...

आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता.................व्वा....... !!

थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता.............मस्त मस्त !!

सुंदर खयाल.........सुंदर गझल ........आवडेश Happy

Pages