शहरात पोचताना गेला बुजून रस्ता

Submitted by तिलकधारी on 20 March, 2013 - 07:58

शहरात पोचताना गेला बुजून रस्ता
आला असेल बहुधा गावाकडून रस्ता

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

सार्‍या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता.................तरल, नाजुक शेर!

सार्‍या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता
...........भाग्यवंताला अनुभव येणारा शेर!

धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता
अतिशय बोलका व धीर देणारा शेर!

अभिनंदन तिलकधारीजी!

अवांतर:
गर्दीमधेच पडती अडकून लोक सारे.......
थोड्याच माणसांना मिळतो चुकून रस्ता!
................. इति गझलप्रेमी

शहरात पोचताना गेला बुजून रस्ता
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता

सार्‍या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
आला असेल बहुधा गावाकडून रस्ता

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता

धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

वा वा ! अशी गझल वाचायला मजा आली Proud

शहरात पोचताना गेला बुजून रस्ता
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता

सार्‍या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
आला असेल बहुधा गावाकडून रस्ता

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता

धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

हे शेर हडळीला आवडले.

केवळ अप्रतिम... आवडले म्हणून सगळेच शेर पुन्हा द्यावे लागतिल.. तरीही..
<<डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता>> अगदी थेट आरपार....

अन हा पर्याय पुसून टाकलेला दिसतोय... पण अतिशय तरल.. लाजवाब
डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता

अभिनंदन, तिलकधारी... एक अतिशय सुरेख गझल.

Pages