Submitted by अविनाश१ on 8 March, 2013 - 04:42
गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास
प्रत्येक छोट्यामोठ्या गावाला ज्ञात-अज्ञात इतिहास असतो. एखाद्या गावाचे नाव हे का पडले याचा शोध घेण्यासाठी इतिहासात डोकावल्यास कित्येक अनाकलनीय गोष्टींची उकल होते. अगदी डोंगरातील एखाद्या लहानात लहान वाडीलादेखील काही ना काही इतिहास असतोच. कित्येक गावांची नावे तर खूपच मजेशीर असतात. त्यांचा सकृत्दर्शनी काहीच संदर्भ लागत नाही. सध्या मी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गावांच्या नावातील व्युत्पत्ती शोधत आहे. आपणदेखील आपल्या भागातील गावांच्या नावामागील व्युत्पत्तीची उकल झाली किंवा त्यासंदर्भात काही धागा सापडला तर तो ह्या धाग्यावर गुंफावा अशी सर्वांना विनंती आहे. जर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर जिल्हावार स्वतंत्र धागे काढावेत अशी ऍडमिनला मी विनंती करतो. धन्यवाद!
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आरंभी अर्थातच 1) कोल्हापूर -
आरंभी अर्थातच 1) कोल्हापूर - देवीने कोल्हासूराचा येथे वध केला.
2) नृसिंहवाडी - काहीजण "नरसोबावाडी' म्हणतात. नृसिंहसरस्वतींचे येथे वास्तव घडले. "नृसिंह' ह्या संस्कृत शब्दास येथील बोलीभाषेत "नरसोबा' असे म्हणतात.
3) औरवाड - "और' म्हणजे "नदीचा पूर' नृसिंहवाडीच्या समोर आहे ते औरवाड. येथे कायम पूर येतो त्यामुळे हे नाव पडलेले असणार.
4) चिखली (प्रयाग) - चिखली गावाच्या पुढे "प्रयाग' हे संगमाचे स्थान आहे. येथे तुळशी-भोगावती व कुंभी-कासारी ह्या नद्यांचा संगम होतो. पाचवी सरस्वती ही गुप्त आहे असे मानले जाते. संगम झाल्यानंतर या नदीला "पंचगंगा' असे म्हणतात. पंचगंगा ही नृसिंहवाडी येथे कृष्णेला मिळते.
आता "चिखली' ह्या नावाविषयी पावसाळ्यात चिखली हे गाव सदैव पूरग्रस्त होत असते. त्यामुळे कायम तेथे चिखल राहत असल्यामुळे "चिखली' हे नाव पडलेले असणार.
5) शिरोळ - मोल्सवर्थमधील अर्थ "To set out-go-walk-come in or at th cool portion of the day'' शिरोळ हे गाव नृसिंहवाडीजवळ आहे. तेथे नृसिंहसरस्वतीचे भिक्षापात्र आहे. यावरून नृसिंहसरस्वती हे वाडीवरून शिरोळला सकाळी लवकर भिक्षा मागण्यासाठी येत असावेत. यावरून हे नाव पडलेले आहे की काय अशी मला शंका येते.
6) वाशी - हे नाव कोणत्या तरी थोर व्यक्तीचा येथे वास घडलेला असतो त्यावरून पडत असावे.
7) गुडाळ - गोदल?
येथे मी तर्क मांडलेले आहेत. त्या-त्या भागातील रहिवासी आणखीन जास्त खुलासा करू शकतील. जस-जसे खुलासे होत जातील तसतशी ही माहिती स्वतंत्रपणे संकलित करता येईल.
मुंबई : मुंबा देवीचे मंदीर
मुंबई : मुंबा देवीचे मंदीर असलेले गाव मुंबा आई चे पुढे मुंबै झाले असावे
तसेच
पवई हे बहुधा पद्मा देवीचे मंदीर असलेले गाव : पद्माई चे पवई झाले असावे
असे माझे मत आहे
कोपरगांवः महर्षी अगस्थी (?)
कोपरगांवः महर्षी अगस्थी (?) तप करत होते तेव्हा गोदावरी नदीला पूर आला. त्यामूळे त्यांच्या तपश्चर्येत बाधा आली. त्यांनी नदीला "कोपराने" ढकलले. नदीचे पात्र त्यामूळे बदलले. आणि गावाचे नाव कोपरगाव झाले. आजही नदीचे जुने पात्र ओळखता येते ते "जुनी गंगा' या नावाने ओळखले जाते .
असा धागा आहे
असा धागा आहे आधीच......
www.maayboli.com/node/41636
धन्स चैत्राली. प्रशासक, आपण
धन्स चैत्राली. प्रशासक, आपण या धाग्यांचे एकत्रीकरण करावे ही वि.
महोदय, मी गावांच्या नावाची
महोदय,
मी गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास (http://www.maayboli.com/node/41723) हा धागा | 8 March, 2013 - 18:42 या वेळी चालू केलेला होता. त्यानंतर त्याला प्रतिसादही सुरु झालेले होते. त्यानंतर माझ्या धाग्यावर Chaitrali ने (8 March, 2013 - 19:51) "नवीन असा धागा आहे आधीच......
www.maayboli.com/node/41636" ही कॉमेंट टाकली.
माझ्यानंतर "गावांच्या नावाचा इतिहास कुमार१ | 5 March, 2013 - 18:54
गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील." हे केवळ एकच वाक्य टाकून हा दुसरा धागा लिहिला.
आमच्या धागा तयार झालेल्या वेळा पाहिल्या तर आपणास लगेच लक्षात येईल. त्यांची वेळ आहे माझ्या(18:42) नंतर १२ मिनिटे म्हणजेच 18:54 . आता त्यांचा नोड क्रमांक माझ्यापेक्षा कमी कसा मिळाला हे मला न उलघडलेले कोडे आहे.
तरी कुमार1 ने म्हटल्याप्रमाणे आणि माझा धागा अगोदरचा असल्यामुळे त्यांचा धागा माझ्या धाग्यात विलिन करावा ही विनंती.
अविनाश, १८: ४२ आणि १८:५४ कडे
अविनाश,
१८: ४२ आणि १८:५४ कडे इतके लक्ष देत आहात तर तारखेकडे देखील लक्ष द्या;
चैत्रालीने कमेंट १८:५१ ला टाकली आहे. तुमच्या म्हणण्यानुसार कुमार यांचा धागा १८:५४ला चालू झाला हे कसे काय?? तर कुमार यांचा धागा ५ मार्चला चालू झाला, आणि तुमचा धागा ८ मार्चला. कुठली तारीख आधी येते? कुणाचा धागा आधीपासून आहे??
SORRY कुमार1 &
SORRY कुमार1 & Maaybolikar
Thanks नंदिनी
मी तारखेकडे पाहिलेच नाही. एक मात्र तेवढेच सत्य आहे की कुमार यांनी काढलेल्या धाग्याची मला बिलकूल कल्पना नव्हती. खरं तर ज्या पद्धतीने मी हे पत्र लिहिलेले आहे तसेच कुमार1 ह्यांनी लिहावयास हवे होते. त्यांनी ते लिहिले नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
एक मात्र नक्की दोघांच्या मनात साधारण पणे एकाच वेळी ह्या धाग्याचा विचार आला. ह्यावरून काहीतरी कुमार1 व अविनाश1 ह्यांचे ब्रिजींग असले पाहिजे. दोघांच्याही नावात 1, 1 आहे. त्यांचे नाव मी काल पहिल्यांदाच पाहिले. आणि मुख्य म्हणजे त्यांनी 5 मार्चला धागा काढला आणि माझा धागा उगवेपर्यंत त्यांच्या धाग्यावर एकही प्रतिसाद नव्हता. थोडक्यात परिस्थिती अशी होत गेली की त्यांच्या धाग्यावरील 5 तारखेकडे माझे लक्षच गेले नाही. नंदिनी ह्यांनी ते दाखवून दिले त्यामुळे त्यांचे पुनश्र्च धन्यवाद.
पुढील माहिती या धाग्यावर
पुढील माहिती या धाग्यावर लिहावी. http://www.maayboli.com/node/41636