हौस

Submitted by समीर चव्हाण on 15 January, 2013 - 07:33

काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते

बोलायचे होते तुझ्याशी, राहिले
ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते

उरली न आता जिद्द जगण्याची, जणू
आयुष्य भरकटल्याप्रमाणे वाटते

लागे जिव्हारी बोल कोणाचा असा
काटा उरी तुटल्याप्रमाणे वाटते

आता स्मरेना नेमके माझे मला
काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते

(हौस संग्रहातून)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वर आणली म्हणून

इतरांच्याही वाचनीय गझला वर आणाव्यात ही विनंती
(आमचाही नंबर लागला तर बरे होईल !!! ;))

Pages